मराठी नाम व नामाचे प्रकार
Types of Noun in Marathi
Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar
मराठी नाम व नामाचे प्रकार ( Types of Noun in Marathi | Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar ) :-
मराठी नाम व नामाचे प्रकार ( Types of Noun in Marathi | Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी नाम व नामाचे प्रकार ( Types of Noun in Marathi | Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी नाम व नामाचे प्रकार ( Types of Noun in Marathi | Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar ) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया मराठी नाम व नामाचे प्रकार ( Types of Noun in Marathi | Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar ) .
हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती
नाम ( Noun \ Nam ) म्हणजे काय ?
कोणत्याही सजीव अथवा निर्जीव, दिसणाऱ्या किवा न दिसणाऱ्या, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम ( Noun / Nam ) असे म्हणतात.
उदारणार्थ :- भांडे, पाणी, मुंगी, हवा, मन, गंगा, काशी, पांढरेपणा, गोडी, शुद्धता, टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक इ.
नामाचे वाक्य :-
१) सुयश हुशार मुलगा आहे.
२) राजेश माझा चांगला मित्र आहे.
३) कुत्रा चाटतो.
४) मला शाळेत जायला आवडते.
५) कविता सुंदर गाते.
६) घड्याळ वेळ दाखवते.
७) माझे कुटुंब माझी, माझी जबाबदारी.
८) माणसाने आपली पायरी ओळखून वागावे.
९) गोदावरीला महाराष्ट्राची गंगा म्हणतात.
१०) नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे.
नामाचे प्रकार :-
मराठी भाषेमध्ये नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे.
१) सामान्य नाम [Common Noun / Samany Nam]
अ ] समुदायवाचक नाम [Collective Noun]
ब ] पदार्थवाचक नाम [Material Noun]
२) विशेष नाम [Proper Noun]
३) भाववाचक नाम [Abstract Noun]
१) सामान्य नाम म्हणजे काय ?
एकाच जातीच्या वस्तूंचा किंवा पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ [Common Noun / Samany Nam ] असे म्हणतात.
ज्या नामाने एकाच प्रकारची वस्तू किंवा पदार्थ अथवा प्राणी यांचा बोध होतो त्या नामाला सामान्य नाम [Common Noun / Samany Nam ] असे म्हणतात.
सामान्य नाम [Common Noun / Samany Nam ] हे जातीवाच असते, काही विशिष्ट नामांचेच अनेकवचन होते. मराठीमध्ये पदार्थवाचक, समुहवाचक नाम हे सामान्य नामच [Common Noun / Samany Nam ] समजले जाते.
उदारणार्थ :- मुलगा , समुद्र , फुले,साखर, नदी, बैल, शहर, पुस्तक, चिंच, खेळ, तारा, ग्रह, घड्याळ, चित्र, घर, माणूस, शाळा , साखर, पाणी, दूध, सोने, कापड, सैन्य, वर्ग इत्यादी.
सामान्य नामाचे वाक्य :-
१] बैलाला दोन शिंगे अस्रतात.
२] माणसाने आपली पायरी ओळखून वागावे.
३] चिंच आंबट असते.
४] घड्याळ वेळ दाखवते.
५] साखर गोड असते.
अ] समुदायवाचक नाम म्हणजे काय ?
ज्या नामतून संपूर्ण समूहाचा बोध होतो त्या नामाला समुदायवाचक नाम [Collective Noun / Samudayvachak Nam ] असे म्हणतात.
उदारणार्थ :- कुटुंब, वर्ग, कळप, गुछा, जुडगा, थवा, सेना, संघ
समुदायवाचक नामाचे वाक्य :-
१] भारताचा क्रिकेटचा संघ जगात एक नंबर आहे.
२] माझे कुटुंब माझी, माझी जबाबदारी.
३] हा ५ वी चा वर्ग आहे.
ब] पदार्थवाचक नाम म्हणजे काय ?
जे पदार्थ संख्येशिवाय इतर परिमानानी मोजले जातात अशा पदार्थांना दिलेल्या नावांना पदार्थवाचक नाम [ Material Noun / Padarthvachak Nam ] असे म्हणतात.
उदारणार्थ :- सोने , चांदी , पानी , दूध , पेट्रोल
पदार्थवाचक नामाचे वाक्य :-
१] आम्ही दररोज १ लिटर दुध आणतो.
२] माझ्या काकांनी गाडीत २ लिटर पेट्रोल टाकले.
३] साखर ४० रुपये किलो झाली.
२) विशेष नाम म्हणजे काय ?
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने ओळखतो त्या नामास विशेष नाम [ Proper Noun / Vishehs Nam ] असे म्हणतात.
ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ [ Proper Noun / Vishehs Nam ] असे म्हणतात.
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा,प्राण्याचा किंवा वस्तूंचा बोध करून त्या नावाला विशेष नाम [ Proper Noun / Vishehs Nam ] असे म्हणतात.
उदारणार्थ :- गोदावरी, नाशिक, जया, भारत, कावेरी, हिमालय, सचिन, गणपती, सुयश, अरबी इत्यादी.
विशेष नामाचे वाक्य :-
१] भारत आमचा देश आहे.
२] सुयश हा हुशार मुलगा आहे.
३] नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे.
४] सचिन चांगला क्रिकेट खेळतो.
५] गोदावरीला महाराष्ट्राची गंगा म्हणतात.
विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, परंतु ज्या वाक्क्यात विशेषनामाचे अनेकवचन होत नसल्यास किंवा ते नाम एखाद्या दुसर्या नामाची उपमा म्हणून काम करत असल्यास ते नाम सामान्य नाम [ Proper Noun / Vishehs Nam ] समजावे.
उदारणार्थ :- गोदावरीला महाराष्ट्राची गंगा म्हणतात.
वरील वाक्यात गंगा हे नाम गोदावरी या नामासाठी उपमा म्हणून आल्याने व त्याचे अनेकवचन होत नसल्याने ते सामान्य नाम [ Proper Noun / Vishehs Nam ] समजावे.
हे पण पहा :- नवोदय सराव प्रश्नसंच
३) भाववाचक नाम म्हणजे काय ?
ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यांचा अनुभव घेतो अशांच्या नामास भाववाचक नाम [ Abstract Noun / Bhav vachak Nam] असे म्हणतात .
ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम [ Abstract Noun / Bhav vachak Nam ] असे म्हणतात.
उदारणार्थ :- उदास , नम्रता , एकता, आळस, राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौंदर्य, पावित्र्य इत्यादी.
भाववाचक नामाचे वाक्य :-
१] भ्रष्टाचार हा प्रशासनातील एक कलंक आहे.
२] एकता ही देशाची खरी ताकत असते.
३] प्रामाणिकपणा हा माणसाचा गुणधर्म असतो.
४] खेळामध्ये चपळाईची आवश्यकता असते.
५] अभ्यासामध्ये कठोर मेहनतीची आवश्यकता असते.
काही सामान्य नाम व विशेषनाम यांची उदाहरणे
सामान्य नाम विशेष नाम
देश = भारत, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश
पर्वत = हिमालय, सहयाद्री, सातपुडा
मुलगा = राजेश, विनोद, मनोज, सुयश, सचिन
मुलगी = सोनम, विद्या, सुनिता, सरला, प्रियंका
शहर = दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, पुणे
नदी = नर्मदा, गोदावरी, गंगा, सिंधू, तापी
नाम कसे ओळखावे ?
अ ] सर्वनामास झा, झी, झे, झ्या असे प्रत्यय लागले असतील तर त्या नंतर येणार शब्द नाम असतो.
१] माझी पिशवी फाटकी आहे.२] माझ्या गावात जत्रा भरली.
३] माझे गुरुजी हुशार आहे.
४] माझा काका शिक्षक आहे.
हे पण पहा :- मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार
ब] वाक्याचा कर्ता व कर्म नाम असतो.
१] भारत आमचा देश आहे.२] सुयश हा हुशार मुलगा आहे.
३] एकता ही देशाची खरी ताकत असते.
४] प्रामाणिकपणा हा माणसाचा गुणधर्म असतो.
५] साखर ४० रुपये किलो झाली.
क] विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात.
१] आईचे जेवण झाले.२] कालिदासाची तुलना शेक्सपिअरशी करतात.
३] श्रीमंतांना गर्व असतो म्हाताऱ्याला चळ भरला.
४] शहाण्याला शब्दाचा मार.
५] लोकमान्यांनी स्वतंत्र्याची प्रेरणा दिली.
ड] षष्ठी प्रत्ययाच्या चा, ची, चे, च्या मागे व पुढे दोन्ही नामेच असतात.
१] माझ्या गावतील खेळाडूचा खेळ छान आहे.२] रामदासची पिशवी फाटकी आहे
३] मंदिरात पुजाऱ्याची पूजा संपली.
४] गावच्या जत्रेत मज्जा फार येते.
५] माकडची शेपूट ओंडक्यात अडकली.
इ] विभक्तीचे प्रत्यय जोडलेले शब्द नाम असतात किंवा नामाचे कार्य करतात.
१] पोपट झाडावर बसला होता.२] माझ्या जीवावर बेतले असते.
३] राजू टेबलाखाली लपला होता.
४] माझे घर शाळेजवळ आहे.
५] गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.
हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार
नामांचे वाक्यातील विविध उपयोग :-
अ ] विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग :-
विशेष नामाचा उपयोग जर दुसऱ्याला उपमा देण्यासाठी किंवा अनेकवचन म्हणून केल्यास ते सामान्य नाम होते.
उदाहरणार्थ :-
१) कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे.
२) आमच्या वर्गात तिन पाटील आहेत.
उदाहरणार्थ :-
१) कालिदास हा भारताचा शेक्सपिअर आहे.
२) आमच्या वर्गात तिन पाटील आहेत.
ब] सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग :-
जर समान्यनामाचा एखादी विशिष्ट व्यक्ती, स्थळ किंवा वस्तू तसेच प्राण्यासाठी उपयोग केल्यास ते विशेष नाम होते.उदाहरणार्थ :-
१) काल पंतप्रधान लंडनहून परत आला.
२) आमची मैना सातवीत शिकते गेला.
क] भाववाचक नामांचा विशेष नाम म्हणून उपयोग :-
जर भाववाचक नामांचा उपयोग एखाद्या व्यक्तीसाठी केल्यास ते विशेष नाम होते.उदाहरणार्थ :-
१) शांती अभ्यासात हुशार आहे.
२) माधुरी चांगले नृत्य करते.
१) शांती अभ्यासात हुशार आहे.
२) माधुरी चांगले नृत्य करते.
क] विशेषणसाधित नामे :-
काही वेळा विशेषणांचा उपयोग नामाप्रमाणे करतात तेव्हा विशेषणांना नामाप्रमाणे विभक्ती प्रत्यय लागतात.उदाहरणार्थ :-
१) श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण)
१) श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण)
श्रीमंतांना गर्व असतो. (नाम)
२) म्हाताऱ्या माणसाला चळ भरला. (विशेषण)
म्हाताऱ्याला चळ भरला. (नाम)
२) म्हाताऱ्या माणसाला चळ भरला. (विशेषण)
म्हाताऱ्याला चळ भरला. (नाम)
ड] धातुसाधित नामे :-
जेव्हा धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला 'धातुसाधित नाम' असे म्हणतात.उदाहरणार्थ :-
१) चांगले खेळाडू आज काल घडत नाहीत.
२) देणाऱ्याने देत जावे.
१) चांगले खेळाडू आज काल घडत नाहीत.
२) देणाऱ्याने देत जावे.
इ] अव्ययसाधित नामे :-
कधीकधी अव्ययांचा उपयोग नामासारखा केला जातो.उदाहरणार्थ :-
१) त्याच्या प्रत्येक वाक्यात 'आणि' चा वापर असतो.
२) आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली.
१) त्याच्या प्रत्येक वाक्यात 'आणि' चा वापर असतो.
२) आमच्या शाळेच्या संघाने यंदा क्रिकेटची ट्रॉफी पटकावल्यामुळे खेळाडूंची खूप वाहवा झाली.
तुम्हाला मराठी नाम व नामाचे प्रकार | Types of Noun in Marathi | Nam v Namache Prakar | Nam V Tyache Prakar | Marathi Namache Prakar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box