अव्ययीभाव समास
Avyayi bhav Samas in Marathi
Avyayibhav Samas
अव्ययीभाव समास ( Avyayi bhav Samas | Avyayi bhav Samas in Marathi ) :-
अव्ययीभाव समास ( Avyayi bhav Samas | Avyayi bhav Samas in Marathi ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला अव्ययीभाव समास ( Avyayibhav Samas | Avyayibhav Samas in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी अव्ययभाव समास ( Avyaybhav Samas | Avyaybhav Samas in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
अव्ययीभाव समास म्हणजे काय?
समासातील पहिले पद अव्यय असून ते प्रधान असते व सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो तेव्हा समासास अव्ययीभाव समास ( Avyayibhav Samas ) असे म्हणतात.
अव्ययीभाव समासातील शब्द बहुदा स्थळ, काळ व रितीवाचक असतात.
अव्ययीभाव समासाची उदाहरणे
सामासिक शब्द विग्रह पदोपदी प्रत्येक पदी दारोदार प्रत्येक दारात
प्रतिदिन प्रत्येक दिन प्रतिदिवस प्रत्येक दिवस दरसाल प्रत्येक वर्षी दररोज प्रत्येक दिवशी / रोज हररोज प्रत्येक दिवशी / रोज दिवसेंदिवस प्रत्येक दिवस बरहुकूम हुकुमाप्रमाणे यथाशक्ति शक्तीप्रमाणे यथाक्रम क्रमाप्रमाणे बिनधास्त धास्ती शिवाय बिनचूक चुकी शिवाय बेमालूम माहिती शिवाय आमरण मरणापर्यंत आजन्म जन्मापासून प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला यथान्याय न्यायाप्रमाणे बेशक शंकेशिवाय बेलाशक शंकेशिवाय गैरहजर हजेरीशिवाय बिनधोक धोक्याशिवाय बिनशर्त शर्तीशिवाय गैरशिस्त शिस्तीशिवाय घरोघरी प्रत्येक घरी वारंवार प्रत्येक वारी आजन्म जन्मापासून जागोजागी प्रत्येक जागी पानोपानी प्रत्येक पानात गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत प्रतिमास प्रत्येक महिना आजीवन जीवनापासून
आजन्म जन्मापासून यथाविधी विधी प्रमाणे यथामती मती प्रमाणे रस्तोरस्ती प्रत्येक रस्त्यात दरमजल प्रत्येक मजल
सामासिक शब्द | विग्रह |
---|---|
पदोपदी | प्रत्येक पदी |
दारोदार | प्रत्येक दारात |
प्रतिदिन | प्रत्येक दिन |
प्रतिदिवस | प्रत्येक दिवस |
दरसाल | प्रत्येक वर्षी |
दररोज | प्रत्येक दिवशी / रोज |
हररोज | प्रत्येक दिवशी / रोज |
दिवसेंदिवस | प्रत्येक दिवस |
बरहुकूम | हुकुमाप्रमाणे |
यथाशक्ति | शक्तीप्रमाणे |
यथाक्रम | क्रमाप्रमाणे |
बिनधास्त | धास्ती शिवाय |
बिनचूक | चुकी शिवाय |
बेमालूम | माहिती शिवाय |
आमरण | मरणापर्यंत |
आजन्म | जन्मापासून |
प्रतिक्षण | प्रत्येक क्षणाला |
यथान्याय | न्यायाप्रमाणे |
बेशक | शंकेशिवाय |
बेलाशक | शंकेशिवाय |
गैरहजर | हजेरीशिवाय |
बिनधोक | धोक्याशिवाय |
बिनशर्त | शर्तीशिवाय |
गैरशिस्त | शिस्तीशिवाय |
घरोघरी | प्रत्येक घरी |
वारंवार | प्रत्येक वारी |
आजन्म | जन्मापासून |
जागोजागी | प्रत्येक जागी |
पानोपानी | प्रत्येक पानात |
गल्लोगल्ली | प्रत्येक गल्लीत |
प्रतिमास | प्रत्येक महिना |
आजीवन | जीवनापासून |
आजन्म | जन्मापासून |
यथाविधी | विधी प्रमाणे |
यथामती | मती प्रमाणे |
रस्तोरस्ती | प्रत्येक रस्त्यात |
दरमजल | प्रत्येक मजल |
उपसर्गा ऐवजी बहुदा खालील शब्द वापरतात.
उपसर्ग = शब्द
यथा, बर = प्रमाणेप्रति, दर, हर = प्रत्येक
बे, बिन = शिवाय
एकापाठोपाठ दोन सारखेच शब्द आल्यास = प्रत्येक
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
तुम्हाला अव्ययीभाव समास | Avyayibhav Samas in Marathi | Avyayibhav Samas | Marathi Avyayibhav Samas ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार
तुम्हाला अव्ययीभाव समास | Avyayibhav Samas in Marathi | Avyayibhav Samas | Marathi Avyayibhav Samas ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box