आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ | Alankarik Shabd V Tyanche Arth - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 31, 2023

आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ | Alankarik Shabd V Tyanche Arth

 आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

Alankarik Shabd V Tyanche Arth


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ | Alankarik Shabd V Tyanche Arth

आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ (Alankarik Shabd V Tyanche Arth) :- 

            आलंकारिक शब्द ( Alankarik Shabd ) हा भाषेचा जणू आलंकारच असतो भाषेला सौंदर्य प्राप्त करण्याचे काम या आलंकारिक शब्दांमुळेच Alankarik Shabd ) शक्य होते.आलंकारिक शब्दाचा Alankarik Shabd ) शाब्दिक अर्थ लक्षात न घेता त्यामागील भावार्थ समजून घेणे आवश्यक असते. म्हणून आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ ( Alankarik Shabd V Tyanche Arth ) माहीत असणे आवश्यक आहे. आलंकारिक शब्दांचा अर्थ Alankarik Shabd Meaning | Alankarik Shabd Arth ) माहित नसेल तर त्यातून चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. 
            स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ ( Marathi Alankarik Shabd V Tyanche Arth ) यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला आलंकारिक शब्द मराठी व त्यांचे अर्थ (Alankarik Shabd Marathi V Tyanche Arth) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ (Alankarik Shabd V Tyanche Arth) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ  (Alankarik Shabd V Tyanche Arth).


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ 

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
अकरावा रूद्रअतिशय तापट माणूस
अकलेचा कांदामूर्ख
अरण्य पंडितमूर्ख मनुष्य
अरण्यरुदननिष्फळ तक्रार
अष्टपैलूअनेक चांगले गुण असलेला
अळवावरचे पाणीफार काळ न टिकणारे
अक्षरशत्रूअशिक्षित
अंडी पिल्लीगुप्त गोष्ट
अंधेर नगरीअव्यवस्तीत पनाचा कारभार
ओनामाएखाद्या गोष्टीची सुरवात
अकलेचा खंदकअत्यंत मूर्ख माणूस.
अजातशत्रूज्याला कोणीही शत्रू नाही असा
अठरा गुणांचा खंडोबा
लबाड. दुर्गुणी
अस्तनीतला निखारागुप्त शत्रू
अदेलातटूआपलाच हेका चालविणारा
आग्यावेताळरागीट माणूस
अडणीवरचा शंखउच्चपदावर असलेला बेअकली


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ 

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
उंटावरचा शहाणामूर्खपणाचा सल्ला देणारा
उंबराचे फुलअगदी दुर्मिळ वस्तू
उपट सुंभभलता सुलता कुणीतरी


आलंकारिक शब्दाचा अर्थ

[ Alankarik Shabd Arth ]

शब्द अर्थ
कुत्र्याचे भूतरागीट मनुष्य
कळसूत्री बाहुलेदुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
कळीचा नारदभांडण लाऊन देणारा
काडी पहिलवानहडकुळा माणूस
कुंभकर्णझोपाळू माणूस
कैकयीद्रुष्ट स्री
कोल्हेकुईलोकांची वटवट
कर्णाचा अवतारदानशूर, उदार माणूस.
कळसूत्री बाहुलीदुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
कळीचा नारदभांडण लावून देणारा
कूपमंडूकसंकुचित वृत्तीचा मनुष्य
कुबेरश्रीमंत मनुष्य


आलंकारिक शब्दाचा अर्थ

[ Alankarik Shabd Meaning ]

शब्द अर्थ
खडास्टकभांडण
खुशालचंदअतिशय चैनिखोर
खेटराची पूजाअपशब्दाने खरडपट्टी काढणे
खडाजंगीजोरदार मोठे भांडण
खुशाल चेंडूअतिचैनी मनुष्य


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
गजांतलक्ष्मीश्रीमंत मनुष्य
गप्पीदासथापा गप्पा मारणारा
गर्भश्रीमंतजन्मापासून श्रीमंत
गंगा यमुनाडोळ्यातले अश्रू
गंडांतरभीतीदायक संकट
गाजर पारखीकसलीही पारख नसलेला, मूर्ख 
गाढवबेअकली माणूस
गुरुकिल्लीमर्म, रहस्य
गुळाचा गणपतीमंद बुद्धीचा
गोकुळमुलाबाळांनी भरलेले घर
गोगलगायगरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
गळ्यातला ताईतअत्यंत प्रिय
गुलाबाचे फूलनाजूक व्यक्ती
गाव मामासर्वाना आपला वाटणारा
गौडबंगालचमत्कारिक गूढ


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
घरकोंबडाघराबाहेर न पडणारा
घोरपडचिकाटी धरणारा
घटोत्कचकपटी मनुष्य


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
चरपट पंजिरीनिरर्थक बडबड
चालता काळवैभवाचा काळ
चौदावे रत्नमार
चतुर साबाजीमूर्ख मनुष्य
चामुंडाकजाग स्री
चंडिकाकजाग स्री


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
छत्तीसचा आकडाशत्रुत्व
छक्के पंजे डावपेच



आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
जमदग्नीचा अवताररागीट माणूस


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
टोळभैरवनासाडी करणारे लोक


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
ताटाखालचे मांजरदुसऱ्याच्या तंत्राने वागणारा
तिस्मारखा   अरेरावी करणारा 
तुकारामबुवाचा अवतारभोळा मनुष्य


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
त्रिशंकूधड ना इकडे, ना तिकडे
त्राटिकांकजाग स्री



आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
थंडा फराळउपवास


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

शब्द अर्थ
दगडावरची रेघकधीही न बदलणारे
दुपारची सावलीअल्पकाळ टिकनारे
देवमाणूससाधाभोळा माणूस
द्राविडी प्राणायामविनाकारण केलेला खटाटोप
दीड शहाणामूर्ख मनुष्य
दुर्वास रागीट मनुष्य


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
धारवाडी काटाबिनचूक वजनाचा काटा
धोपट मार्गसरळ मार्ग, अचूक मार्ग.
धर्मराजसत्यवचनी, नेहमी सत्य बोलणारा


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

शब्द अर्थ
नवकोट नारायणखूप श्रीमंत
नंदीबैलहो ला हो म्हणणारा
नरसिंहपराक्रमी


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
पर्वणीअतिशय दुर्मिळ योग
पाताळयंत्रीकारस्तान करणारा
पांढरा कावळानिसर्गात नसलेली वस्तू
पिकले पानम्हातारा मनुष्य
पांढरा परीसलबाड माणूस
पोपटपंचीअर्थ न समजता पाठांतर करणे
पाण्याचे पितरहडकुळा
पिलाषष्ठीचा योगदुर्मिळ संधी


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
बृहस्पतीबुद्धिमान व्यक्ती
बोकेसंन्याशीढोंगी मनुष्य
बोलाचीच कढीकेवळ शाब्दिक वचन
बिन भाड्याचे घरतुरुंग
बादरायण संबंधओढून ताणून दाखवलेले संबंध



आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
भगीरथ प्रयत्नअटोकाट प्रयत्न
भाकड कथाबाष्कळ गोष्टी
भीष्म प्रतिज्ञाकठीण प्रतिज्ञा
भांगेमध्ये तुळसवाईटांच्या पोटी चांगले अपत्य


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
मंथरादुष्ट स्त्री
मायेचा पूतमायाळू माणूस
मारुतीचे शेपूटलांबत जाणारे काम
मृगजळकेवळ आभास
मेषपात्रबावळट मनुष्य
मुखस्तंभन बोलता उभ राहणारा
मुक्ताफळेवेडेवाकडे शब्द
महामायाकजाग स्री


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
रुपेरी बेडीचाकरी
रामबाण औषधअचूक गुणकारी
रडतरावइच्छा नसताना काम करणारा
रामसत्यवचनी


आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
लंकेची पार्वतीअंगावर एकही दागिना नसलेली स्री
लंबकर्णबेअकली मनुष्य


आलंकारिक शब्द मराठी व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd Marathi V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
वाटण्याच्या अक्षतानकार
वाहती गंगाआलेली संधी
वामन मूर्तीटका माणूस
वरणभातविजोड जोडपे


आलंकारिक शब्द मराठी  व त्यांचे अर्थ

[ Alankarik Shabd Marathi V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
शकुनी मामाकपटी मनुष्य
शिराळशेठअतिशय चैनी
शुंभमंद बुद्धीचा
शूर्पणखाकुरूप स्री
शेंदाड शिपाईभित्रा मनुष्य
शेंडे फळघरातील सर्वात लहान किंवा लाडका


मराठी आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Marathi Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
श्रीगणेशाआरंभ करणे


मराठी आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ

[ Marathi Alankarik Shabd V Tyanche Arth ]

शब्द अर्थ
सव्यसाचीडाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
स्मशान वैराग्यतात्कालिक वैराग्य
सांबाचा अवतारअत्यंत भोळा मनुष्य
सुळावरची पोळीजीव धोक्यात घालण्यासारखे काम
सूर्यवंशीउशिरा उठणारा
सोन्याचे दिवसचांगले दिवस
सिकंदरभाग्यवान
सिकंदर नशीबफार मोठे नशीब



खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य आलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा

१] सतीश हा आमच्या गावातील ...................... आहे.
    अ) भांडखोर
    ब) कळ लावणारा
    क) कळीचा नारद
    ड) भांडकुदाळ

२] सीताचे पंजोबा ................. च जणू कधीतरी गळून पडणारच!
    अ) गाजरपारखी 
    ब) बोकेसंन्याशी
    क) अक्षरशत्रू
    ड) पिकलेले पान

३] आमचे शाळेच्या बाई इतक्या रागीट जणू ............... च.
    अ) जमदग्निचा अवतार
    ब) कैकयी
    क) तिस्मारखा
    ड) देवमाणूस


          तुम्हाला आलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ | Alankarik Shabd V Tyanche Arth ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad