मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 18, 2023

मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning

PROVERBS IN MARATHI

मराठी म्हणी व त्याचे अर्थ

Mhani in Marathi with Meaning

Marathi Proverbs | Marathi Mhani


मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning

मराठी म्हणी व त्याचे अर्थ ( Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning ) :-

            मराठी म्हणी व त्याचे अर्थ ( Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meanaing ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            मराठी म्हणी ( Marathi Mhani ) म्हणजे आपण सहज बोलत असतांना पूर्वीच्या अनुभवावर आधारित पारंपारिक वाक्य कि जे सत्याची अभिव्यक्ती करत असेल. आपण रोजच संभाषण करत असतांना कुठेना कुठे न जाणता का होईना पण म्हणीचा वापर करतच असतो. म्हणीनमुळे देखील आपल्या भाषेचे सौंदर्य खुलून येते ती निरस वाटत नाही. 
          चला तर मग आपण बघूया मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning ) .


म्हणी म्हणजे काय ?

            परिस्थितीचा अंदाज घेऊन लोकपरंपरेने आलेला अनुभव व ज्ञान यांच्या जोरावर कमीत कमी शब्दात त्या परिस्थिती वर सूचक व समर्पक वापरला जाणारा अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे 'म्हणी' ( Mhani ) होय.



मराठी म्हणी व त्याचे अर्थ या घटकावर परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न पुढील प्रमाणे :

   १] खालील म्हण पूर्ण करा.

    २] खालील म्हण ओळखा.

    ३] खालील म्हणीचा अर्थ सांगा.

    ४] पुढील म्हणीचा वाक्यात उपयोग करा.

    ५] पुढील वाक्यास कोणती म्हण लागू पडेल.


मराठी म्हणी व त्याचे अर्थ

Marathi proverbs

Marathi Mhani

Proverbs in Marathi

Mhani in Marathi with Meaning


कोल्हा काकडीला राजी = लहान लहान गोष्टींनी खुश होतात.

कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी = चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला

कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी = महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.

खऱ्याला मरण नाही = खरे कधीच लपत नाही.

खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते = खर्च करणार्‍याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.

खाऊ जाणे तो पचवू जाणे = एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो.


हे पण पहा :- समानार्थी शब्द

खान तशी माती = आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.

खायला काळ भुईला भार = निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.

खाई त्याला खवखवे = जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.

खाऊन माजावे टाकून माजू नये = पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.

खोट्याच्या कपाळी गोटा = खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.

गरज सरो, वैद्य मरो = एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.

कधी तुपाशी तर कधी उपाशी = सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.

कशात-काय-अन-फाटक्यात-पाय = वाईटात आणखी वाईट घडणेकाठी मारल्याने पाणी दुभंगत नाहीरक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.


काडीचोर तो माडीचोर = एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे.

काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती = गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.

का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ = निरर्थक गोष्टींची काळजी करणे.

कानात बुगडी, गावात फुगडी = आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.

काल महिला आणि आज पितर झाला = अतिशय उतावळेपणाची वृत्ती.

काकडीची चोरी फाशीची शिक्षा = अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.


काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही = जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.

कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते = पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.

मल्हारी माहात्म्य = नको तिथे नको ती गोष्ट करणे.

काना मागुन आली आणि तिखट झाली = श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.

कामापुरता मामा = आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.

कावळा बसला आणि फांदी तुटली = परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे

अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे = एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.

अंथरूण पाहून पाय पसरावे = आपली ऐपत, वकूब पाहून वागावे.

अंगापेक्षा बोंगा मोठा = मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.

आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे = स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे.

आपली पाठ आपणास दिसत नाही = स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.

आजा मेला नातू झाला = एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे.

आत्याबाईला जर मिशा असत्या तर = नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.

आवळा देऊन कोहळा काढणे = आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.

आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही = अनुभवाशिवाय शहाणपण नसते.

आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन = दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.


हे पण पहा :- शब्दसमूहाबद्दल एक शब्द

आधीच तारे, त्यात गेले वारे = विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.

आधीच मर्कट तशातही मद्य प्याला = आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.

अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा = मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे.

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर = रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.

आयजीच्या जीवावर बायजी उदार = दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.


आग खाईल तो कोळसे ओके = लजशी करणी तसे फळआठ पूरभय्ये नऊ चौबेखूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे.

आधणातले रडतात व सुपातले हसतात = संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते.

इकडे आड तिकडे विहीर = दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.

इच्छा परा ते येई घरा = आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.

इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते = इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.

इन मीन साडेतीन = एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.

ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो = जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.

उथळ पाण्याला खळखळाट फार = अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.

उंदराला मांजर साक्ष = ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.

उचलली जीभ लावली टाळ्याला = दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे

उतावळा नवरा गुडघ्याला बारशिंग = अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.

उठता लाथ बसता बुक्की = प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.

उडत्या पाखराची पिसे मोजणे = अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.



उतावळी बावरी (नवरी) म्हातार्‍याची नवरी = अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.

उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी = जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.

उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले = फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे.

ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे = अतिशय हलाखीची स्थिती.

उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी = प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

उकराल माती तर पिकतील मोती = मशागत केल्यास चांगले पीक येते.

उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला? = एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.


हे पण पहा :-शब्दांच्या शक्ती

उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? = जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.


उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक = एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.

उधारीची पोते, सव्वा हात रिते = उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.

उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे = श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.

उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे = येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

उसाच्या पोटी कापूस = सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.

ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये = कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

एका माळेचे मणी = सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.

एका हाताने टाळी वाजत नाही = दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.

एक ना धड भाराभर चिंध्या = एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.

एकावे जनाचे करावे मनाचे = लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे.

एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी = दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.

एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये = दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.

एका पिसाने मोर होत नाही = थोड्याश्या यशाने हुरळून जाणेएका खांबावर द्वारकाएकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.

एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला = एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.


एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी = बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्यएका मान्यात दोन तलवारी राहात नाहीतदोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.

ऐंशी तेथे पंचाऐंशी = अतिशय उधळेपणाची कृती.

ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | = मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.

ओळखीचा चोर जीवे न सोडली = ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.

ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो = कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.

ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे? = सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.

औटघटकेचे राज्य = अल्पकाळ टिकणारी गोष्ट.


करावे तसे भरावे = जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.

कर नाही त्याला डर कशाला ? = ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?

करीन ते पूर्वमी करेन ते योग्य, = मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.

करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते = काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.

करुन करुन भागला, देवध्यानी लागला = भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.

कणगीत दाणा तर भिल उताणा = गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.

काखेत कळसा गावाला वळसा = जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे

काप गेले नी भोके राहिली = वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही = शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

काळ आला; पण वेळ आली नव्हती = नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.

असतील शिते तर जमतील भूते = एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ = दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो

अडला हरी गाढवाचे पाय धरी = एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते

अतिशहाणा त्याचा बैल रिकामा = जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही

अति तेथे माती = कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो

अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे = दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे

अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज = गरजवंताला अक्कल नसते

अंगावरचे लेणे, जन्मभर देणे = दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे

अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण = मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.

अंधारात केले, पण उजेडात आले = कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे = नाव मोठे लक्षण खोटे

अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था = अशक्यकोटीतील गोष्टीअती झाले अन आसू आले = एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते

अतिपरिचयात अवज्ञा = जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे = कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच

अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास = अन्न न खाणे;पण त्यात मन असणे

अपापाचा माल गपापा = लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.

अर्थी दान महापुण्य = गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.


आईची माया अन् पोर जाईल वाया = फार लाड केले तर मुले बिघडतात

आधी पोटोबा मग विठोबा = प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे

आपलेच दात आपलेच ओठ = आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.


हे पण पहा :- तत्सम शब्द

आयत्या बिळावर नागोबा = एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे = अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे

आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला = ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो, तो दोष आपल्या अंगी असणे

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास = मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.

आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं = एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.

आंधळ्या बहिर्यांची गाठ = एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्‍या दोन माणसांची गाठ पडणे.

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ? = चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे.

अडली गाय फटके खाय = एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते.

आपला हात जगन्नाथ = आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा = अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.

अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ? = कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.

अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप = अतिशय उतावळेपणाची कृती.

अती खाणे मसणात जाणे =अति खाणे नुकसानकारक असते.

अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी = मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.

अवचित पडे, नि दंडवत घडे = स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.

आपल्याच पोळीवर तूप ओढणे = फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

आलिया भोगासी असावे सादर = तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात = चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.

कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा = दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.

कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे = मूळचा स्वभाव बदलत नाही.

कुडी तशी फोडी = देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ = स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.

केळीला नारळी अन घर चंद्रमौळी = अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे.

केस उपटल्याने का मढे हलके होते ? = जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.

केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले = एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.

कोळसा उगाळावा तितका काळाच = वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.

गळ्यात पडले झुंड हसून केले गोड = गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते.

ग ची बाधा झाली = गर्व चढणे

गरजेल तो पडेल काय = केवळ बडबडणार्या माणसाकडून काही घडत नाही.

गरजवंताला अक्कल नसते = गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.

गर्वाचे घर खाली = गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.

गळ्यातले तुटले ओटीत पडले = नुकसान होता होता टळणे.

गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता = मुर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो.

गाड्याबरोबर नळ्याची यात्रा = मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.

गाढवाला गुळाची चव काय ? = ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.


गाढवाच्या पाठीवर गोणी = एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा.

गाव करी ते राव न करी = श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात.

गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ = मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.

गाय व्याली, शिंगी झाली = अघटित घटना घडणे.

जळे आणि हनुमान बेंबी चोळे = दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे

गोगलगाय न पोटात पाय = बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती.


हे पण पहा :- बहुव्रीहि समास

घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे = अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे

घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात = एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.

घरोघरी मातीच्या चुली = एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

घर ना दार देवळी बिर्हाड = शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती.

घडाई परिस मडाई जास्त = मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.

घेता दिवाळी देता शिमगा = घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.

घोडे कमावते आणि गाढव खाते = एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा.

चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ = मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.

चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे = प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.

चार जणांची आई बाजेवर जीव जाई = जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.

चिंता परा येई घरा = दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते.

चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला = स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.

चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई = घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.

चोर सोडून संन्याशालाच फाशी = खर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.

चोराच्या उलट्या बोंबा = स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.

चोरावर मोर = एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.

चोरांच्या हातची लंगोटी = ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे.

चोराची पावली चोराला ठाऊक = वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

चोराच्या मनात चांदणे = वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते.

चालत्या गाडीला खीळ = व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.

जशी देणावळ तशी धुणावळ = मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.

जलात राहून माशाशी वैर करू नये = ज्यांच्या सहवासात रहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.

जळतं घर भाड्याने कोण घेणार ? = नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ?

बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ? = जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही =बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.

जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे = दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.

जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले = जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे.

जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी = अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे.

जे न देखे रवि ते देखे कवी = जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.

जो गुळाने मरतो त्याला विष कशास ? = जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते.


ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी = एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.

ज्याच्या हाती ससा, तो पारधी = ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.

ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे = एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.

ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी = जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.

झाकली मूठ सव्वा लाखाची = व्यंग नेहमी झाकून ठेवावे.

टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही = कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही.

डोळ्यात केर आणि कानात फुंकर = रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.

ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला = वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो.

ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा = वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.

तळे राखील तो पाणी चाखील = ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच.

तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे = अगदी उलट गुणधर्म दिसणे.

तट्टाला टूमणी, तेजीला इशारत = जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.

ताकापुरते रामायण = एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.

तीन दगडात त्रिभुवन आठवते = संसार केल्यावरच खरे मर्म कळते.

तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही = चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.

तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे =  आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.

तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले = मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.

तेरड्याचा रंग तीन दिवस = कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार = एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.

तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे = खायला पुढे कामाला मागे.

थेंबे थेंबे तळे साचे = दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.

थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान = मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.

दगडापेक्षा वीट मऊ = मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.

दस की लकडी एक्का बोजा = प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.


हे पण पहा :- विशेषण

दहा गेले, पाच उरले = आयुष्य कमी उरणे.

दात कोरून पोट भरत नाही = मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.

दाम करी काम, बिवी करी सलाम = पैसे खर्च केले की कोणतेही काम होते.

दाखविलं सोनं हसे मुल तान्हं = पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.

दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत = एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.

दिल चंगा तो कथौटी में गंगा = आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते.

दिव्याखाली अंधार = मोठ्या माणसातदेखील दोष असतो.

दिल्ली तो बहुत दूर है = झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.

दिवस बुडाला मजूर उडाला = रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.

दुरून डोंगर साजरे = कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.


दुभत्या गाईच्या लाथा गोड = ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.

दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही = दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.

दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते = एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

देश तसा वेश = परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.

देव तारी त्याला कोण मारी ? = देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.

देखल्या देवा दंडवत = सहज दिसले म्हणून चौकशी करणे.

देणे कुसळांचे घेणे मुसळाचे = पैसे कमी आणि काम जास्त.

देवा दंडवत = एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.

दैव देते आणि कर्म नेते = नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.

दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी = नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.

दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला = नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे

दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाईन = शिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.

दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी = दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.

दृष्टी आड सृष्टी = आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.

धर्म करता कर्म उभे राहते = एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.

धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी = कोणत्याच कामाचे नसणे.

धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा = छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे.

धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या = गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने = दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात

नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये = नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.

न कर्त्याचा वार शनिवार = एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.

नव्याचे नऊ दिवस = कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.

नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे = केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे.


हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार

नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे = एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणेनाकापेक्षा मोती जडमालकापेक्षा नोकर शिरजोर असणेनाव सोनुबाई हाती कथलाचा वाळानाव मोठे लक्षण खोटे.

नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे = देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.

नाक दाबले, की तोंड उघडते = एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.

नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला = आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.

नागिन पोसली आणि पोसणाराला डसली = वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच

नाकापेक्षा मोती जड = मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणेनाचता येईना



            आम्ही तुम्हाला येथे मराठी म्हणी म्हणजे काय ? , मराठी म्हणी व त्याचे अर्थ या घटकावर परीक्षेत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न, मराठी म्हणी व त्याचे अर्थ ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला सामान्य रूपाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी म्हणी व त्याचे अर्थ | Proverbs in Marathi | Marathi proverbs | Mhani in Marathi with Meaning ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad