मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार | Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 18, 2023

मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार | Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi

ADVERB AND THEIR TYPES IN MARATHI

मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार

Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi

मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार | Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi

मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार ( Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi ) :- 

          मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार ( Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार ( Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Types of  Adverb in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार ( Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
          चला तर मग आपण बघूया मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार | Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi ) .

हे पण पहा :- क्रियापद


क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

        क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय ( Kriyavisheshan Avyay ) असे म्हणतात. 

          क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण ( Kriyavisheshan ) म्हणतात.

          क्रियाविशेषण काही विकारी असतात तर काही अविकारी असतात.


क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक

          क्रियाविशेषण कर्त्याचे लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते तर क्रियाविशेषण अव्यय हे त्यानुसार बदलत नाही.


क्रियाविशेषणक्रियाविशेषण अव्यय
तो चांगला खेळतो.तो हळूहळू चालतो.
ती चांगली खेळते.ती हळूहळू चालते.
ते चांगले खेळतात.ते हळूहळू चालतात.
तु चांगला खेळतो.तु हळूहळू चालतो. 

उदाहरणार्थ :-

   १) सभोवार हिरवळ पसरली आहे.
   २) आजन्म मी माझ्या देशाची सेवा करीन.
   ३) परीक्षेचे दिवस जवळ येत चालले.
   ४) तू हळूच बोल जरा.
   ५) यंदा अधिक पैसा मिळेल.

क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार कोणते?

क्रियाविशेषण अव्ययाचे मुख्य चार प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.

क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार

क्रक्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार
कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय
परिमानवाचक क्रियाविशेषण अव्यय

हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय

१) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          जी क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याची वेळ दर्शवितात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण :-
    १) फिरून तुम्ही तोच मुद्धा उपस्थित केरतात.
    २) बाबा उदया कामावर जातील.
    ३) दिवसभर ऊन रणरणत होते.
    ४) पाऊस सतत कोसळत होता.
    ५) तो वारंवार आजारी पडलो
    ६) आई दररोज मंदिरात जाते.
    ७) तो नेहमी खोटे बोलतो.
    ८) आपण केव्हा आलात?
    ९) पाऊस रात्री झाला.
    १०) सुसंगती सदा घडो.


कालवाचक क्रियाविशेषण अव्यायाचे प्रकार कोणते?

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. 

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार

क्रकालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार
कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय
सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय
आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय


अ) कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          क्षणभर, आज, उदया, आता, नंतर, हल्ली, सध्या, आधी, लगेच, जेव्हा, पुर्वी, केव्हा, दिवसा, रात्री, अवकाळी, यरवाळी, सांप्रत, लुर्ल, नुकतेच, इ. अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो.
उदाहरणार्थ :-.
    १) बाबा उदया कामावर जातील.
    २) आपण केव्हा आलात?
    ३) पाऊस रात्री झाला.
    ४) अवकाळी पाऊस पडला.
    ५) त्याने क्षणभर विश्रांती घेतली.

ब) सातत्य दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, सर्वकाळ, दिवसभर, रात्रभर, महीनाभर, वर्षभर, अद्यापी, हमेशा, सदोदीन, आजकाल, सतत अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केला असतो.
उदाहरणार्थ :-.
    १) पाऊस सतत कोसळत होता.
    २) सुसंगती सदा घडो.
    ३) दिवसभर ऊन रणरणत होते.
    ४) तो नेहमी खोटे बोलतो.
    ५) रात्रभर पाऊस उघडला नाही.

हे पण पहा :- तत्पुरुष समास

क) आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          पुन:पुन्हा, वारंवार क्षणोक्षणी, दररोज, साल, सालो, फिरून अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो
उदाहरणार्थ :-
    १) आई दररोज मंदिरात जाते.
    २) तो वारंवार आजारी पडतो.
    ३) फिरून तुम्ही तोच मुद्धा उपस्थित केरतात.
    ४) पुन:पुन्हा तोच क्षण आठवतो.
    ५) आयुष्यात त्याने कधीही फिरून नाही बघितले.


२) स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          जे क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ / ठिकाण दर्शवितात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) येथून गाव दूर आहे.
    २) बस स्थानक डावीकडे आहे.
    ३) राजेश माझ्या मागुन आला.
    ४) बस स्थानक डावीकडे आहे.
    ५) पवन बाहेरून आला.
    ६) पलीकडे एक विहीर आहे.
    ७) पलीकडून आवाज येतो.
    ८) सुयश बाहेर गेला.
    ९) तेथून पाणी आन.
    १०) रमेश खाली बसला.
    

स्थलवाचक क्रिया विशेषणाच अव्ययाचे प्रकार कोणते?

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे दोन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. 

हे पण पहा :- तद्भव शब्द

स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार

क्रस्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार
स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय 
गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय


अ) स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          येथे, तेथे, मागे, पुढे, वर, खाली, अलिकडे, पलिकडे, जिकडे, तीकडे, मध्ये, सभोवार, आत, बाहेर, सभोवती, सभोवताली, डावीकडे, उजवीकडे, इकडे, सर्वत्र अशाप्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो.
उदाहरणार्थ :-
    १) रमेश खाली बसला.
    २) बस स्थानक डावीकडे आहे.
    ३) पुस्तक वर आहे.
    ४) पलीकडे एक विहीर आहे.
    ५) सुयश बाहेर गेला.


ब) गतीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          येथून, तेथून, मागुन, पुढून, समोरून अलिकडून, पलीकडून, खालुन, मधून, डावीकडून उजवीकडू बाहेरून अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो
          सहसा स्थितीदर्शक दर्शक शब्दाला ऊन व हून प्रत्येय लागुन गतीदर्शक शब्द तयार होतात.
उदाहरणार्थ :-
    १) येथून गाव दूर आहे.
    २) राजेश माझ्या मागुन आला.
    ३) पवन बाहेरून आला.
    ४) पलीकडून आवाज येतो.
    ५) तेथून पाणी आन.


हे पण पहा :-सामासिक शब्द

३) रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          वाक्यातील क्रिया कशी आहे किंवा कोणत्या रिती / पद्धतीने घडते आहे हे दाखविनाऱ्या शब्दाला रितीवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

          सावकाश, जोरान, हळू, हळूहळू, पटपट, जलद, खचीत, खरोखर, फुकट, उभ्याने, अपोआप, मुद्दाम, खरोबर, खळखळ, चमचम, धापधाप, वटवट, तेवी, झटझट, झटपट, बदाबद अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो.
उदाहरणार्थ :-.
    १) वचन दिल्या प्रमाणे तो खरोखर आला
    २) तो जलद धावला.
    ३) खचितच तो खोटे बोलतो.
    ४) पाणी खळखळ वाहते.
    ५) मला पाहून तो झटकन गेला.


४) परिमान वाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

          जे अव्यय क्रियेचे परिमान दर्शविते किंवा क्रिया किती वेळा घडली हे दर्शवीते त्याला परिमान / संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

          थोडा, मुळीच, क्वचीत, अतिशय, बिलकुल, पूर्ण, मोजके, भरपुर, किंचीत, जास्त, अत्यंत, अगदी, कमी, जास्त, काहीसा, खुप, जरा, अर्धा अशा प्रकारच्या शब्दांचा त्यात वापर केलेला असतो.

उदाहरणार्थ :-
    १) तो मुळीच घाबरला नाही.
    २) क्वचीत मुले अभ्यास करतात.
    ३) गुरुजी किंचीत हसले
    ४) तो भरपूर जेवला.
    ५) राहुल मोजके बोलतो.



            आम्ही तुम्हाला येथे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय ? , क्रियाविशेषण अव्यय उदाहरण, क्रियाविशेषण अव्यय प्रकार, क्रियाविशेषण अव्यय वाक्य ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार | Adverb and their types in Marathi | Kriyavisheshan Avyay v Tyache Prakar | Adverb in Marathi | Types of Adverb ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad