शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार
Shabd Yogi Avyay
Preposition in marathi | Preposition examples | Preposition list
शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार ( Preposition in marathi | Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार ( Preposition in marathi | Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार ( Preposition in marathi | Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) ही माहिती येथे देण्यात येत आहे. चला तर मग आपण बघूया शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार ( Preposition in marathi | Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) .
हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती
शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ?
जे शब्द सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दर्शवितात त्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय ( Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) असे म्हणतात.
शब्दयोगी अव्यय ( Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) हे स्वतंत्र असे शब्द नसतात. पुढे, मागे, खाली, वर, समोर, नंतर, आता, बाहेर, दूर, जवळ हे शब्द मूळचे क्रियाविशेषण आहेत परंतु हेच शब्द नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून आल्यास ते शब्दयोगी अव्यय ( Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay ) होतात.
शब्दयोगी अव्यय उदाहरण :-
क्र क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय १ पुर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे. परीक्षेपूर्वी तयारी करा. २ औषधाचा परिणाम नंतर दिसेल. जूननंतर जुलै महिना येतो. ३ अचानक समोर वाघ आला. घरासमोर विहीर आहे. ४ चालताना पुढे बघ. मुर्खापुढे शहाणपण चालत नाही. ५ तू मध्ये का बसतोस. त्या दोघांमध्ये तू पडू नकोस. ६ माझी शाळा जवळ आहे. माझ्याजवळ पुस्तक आहे. ७ तू वर बघ. तो पक्षी झाडावर बसला. ८ सुयश खाली उतर पाहू. सुयश बाकाखाली बसला.
क्र | क्रियाविशेषण अव्यय | शब्दयोगी अव्यय |
---|---|---|
१ | पुर्वी माणसे क्षयरोगाने मरत असे. | परीक्षेपूर्वी तयारी करा. |
२ | औषधाचा परिणाम नंतर दिसेल. | जूननंतर जुलै महिना येतो. |
३ | अचानक समोर वाघ आला. | घरासमोर विहीर आहे. |
४ | चालताना पुढे बघ. | मुर्खापुढे शहाणपण चालत नाही. |
५ | तू मध्ये का बसतोस. | त्या दोघांमध्ये तू पडू नकोस. |
६ | माझी शाळा जवळ आहे. | माझ्याजवळ पुस्तक आहे. |
७ | तू वर बघ. | तो पक्षी झाडावर बसला. |
८ | सुयश खाली उतर पाहू. | सुयश बाकाखाली बसला. |
शब्दयोगी अव्ययाचे प्रकार ( Shabd Yogi Avyayache Prakar ):-
शब्दयोगी अव्ययांचे प्रकार
प्रकार शब्द दिक
वाचक प्रत, प्रति, कडे, लागी विनिमय
वाचक बद्दल, ऐवजी, जागी, बदली कैवल्य
वाचक मात्र, ना, पण, फक्त, केवळ संग्रह
वाचक सुद्धा, देखील, ही, पण, बारीक,
केवळ, फक्त काल
वाचक पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत,पावेतो,
गतिवाचक, आतून, खालून, मधून,
पर्यंत, पासून. स्थल
वाचक आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे,
समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक. करण
वाचक मुळे, योगे, करून, कडून, व्दारा,
करवी, हाती भाग
वाचक पैकी, पोटी, आतून साहचर्य
वाचक बरोबर, सह, संगे, सकट, सहित,
रावे, निशी, समवेत व्यक्तिरेखा
वाचक शिवाय, खेरीज, विना, वाचून,
व्यक्तिरिक्त, परता हेतु
वाचक साठी, कारणे, करिता, अथा,
प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव तुलना
वाचक पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस विरोधा
वाचक विरुद्ध, वीण, उलटे, उलट परिणाम
वाचक भर योग्यता
वाचक विषयी, विशी संबंध
वाचक विषयी, विशी
प्रकार | शब्द |
---|---|
दिक वाचक | प्रत, प्रति, कडे, लागी |
विनिमय वाचक | बद्दल, ऐवजी, जागी, बदली |
कैवल्य वाचक | मात्र, ना, पण, फक्त, केवळ |
संग्रह वाचक | सुद्धा, देखील, ही, पण, बारीक, केवळ, फक्त |
काल वाचक | पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत,पावेतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून. |
स्थल वाचक | आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक. |
करण वाचक | मुळे, योगे, करून, कडून, व्दारा, करवी, हाती |
भाग वाचक | पैकी, पोटी, आतून |
साहचर्य वाचक | बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत |
व्यक्तिरेखा वाचक | शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यक्तिरिक्त, परता |
हेतु वाचक | साठी, कारणे, करिता, अथा, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव |
तुलना वाचक | पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस |
विरोधा वाचक | विरुद्ध, वीण, उलटे, उलट |
परिणाम वाचक | भर |
योग्यता वाचक | विषयी, विशी |
संबंध वाचक | विषयी, विशी |
शब्दयोगी अव्ययाचे इतर प्रकार ( Shabd Yogi Avyayache Prakar ):-
शब्दयोगी अव्ययांचे इतर प्रकार
प्रकार शब्द नामसाधित
शब्दयोगी अव्यय कडे, मध्ये प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी इ. विशेषणसाधित
शब्दयोगी अव्यय सम; सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध इ. धातुसाधित
शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषणसाधित
शब्दयोगी अव्यय खालून, मागून, वरून, आतून, जवळून इ. संस्कृत शब्दसाधित
शब्दयोगी अव्यय पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष इ.
प्रकार | शब्द |
---|---|
नामसाधित शब्दयोगी अव्यय | कडे, मध्ये प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी इ. |
विशेषणसाधित शब्दयोगी अव्यय | सम; सारखा, सहित, समान, योग्य, विरुद्ध इ. |
धातुसाधित शब्दयोगी अव्यय | क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय |
क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यय | खालून, मागून, वरून, आतून, जवळून इ. |
संस्कृत शब्दसाधित शब्दयोगी अव्यय | पर्यंत, विना, समक्ष, समीप, परोक्ष इ. |
विभक्ती प्रतिरूपक अव्यये म्हणजे काय ?
विभक्तीप्रत्ययांची कार्य करणान्या शब्दयोगी अव्ययाना विभक्ती प्रतिरूपक अव्यये असे म्हणतात.विभक्ती प्रतिरुपक अव्यय प्रकार
विभक्ती विभक्ती प्रतिरूपक अव्यये व्दितिया प्रत, लागी तृतीया कडून, करवी, वारा, मुळे, योगे, प्रमाणे चतुर्थी करिता, साठी, कडे, प्रत, प्रीत्यर्थ, बद्दल पंचमी पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून, षष्ठी संबंधी, विषयी सप्तमी आत, मध्ये, खाली, ठायी, विषयी, समोर
विभक्ती | विभक्ती प्रतिरूपक अव्यये |
---|---|
व्दितिया | प्रत, लागी |
तृतीया | कडून, करवी, वारा, मुळे, योगे, प्रमाणे |
चतुर्थी | करिता, साठी, कडे, प्रत, प्रीत्यर्थ, बद्दल |
पंचमी | पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून, |
षष्ठी | संबंधी, विषयी |
सप्तमी | आत, मध्ये, खाली, ठायी, विषयी, समोर |
इतर महत्वाचे शब्द (Preposition examples, Preposition list) :-
पुलापर्यंत, शाळेबाहेर, नदीपलीकडे, सर्वांसमक्ष, पत्राविषयी, पत्राद्वारे, कारणास्तव, सुखापेक्षा, मित्राविना, मित्रासंगे, मित्रांसमवेत, मित्रांसोबत, प्रेमापोटी, भावांपैकी, भारतासारखा, सहलीनिमित्त, आईसमान, ढगांसवे, सामानानिशी, संतांच्याठायी, लिहिण्यासाठी, आजपोवेत इत्यादी.
सरावासाठी प्रश्न :-
खालील अधोरेखित शब्दांचा प्रकार ओळखा ?
- तो पुण्याकडे गेला
- साखरेऐवजी गूळ पा
- रामापेक्षा मधू उंच आहे.
- पाण्याविना जीवन नाही.
- माणसापरीस मेंढरं बरी
- जगण्याकरिता अत्र हवे.
- हा पेरू खाण्यायोग्य आहे.
- हे रान गाईसाठी ठेवले आहे.
- पुष्पासंगे मातीस सुवास लागे
- दिवसभर पाऊस कोसळत होता.
- हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे.
- मुलीमध्ये सारिका सर्वात हुशार आहे.
- देव देखील भक्तासाठी धावून येतो.)
- शंभरातून एखादाच वाईट निघतो.
- उपचाराकरिता मुंबईस जात आहे.
- उपचारानिमित्त तो पुण्याला गेला.
- भारताविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे.
- सालीसकट फळे खाणे हितकारक असते.
- पत्र लिहिण्यासाठी मला एक पेन हवा.
- फक्त देव तुला या संकटातून वाचवू शकतो.
- अंगच्या कपड्यानिशी त्याला हाकलून दिले.
- तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही.
- व्याजापोटी मला पाचशे रुपये द्यावे लागले.
- पंधरापैकी सात पक्षी उडून गेले तर खाली किती शिल्लक राहिले?
तुम्हाला शब्दयोगी अव्यय व त्यांचे प्रकार | Preposition in marathi | Shabd Yogi Avyay | Shabdyogi Avyay Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box