Marathi Bodh Katha | Moral Stories in Marathi For Kids | Bodh Katha in Marathi | Bodh Katha Marathi | मराठी बोध कथा - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 8, 2023

Marathi Bodh Katha | Moral Stories in Marathi For Kids | Bodh Katha in Marathi | Bodh Katha Marathi | मराठी बोध कथा

मराठी बोध कथा

Marathi Bodh Katha

Moral Stories For Kids | Moral Story in Marathi | Bodh Katha Marathi | Choti Bodh Katha Marathi | Bodh Katha in Marathi

Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids | Bodh Katha in Marathi | Bodh Katha Marathi | मराठी बोधकथा

Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids | Bodh Katha in Marathi | Bodh Katha Marathi | मराठी बोध कथा  :- 

            Marathi Bodh Katha मराठी बोध कथा हे बालपण जागृत करणार अमृत आहे. बालपण नको असतो हे तर प्रत्येक व्यक्तीला हवे असते. ते मिळू तर शकत नाही पण ते शोधण्याचे एकमेव साधन म्हणजे बोधकथा (Bodhkatha). आजच्या युगात जर तुम्हा स्वतःला तुमच्या पाल्यामध्ये चांगले गुण रुजावे असे वाटत असेल व त्याचे जीवन चांगले व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी त्यांना चांगल्या पुस्तकांची तसेच चांगल्या बोधकथेची गरज असते. 
            विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कथा (Moral Stories For Kids) वाचनातून त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवू शकतो. सकारात्मक कथा (Positive moral story | motivational Moral Stories ) वाचनातून नकारात्मक विचार दूर जातात. लहान मुलांसाठी छोटी बोध कथा ( Short moral story for kids | short story in marathi ) व तीही छोटी बोध कथा व तात्पर्य / लघु बोध कथा ( Short story and meaning for children ) अशी असेल तर फार उपयोगी असते. मराठी बोध कथा तात्पर्य सहित वाचायला दिल्यास त्यातून एक चांगला संदेश मिळतो. तसेच लहान मुलांना लहान बोध कथा ( Short story for Kids / Short story for children ) वाचण्यास कंटाळाही येणार नाही.
            मराठी मध्ये खूप कथा आहेत त्यामध्ये तुम्हाला छान छान गोष्टी मराठीत, मराठी लघु कथा, भुतांच्या गोष्टी, मराठी प्रेम कथा, तेनाली राम मराठी कथा, अकबर बिरबल मराठी गोष्टी, लहान मुलांच्या मराठी गोष्टी, महाभारत कथा मराठीत, इसापनीती कथा, संस्कार कथा मराठीत अशा कथा मुलांना ऐकायला फार आवडतात व अशाच कथा आम्ही भविष्यात देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

            एक चांगली रचलेली नैतिक कथा तरुण मनांचे मनोरंजन, शिक्षण आणि प्रेरणा देऊ शकते. मुलांनी नैतिक कथा का वाचाव्यात याची ही काही कारणे आहेत. चला तर मग नैतिक कथा वाचूया.


Marathi Bodh Katha | Moral Stories For Kids | Bodh Katha Marathi | Bidh Katha in Marathi
मराठी बोधकथा

लांडगा आणि बकरी

            दर वर्षा प्रमाणेच एकदा कडक उन्हाळ्याचे दिवस होते. बहुतेक प्राणी चरावयास बाहेर आले नाहीत. लांडग्याला फार भुक लागली होती. शेवटी त्याला एक बकरी चरताना दिसली. लांडग्याला खुप आनंद झाला. तो बकरीवर उडी मारण्याआधीच गुरगुरु लागला. बकरी सावध झाली. व जोराने पळू लागली. लांडगा बकरीचा पाठलाग करू लागला. दोघेही त्यांच्या पुर्ण क्षमतेने पळत होते.

            शेवटी बकरी एका उंच खडकावर चढली. लांडगा खालीच राहीला. बकरी उपहासाने म्हणाली, "मुर्ख लांडग्या, माझा पाठलाग करण्याऐवजी तू तुझे तोंड उघड  Read More

हे पण पहा :- हिंदी बोधकथा

उंदीर आणि डोंगर

            एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी एक उंदीर रहात होता. डोंगर उंदराला रोज इकडे तिकडे पळताना पहात असे. एक दिवस उंदीर त्याच्या बिळातून बाहेर येताच डोंगर म्हणाला, "अरे क्षुद्र प्राण्या! किती लहान आहेस तू." उंदीर म्हणाला, "माझ्या आकाराशी तुला काय करायचे आहे?" डोंगर म्हणाला, " मी बघ केवढा मोठा आहे. माझ्या समोर वारा व ढग गुढगे टेकतात. मोठ्यांचा फायदा मोठ असतो."  Read More


ससा आणि लांडगा

            एक लांडगा जंगलात खुप भुकेला होउन हिंडत होता. पण त्याला शिकार मिळत नव्हती. फिरता फिरता एका झाडाच्या ढोलीत त्याला एक ससा बसलेला दिसला आणि लांडग याला खुप आनंद झाला. लांडगा आपल्याच दिशेने येतो आहे हे पाहून सावध झालेला ससा ढोलीतुन उडी मारून जोरात पळत सुटला. लांडगाही त्याच्या मागे धावू लागला. पण शेवटी   Read More


हे पण पहा :- इंग्रजी बोधकथा

काळवीटाचे पाय

            एकदा एक काळविट पाण्यात आपले प्रतिबिंब पहात होते तो विचार करू लागला, माझी शिंगे किती सुंदर आहेत! ते सर्वांपेक्षा सुंदर आहेत" इतक्यात त्याचे लक्ष पायाकडे गेले व तो दुःखी झाला. तो मनाशी म्हणाला, " पहा माझे पाय किती काटकुळे व कुरुप आहेत"

            इतक्यात त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली. त्याने जोरात धावण्यास सुरवात केली. त्याच्या काटकुळ्या पायांनीच त्याला वाघापासून लांब नेले. पण त्याची सुदंर शिंगे झाडात अडकली  Read More


नक्कल पडली महागात

            एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरविले. मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरवात केली. तेथे लाकडाचे सुद्धा काम सुरु झाले. त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत. मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे. त्यातील काही माकडे फार उद्योगी होती. ती रोज सुताराना   Read More


आळशी नोकर

            एका गावात दोन नोकर एका आजीबाईंचे काम करत असत. आजी दररोज सकाळी लवकर ऊठत असत. कोंबडा आरवताच त्या नोकरांना कामासाठी ऊठवित. नोकरांना कोंबड्याचा फार राग येत असे. एके दिवशी त्यांनी कोंबड्याला ठार मारले. ते आनंदात घरी परत आले. त्यांनी विचार केला, "कोबडा नसल्यामुळे आजी लवकर ऊठणार नाहीत व आपल्यालाही ऊठावे लागणार नाही."  Read More


साधू आणि गवळण

            एका गावात एक साधू राहत होता लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे. एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले,"आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला." साधू हसत म्हणाला"   Read More


घोडा आणि लांडगा

            एकदा एक घोडा कुरणात चरत होता. तो इतक मग्न झाला होता की त्याला लांडगा जवळ आल्याचे कळले नाही. ज्या वेळी त्याच्या लक्षात आले तो पर्यंत खुप उशीर झाला होता. घोड्याला एक युक्ति सुचली. तो मैदानावर उड्या मारू लागला. लांडग्याला वाटले "ही संधी चांगली आहे." 

            लांडगा घोड्या जवळ आला आणि त्याने विचारले, " तु उड्या का मारत आहेस?" घोड्याने उत्तर दिले, "माझ्या पायात काटा मोडला आहे." लांडगा म्हणाला,  Read More


मित्र

             विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.

            एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता. त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले,"हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस." आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी   Read More



कावळ्याची शर्यत

                  एकदा दोन कावळ्यांमध्ये शर्यत लागली. जास्त उंच कोण उडू शकतो हे पाहण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी सारख्या आकाराची पिशवी घेऊन उडण्याचे ठरवले. पहिल्या कावळ्याने मिठाने भरलेली पिशवी घेतली. त्याने विचार केला, "काळे ढग आले असल्यामुळे पाऊस पडेल." दुसरा कावळा पहिल्याला हसला. त्याने कापसाने भरलेली पिशवी घेतली. त्याने विचार केला, "हा किती मुर्ख आहे. त्याने मिठाने भरलेली पिशवी घेतली आहे.  Read More


आत्मनियंत्रणाचे महत्त्व

             एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्‍ट शिकण्‍यास तयार होत असे. त्‍याने धनुष्‍यबाण तयार करण्‍यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्‍याच्‍यात अहंकार आला, तो आपल्‍या मित्रांना सांगत असे.

             या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्‍य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्‍यांनी जेव्‍हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्‍हा त्‍यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्‍यावी जी आतापर्यंतच्‍या कलांमध्‍ये श्रेष्‍ठ   Read More


कोल्हा आणि कासव

                  एकदा एका जंगलात एक कोल्हा राहत होता त्याला स्वतःच्या हुशारी बद्दल गर्व होता. तो म्हणत असे, "मी सर्व प्राण्यात हुशार आहे."

            एक दिवस तो अन्नाच्या शोधात निघाला. त्याला काही मिळाले नाही. त्याला भूक सहन झाली नाही. अखेर त्याला एक कासव दिसले. त्याला खुप आनंद झाला. त्याने उडी मारून कासवाला पकडले. कोल्ह्याने कासवाचे कवच फोडण्याचा प्रयत्न केला. पण ते काही फुटेना. कासव धुर्तपणे म्हणाले, "तु मला पाण्यात का बुडवत नाहीस? म्हणजे माझे कवच मऊ होईल व मला तु सहजपणे खाऊ शकशील." भुकेने व्याकुळ झालेल्या कोल्ह्याने, काही विचार न करता कासवाला तळ्यात ढकलले.   Read More


लोभी शिक्षा

             एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे ब्राह्मणाला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला.

             वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस   Read More


कुत्रा आणि गाय

            एकदा एका गोठ्यात एक गाईंचा कळप गवत खाण्यास आला. त्यानी एका कुत्र्याला गवतावर लोळताना पाहिले. एक गाय कुत्र्याला म्हणाली, 'कृपया, गवतावरून ऊठ! आम्हाला भुक लागली आहे. आम्हाला गवत खायचे आहे.' कुत्र्याने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. परत एका गाईने विनंती केली, 'कृपया आम्हाला गवत खाऊ कुत्रा गुरगुरला   Read More


प्रामाणिक मुलगा

             एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्‍याच्‍यावर त्‍याच्‍या आईवडीलांनी चांगले संस्‍कार केले होते व त्‍या संस्‍कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्‍या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्‍या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला.

              मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्‍या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्‍याने त्‍यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्‍याने पाहिले की मुलगा बसला  Read More


प्रामाणिक लाकुडतोड्या

            एका गावात सखाराम एक गरीब माणूस राहत होता. तो. लाकूड तोडून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचे कुटुंब मोठे होते. एकदा सखाराम रानात लाकडे तोडण्यास गेला असताना, त्याची कुऱ्हाड एका विहिरीत पडली. त्याने खुप प्रयत्न केला. पण कुऱ्हाड मिळाली नाही. तो रडू लागला.

            अचानक त्याला एक आवाज ऐकू आला, "करीम तुला काय हवे आहे?" त्याने डोके उचलले, तर समोर एक परी उभी होती. तो म्हणाला, "माझी कुऱ्हाड तळ्यात पडली आहे " परी म्हणाली, "काळजी करू नकोस मी तुला कुऱ्हाड काढून देते" असे म्हणून परी  Read More


जीवनाचे रहस्य

             एकदा एका कसायाकडे त्‍याचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी गेला होता. तिथे त्‍याने असे पाहिले की, एका मोठ्या पिंज-यात खूप असे बोकड, मेंढ्या कैद आहेत आणि एकमेकांशी मस्‍ती करत आहेत. मोठ्या आनंदात ते प्राणी आहेत. दुसरीकडे त्‍याने असे पाहिले की त्‍याच पिंज-यातून एकेक बोकड काढून तो कसाई कापत आहे आणि त्‍याचे मांस विकत आहे.

              कसायाच्‍या मित्राला ही गोष्‍ट पाहून कसेतरी वाटले. तो त्रस्‍त झाला कारण ज्‍यावेळी प्रत्‍येक बोकडाला कसाई बाहेर काढून कापत असे हे जाळीतून पिंज-यातल्‍या प्रत्‍येक बोकडाला दिसत होते पण तरीसुद्धा ते बोकड आपला कुणीतरी मित्र मरतो आहे याची जाणीव न ठेवता आनंदात कसे   Read More


हरणाची चतुराई

               एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही.

              हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या  Read More


मानवता

                  जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही.

                अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला   Read More 


भित्रा सशाची कैफियत

            एकदा एका जंगलात एके दिवशी जोराचा वारा वहात होता. त्यामुळे जंगलात वाऱ्याचा आवाज येत होता. ससा फार घाबरला. तो पळत जाऊन झाडाच्या ढोलीत लपला. अचानक त्याने जवळच मोठा आवाज ऐकला. त्याने ऊडी मारली व तो रानात पळू लागला.

            पळता पळता ओरडला, पळा, पळा आकाश पडत आहे." त्याला वाटेत हरिण भेटले. हरणाने विचारले, "तु का पळत आहेस?" ससा म्हणाला, "तु आवाज नाही ऐकलास? आभाळ पडत आहे." त्याच्या बरोबर हरिणसुद्धा धावू लागले. दोघांना झेब्रा भेटला. सर्व ऐकल्यावर तो देखील पळू लागला. हे तिघे पळत असताना एका मागोमाग एक असे जिराफ, कोल्हा, लांडगा आणि अनेक प्राणी पळू लागले. सिंहाने आवाज ऐकला आणि तो गुहेबाहेर आला. त्याने विचारले,   Read More 


          तुम्हाला मराठी बोध कथा ( Marathi Bodh Katha | Moral Stories in Marathi For Kids | Bodh Katha in Marathi | Bodh Katha Marathi )  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad