विभक्ती व त्यांचे प्रकार | Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 20, 2023

विभक्ती व त्यांचे प्रकार | Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi

VIBHAKTI PRAKAR

विभक्ती व त्यांचे प्रकार

Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup

Vibhakti Pratyay in Marathi

विभक्ती व त्यांचे प्रकार | Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi

विभक्ती व त्यांचे प्रकार ( Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi) :- 

            विभक्ती व त्यांचे प्रकार ( Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi ) या घटकावर विभक्ती म्हणजे काय ? , विभक्तीचे प्रकार किती व कोणते ?, विभक्ती उदाहरण, विभक्ती प्रत्यय ओळखा, विभक्तीचा कारकार्थ ओळखा अशा प्रकारची प्रश्न स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी विभक्ती प्रत्येय, कारकार्थ व सामान्य रूप | Vibhakti Pratyay Karakarth v Samany Rup ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी विभक्ती प्रत्येय, कारकार्थ व सामान्य रूप | Vibhakti Pratyeya Karakarth v Samany Rup ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया विभक्ती व त्यांचे प्रकार | Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi ) .


123


विभक्ती म्हणजे काय?

            नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ (Vibhakti) असे म्हणतात.

प्रत्यय म्हणजे काय?

          जेव्हा शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना प्रत्यय ( Pratyay ) असे म्हणतात.

विभक्ती प्रत्येय म्हणजे काय?

            नामे किंवा सर्वनामे यांचे विभक्तीत रूपांतर होताना जी अक्षरे जोडली जातात त्यास 'विभक्ती प्रत्यय' (Vibhakti Pratyey) असे म्हणतात.

विभक्ती उदाहरण :- फूल  = फुलाचा, फुलाला, फुलाने, फुला


कारकार्थ म्हणजे काय?

            नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास 'कारकार्थ किंवा  कारकसंबंध' (Karakarth / Karaksambandh)  म्हणतात. कारकार्थ मध्ये षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही ते उपपदार्थ निर्माण करतात.

उपपदार्थ म्हणजे काय?

            नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापद सोडून इतर शब्दाशी जो संबंध असतो त्यास 'उपपदार्थ' (Upapadarth) म्हणतात. षष्टी व संबोधन यांचा समावेश होत नाही.


सामान्य रूप म्हणजे काय?

            नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याच्या रुपात जो बदल होतो त्याला 'सामान्य रूप' ( Samanya Rup ) असे म्हणतात.

सामान्यरूप उदाहरण :- फूल  = फुलाचा, फुलाला, फुलाने, फुला

            वरील वाक्यात फुल (सरळ / मूळ रूप ) हे नाम आहे. चा, ला, ने, स ही त्याला प्रत्येय लागली आहेत. तर फुला हे सामान्य रूप आहे.  

हे पण पहा :- सामान्य रूप

विभक्ती प्रत्येय [ Vibhakti Pratyey ]

विभक्तीविभक्ती प्रत्येय
एकवचन
विभक्ती प्रत्येय
अनेक वचन
 कारकार्थ
प्रथमा----कर्ता
व्दितीयास, ला, तेस, ला, ना, तेकर्म
तृतीयाने, ए, शीनी, शी, ई, हीकरण
(साधन)
चतुर्थीस, ला, तेस, ला, ना, तेसंप्रदान
(दान/भेट)
पंचमीऊन, हुनऊन, हुनअपादान
(दुरावा/वियोग)
षष्टीचा, ची, चे, च्याचा, ची, चे, च्यासंबंध
सप्तमीत, ई, आत, ई, आअधिकरण
(स्थळ/वेळ)
संबोधन--नोहाक


विभक्ती प्रत्येय उदाहरण [ मुल ]


विभक्तीविभक्ती प्रत्येय
एकवचन
विभक्ती प्रत्येय
अनेक वचन
प्रथमामुलमुले
व्दितीयामुलास, मुलालामुलांस, मुलांना, मुलांला
तृतीयामुलाने, मुलाशीमुलांनी, मुलांशी
चतुर्थीमुलास, मुलालामुलांस, मुलांना, मुलांला
पंचमीमुलातून, मुलाहूनमुलांतून, मुलांहून
षष्टीमुलाचा, मुलाची,
मुलाचे, मुलाच्या
मुलांचा, मुलांची,
मुलांचे, मुलांच्या
सप्तमीमुलातमुलांत
संबोधन
मुलांनो


विभक्तीचे प्रकार व कारकार्थ :-

मराठी भाषेमध्ये विभक्तीचे आठ प्रकार आहेत. तर कारकार्थचे सहा प्रकार आहेत. 

हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय

विभक्तीचे प्रकार कोणते?

विभक्तीचे आठ प्रकार

प्रकारविभक्तीचे प्रकार
प्रथमा
व्दितीया
तृतीया
चतुर्थी
पंचमी
षष्टी
सप्तमी

संबोधन


कारकार्थाचे प्रकार कोणते?

कारकार्थाचे सहा प्रकार

क्रकारकार्थाचे प्रकार
कर्ता
कर्म
करण
संप्रदान
अपादान
अधिकरण

हे पण पहा :- सिद्ध शब्द

१] प्रथमा विभक्ती  : कारकार्थ - कर्ता

            जेव्हा कर्ता, कर्म व क्रियेचे स्थळ, वेळ दर्शवणाऱ्या शब्दाला प्रत्यय नसतील तेव्हा ती प्रथमा विभक्ती असते. 
            क्रियापदाने दर्शविलेली क्रिया करणारा कोणीतरी असतो, त्यास ‘कर्ता’ असे म्हणतात. व त्या कर्त्यांची विभक्ती केव्हा-केव्हा प्रथमा असते. प्रथमा विभक्तीचा कारकार्थ 'कर्ता' असतो.

प्रथमा विभक्ती उदाहरण :-

१] राम देव होता.
२] पियुष सायकल खेळतो.
३] पेट्रोल ११५ रुपये लिटर आहे.
४] राम दोन मैल चालतो.
५] रोहित तीन आठवडे कबड्डी खेळला.

२] व्दितीया विभक्ती : कारकार्थ - कर्म

            जेव्हा कर्माला स, ला, ना, ते हे प्रत्यय असतील व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल तर ती व्दितीया विभक्ती असते. 
            कर्त्यांने केलेली क्रिया कोणावर तरी घडली हे सांगणारा शब्द म्हणजे ‘कर्म’ होय. द्वितीया विभक्तीचा कारकार्थ 'कर्म' असतो. कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती व्दितीय नसते. जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते प्रथमा विभक्ती असते.

व्दितीया विभक्ती उदाहरण :-

१) राजाने प्रधानाला बोलावले.
२) पोलिसाने चोरास पकडले.
३] तो मालकास कडक शब्दात बोलला.
४] अधिकार्याने कामगारांना फटकारले.

* पोलिसाने चोर पकडला. – कर्ता (प्रथमा)

३] तृतीया विभक्ती : कारकार्थ - करण [ साधन ]

            जेव्हा क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली हे दर्शवणाऱ्या नामांना ने, ए, शी, नी प्रत्यय लागलेले असते तेव्हा तृतीया विभक्ती होते. 
            वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते त्याला ‘करण’ असे म्हणतात. तृतीया विभक्तीचा कारकार्थ 'करण [ साधन ]' असतो.

तृतीया विभक्ती उदाहरण :-

१] घरमालक दोन वर्षांनी येतात.
२] कुत्रा पायथ्याशी बसला.
३] मुलाने चाकूने केक कापले.
४] रोहित बंदुकीने शिकार करतो.
५] शेतकरी नांगराने शेत नागरतो.


४] चतुर्थी विभक्ती : कारकार्थ - संप्रदान [ दान/भेट ]

            जेव्हा वाक्यात स, ला, ना, ते प्रत्यय असून दान किंवा भेटीचा वर्णन होत असेल तेव्हा ती  चतुर्थी विभक्ती असते. 
            जेव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते तेव्हा ते दान (कोणतीही वस्तू) ज्याला करण्यात येते त्या शब्दाला किंवा क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला व स्थानाला ‘संप्रदान’ असे म्हणतात. दान देण्याची क्रिया ज्याच्यावर होते त्याला ‘संप्रदान’ असे म्हणतात. चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ ‘संप्रदान’ असतो. 

चतुर्थी विभक्ती उदाहरण :-

१] मी गुरुजींना दक्षिणा दिली.
२] आजीने नातीला गोष्ट सांगितली.
३] गुरुजी मुलांना व्याकरण शिकवतात.
४] दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
५] करणाने इंद्राला कवच कुंडले दिली.
  
हे पण पहा :- द्वंद्व समास

५] पंचमी विभक्ती : कारकार्थ - अपादान [ वियोग/दुरावा ]

            जेव्हा वाक्य दुरावा, वियोग किंवा अंतर दर्शवत असेल आणि वाक्यात ऊन, हुन प्रत्यय असतील तेव्हा तेथे पंचमी विभक्ती होते. 
            क्रिया जेथून सुरू होते तेथून ती व्यक्ती व वस्तू दूर जाते म्हणजे क्रियेच्या संबंधाने त्याच्यापासून एखाधा वस्तूचा वियोग दाखविण्याचा असतो त्यास ‘अपादान’ म्हणतात. पंचमी विभक्तीचा कारकार्थ ‘अपादान’ असतो. 

पंचमी विभक्ती उदाहरण :-

१] खेडयाहून शहर मोठे असते.
२] धिरज नागपूरहून आला.
३] साप बिळातून बाहेर गेला.
४] मी शाळेतून आताच घरी आलो.  
५] फक्त त्याच्या हातून हे काम होऊ शकते.

६] षष्ठी विभक्ती : कारकार्थ - संबंध

            जेव्हा वाक्यात चा, ची, चे, च्या प्रत्यय असतील आणि वाक्य संबंध दर्शवत असेल तर तेथे षष्टी विभक्ती होते.

षष्टी विभक्ती उदाहरण :-

१) मुलांचे खाऊन झाले.
२) आमचा रेल्वेचा प्रवास संपला.
३) ससा हातचा निसटला.
४] तो सुयशचा भाऊ आहे.
५] बर्फाचे पाणी झाले.

हे पण पहा :- सर्वनाम

७] सप्तमी विभक्ती : कारकार्थ - अधिकरण

            जेव्हा स्थळ, वेळ, साधन दर्शवणाऱ्या शब्दांना त, ई, आ प्रत्यय जोडले असतात तेव्हा तेथे सप्तमी विभक्ती होते.
            वाक्यातील क्रिया कोठे किंवा केव्हा घडली हे क्रियचे स्थान किंवा काळ दर्शविणार्‍या शब्दांच्या संबंधास ‘अधिकरण’ असे म्हणतात. सप्तमी विभक्तीचा कारकार्थ ‘अधिकरण’ असतो.

सप्तमी विभक्ती उदाहरण :-

१] तेजस सायंकाळी अभ्यास करतो.
२] माझ्या घरात पाच मांजरी आहेत.
३] मी शाळेत जाणार नाही
४] सतीश दररोज सकाळी व्यायाम करतो.
५] मला रविवारी सुट्टी असते. 


८] संबोधन विभक्ती 

            जेव्हा नामाने हाक मारली जाते तेव्हा संबोधन विभक्ती म्हणतात, सर्वनामांना हाक मारता येत नाही त्यामुळे त्याची संबोधन विभक्ती होत नाही.

संबोधन विभक्ती उदाहरण :-

१] रामदास, मोठ्याने बोल.
२] मुलांनो, व्यायाम करा.
३] शरद, जोरात धाव.
४] सुयश, झोपून घे.
५] गोलू, अभ्यास कर.



            आम्ही तुम्हाला येथे विभक्ती म्हणजे काय? प्रत्येय म्हणजे काय? विभक्ती प्रत्येय म्हणजे काय? कारकार्थ म्हणजे काय? उपपदार्थ म्हणजे काय? सामान्य रूप म्हणजे काय? व या  या सर्वांचे उदाहरण, विभक्तीचे प्रकार व कारकार्थ ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला विभक्ती व त्यांचे प्रकार ( Vibhakti Prakra | Vibhakti Pratyey Karakarth v Samany Rup | Vibhakti Pratyay in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad