१ली ते १२वी च्या शाळांना सुट्टी तसेच १० वी व १२वी चे पुरवणी पेपर पुढे ढळण्याचा निर्णय
महाराष्ट्र राज्यात दाेन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहून इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले असून गुरूवारी दि. २० राेजी हाेणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे पेपरही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. गुरूवारी हाेणारा दहावीचा पेपर येत्या २ ऑगस्ट तर बारावीचा पेपर दि. ११ ऑगस्ट राेजी हाेतील अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.
तुम्हाला १ली ते १२वी च्या शाळांना सुट्टी तसेच १० वी व १२वी चे पुरवणी पेपर पुढे ढळण्याचा निर्णय | Decision to postpone 10th and 12th supplementary papers as well as holiday for 1st to 12th schools ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box