क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 13, 2023

क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi

क्रियापद व त्याचे प्रकार

Verbs and their types in Marathi

Kriyapad v Tyache Prakar

क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi

क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi ) :- 

          क्रियापद व त्याचे प्रकार ( Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी क्रियापद व त्याचे प्रकार ( Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी क्रियापद व त्याचे प्रकार ( Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
          चला तर मग आपण बघूया मराठी क्रियापद व त्याचे प्रकार ( Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi ) .


क्रियापद म्हणजे काय?

            वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद ( Verb / Kriyapad ) असे म्हणतात.

क्रियापदाचे उदाहरण :-

१) ती हसते.
२) तो पळतो.
३) ते खेळतात.
३) आम्ही प्रार्थना म्हणतो.
४) सचिन क्रिकेट खेळतो.
५) आशा गाणे गाते.

क्रियापदाचे प्रकार कोणते?

            मराठी भाषेमध्ये क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.
प्रश्न
कर्ता
सकर्मक क्रियापद ( Sakarmak Kriyapad )
अकर्मक क्रियापद ( Akarmak Kriyapad )

१) सकर्मक क्रियापद म्हणजे काय?

            ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यास सकर्मक क्रियापद ( Sakarmak Kriyapad ) असे म्हणतात.

            ज्या वाक्यात कर्म असते त्यास सकर्मक क्रियापद ( Sakarmak Kriyapad ) असे म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-


कर्ताकर्मक्रियापद
बगळामासापकडतो
रामगवतकापतो.
आजीगोष्टसांगते
राधागाणेगाते.
सुयशपुस्तकवाचतो
गुरुजीमुलांनाशिकवतो.
सचिनक्रिकेटखेळतो.
अजयअभिनयकरतो

            जर क्रियापदाला णारा, णारी, णारे हे प्रत्येय लावून प्रश्न विचाले तर उत्तर कर्ता मिळतो.

उदाहरण :-


प्रश्नकर्ता
मासा पकडणाराबगळा
गवत कापणाराराम
गोष्ट सांगणारीआजी
गाणे गाणारीराधा
पुस्तक वाचणारासुयश
मुलांना शिकवणाराशिक्षक
क्रिकेट खेळणारासचिन
अभिनय करणारा
अजय


            कर्ता ज्याच्यावर क्रिया करतो किंवा ज्याच्यावर क्रिया घडते त्यास कर्म म्हणतात.

            जेव्हा कर्ता क्रियापदाला प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारतो तेव्हा कर्म मिळते.

उदाहरण :-


कर्ताप्र.शब्दक्रियापदकर्म

बगळा

काय

पकडतो?

मासा

राम कायकापतो?गवत
आजीकायसांगते?गोष्ट
राधाकायगाते?गाणे
सुयशकायवाचतो?पुस्तक
शिक्षककोणालाशिकवतो?मुलांना
सचिनकायखेळतो?क्रिकेट
अजयकायकरतो?अभिनय


२) अकर्मक क्रियापद म्हणजे काय?

            ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज नसते त्यास अकर्मक क्रियापद ( Akarmak Kriyapad )  असे म्हणतात.

            कर्ता जेव्हा एखादी क्रिया करतो व ती क्रिया कर्त्याजवळच येऊन थांबत असेल किंवा संपत असेल तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद ( Akarmak Kriyapad ) म्हणतात.

            ज्या वाक्यात कर्म नसते त्यास अकर्मक क्रियापद ( Akarmak Kriyapad ) असे म्हणतात.

अकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

१) तो जोरात धावतो.
२) श्रेया छान नाचते.
३) राजेश बोबडा बोलतो.
४) राहुल घाईघाईने जात होता.
५) चेंडू सीमापार गेला.


सकर्मकअकर्मक
सुयश पुस्तक वाचतो.
सुयश हळू-हळू वाचतो.
रमेश पतंग उडवतो.सारे पोपट उडाले.
प्रकाश मुलांस बसवतो.प्रकाश गप्प बसला.
राधा गाणे गाते.ती सुरेल गाते.
सचिन क्रिकेट खेळतो.सचिन आकर्षक खळते.

क्रियापदाचे इतरही काही प्रकार आहेत

क्रक्रियापदाचे प्रकार
संयुक्त क्रियापद
सहाय्यक क्रियापद
प्रयोजक क्रियापद
शक्य क्रियापद
अनियमित क्रियापद
द्विकर्मक क्रियापदे
उभयविध क्रियापदे

भावकर्तृक क्रियापद
सिद्ध क्रियापद
१०साधित क्रियापदे
११स्थिती व स्थित्यंतरदर्शक क्रियापदे
१२करणरूप क्रियापद
१३अकरणरूप क्रियापद


१] संयुक्त क्रियापद म्हणजे काय?

            जेव्हा धातुसाधित व सहाय्यक क्रियापद हे दोन्ही शब्द मिळून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा त्यास संयुक्त क्रियापद (Sayukt Kriyapad) म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

(धातुसाधित + सहाय्यक क्रियापद = संयुक्त क्रियापद)
१) तो सारखा खेळत असतो.
२) ती आनंदाने नाचू लागली.
३) वाघ गवत खात नाही.
४) त्याला त्याचे मत मांडू दे.
५) सुयश गोष्टी वाचत असतो.

२] सहाय्यक क्रियापद म्हणजे काय?

                जेव्हा वाक्यात धातुसाधीत व क्रियापद ह्या दोन्ही शब्दातून एकाच क्रियेचा बोध होतो तेव्हा धातुसाधिताला मदत करणाच्या क्रियापदाला सहाय्यक क्रियापद (Sahayak Kriyapad) म्हणतात.
सहाय्यक क्रियापदाला गौण क्रियापद असेही म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

१) तो सकाळी उठला आहे.
२) त्याने आपली सर्व संपत्ती वाटून टाकली.
३) राधाने १० रुपये खाऊन टाकले.

३] प्रयोजक क्रियापद म्हणजे काय?

            जेव्हा वाक्यातील क्रियेचा कर्ता ती क्रिया दुसऱ्याकडून करवितो तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद (Prayojak Kriyapad) म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

१) विदुशक प्रेक्षकांना हसवितो.
२) आई मुलाला चालविते.
३) त्याला घोड्यावर बसविले.
४) मोडकळीस आलेली इमारत पाडली.
५) आई कृष्णाला हसविते.

४] शक्य क्रियापद म्हणजे काय?

            जो धातु कार्याल्या ती क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ आहे असे दाखवितो त्याला शक्य क्रियापद (Shaky Kriyapad) म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

१) मला आता थोडे चालवते.
२) तिला आत काम करवते.
३) आजारानंतर त्याला खेळवते.
४) मला आता अभ्यास करवते.
५) माझ्याकडून आता चालवते.

५] अनियमित क्रियापद म्हणजे काय?

            आहे, नाही, नको, नये, नव्हे, पाहिजे अश्या क्रियापदाची मुळ रूपे ही क्रियापदेच असुन त्यात अमुक एक धातु आहे असे निश्चित पणे सांगता येत नाही त्यास अनिश्चित / गौण /अनियमित  क्रियापद (Aniyamit Kriyapad) असे म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

१) त्याने खोटे बोलू नये.
२) तिला फक्त पैसा पाहिजे.
३) विचारल्यास गैरीस बोलू नको.
४) ईश्वर सर्वत्र आहे.
५) मला जेवण पाहिजे.

६] द्विकर्मक क्रियापदे म्हणजे काय?

            जेव्हा दिलेल्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकांवर घडते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद ( Dvikarm Kiryapad ) असे म्हणतात.

सकर्मक क्रियापदाचे उदाहरण :-

१) मामाने सतीशला पेरू दिला.
२) बाबांनी ताईला अभ्यास दिला.
३) आईने दादाला लाडू दिला.
४) शेजारच्या काकुनी दिनेशला निरोप दिला.
३) महाराजांनी भक्तांना कथा सांगितली.

  • वरील वाक्यात दोन कर्म आहेत एक मुख्य कर्म व दुसरे उपकर्म असते
  • मुख्य कर्म वस्तूवाचक ( दान जाणारे ) तर उपकर्म व्यक्तिवाचक ( दान घेणारे) असते.
  • मुख्य कर्माला प्रत्यय नसतो तर उपकर्माला प्रत्यय असतो.
  • मुख्य कर्म प्रथमेत असते.
  • उपकर्माला शक्यतो चतुर्थी विभक्ती असून स,ला,ना,ते प्रत्यय लागतात.

उदाहरण :-

मुख्यकर्म :- पेरू, अभ्यास, लाडू, निरोप, कथा
उपकर्म :- सतिशला, ताईला, दडला, दिनेशला, भक्तांना

७] उभयविध क्रियापदे म्हणजे काय?

            जेव्हा एखाद्या वाक्यात क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पध्दतींनी वापरले जाते, त्याला उभयविध क्रियापद ( Ubhayvidh Kiryapad ) म्हणतात.

उभयविध क्रियापदाचे उदाहरण :-


सकर्मकअकर्मक
सुयाशने साक्ष दिली.सुयाशची साक्ष दिली.
रमेशने पतंग उडवली.रमेशची पतंग उडवली
त्याने बोट कापले.त्याचे बोट कापले.
रामने पेन्सिल हरवली.रामची पेन्सिल हरवली
तिने पुस्तक फाडले.त्याचे पुस्तक फाडले.


८] भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय?

            जेव्हा वाक्यातील कर्ता क्रियापदातच सामावलेला असतो तेव्हा त्या क्रियापदांना भावकर्तृक क्रियापदे ( Bhavkartrutv Kiryapad ) असे  म्हणतात.

भावकर्तृक क्रियापदाचे उदाहरण :-

१) सतत प्रवासाने मळमळतेय. (मळमळ होते)
१) साताऱ्याला जाताना घाटाखाली उजाडले. (उजेड झाला)
२) आज दिवसभर सारखे गडगडतेय. (गडगड होते)
४) सकाळी लवकर उठल्याने थकवतेय ( थकवा येणे )
५) भूक लागल्याने गरगरतय ( गरगर होणे )


९] सिद्ध क्रियापद म्हणजे काय?

            क्रियापदांमधील जो मूळ धातू असतो त्याला सिद्ध धातू असे म्हणतात. व अशा धातूला जेव्हा प्रत्यय लागून क्रियापद बनते त्याला सिद्ध क्रियापद ( Siddha Kiryapad ) असे म्हणतात.

सिद्ध क्रियापदाचे उदाहरण :-


मूळ धातूसिद्ध क्रियापदमूळ धातूसिद्ध क्रियापद

जा

जाणे

खा

खाणे

पळ पळणेहसहसणे
रडरडणेवाचवाचणे
गागाणेप्यापिणे
खाखाणेनाचनाचणे


१०] साधित क्रियापदे म्हणजे काय?

            शब्दाच्या जातीतील नाम, विशेषण, क्रियापद व अव्यय अशा विविध शब्दांपासून तयार होणाऱ्या धातूंना साधित धातू असे म्हणतात व त्याच साधित धातूपासून बनलेल्या क्रियापदांना 'साधित क्रियापदे' ( Sadhit Kiryapad ) असे म्हणतात.

साधित क्रियापदाचे उदाहरण :-

१) नामसाधित तो चेंडू लाथाळतो. (लाथ)
    पाणावले, हाताळले, डोकावले
२) विशेषण साधित - त्या मनोहारी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले. (स्थिर)
    उंचावला, एकवटला, 
३) अव्ययसाधित धर्माच्या बंधनामुळे माणसे मागासली. (मागे) 
    पुढारले, खालावले, उंचावले, पुढारलेले, 
(४) धातुसाधित आम्ही ही मोटार मुंबईहून आणवली. (आण)
    मागितली, बसले, शोधली, पळाली, हसली, गायली


हे पण पहा :- वाक्याचे प्रकार

११] स्थिती व स्थित्यंतरदर्शक क्रियापदे म्हणजे काय?

            स्थित्यंतर म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे होय, व ती स्थिती दर्शविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रियापदाणा स्थितीदर्शक क्रियापद ( Sthitidarshak Kiryapad ) म्हणतात.

स्थितीदर्शक क्रियापद उदाहरण :-

१) राम राजा होता. (स्थिती)
२) ताई डॉक्टर आहे. (स्थिती)
३) सतिश पोलीस आहे. (स्थिती)
४) मामा कलेक्टर झाला. (स्थित्यंतर)
५) सुयश पास झाला. 
(स्थित्यंतर)
६) सविता कर्णधार झाली. (स्थित्यंतर)

१२] करणरूप क्रियापद म्हणजे काय?

                जेव्हा क्रियापदामधून होकार दर्शवला जातो तेव्हा त्यास करणरूप क्रियापद ( Karnrup Kiryapad / Karnrupi Kiryapad  ) म्हणतात.

करणरूप क्रियापदाचे उदाहरण :-

१) नेहमी खरे बोलावे.
२) सतत अभ्यास करावा.
३) धूम्रपान टाळावे.
५) दुसऱ्यांशी चांगले वागावे.
६) प्राणीमात्रांवर दया करावी.
७) नेहमी सत्याची कास धरावी.
८) गरिबांना मदत करावी.
९) दररोज व्यायाम करावा.
१०) मोठ्या व्यक्तींचा आदर करावा.

१३] अकरणरूप क्रियापद म्हणजे काय?

            जेव्हा क्रियापदामधून नकार सुचवला जातो तेव्हा त्यास अकरणरूप क्रियापद ( Akarnrup Kiryapad / Akarnrupi Kiryapad  ) म्हणतात. असे म्हणतात.

अकरणरूप क्रियापदाचे उदाहरण :-

१) कधीही खोटे बोलू नये
२) अभ्यासात टाळाटाळ करू नये.
३) धूम्रपान करू नये.
५) दुसऱ्यांशी वाईट वागू नये.
६) प्राणीमात्रांना त्रास देवू नये.
७) सत्याची कास सोडू नये.
८) उभ्याने पाणी पिवू नका.
१) जेवतांना फोनवर बोलू नये.
२) अभ्यास करतांना टीव्ही पाहू नये.
३) उन्हात फिरू नका.



  • क्रियापदाचे प्रकार किती
  • क्रियापदाचे मूळ रूप
  • क्रियापदाचे वाक्य
  • क्रियापदाचे उदाहरण
  • क्रियापदाचे शब्द
  • क्रियापदाची व्याख्या

            आम्ही तुम्हाला वरील माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला क्रियापद व त्याचे प्रकार | Kriyapad v Tyache Prakar | Marathi Kriyapad | Verbs and their types in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad