मराठी शब्दांच्या जाती
Parts of Speech in Marathi | Shabdanchya Jati | Marathi Grammar
मराठी शब्दांच्या जाती | Parts of Speech in Marathi | Shabdanchya Jati | Marathi Grammar :-
मराठी शब्दांच्या जाती ( Parts of Speech in Marathi | Shabdanchya Jati ) मराठी भाषा शास्रशुद्ध शिकाण्यासाठी फार महत्वाच्या आहेत. कारण जोपर्यंत तुम्हाला चांगले मराठी व्याकरण ( Marathi Grammar ) येत नाही तोपर्यंत तुम्ही शास्रशुद्ध मराठी भाषेचा वापर करू शकत नाही. मराठी व्याकरण ( Marathi Grammar ) शिकत असताना त्यातील अतिशय महत्वाचा घटक असतो तो म्हणजे मराठी शब्दांच्या जाती ( Parts of Speech in Marathi | Shabdanchya Jati ) मराठी भाषेत शब्दांच्या आठ जाती आहेत. त्या जातींचे दोन विभागात विभाजन केले जाते.
अ] विकारी शब्द :-
१] नाम [ Noun ]
२] सर्वनाम [ Pronoun ]
३] विशेषण [ Adjective ]
४] क्रियापद [ Verb ]
ब] अविकारी शब्द :-
१] क्रियाविशेषण अव्यय [ Adverb ]
2] शब्दयोगी अव्यय [ Preposition ]
3] उभयान्वयी अव्यय [ Conjunction ]
४] केवलप्रयोगी अव्यय [ Interjection ]
अ] विकारी शब्द म्हणजे काय ?
जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या मूळ रुपात बहुधा कोणत्यातरी प्रकारचा बदल होतो, त्यांना विकारी शब्द असे म्हणतात . पुढील शब्दाच्या जाती विकारी शब्दात मोडतात.
अ] विकारी शब्द :-
१] नाम [ Noun ] २] सर्वनाम [ Pronoun ] ३] विशेषण [ Adjective ] ४] क्रियापद [ Verb ]
१] नाम [ Noun ]
२] सर्वनाम [ Pronoun ]
३] विशेषण [ Adjective ]
४] क्रियापद [ Verb ]
१] नाम [ Noun ] :-
कोणत्याही सजीव अथवा निर्जीव, दिसणाऱ्या किवा न दिसणाऱ्या, खऱ्या किंवा काल्पनिक व्यक्ती, ठिकाण, प्राणी, विचार आणि कल्पना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात.
उदारणार्थ :- भांडे, पाणी, मुंगी, हवा, मन, गंगा, काशी, पांढरेपणा, गोडी, शुद्धता, टेबल, कागद, पेन, साखर, अप्सरा, गाडी, खोटेपणा, औदार्थ, देव, स्वर्ग, पुस्तक, पर्वत, मुलगी, घर, शाळा, फळ, फूल, गाय, घोडा, टेवल, खुची, सलोख, स्नेहल, हिमालय, गंगा, कपिला, प्रामाणिकपणा, गोडी, धूर्तपणा, शौर्य, निर्भयता, कारुण्य इ.
- सुयश हुशार मुलगा आहे.
- राजेश माझा चांगला मित्र आहे.
- कुत्रा चाटतो.
- मला शाळेत जायला आवडते.
- कविता सुंदर गाते.
- घड्याळ वेळ दाखवते.
- माझे कुटुंब माझी, माझी जबाबदारी.
- माणसाने आपली पायरी ओळखून वागावे.
- गोदावरीला महाराष्ट्राची गंगा म्हणतात.
- नाशिक द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे.
हे पण पहा :- मराठी नामाचे प्रकार
२] सर्वनाम [ Pronoun ] :-
नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामा ऐवजी वापरल्या जाणार्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
उदारणार्थ :- मी, तू, हा, कोण, काय, आपण, स्वतः, आम्ही, तुम्ही, तो, ती, ते, त्या, ती, जो, जी, जे, ज्या इ.
- पक्षी निज बाळांसह बागडते.
- तो आपणहून माझ्याकडे आला.
- रमेशच्या पिशवीत काय आहे ते पाहूया.
- कविता कोणी लिहिली ती माहीत नाही.
- ही कोण आहे?
- तुझे नाव काय आहे?
- जो करेल तो भरेल.
- जे कष्ट घेतात ते यशस्वी होतात.
- तो हुशार मुलगा आहे.
- ती कब्बडी खेळाडू आहे.
- ते सर्वात मोठे जहाज आहे.
- त्या चांगल्या नृत्य करत आहेत.
- हा हुशार मुलगा आहे.
- ही माझी जवळची मैत्रिण आहे.
- हे माझे काका आहेत.
- ह्या माझ्या आजी आहेत.
- तो म्हणे पुण्याला गेला.
- ती चांगली गाते.
- ते माझ्यावर रागावले होते.
- त्या चांगल्या नृत्य करतात.
- तू उद्या गावाला जाणार आहेस का?
- मी उद्या गावाला जाणार आहे.
- आम्ही तुला जेवण देणार.
- आपण खेळायला जाणार आहोत.
हे पण पहा :- मराठी सर्वनामाचे प्रकार
३] विशेषण [ Adjective ] :-
नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
उदारणार्थ :- चांगला, पांढरी, कड, पिवळी, वीस, पंचवीस,दहा, पाच, काही, थोडी, पुष्कळ, पहिला, चौथा,आठवा, दुप्पट, तिप्पट, दसपट इ.
- हुशार मुलगा
- सुंदर फुल
- आंबट चिंच
- पाच पांडव
- अर्धा किलो
- दोघे मित्र
- पहिला तास
- पाचवी इयत्ता
- पाचपट रक्कम
- द्विगुणीत आनंद
- दुहेरी फेरी
- तीन-तीनच्या रांगा
- दोन-दोनचे नाणे
- एकेक ओळ
- सर्व मुले
- काही फुले
- इत्यादी प्राणी
- थोडे मासे
- माझे घर
- हे पुस्तक
- त्याचा चेहरा बोलका वाटतो. (बोलणे)
- कोकिळा गात आहे. (गाणे)
- माझ्या भावाचे कापड दुकान आहे.
- त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.
- वरचा मजला
- खालचे पुस्तक
- काही साखर
- शहाणा मुलगा शांत असतो.
- पंचमुखी हनुमान
- एकवचनी राम
- गुलमोहर मोहक दिसतो.
हे पण पहा :- विशेषण व त्याचे प्रकार
४] क्रियापद [ Verb ] :-
वाक्यात क्रियादर्शविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदारणार्थ :- वाचणे, लिहिणे, पाहणे, रडणे , हसणे , पाळणे , मोडणे , तोडणे , उघडणे , पाळणे , खाणे, देणे इ.
- ती हसते.
- आम्ही प्रार्थना म्हणतो.
- तो जोरात धावतो.
- श्रेया छान नाचते.
- वाघ गवत खात नाही.
- त्याला त्याचे मत मांडू दे.
- सुयश गोष्टी वाचत असतो.
- विचारल्यास गैरीस बोलू नको.
- ईश्वर सर्वत्र आहे.
- आजारानंतर त्याला खेळवते.
- मला आता अभ्यास करवते.
- विदुशक प्रेक्षकांना हसवितो.
- आई मुलाला चालविते.
- त्याला घोड्यावर बसविले.
- मोडकळीस आलेली इमारत पाडली.
- आई कृष्णाला हसविते.
हे पण पहा :- क्रियापद व त्याचे प्रकार
ब] अविकारी शब्द म्हणजे काय ?
जे शब्द वाक्यात उपयोगात येताना त्यांच्या मूळ रुपात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. पुढील शब्दाच्या जाती अविकारी शब्दात मोडतात.
ब] अविकारी शब्द :-
१] क्रियाविशेषण अव्यय [ Adverb ]
2] शब्दयोगी अव्यय [ Preposition ]
3] उभयान्वयी अव्यय [ Conjunction ]
४] केवलप्रयोगी अव्यय [ Interjection ]
१] क्रियाविशेषण अव्यय [ Adverb ] :-
क्रियापदाबद्दल (क्रियेविषयी) विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
उदारणार्थ :- येथे, तेथे, पलीकडे, सभोवार, वर, खाली, आत, माग, पुढे,आज, उद्या, यंदा, जेव्हा, महिनाभर, वारंवार, आता, पूर्वी, मागे, सकाळी, रात्री, नेहमी, पुन्हा, दररोज, वेळोवेळी, क्षणोक्षणी,असे, तसे, जलद, सावकाश, हळूहळू, आपोआप, झटपट, खरोखर, खचित, उगीच, फुकट, मुद्दाम, व्यर्थ,किंचित, अत्यंत, थोडा, मुळीच, भरपूर, अतिशय, काहीसा, जरा, पूर्ण, विलकुल, कमी, अधिक इ .
उदाहरणार्थ :-
क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय तू वर बघ. तो पक्षी झाडावर बसला. अचानक समोर वाघ आला. घरासमोर विहीर आहे. पुर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे. परीक्षेपूर्वी तयारी करा. माझी शाळा जवळ आहे. माझ्याजवळ पुस्तक आहे. औषधाचा परिणाम नंतर दिसेल. जूननंतर जुलै महिना येतो. तू मध्ये का बसतोस. त्या दोघांमध्ये तू पडू नकोस. चालताना पुढे बघ. मुर्खापुढे शहाणपण चालत नाही.
क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय |
---|---|
तू वर बघ. | तो पक्षी झाडावर बसला. |
अचानक समोर वाघ आला. | घरासमोर विहीर आहे. |
पुर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे. | परीक्षेपूर्वी तयारी करा. |
माझी शाळा जवळ आहे. | माझ्याजवळ पुस्तक आहे. |
औषधाचा परिणाम नंतर दिसेल. | जूननंतर जुलै महिना येतो. |
तू मध्ये का बसतोस. | त्या दोघांमध्ये तू पडू नकोस. |
चालताना पुढे बघ. | मुर्खापुढे शहाणपण चालत नाही. |
हे पण पहा :- क्रियाविशेषण अव्यय व त्यांचे प्रकार
2] शब्दयोगी अव्यय [ Preposition ] :-
शब्दांनाजोडून येणाऱ्या व स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या शब्दांना (अव्यय) शब्दयोगी अव्यय म्हणतात.
उदारणार्थ :- आता, पूर्वी, पुढे, आत, पुढे, मध्ये, मुळे, कडून, साठी, भर, निशी. समवेत, पेक्षा, सारखा, मात्र, शिवाय, परीस इ.
उदाहरणार्थ (Preposition examples) :-
क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय तू वर बघ. तो पक्षी झाडावर बसला. अचानक समोर वाघ आला. घरासमोर विहीर आहे. पुर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे. परीक्षेपूर्वी तयारी करा. माझी शाळा जवळ आहे. माझ्याजवळ पुस्तक आहे. औषधाचा परिणाम नंतर दिसेल. जूननंतर जुलै महिना येतो. तू मध्ये का बसतोस. त्या दोघांमध्ये तू पडू नकोस. चालताना पुढे बघ. मुर्खापुढे शहाणपण चालत नाही.
क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय |
---|---|
तू वर बघ. | तो पक्षी झाडावर बसला. |
अचानक समोर वाघ आला. | घरासमोर विहीर आहे. |
पुर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे. | परीक्षेपूर्वी तयारी करा. |
माझी शाळा जवळ आहे. | माझ्याजवळ पुस्तक आहे. |
औषधाचा परिणाम नंतर दिसेल. | जूननंतर जुलै महिना येतो. |
तू मध्ये का बसतोस. | त्या दोघांमध्ये तू पडू नकोस. |
चालताना पुढे बघ. | मुर्खापुढे शहाणपण चालत नाही. |
हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार
3] उभयान्वयी अव्यय [ Conjunction ] :-
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणारा व त्यांच्यात वियोग घडवून आणणारा किंवा याप्रकारची कामे करणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदारणार्थ :- त्यासाठी, आणि, व, शिवाय, अन्, परंतु, पण, अथवा, किंवा, वा, म्हणून, कारण, की, म्हणजे, तर, जर, तरी, यासाठी, इ.
- मी वेळेवर गेलो म्हणून तो मला भेटला.
- तो भेटला आणि चटकन निघून गेला.
- देह जावो अथवा राहो.
- बाका प्रसंग आलाच तर डगमगू नये.
- तो इतका हसला की त्याचे पोट दुखू लागले.
- पैसा आला की माणुसकी संपते.
- तुला यायचे की नाही तूच ठरव.
- डॉक्टर झालास म्हणजे आमच्या आयुष्याचे सार्थक झाले.
- तप करता यावे म्हणून त्याने सन्यास घेतला.
- धोनी सामनावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या.
- विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला.
- मला काल ताप आला सबब मी शाळेत काल गैरहजर राहिलो.
- साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच.
- मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
- त्याने काम केले नाही शिवाय तो पैसे मागू लागला.
हे पण पहा :- उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार
४] केवलप्रयोगी अव्यय [ Interjection ] :-
मनाला भावना किंवा भावस्थिती यांचा उत्स्फूर्त उदगार दर्शविण्यासाठी जे शब्द वापरले जातात, अशा अविकारी शब्दांना केवल प्रयोगी किंवा उद्गार वाचक अव्यये असे म्हणतात.
उदारणार्थ :- वाहवा, अहाहा, वा वाः अहा, आहो, अरेरे, अगाई, हायहाय, शिवशिव, रामराम, देवा रे, आई, अबब, अरे बापरे, अय्या, अगवाई, छे, हट्ट, अंहं, उहूं, छी, थू, शी, इश्क, शाबास, भले, ठीक, जी, हां. ठीक. वरे, होय,अरे, अहो, अग, इ.
- अरेरे! फार वाईट झाले.
- बापरे! किती उंच इमारत ही!
- अरे ! इकडे कुठे तू?
- चुप! एक शब्दही बोलू नकोस!
- अबब! केवढा मोठा नाग तो.
- शाबास! असेच यश पुढेही मिळव.
- वा! काय धमाल उडवली त्याने!
- ठीक! हे अतिशय उत्तम झाले.
- 'हाय-हाय'! मोठा विषप्रयोग आहे हा!
हे पण पहा :- केवल प्रयोगी अव्यय
आम्ही तुम्हाला येथे शब्दांच्या जाती म्हणजे काय? शब्दांच्या जाती प्रकार, शब्दांच्या जाती उदाहरण, शब्दांच्या जाती वाक्य ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी शब्दांच्या जाती ( Parts of Speech in Marathi | Shabdanchya Jati Marathi | Marathi Grammar ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box