मराठी सामान्य रूप | Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 14, 2023

मराठी सामान्य रूप | Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup

 मराठी सामान्य रूप 

 Samanya Rup

Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup

मराठी सामान्य रूप | Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup

सामान्य रूप ( Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup ) :- 

            सामान्य रूप ( Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी सामान्य मराठी रूप ( Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी सामान्य रूप ( Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया सामान्य रूप ( Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup ) .



सामान्य रूप म्हणजे काय? [ Samanya Rup ]

            नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याच्या रुपात जो बदल होतो त्याला 'सामान्य रूप' ( Samanya Rup ) असे म्हणतात.


सामान्य रुपाची उदाहरणे :-

मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
घोडाघोड्याचे, ला, ने, सघोड्याचे, घोड्याला, घोड्याने, घोड्यास
वाडावाड्याचे, ला, त, सवाड्याचे, वाड्याला, वाड्यात, वाड्यास
दिशादिशेचे, ला, ने, सदिशेचे, दिशेला, दिशेस, दिशेने
फूलफुलाचा, ला, ने, सफुलाचा, फुलाला, फुलाने, फुलास
किंमतकिमतीचे, ला, सकिमतीचे, किमतीला, किमतीस
पैसापैशाचा, ला, ने, सपैशाचा, पैशाला, पैशाने, पैशास
गाणेगाण्याचे, ला, ने, सगाण्याचे, गाण्याला, गाण्याने, गाण्यास
बैलबैलाचे, ला, ने, सबैलाचे, बैलाला, बैलाने, बैलास
मुलमुलांचे, ना, नोमुलांचे, मुलांना, मुलांनो
देवदेवाचे, ला, ने, सदेवाचे, देवाला, देवाने, देवास


स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप करण्याचे नियम:

अ] ‘आ’ कारान्त चे ‘ए’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
शाळाशाळेत, स, लाशाळेत, शाळेस, शाळेला
भाषाभाषेत, स, चाभाषेत, भाषेस, भाषेचा
विधाविधेस, ला, चेविधेस, विधेला, विधेचे
दिशादिशेस, ला, चेदिशेस, दिशेला, दिशेचे
मातामातेस, ला, चेमातेस, मातेला. मातेचे



ब] ‘अ’ कारान्त चे एकवचनात ‘ए’ कारान्त व अनेकवचनात ‘आ’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
वीटविटे, विटांस, ला, ना, चाविटेस, विटेला, विटांना, विटांचा
जीभजीभेस, ला, ची जीभेस, जिभेला, जिभेची
विधासुने, सुनांस, ला, ना, चासुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा
लाटलाटे, लाटांस, त, चा, चीलाटेस,लाटेत, लाटांचा, लाटांची
वाटवाटे, वाटांस, ला, चेवाटेत, वाटेला, वाटांची

हे पण पहा :- सिद्ध शब्द

क] काही वेळा ‘अ’ कारान्त चे ‘ई’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
भिंतभिंतीस, ला, चाभिंतीस, भिंतीला, भिंतीचा
विहीरविहिरीस, ला, ची विहिरीस, विहिरीला, विहिरीची
पालपालीस, ला, ना, चापालीस, पालीला, पालीना
रीतरीतीत, ने, ला, चेरीतीत, रीतीने, रीतीला, रीतीचे


ड] ‘ई’ कारान्त चे एकवचनात ‘ई’ कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘य’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
पेटीपेटीस, ला, त, चेपेटीस, पेटीला, पेटीत, पेटीचे
भक्तीभक्तीने, त, ऊन भक्तीने, भक्तीत, भक्तीतून
बीबियांचा, चे, नाबियांचा, बियांचे, बियांना
नदीनदीत, ऊन, स, लानदीत, नदीतून, नदीस, नदीला
दासीदासीचा, ला, चेदासींचा, दासीला, दासींचे


इ]  ‘ऊ’ कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते ‘वा’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
ऊवास, लाऊवास, उवाला
काकूकाकूस, ला, ने, चे काकूस, काकूला, काकूने, काकूचे
सासूसासू, सासवांला, चे, ने, नासासुला, सासूचे, सासूने, सासवांना
वधू वधूचा, ला, स, नेवधूचा, वधूला, वधूस, वधूने
भाऊभावाचा, ला, चे, नेभाऊचा, भाऊला, भावाचे, भावाने

हे पण पहा :- साधित शब्द

पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप करण्याचे नियम :

अ] ‘अ’ कारान्त चे ‘आ’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
खांबखांबास, चे, ऊन
खांबास, खांबाचे, खांबातून
काळकाळास. चे, लाकाळास, काळाचे, काळाला
निर्णयनिर्णयास, ने, त, चेनिर्णयास, निर्णयाने, निर्णयात, निर्णयाचे
दोरदोरास, ने, चेदोरास. दोराने, दोराचे
बाकबाकास, ला, चेबाकास, बाकाला, बाकाचे

ब]. ‘आ’ , 'ई' व 'ए' कारान्त चे ‘या’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
घोडाघोड्याचे, स, लाघोड्याचे, घोड्यास, घोड्याला
वाडावाड्याचे, त, लावाड्याचे, वाड्यात, वाड्याला
धोबीधोब्याला, सधोब्याला, धोब्यास
माळीमाळ्यास, त, चेमाळ्यास, माळ्यात, माळ्याचे
फडकेफडक्यांचा, ने, सफडक्यांचा, फडक्यांने, फडक्यांस
गोखलेगोखल्यांचा, नागोखल्यांचा, गोखल्यांना

अपवाद:- आजोबा, दादा, काका, मामा, राजा, हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी. यांचे सामान्यरूप होत नाही.


क] ‘ऊ’ कारान्त चे ‘वा’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
भाऊभावास, चा, ने भावास, भावाचा, भावाने
विंचूविंचवास, ला, नेविंचवास, विंचवाला, विंचवाने
नातूनातवाला, स, नेनातवाला, नातवास, नातवाने


नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप करण्याचे नियम:

अ] ‘अ’ कारान्त चे ‘आ’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
मूलमुलास, ला, नामुलास, मुलाला, मुलांना
पानपानास, ला, ना पानास, पानाला, पानांना
फूलफुलास, चा, नाफुलास, फुलाचा, फुलांना
झाडझाडास, चा, चेझाडास, झाडाचा, झाडाचे
डोंगरडोंगराचे, त, लाडोंगराचे, डोंगरात, डोंगराला


ब] ‘ए’ कारान्त चे ‘या’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
तळेतळ्यात, ला, चे, ऊनतळ्यात, तळ्याला, तळ्याचे, तळ्यातून
केळेकेळ्याची. चे केळ्याची, केळ्याचे
खोकेखोक्यात, ला, चे, ऊनखोक्यात, खोक्याला, खोक्याचे, खोक्यातून
डोकेडोक्यात, ला, चे, ऊनडोक्यात, डोक्याला, डोक्याचे, डोक्यातून
गाणेगाण्यात, ला, चे, ऊनगाण्यात, गाण्याला, गाण्याचे, गाण्यातून


क] ‘ई’ कारान्त चे ‘या’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
पाणीपाण्यात, ला, चे, ऊनपाण्यात, पाण्याचा, पाण्याला, पाण्याचे
मोतीमोत्याचा, ची, हूनमोत्याचा,मोत्याची, मोत्याहून, 
लोणीलोण्यात, चा, ला, चेलोण्यात, लोण्याचा, लोण्याला, लोण्याचे
मनीमण्यात, ला, चे, ऊनमण्यात, मण्याला, मण्याचे, मण्यातून
गोनीगाण्यात, ला, चे, ऊनगाण्यात, गाण्याला, गाण्याचे, गाण्यातून


ड] ‘ऊ’ चे ‘आ’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
लिंबूलिंबात, चा, ला, चे,लिंबात, लिंबाचा, लिंबाला, लिंबाचे
कोकरूकोकाराचा. ला, नेकोकराचा,कोकराला, कोकराने
लेकरूलेकराचा. ला, नेलेकराचा,लेकराला, लेकराने



इ] काही वेळा ‘ऊ’ कारान्त चे ‘वा’ कारान्त होते.
मुळ शब्दसामान्य रूपप्रत्यय तयार झालेला शब्द
कुंकूकुंकवास, चा, ने, ऊनकुंकवास, कुंकवाचा, कुंकवाने, कुंकवातून
गडूगडवास, चागडवास, गडवाचा
आसूआसवात, चा, ला, चेआसवात, आसवाचा, आसवाला, आसवाचे
गळूगाळावाला, चेगाळावाला, गाळावाचे

हे पण पहा :- विराम चिन्हे

विशेषणाचे सामान्यरूप करण्याचे नियम :

१] ‘अ’ , ‘ई’  व ‘ऊ’ कारान्त चे सामान्यरूप होत नाही.
उदाहरण :-
    १] श्रीमंत माणसांना अधिक मान दिला जातो.
    २] सुयशचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
    ३] मला कडू कारल्याची भाजी आवडते.



२] ‘आ’ कारान्त चे ‘या’ कारान्त होते.
उदाहरण :-
भला माणूस     -    भल्या माणसास
हा मुलगा        -     ह्या मुलास
खरा माणूस         खर्य्या माणसाला.


            आम्ही तुम्हाला येथे सामान्य रूप म्हणजे काय ? , सामान्य रूपाचे नियम तसेच सामान्य रुपाची उदाहरणे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला सामान्य रूपाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला सामान्य रूप | Samanya Rup | Samany Rup in Marathi | Marathi Samany Rup ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad