बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 9, 2023

बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas

  बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार

Bahuvrihi Samas in Marathi

 Bahuvrihi Samas

बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas

बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas )  :- 

            बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार ( Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas ).

बहुव्रीहि समास म्हणजे काय?

            ज्या सामाजिक शब्दांचे दोन्ही पदे महत्वाची नसतात त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तसेच हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते त्या सामाजिक शब्दाला बहुव्रीहि समास ( Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.


हे पण पहा :- सिद्ध शब्द

बहुव्रीहि समासाचे चार प्रकार आहेत.

बहुव्रीहि समासाचे प्रकार

क्रसमासाचे नाव
नत्र बहुव्रीहि समास
सह बहुव्रीहि समास
प्रादि बहुव्रीहि समास
विभक्ती बहुव्रीहि समास

१] समानाधिकरण बहुव्रीहि समास

२] व्याधिकरण बहुव्रीहि समास 


अ) नत्र बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीहि समासाचे पहिले पद अ, अन, न, ना, नि असे नकार दर्शक असते तेव्हा त्या समाजाला नत्र बहुव्रीहि समास ( Natra Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

नत्र बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
अनंतज्याला अंत नाही असा तो
निर्धननाही ज्याच्याकडे धन असा तो
निरसनाही रस ज्यात असे तो
अनाथनाही नाथ ज्याला असा तो
अनादीनाही आदी ज्याला तो
अनिकेतनाही निकेत ज्याला असा
अव्ययनाही व्यय ज्याला तो 


ब) सह बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीहि समासाचे पहिले पद स किंवा सह अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखादे विशेषणाचे कार्य करतो त्याला सह बहुव्रीहि समास ( Sah Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

सह बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
सानुजअनुजासहित आहे असा तो
सुपुत्रपुत्रासहित आहे असा तो
सनाथनाथासहित आहे असा तो
सानंदआनंदासहित आहे असा तो
सादरआदरासहित आहे असा तो
सवर्णवर्णासहित आहे असा तो
सबळबळासहित आहे असा तो
सहपरिवारपरिवारासहित आहे असा तो
सहकुटुंब कुटुंबासहित आहे असा तो



क) प्रादि बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या समासाचे पहिले पद प्र, परा, आप, सु, दूर, वि, नि असा उपसर्ग युक्त असते त्याला प्रादि बहुव्रीहि समास ( Pradi Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

प्रादि बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
विख्यातविशेष ख्याती असलेला
विरागीराग नसलेला
प्रज्ञावंतबुद्धी असलेला
सुनयनासु नयन असलेली स्त्री
दुर्गुणीगुणा पासून दूर आहे असा तो
प्रबळअधिक शक्तिशाली आहे असा तो
सुमंगलचांगले पवित्र आहे असे ते 



ड) विभक्ती बहुव्रीहि समास म्हणजे काय?

ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एकच संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्ती चे नाव समासाला दिले जाते. अशा समासाला विभक्ती बहुव्रीहि समास ( Vibhakti Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

विभक्ती बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
विद्याधनविद्या आहे धन ज्याचे तो
पूर्णजलपूर्ण आहे जल ज्यात असे
प्राप्तधनप्राप्त आहे धन ज्याला तो
जीतशत्रूजीत आहे शत्रू ज्याने तो
त्रिकोणतीन आहेत कोन त्याला तो
गतप्राणगत आहे प्राण ज्यापासून तो 


विभक्ती बहुव्रीहि समासाचे दोन प्रकार आहेत.

१) समानाधिकरण बहुव्रीहि समास 

२) व्याधीकरण बहुव्रीहि समास 

१) समानाधिकरण बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीहि समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे एकाच विभक्ती मध्ये असतात तेव्हा त्या समासाला समानाधिकरण बहुव्रीहि समास ( Samanadhikaran Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

समानाधिकरण बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
वक्रतुंडवक्र आहे तोंड ज्याचे असा तो - गणपती
नीलकंठनिल आहे कंठ असा तो - शंकर
लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो - विष्णू 


२) व्याधीकरण बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीही समाजाचा विग्रह करताना दोन्ही पदे जेव्हा भिन्न विभक्ती मध्ये असतात तेव्हा त्या समासाला व्याधीकरण बहुव्रीहि समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

व्याधीकरण बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
गजाननगजाचे आहे आनन असा तो - गणपती
सुधाकरसुधा आहे करात ज्याच्या असा तो - कृष्णा
भालचंद्रभाळी आहे चंद्र असतो - शंकर
चक्रपाणिचक्र आहे पाणीत असा तो - विष्णू 

हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार

विग्रहाला अनुसरून समासाची नावे बदलतात.

चौकोन = चार कोण आहे ज्याला असा तो - बहुव्रीहि समास 
           = चार कोणाचा समूह - तत्पुरुष समास

पितांबर = पिवळे आहे वस्त्र ज्याचे तो - बहुव्रीहि समास
            = पिवळे असे वस्त्र - कर्मधारेय समास

  • अव्ययीभाव असलेला शब्द क्रियाविशेषण असतो.
  • बहुव्रीहि असलेला शब्द विशेषण असतो.
  • द्वंद्व समाज व तत्पुरुष समास असलेला शब्द नाम किंवा विशेषण असतो.


          तुम्हाला या लेखातुन बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार, नत्र बहुव्रीहि समास, सह बहुव्रीहि समास, प्रादि बहुव्रीहि समास, विभक्ती बहुव्रीहि समास, समानाधिकरण बहुव्रीहि समास, व्याधीकरण बहुव्रीहि समास व या सर्व समासांची उदाहरणे( bahuvrihi samas examples in marathi ) दिलेली आहेत याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अशी आशा करतो.


          तुम्हाला बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad