KRANTI DIN
९ ऑगस्ट क्रांती दिन
9 August Kranti Din
९ ऑगस्ट - क्रांती दिन | 9 August - Kranti Din :-
क्रांती दिन (Kranti Din) म्हणजे काय? तर त्याचा अर्थ होतो बदल. मानवी आयुष्यात रोजच नवनवीन बदल असतात मग त्याला क्रांती म्हणता येईल का? तर नाही क्रांती ही एकदम अचानक किंवा रोज होणारी गोष्ट नाही. क्रांती ही ठराविक एखादी समस्या किंवा प्रसंग निर्माण झाल्यावर जीवनात अमुलाग्र बदल होत त्यालाच क्रांती असे म्हणतात. असाच बदल जगामध्ये अनेक ठिकाणी होतो. क्रांती म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती हरित क्रांति किंवा धवलक्रांती. ज्या बदलामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात लक्षणीय बदल घडून आला त्याला हरितक्रांती असे म्हटले गेले ही क्रांती घडून आली ती डॉक्टर स्वामीनाथन यांच्यामुळे तर दुधाच्या उत्पादनात वाढ करून धवल क्रांती घडवून आणली ती वर्गीस कुरियन यांनी घडवून आणली.
हे पण पहा :- जागतिक आदिवासी दिन
१९४२ साली अशीच एक क्रांती भारतात घडली ती म्हणजे १९४२ ची ऑगस्ट क्रांती महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतातील जनता एकत्रित आली कारण तो प्रसंग होता मातृभूमीचा, भारत मातेचा कारण त्याच्यावर राज्य करणारे होते अन्यायी ब्रिटिश आपल्याला ब्रिटीशांच्या ताब्यातून भारत मातेला मुक्त करायचे होते त्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले तो दिवस होता ९ ऑगस्ट. ९ ऑगस्ट हा दिवस म्हणजे अशा क्रांतिवीरांना आठवण्याचा स्मरणाचा दिवस म्हणून त्याला क्रांती दिन असे म्हणतात
स्वातंत्र्यलढ्याचे मशाल पेटवून देशातून इंग्रजी राजवटीला निघताना निस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस पण स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यात दंग असलेल्या आजच्या पिढीसाठी हा दिवस अनोळखी झाला आहे. सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांना ती पेटवलेली मशाल आपल्या आठवणीत ती मशाल केव्हाच वीजवली आहे एवढेच काय प्रशासकीय यंत्रणेसाठी ही या दिवसाचे महत्त्व आता औपचारीकते पुरते शिल्लक आहे.
हे पण पहा :- देशभक्ति गीत
ऑगस्ट क्रांती ला आज ७७ वर्ष पूर्ण होत आहे ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत भरलेला काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधीनी केलेली छोडो भारतची गर्जना आणि दिलेला "करेंगे या मरेंगे" हा मंत्र ९ ऑगस्ट च्या दिवशी संपूर्ण देशात पसरला त्यामुळे त्यादिवशी क्रांतिची ज्योत जेव्हा पेटली देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनास सुरुवात झाली प्रत्येकाला जे योग्य वाटलं ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणात मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे ५ वाजता मुंबईतील बिर्ला हाऊसमधून महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेतले यावेळी गांधींनी जनतेला संदेश दिला "आता प्रत्येक जण पुढारी होईल".
जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते संपूर्ण देश भेटला होता दंगल, जाळपोळ, गोळीबार, रेल्वे अपघात, सरकारी कार्यालयांना आग लावल्या, सरकारी खजिन्याची लुटालुट असे प्रकार सुरु होत होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता. सरकारने या सर्व प्रकाराला गांधीजींना जबाबदार ठरवले गांधीजींनी याचा इंकार केला आणि सरकारच्या निषेधार्थ २१ दिवसांचे उपोषण केले पण याच वेळी जगभरातील परिस्थितीत बदल होत होता युद्धाचे पारडे दोस्त राष्ट्रांच्या बाजूने झुकले होते दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवल्याने सर्व यंत्राना नियंत्रित करण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला परंतु ज्या ब्रिटिशांनि दीडशे वर्ष राज्य केले त्यांना हुसकावून लावण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पेटली ती गोंदिया जिल्ह्यात तेथे काही ठिकाणी हौतात्म्य पत्करले होते त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांती लढ्याची आठवण नऊ ऑगस्ट ला क्रांती लढ्याचि आठवण म्हणून ९ ऑगस्ट ला क्रांती दिन पाळला जातो. इयत्ता आठवी शिकणारा विद्यार्थी शिरीष कुमार या च्या आत्म बलिदानाने संपूर्ण देशाने प्रेरणा घेतली आणि एक जण आंदोलन घडवून आले. अशा या क्रांतिवीरांना स्मरणाच्या आठवण्याचा हा दिवस.
अशा या सर्व क्रांतिवीरांना माझे शतशः कोटी कोटी प्रणाम
जय हिंद , जय भारत
तुम्हाला ९ ऑगस्ट - क्रांती दिन | Kranti Din | 9 August Kranti Din ही माहिती नक्कीच आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box