POWER OF WORDS IN MARATHI
मराठी शब्दांच्या शक्ती
Marathi Shabdanchya Shakti
मराठी शब्दांच्या शक्ती ( Power of words in marathi | Marathi Shabdanchya Shakti ) :-
मराठी शब्दांच्या शक्ती ( Power of words in marathi | Marathi Shabdanchya Shakti ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी शब्दांच्या शक्ती ( Power of words in marathi | Marathi Shabdanchya Shakti ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी शब्दांच्या शक्ती ( Power of words in marathi | Marathi Shabdanchya Shakti ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती
शब्दांच्या शक्ती (Shabdanchya Shakti) म्हणजे काय ?
शब्दांच्या अंगी वेगवेगळ्या अर्थच्छटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती (Shabdanchya Shakti) असे म्हणतात.
शब्दांच्या शक्तीचे (Shabdanchya Shakti) प्रकार किती व कोणते?
शब्दांच्या शक्तीचे तीन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे
शब्दांच्या शक्ती
क्र प्रकार १ अभिधा [ Abhidha ] २ व्यंजना [ Vyanjana ] ३ लक्षणा [ Lakshana ]
क्र | प्रकार |
---|---|
१ | अभिधा [ Abhidha ] |
२ | व्यंजना [ Vyanjana ] |
३ | लक्षणा [ Lakshana ] |
शब्दांच्या शक्तीचे (Shabdanchya Shakti) प्रकार :-
१] अभिधा म्हणजे काय ?
एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य एकच अर्थ निघतो हा अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दांच्या शक्तीस अभिधा ( Abhida ) असे म्हणतात.
- वाच्यार्थालाच अभिधा असे म्हणतात.
- योग, रूढी, योगरूढ हे अभिधा शब्दशक्ती मध्ये येते.
- शब्द उच्चारल्यावरच मूळ वस्तू, पदार्थ आपल्या डोळ्यासमोर येते.
उदारणार्थ :-
१ ] बाबा जेवायला बसले.
२ ] मी एक साप पाहिला.
३ ] आम्ही गहू खरेदी केला.
४ ] माझ्याकडे पांढरा उंदीर आहे.
५ ] आमच्या बागेत लाल गुलाबाचे फुल आहे.
👉या वाक्यात बाबा, साप, गहू, पांढरा उंदीर, लाल गुलाबाचे फुल ह्या वस्तू डोळ्यासमोर उभ्या राहतात.
हे पण पहा :- म्हणी व त्याचे अर्थ
२] व्यंजना म्हणजे काय ?
मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दाची शक्ती असते तिला व्यंजना ( Vyanjana ) असे म्हणतात.
- व्यंग दाखविणे, टोमणे मारणे, दुसऱ्याला नाव ठेवणे, दोन अर्थाने शब्द वापरणे अशा प्रकारे व्यंजना वापरतात.
- काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी याचा वापर करतात.
- ध्वन्यर्थ म्हणजे व्यंजना शब्दशक्तीमूळे सूचित होणारा अर्थ होय.
उदारणार्थ :-
१ ] समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.
२ ] भुंकणारे कुत्रे चावत नसतात.
३ ] ताराबाई सुनेला म्हणाल्या, 'सूर्य अस्ताला गेला'.
४ ] घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले.
५ ] गोरगरिबांचे रक्त शोषणार्या या जळवा वेचून काढल्या पाहिजे.
३] लक्षणा म्हणजे काय ?
ज्या शब्दशक्ती मध्ये शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो व मनात शंका येते, हे कसे शक्य आहे, तेव्हा ती शब्दशक्ती लक्षणा ( Lakshana ) असते.
उदारणार्थ :-
१ ] चला पानावर बसा.
(चला जेवायला बसा)
२ ] सूर्य बुडाला.
( सूर्यास्त झाला किंवा रात्र झाली)
३ ] घरावरून हत्ती गेला.
(घरासमोरून हत्ती गेला)
४ ] मी वि.स.खांडेकर वाचला.
(मी वि.स.खांडेकर यांचे पुस्तक वाचले)
५ ] पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली.
(पानिपत युद्धात सव्वा लाख सैन्य मेले किंवा स्रिया विधवा झाल्या)
हे पण पहा :- विराम चिन्हे |
आम्ही तुम्हाला शब्दांच्या शक्ती म्हणजे काय? , शब्दांच्या शक्तींचे प्रकार, तसेच त्यांचे उदाहरण ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी शब्दांच्या शक्ती ( Power of words in marathi | Marathi Shabdanchya Shakti ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box