मराठी वर्णमाला
Marathi Varnmala | Alphabet in Marathi
वर्णमाला म्हणजे काय ?
आपण जे तोंडा द्वारे मूलध्वनी काढतो त्यांना वर्ण म्हणतात व अशाच वर्णांचा संच म्हणजे वर्णमाला ( Varnmala ) होय.
वर्ण म्हणजे काय ?
आपल्या तोंडाद्वारे निघणाऱ्या मूळ ध्वनींना किंवा मूल ध्वनींना वर्ण (Varn) असे म्हणतात.
अक्षरे म्हणजे काय ?
ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खूणांना अक्षरे ( Akshare / Letters ) असे म्हणतात.
पूर्ण उच्चाराने उच्चार जाणारे वर्ण म्हणजे अक्षरे ( Akshare / Letters ) होय
सर्व स्वर व स्वर्ण युक्त व्यंजने यांना अक्षरे ( Akshare / Letters ) म्हणतात
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
शब्द म्हणजे काय ?
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास शब्द ( Shabd / Words ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ : -
खेळणे, आवड, सवय, वाचन, बोलणे, कप, कमळ, हत्ती, खबरदारी, खळखळाट इ.
वाक्य म्हणजे काय ?
ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास वाक्य ( Vaky / Sentence ) असे म्हणतात.
पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य ( Vaky / Sentence ) होय.
उदाहरणार्थ :-
- मी शाळेत जातो.
- मी जेवण करतो.
- मला फिरायला आवडते.
- सुयश उत्तम नृत्य करतो.
हे पण पहा :- वचन व त्याचे प्रकार
भाषा म्हणजे काय ?
भाषा ( Bhasha / language ) म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन किंवा माध्यम होय.
लिपी म्हणजे काय ?
आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुणांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी ( Lipi / Script ) असे म्हणतात.
देवनागरी म्हणजे काय ?
मराठी भाषेचे लेखन मराठी बालबोध / बाळबोध लिपी म्हणजे देवनागरी लिपी मध्ये करतात.
व्याकरण म्हणजे काय ?
भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण ( Vyakaran / Grammar ) होय.
मराठी स्वर व त्यांचे प्रकार
Vowels and their types in Marathi
Swar V Tyanche Prakar
Swaranche Prakar
स्वर म्हणजे काय ? [ Swar / Vowels ]
Vowels meaning in Marathi
ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर (Vowels / Swar ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ऋ, लु, ओ, औ, अँ, ऑ- स्वर पूर्ण उच्चाराचे असतात.
- मराठी भाषेत एकूण १४ स्वर आहेत.
- मराठी भाषेत अँ व ऑ हे दोन स्वर स्वर इंग्रजी भाषेतून आलेले आहेत.
मराठी भाषेत स्वरांचे मुख्य तीन प्रकार आहेत.
[ Swar V Tyanche Prakar / Swaranche Prakar ]
क्र स्वरांचे प्रकार १ र्हस्व स्वर ( Rhasva svara ) २ दीर्घ स्वर ( Dirgha svara ) ३ संयुक्त स्वर ( Sanyukta svara )
क्र | स्वरांचे प्रकार |
---|---|
१ | र्हस्व स्वर ( Rhasva svara ) |
२ | दीर्घ स्वर ( Dirgha svara ) |
३ | संयुक्त स्वर ( Sanyukta svara ) |
१] र्हस्व स्वर म्हणजे काय ? [ Rhasva svara ]
ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे ज्यांचा उच्चार करायला थोडाच वेळ लागतो त्यांना र्हस्व स्वर ( Rhasva svara ) असे म्हणतात.
उदाहरण : - अ, इ, उ, ऋ, लू
२] दीर्घ स्वर म्हणजे काय ? [ Dirgha svara ]
ज्या स्वरांचा उच्चार करायला अधिक वेळ लागतो म्हणजेच त्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर ( Dirgha svara ) असे म्हणतात.
उदाहरण : - आ, ई, ऊ
३] संयुक्त स्वर म्हणजे काय ? [ Sanyukta svara ]
दोन स्वर एकत्र येऊन जे स्वर तयार होतात त्यांना संयुक्त स्वर ( Sanyukta svara ) असे म्हणतात.
उदाहरण : -
ए = अ + इ/ई
ऐ = आ+इ/ई
ओ = अ+उ/ऊ
औ = आ+उ/ऊ
मराठी भाषेत वरील स्वरांच्या मुख्य तीन प्रकारा व्यतिरिक्त अजून दोन प्रकार आहेत.
क्र स्वरांचे प्रकार १ सजातीय स्वर ( Sajatiy Swar ) २ विजातीय स्वर ( Vijatiy Swar )
क्र | स्वरांचे प्रकार |
---|---|
१ | सजातीय स्वर ( Sajatiy Swar ) |
२ | विजातीय स्वर ( Vijatiy Swar ) |
१] सजातीय स्वर म्हणजे काय ? [ Sajatiy Swar ]
एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर ( Sajatiy Swar ) असे म्हणतात.उदाहरण :- अ-आ, उ-ऊ, ओ-औ, इ-ई, ए-ऐ इत्यादी
२] विजातीय स्वर म्हणजे काय ? [ Vijatiy Swar ]
भिन्न उच्चारस्थानांतून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर ( Vijatiy Swar ) असे म्हणतात.उदाहरण :- अ-ई, उ-ए, ओ-ऋ इत्यादी
मराठी स्वरादी
Marathi Swaradi
स्वरादी म्हणजे काय ?
अनुस्वार व विसर्ग करणाऱ्या पूर्वी एखाद्या स्वराचा कारावास म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी / परसवर्ण ( Swaradi / Parasvarna ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- अं, अ:
- मराठी भाषेत एकूण २ स्वरादी / परसवर्ण आहेत.
मराठी व्यंजन व त्यांचे प्रकार
Consonants and their types in Marathi
Vyanjan v Tyanche Prakar
Vyanjananche Prakar
व्यंजने म्हणजे काय ?
Consonants meaning in Marathi
ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण करण्यासाठी शेवटी अ या स्वराचे सहाय्य घ्यावे लागते अशा वर्णांना व्यंजने / स्वरांत / परवर्ण ( Vyanjan / Swarant / Parvarn / Consonants ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
क
ख
ग
घ
ङ
च छ ज झ ञ ट
ठ
ड
ढ
ण
त थ द ध न प
फ
ब
भ
म
य र ल व
श
ष
स
ह ळ
व्यंजने अपूर्ण उच्चाराचे किंवा त्यांचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते.
क | ख | ग | घ | ङ |
च | छ | ज | झ | ञ |
ट | ठ | ड | ढ | ण |
त | थ | द | ध | न |
प | फ | ब | भ | म |
य | र | ल | व | |
श | ष | स | ||
ह | ळ |
व्यंजने अपूर्ण उच्चाराचे किंवा त्यांचा उच्चार करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते.
मराठी भाषेत एकूण ३४ व्यंजने आहेत.
व्यंजनाचे (Vyanjananche Prakar) काही प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे
कठोर व्यंजन म्हणजे काय ? [ Kathor Vyanjan ]
ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यास कठीण असतो त्या व्यंजनांना कठोर व्यंजने ( Kathor Vyanjan ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ - क, ख, च, छ, त, थ, प, फ, ट, ठहे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
मृदू व्यंजन म्हणजे काय ? [ Mrudu Vyanjan ]
ज्या व्यंजनाचा उच्चार करण्यास सोपा असतो त्या व्यंजनांना मृदू व्यंजन ( Mrudu Vyanjan ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ - ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भअनुनासिके म्हणजे काय ? [ Anunasike ]
ज्या वर्णाचा उच्चार होताना त्या वर्णाच्या उच्चार स्थाना बरोबरच नासिक ( नाक ) येथून होतो म्हणून त्यांना अनुनासिके ( Anunasike ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ - ङ, ञ, ण, न, म- अनुनासिकाला परसवर्ण असेही म्हणतात.
स्पष्टोचारीत अनुनासिके म्हणजे काय ? [ Spashtocharit Anunasike ]
ज्या अनुस्वरांबद्दल अनुनासिके वापरता येते त्याला स्पष्टोचारीत अनुनासिके ( Spashtocharit Anunasike ) असे म्हणतात.
- अनुस्वराबद्दल अनुनासिक वापरता येते.
अर्धस्वर म्हणजे काय ? [ Ardh Swar ]
य, र, ल, व या वर्णांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ, ऋ, लु आणि उ या स्वरांच्या उच्चार स्थानासाठी होतो असल्याने या व्यंजनाचा दिलेल्या स्वराशी निकटचा संबंध आहे, म्हणून त्यांना अर्धस्वर ( Ardh Swar ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ - य-इ, र-ऋ, ल-लु, व-उउष्मे ( घर्षक ) म्हणजे काय ? [ Ushme / Gharshak ]
श, ष, स या वर्णांचा उच्चार करतांना घर्षणामुळे उष्णता तयार होते म्हणून त्यांना उष्मे किंवा घर्षक ( Ushme / Gharshak ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ- श, ष, सहे पण पहा :- समूह दर्शक शब्द
महाप्राण म्हणजे काय ? [ Mahapran Varn ]
ह वर्णाचा उच्चार करतांना फुफुसातील हवा तोंडातून जोरात बाहेर फेकली जाते म्हणून या वर्णाला महाप्राण ( Mahapran Varn ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ - हमहाप्राण वर्ण म्हणजे काय ? [ Mahapran Varn ]
ज्या वर्णांमध्ये ह या वर्णाची छटा असते त्यांना महाप्राण वर्ण असे म्हणतात. तसेच मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना 'H' वापरावे लागते, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात असे एकूण १४ महाप्राण वर्ण ( Mahapran Varn ) आहेत.
उदाहरणार्थ - ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, ष, स, ह
अल्पप्राण वर्ण म्हणजे काय ? [ Alppran Varn ]
ज्या वर्णांमध्ये ह या वर्णाची छटा नसते त्यांना अल्पप्राण वर्ण (Alppran Varn ) असे म्हणतात. असे एकूण २० अल्पप्राण वर्ण आहेत.
उदाहरणार्थ - क, ग, ङ, च, ज, ञ, ट, ड, ण, त, द, न, प, ब, म, य, र, ल, व, ळस्वतंत्र वर्ण म्हणजे काय ? [ Swatantr Varn ]
ळ हा मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण ( Swatantr Varn ) आहे.कंपित वर्ण म्हणजे काय ? [ Kampit Varn ]
र या वर्णाला कंपित वर्ण ( Kampit Varn ) असे म्हणतातमहत्वाचे
- संयुक्त स्वर = स्वर + स्वर
- संयुक्त व्यंजन = व्यंजन + व्यंजन
- अक्षर = व्यंजन + स्वर
- द्वित = व्यंजन + तेच व्यंजन
- जोडाक्षर = व्यंजन + व्यंजन + स्वर
हे पण पहा :- समानार्थी शब्द
संयुक्त व्यंजने म्हणजे काय ?
दोन व्यंजने मिळून तयार झालेले दोन सयुक्त व्यंजन ( Sayukt Vyanjan ) मराठी भाषेत आहेत. तसे पाहता त्यांचा बाराखडी व मराठी वर्णमालेत त्यांचा समावेश करण्यात येत नाही.
उदाहरणार्थ :-
क्ष = क + ष
ज्ञ = द + न + य
तुम्हाला मराठी वर्णमाला | Marathi Varnmala | Alphabets in Marathi | Varnvichar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box