पसायदान व त्याचा अर्थ
PASAYDAN WITH MEANING
भगवत गीतेच्या अठराव्या अखेरच्या अध्यायातले ते नऊ ओव्यांचे पसायदान [ Pasaydan ] म्हणजे नऊ रत्नांनी जडवलेलं कंठामाळच होय. त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.
भारत हा एक सुसंस्कृत देश आहे. या देशााला सुसंंसकृत बनवण्यात संतांचे मोलाचे सहकार्य आहे. महाराष्ट्र ही तर संतांची भूमी आहे. त्यात संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत सावतामाळी अश्या अनेक संतांचा समावेश आहे. याच संतांनी आपल्याला आयुष्य जगण्यासाठी लागणारी जी मुल्ये , विचार, आचार , चांगुलपणा , सामाजिक बांधिलकी या संस्काराची शिकवण मराठी मातीत रुजवून दिली आहे.
संत ज्ञानेश्वर म्हणजेच 'माउली' यांनी "ज्ञानेश्वरी " उर्फ " भावार्थ दीपिका " हा ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची. भगवत गीतेच्या सातशे श्लोकांवर नऊ हजार ओव्यांचा फुलून आलेला भावनांचा फुलोरा. त्यातही अठराव्या अखेरच्या अध्यायातले ते नऊ ओव्यांचे पसायदान म्हणजे नऊ रत्नांनी जडवलेलं कंठामाळच होय.
पसायदान ही वैश्विक प्रार्थना आहे. पसायदान ही एक शांतिगाथाच होय. ज्ञानेश्वरी हा पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ आता पूर्ण व्हायला आला आहे तरी हे विश्वाच्या देवा आपण मला सर्व विश्वाच्या कल्याणासाठी प्रसादाचे दान द्यावे अशी प्रार्थना परमेश्वराकडे ज्ञानेश्वर महाराज करतात. पसायदान आपणा सर्वांना माहितच आहे परंतु त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न. जर काही चूक झाल्यास माफी असावी.
पसायदान
[ Pasaydan ]
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवांचें ॥ २ ॥
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥
वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥ ८ ॥
येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥
पसायदानाचा अर्थ
[ Meaning of Pasaydana ]
आता ह्या सर्व विश्वाचा आत्मा असणाऱ्या परमेश्वराने मला माझ्या वागयज्ञरूपी सेवेवर प्रसंन्न होऊन मला प्रसादाचे दान द्यावे.
दुष्टांचे दुष्टपण जावे आणि त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होवो आणि मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करवा.
पापरूपी अंधाराचा नाश होवो आणि सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.
ईश्वरनिष्ठांचा समुदाय (संत) पृथ्वीवर सर्वत्र मंगलांचा अखंड असा वर्षाव करीत आहे. तो सर्व प्राण्यांना भेटो.
कल्पतरू आणि चिंतामणी पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर संत मात्र हे दोन्हीचे पण काम करतात शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात व देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात आणि त्यांच्या प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत ,तर त्यांचे समूह आहेत. अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते सार्या समाजाला अमर करू शकतात.
संत हे चंद्र आहेत पण त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग नाही आणि त्यांच्याकडे ज्ञानाचे तेज आहे पण ते उष्णतेची दाहकता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात.
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची (परमेश्वर) अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात.
आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे, उपजीविकेचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट असे दोन्ही प्रकारचे विजय मिळोत.
तेव्हा, विश्वाचे राजे सद्गुरू निवृत्तीनाथ प्रसंन्न होऊन म्हणाले. की तुझी ही ईच्छा सफल होईल. असा तुला प्रसाद आहे. तेेेव्हाच ज्ञांनेश्वर महाराज सुखी झाले.
भगवत गीतेच्या अठराव्या अखेरच्या अध्यायातले ते नऊ ओव्यांचे पसायदान म्हणजे नऊ रत्नांनी जडवलेलं कंठामाळच होय. त्याचा अर्थ सोप्या भाषेत लिहिण्याचा छोटासा प्रयत्न.
तुम्हाला पसायदान व त्याचा अर्थ ( Pasaydan with meaning ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box