केवल प्रयोगी अव्यय व त्यांचे प्रकार
Keval Prayogi Avyay V Tyanche Prakar
Interjection and their types in marathi
केवल प्रयोगी अव्यय ( Keval prayogi avyay | Interjection in marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला केवल प्रयोगी अव्यय | Keval prayogi avyay | Interjection in marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी केवल प्रयोगी अव्यय | Keval prayogi avyay | Interjection in marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती
केवल प्रयोगी अव्यय (Interjection | Keval Prayogi Avyay) :-
मनातील तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या उद्गारवाची अविकारी शब्दाला केवल प्रयोगी अव्यय (Interjection | Keval Prayogi Avyay) असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय (Interjection | Keval Prayogi Avyay) सामान्यतः वाक्याच्या सुरवातीला येतात व त्यांच्यापुढे उदगारचिन्ह (!) वापरतात.
केवल प्रयोगी अव्ययाचे भावनावरून प्रकार
[ Types of Interjection | Keval Prayogi Avyayache Prakar ]
क्र प्रकार शब्द १ हर्ष दर्शक वा, अहाहा, ओ-हो, वा-वा, अहा इत्यादी २ शोक दर्षक अरेरे, अग आई, आई ग, हायहाय, हाय, ऊ, अं इत्यादी ३ आश्चर्य दर्शक अरेच्या, अबब, बापरे, ओ हो, ऑ, अहाहा इत्यादी ४ प्रशंसा दर्शक शाब्बास, छान, वाहवा, भले, फक्कड, खाशी इत्यादी ५ संमती दर्शक हां, जी, जी हां, ठीक, अच्छा, बराय इत्यादी ६ विरोध दर्शक छे, छे-छे, अहं, छ, छट, ऊं:, हँट इत्यादी ७ तिरस्कार दर्शक शी, थु:, छी, छत, हुडूत, धिक, इश्श, हुड, फुस, हत इत्यादी ८ संबोधन दर्शक अरे, अग, ए, अहो, अगा, अगो, बा, रे इत्यादी ९ मौन दर्शक गप, चुप, गुपचूप, चिप, चुपचाप इत्यादी
क्र | प्रकार | शब्द |
---|---|---|
१ | हर्ष दर्शक | वा, अहाहा, ओ-हो, वा-वा, अहा इत्यादी |
२ | शोक दर्षक | अरेरे, अग आई, आई ग, हायहाय, हाय, ऊ, अं इत्यादी |
३ | आश्चर्य दर्शक | अरेच्या, अबब, बापरे, ओ हो, ऑ, अहाहा इत्यादी |
४ | प्रशंसा दर्शक | शाब्बास, छान, वाहवा, भले, फक्कड, खाशी इत्यादी |
५ | संमती दर्शक | हां, जी, जी हां, ठीक, अच्छा, बराय इत्यादी |
६ | विरोध दर्शक | छे, छे-छे, अहं, छ, छट, ऊं:, हँट इत्यादी |
७ | तिरस्कार दर्शक | शी, थु:, छी, छत, हुडूत, धिक, इश्श, हुड, फुस, हत इत्यादी |
८ | संबोधन दर्शक | अरे, अग, ए, अहो, अगा, अगो, बा, रे इत्यादी |
९ | मौन दर्शक | गप, चुप, गुपचूप, चिप, चुपचाप इत्यादी |
केवल प्रयोगी अव्ययाचे उदाहरण :-
अरेरे! फार वाईट झाले.
बापरे! किती उंच इमारत ही!
अरे ! इकडे कुठे तू?
चुप! एक शब्दही बोलू नकोस!
अबब! केवढा मोठा नाग तो.
शाबास! असेच यश पुढेही मिळव.
वा! काय धमाल उडवली त्याने!
ठीक! हे अतिशय उत्तम झाले.
'हाय-हाय'! मोठा विषप्रयोग आहे हा!
व्यर्थ उद्गारवाचक :-
जे उद्गारवाचक शब्द भावना किंवा अर्थ व्यक्त करीत नाही म्हणजेच ते वाक्यात व्यर्थ येतात व त्यांचा वाक्यावर कोणताही परिणाम होत नाही त्यामुळे त्यांना व्यर्थ उद्गारवाचक असे म्हणतात.
शब्द :- म्हणे, बापडा, आपला, बेटे
उदाहरणार्थ :-
काल रात्री म्हणे भूकंप झाला.
तो बापडा काय बोलणार !
मी आपली काय तक्रार करणार!
पण काळीज बेटे स्वस्त राहिना!
पादपुरानार्थक केवल प्रयोगी अव्यय / पालुपदे :-
लकब किंवा काही आठवेनासे झाले की काही शब्द उगीच पुन:पुन्हा येतात अशा शब्दांना पादपुरानार्थक केवल प्रयोगी अव्यय / पालुपदे असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
बरंका, आत्ता, जळलं मेलं, आणखीन इ.
तुम्हाला केवल प्रयोगी अव्यय | Keval prayogi avyay | Interjection in marathi | Keval prayogi avyay in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box