समास व त्यांचे प्रकार | Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi | Samas Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, July 9, 2023

समास व त्यांचे प्रकार | Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi | Samas Marathi

 समास व त्यांचे प्रकार

Samas V Tyanche Prakar in Marathi

 Samas V Tyanche Prakar

Samasache Prakar

समास व त्यांचे प्रकार | Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi | Samas Marathi

समास व त्यांचे प्रकार ( Samas V Tyanche Prakar in Marathi | Marathi Samas ) :- 

            समास व त्यांचे प्रकार ( Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi | Samas Marathi ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला समास व त्यांचे प्रकार | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी समास व त्यांचे प्रकार | Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया समास व त्यांचे प्रकार | Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi | Samas Marathi ).


समास म्हणजे काय?

          दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणाला समास (Samas) असे म्हणतात.

समास शब्दाची उत्पत्ती अशी झाली?

          समास (Samas) हा शब्द संस्कृत मधील सम् अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे व त्याचा अर्थ एकत्र होणे असा आहे.

सामासिक शब्द म्हणजे काय?

          दोन किंवा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणामुळे तयार होणाऱ्या जोडशब्दांना सामासिक शब्द ( Samasik Shabd ) म्हणतात.

उदाहरणार्थ :- प्रश्नोत्तर, आमरण, क्रीडांगण, पंचवटी इ.


विग्रह म्हणजे काय?

          सामासिक शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला आहे हे दाखविण्यासाठी त्या सामासिक शब्दाची फोड केली जाते त्याला विग्रह ( Vigraha)  असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

समासाची उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
अनैच्छिकऐच्छिक नसलेला
पंचवटीपाच वाडांचे समूह
प्रश्नोत्तरप्रश्न + उत्तर
आमरणमरे पर्यंत
क्रीडांगणक्रीडेसाठी आंगण
अनुत्तीर्णउत्तीर्ण नसलेला
अनंतज्याला अंत नाही असा तो
सुनयनासु नयन असलेली स्त्री
निर्धननाही ज्याच्याकडे धन असा तो
दुर्गुणीगुणा पासून दूर आहे असा तो
विद्यालयविद्येसाठी आलय
गायरानगाईसाठी रान
दिवसेंदिवसप्रत्येक दिवस
यथाशक्तिशक्तीप्रमाणे
बिनधास्तधास्ती शिवाय


समासाचे मुख्य प्रकार किती व कोणते?

          समासामध्ये कमीत कमी दोन पदे एकत्र आलेली असतात. एकत्रीत आलेल्या पदांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे मुख्य चार प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे.

समासाचे मुख्य प्रकार चार आहेत.

समासाचे नावसमासाचे नावसमासाचे नाव
१) पहिले पद प्रधानप्रथम पद प्रधान समासअव्ययभावी समास
२) दुसरे पद प्रधानद्वितीय पद प्रधान समासतत्पुरुष समास
३) दोन्ही पद प्रधानउभय पद प्रधान समासद्वंद्व समास
४) दोन्ही पद गौण-बहुव्रीहि समास 


१] अव्ययीभाव समास

अव्ययीभाव समास | Avyayibhav Samas in Marathi | Avyayibhav Samas

अव्ययीभाव समास म्हणजे काय?

          समासातील पहिले पद अव्यय असून ते प्रधान असते व सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो तेव्हा समासास अव्ययीभाव समास ( Avyayibhav Samas  ) असे म्हणतात.
          अव्ययीभाव समासातील शब्द बहुदा स्थळ, काळ व रितीवाचक असतात.

अव्ययीभाव समासाची उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
पदोपदीप्रत्येक पदी
दारोदारप्रत्येक दारात
प्रतिदिनप्रत्येक दिन
प्रतिदिवसप्रत्येक दिवस
दरसालप्रत्येक वर्षी
दररोजप्रत्येक दिवशी / रोज
हररोजप्रत्येक दिवशी / रोज
दिवसेंदिवसप्रत्येक दिवस
बरहुकूमहुकुमाप्रमाणे
यथाशक्तिशक्तीप्रमाणे
यथाक्रमक्रमाप्रमाणे
बिनधास्तधास्ती शिवाय
बिनचूकचुकी शिवाय
बेमालूममाहिती शिवाय
आमरणमरणापर्यंत
आजन्मजन्मापासून
प्रतिक्षणप्रत्येक क्षणाला
यथान्यायन्यायाप्रमाणे
बेशकशंकेशिवाय
बेलाशकशंकेशिवाय
गैरहजरहजेरीशिवाय
बिनधोकधोक्याशिवाय
बिनशर्तशर्तीशिवाय
गैरशिस्तशिस्तीशिवाय
घरोघरीप्रत्येक घरी
वारंवारप्रत्येक वारी
आजन्मजन्मापासून
जागोजागीप्रत्येक जागी
पानोपानीप्रत्येक पानात
गल्लोगल्लीप्रत्येक गल्लीत
प्रतिमासप्रत्येक महिना
आजीवनजीवनापासून
आजन्मजन्मापासून
यथाविधीविधी प्रमाणे
यथामतीमती प्रमाणे
रस्तोरस्तीप्रत्येक रस्त्यात
दरमजलप्रत्येक मजल

हे पण पहा :- वाक्याचे प्रकार


उपसर्गा ऐवजी बहुदा खालील शब्द वापरतात.

  उपसर्ग      =   शब्द

यथा, बर       = प्रमाणे
प्रति, दर, हर  = प्रत्येक
बे, बिन         = शिवाय
एकापाठोपाठ दोन सारखेच शब्द आल्यास = प्रत्येक


 २] तत्पुरुष समास

तत्पुरुष समास व त्याचे प्रकार | Tatpurush Samas in Marathi | Tatpurush Samas | Marathi Tatpurush Samas

तत्पुरुष समास म्हणजे काय?

         ज्या समासात दुसरे पद प्रधान असते व समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय जोडावा लागतो त्या समासात तत्पुरुष समास ( Tatpurush Samas ) असे म्हणतात. 

तत्पुरुष समासचे पाच प्रकार आहे

तत्पुरुष समासाचे प्रकार

क्रतत्पुरुष समासाचे नाव
विभक्ती तत्पुरुष समास

उपपद तत्पुरुष समास / कृदंत तत्पुरुष समास
अलुक तत्पुरुष समास
नत्र तत्पुरुष समास
कर्मधारेय समास

अ] द्विगु कर्मधारेय समास

ब] मध्यमपदलोपी कर्मधारेय समास 

१] विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय?

          ज्या समासामध्ये बहुदा दुसरे पद महत्त्वाचे असून सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेला शब्द, विभक्ती प्रत्यय घालावा लागतो त्या समासास विभक्ती तत्पुरुष समास ( Vibhakti Tatpurush Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

समासाचे नाव व्दितीया तत्पुरुष 

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
धनप्राप्तधनाला प्राप्तव्दितीया तत्पुरुष
कृष्णाश्रितकृष्णाला आश्रितव्दितीया तत्पुरुष
रामशरणरामाला शरणव्दितीया तत्पुरुष
देशगतदेशाला गतव्दितीया तत्पुरुष
दुःखप्राप्तदुःखाला प्राप्तव्दितीया तत्पुरुष
व्दिजदंडव्दिजाला दंडव्दितीया तत्पुरुष
देशप्रतदेशप्रत गेलेलाव्दितीया तत्पुरुष
सुखप्राप्तसुखाला प्राप्तव्दितीया तत्पुरुष 



समासाचे नाव तृतीया तत्पुरुष

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
देवदत्तदेवाने दत्ततृतीया तत्पुरुष
तोंडपाठतोंडाने पाठतृतीया तत्पुरुष
मतिमंदमतीने मंदतृतीया तत्पुरुष
द्रव्यसाध्यद्रव्याने साध्यतृतीया तत्पुरुष
पितृसदृशपित्याशी सदृश तृतीया तत्पुरुष
ईश्वरनिर्मितईश्वराने निर्मिलेलेतृतीया तत्पुरुष
चिंताग्रस्तचिंतेने गस्ततृतीया तत्पुरुष
कष्टसाध्यकष्टाने साध्यतृतीया तत्पुरुष
बुध्दीजडबुध्दीने जडतृतीया तत्पुरुष 



हे पण पहा :- समानार्थी शब्द

समासाचे नाव चतुर्थी तत्पुरुष

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
कृष्णाश्रितकृष्णास आश्रितचतुर्थी तत्पुरुष
विद्यागृहविद्येसाठी गृहचतुर्थी तत्पुरुष
क्रीडाभुवनक्रीडेसाठी भुवनचतुर्थी तत्पुरुष
पोळपाटपोळीसाठी पाटचतुर्थी तत्पुरुष
देवालयदेवासाठी आलयचतुर्थी तत्पुरुष
विद्यालयविद्येसाठी आलयचतुर्थी तत्पुरुष
गायरानगाईसाठी रानचतुर्थी तत्पुरुष
अनाथाश्रमअनाथांसाठी आश्रमचतुर्थी तत्पुरुष
क्रीडांगणक्रीडेसाठी अंगणचतुर्थी तत्पुरुष 


समासाचे नाव पंचमी तत्पुरुष

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
कर्जमुक्तकर्जातून मुक्तपंचमी तत्पुरुष
व्यसनमुक्तव्यसनापासून मुक्ततापंचमी तत्पुरुष
भारमुक्तभारातून मुक्तपंचमी तत्पुरुष
पदच्युतपदापासून मुक्ततापंचमी तत्पुरुष
ऋणमुक्तऋणातून मुक्तपंचमी तत्पुरुष
जन्मखोडजन्मापासूनचे खोडपंचमी तत्पुरुष
चोरभयचोरापासून भयपंचमी तत्पुरुष
सेवानिवृत्तसेवेतून निवृत्तपंचमी तत्पुरुष
जन्मखूणजन्मापासूनची खूणपंचमी तत्पुरुष 


समासाचे नाव षष्ठी तत्पुरुष

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
भाग्योदयभाग्याचा उदयषष्ठी तत्पुरुष
पिंपळपानपिंपळाचे पानषष्ठी तत्पुरुष
राजवाडाराजाचा वाडाषष्ठी तत्पुरुष
सागरकिनारासागराचा किनाराषष्ठी तत्पुरुष
देशसेवादेशाची सेवाषष्ठी तत्पुरुष
ज्ञानोदयज्ञानाचा उदयषष्ठी तत्पुरुष
घंटानादघंटेचा नादषष्ठी तत्पुरुष
राजपुत्रराजाचा पुत्रषष्ठी तत्पुरुष
तंत्रज्ञानतंत्राचे ज्ञानषष्ठी तत्पुरुष
घरधनीघराचा धनीषष्ठी तत्पुरुष 


हे पण पहा :- वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ


समासाचे नाव सप्तमी तत्पुरुष

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
वर्गाध्यापनवर्गातील अध्यापनसप्तमी तत्पुरुष
गृहकलहगृहातील कलहसप्तमी तत्पुरुष
कर्मकुशलकर्मात कुशलसप्तमी तत्पुरुष
प्रवाहपतितप्रवाहात पतितसप्तमी तत्पुरुष
कुलोत्पन्नकुळातील उत्पन्नसप्तमी तत्पुरुष
स्वर्गवासस्वर्गातील वाससप्तमी तत्पुरुष
कूपमंडूककूपातील मंडूकसप्तमी तत्पुरुष
शास्त्रपंडितशास्त्रात पंडितसप्तमी तत्पुरुष
रानमेवारानातील मेवासप्तमी तत्पुरुष
वनभोजनवनातील भोजनसप्तमी तत्पुरुष 


विग्रहानुसार तत्पुरुष समासाची नावे बदलतात

विद्यालय = विद्येसाठी आलय - चतुर्थी तत्पुरुष समास
             = विद्येचे आलय - षष्ठी तत्पुरुष समास
चोरभय  = चोरांपासून भय - पंचमी तत्पुरुष समास
            = चोरांचे भय - षष्ठी तत्पुरुष समास

२] उपपद तत्पुरुष किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणजे काय?

          ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते ते कृदंत ( धातुसाधित ) असते त्याचा वाक्यात स्वतंत्र उपयोग करता येत नाही त्या समासास उपपद किंवा कृदंत तत्पुरुष समास ( Upapad Tatpurush Samas | Krudant Tatpurush Samas )  असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

उपपद तत्पुरुष समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
कलाकारकला करणारा
मार्गस्तमार्गावर असलेल्या
खगआकाशात गमन करणार
निरजनिरात जन्मलेला
द्विजदोनदा जन्मलेला
जलदजल देणारा
पंकजचिखलात जन्मलेला
अंबुदअंबू देणारा
शेतकरीशेती करणारा
आगलाव्याआग लावणारा
सुखदसुख देणारा
कुंभारकुंभ करणारा
ग्रंथकारग्रंथ करणारा
कामकरीकाम करणारा
मालाकारमाला करणारा
गृहस्थघरात राहणारा
लाकूडतोड्यालाकूड तोडणारा 


३] अलुक तत्पुरुष समास म्हणजे काय?

          ज्या तत्पुरुष समासामध्ये पूर्वपदात सप्तमीच्या 'ई' विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्याला अलुक तत्पुरुष समास ( Aluk Tatpurush Samas )  असे म्हणतात.
          अलुक या शब्दाचा अर्थ नाश न पावणारे किंवा लोप न पावणारे असा होतो.

उदाहरणार्थ :-

कर्मनीप्रयोग = ई
कर्तरीप्रयोग = ई
तोंडीलावणे = ई
पंकेरू = ए (अ+ई)
ग्रेसर = ए (अ+ई)


४] नत्र तत्पुरुष समास म्हणजे काय?

          ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष समास ( Natr Tatpurush Samas ) असे म्हणतात.
           या सामाजिक शब्दातील पहिले पद अ, अन, न, ना, नि, बे, गैर यासारखे अभाव अथवा निरोध दर्शविणारी असतात.

उदाहरणार्थ :-

नत्र तत्पुरुष समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
अनैच्छिकऐच्छिक नसलेला
नास्तिकआस्तिक नसलेला
अनादरआदर नसलेला
अमान्यमान्य नसलेला
अज्ञानज्ञान नसलेला
अनुत्तीर्णउत्तीर्ण नसलेला
बेसावधसावध नसलेला
नाईलाजइलाज नसलेला
निर्दोषदोष नसलेला
नापसंतपसंत नसलेला
अशक्यशक्य नसलेला
गैरसोयसोयी नसलेल्या
गैरहजरहजर नसलेला
बेकायदाकायदा नसलेला
अयोग्ययोग्य नसलेला

          नत्र तत्पुरुष समासात बहुदा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द घेऊन यापुढे नसलेला किंवा नसलेली हे शब्द लिहितात.

५]  कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणजे काय?

         ज्या तत्पुरुष समासाची दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात तसेच पहिले पद विशेषण असून दुसरे पद नाम असते तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण - विशेष्य किंवा उपमेय - उपमान या स्वरूपात असतो त्यास कर्मधारेय समास ( Karmadharay Samas ) असे म्हणतात.
          उपमेय म्हणजे ज्याला उपमा द्यायची तो शब्द.
          उपमान म्हणजे ज्याची उपमा द्यायची तो शब्द.

उदाहरणार्थ :-

माझा मुलगा सुयश म्हणजे कर्ण होय.
सुयश - नाम (उपमेय / विशेष्य)
कर्ण - विशेषण ( उपमान )

कर्मधारेय तत्पुरुष समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
भवसागरविश्वरूपी सागर
काळाकुट्टखूप काळा
लालभडकखूप लाल
विषयांतरअन्य विषय
तपोबलतप हेच बल
विद्याधनविद्या हेच धन
पितांबरपिवळे असे अंबर
रक्तचंदनरक्तासारखे चंदन
श्यामसुंदरसुंदर असा श्याम
घनश्यामघनासारखा शाम
महाराष्ट्रमहान असे राष्ट्र
पुरुषोत्तमउत्तम असा पुरुष 

हे पण पहा :- सामान्य रूप

कर्मधारेय समासचे दोन प्रकार आहे

    अ) द्विगु समास

     ब) मध्यमपदलोपी समास


अ] द्विगु समास म्हणजे काय?

          जर कर्मधारेय समासामध्ये पहिले पद संख्याविशेषण असेल व त्या शब्दावरून एक समूहाचा बोध होत असेल तर त्या समासास द्विगु समास ( Dvigu Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

द्विगु समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
चौघडीचार घडींचा समूह
त्रैलोक्यतीन लोकांचा समूह
सप्ताहसात दिवसांचा समूह
नवरात्रनऊ रात्रीचा समूह
पंचपाळेपाच पाळ्यांचा समूह
बारभाईबारा भावांचा समूह
पंचवटीपाच वाडांचा समूह
त्रिभुवनतीन भुवणांचा समूह 

ब] मध्यमपदलोपी कर्मधारेय समास म्हणजे काय?

          ज्या कर्मधारेय समामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारे शब्द लुप्त असतात व विग्रहाच्या वेळी त्यांची स्पष्टता करावी लागते त्या समासास मध्यमपदलोपी कर्मधारेय समास किंवा लुप्त पद कर्मधारेय समास ( Madhyampadlopi Karmdhary Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

मध्यमपदलोपी कर्मधारेय समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
घोडेस्वारघोड्यावर स्वार असलेला
पुरणपोळीपुरण घालून तयार केलेली पोळी
मामेभाऊमामाचा मुलगा या नात्याने भाऊ
चुलतसासरानवरा किंवा नवरी यांचा चुलता या नात्याने सासरा
गुरुबंधूगुरुचा शिष्य या नात्याने बंधू
साखरभातसाखर घालून तयार केलेला भात
कांदेपोहेकांदे घालून तयार केलेले पोहे 


३] द्वंद्व समास

द्वंद्व समास व त्याचे प्रकार | Dvandva Samas in Marathi | Dvandva Samas | Marathi Dvandva Samas

द्वंद्व समास म्हणजे काय?

           ज्या समासातील दोन्ही पद अर्थ दृष्टीने प्रधान असतात त्या समासास द्वंद्व समास ( Dvandva Samas ) किंवा उभय पद प्रधान समास ( Ubhay Pad Pradhan Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-


द्वंद्व समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
न्यायअन्यायन्याय अथवा अन्याय
भेदाभेदभेद अथवा अभेद
चूकभूलचूक अथवा भूल
भाजीपालाभाजी, पाला व इतर तत्सम भाज्या वस्तू
घरदारघर, दार व इतर स्थावर मालमत्ता
चहापाणीचहा, पाणी व इतर तत्सम फराळाचे पदार्थ
सत्यासत्यसत्य वा असत्य
न्यायान्यायन्याय वा अन्याय
तीनचारतीन किंवा चार
बरेवाईटबरे किंवा वाईट
मामामामीमामा व मामी
नेआणने आणि आण
दक्षिणोत्तरदक्षिण आणि उत्तर
भाऊबहिणभाऊ आणि बहीण 

द्वंद्व समासाचे तीन प्रकार आहेत.

द्वंद्व समासाचे प्रकार

क्रसमासाचे नाव
इतरेतर द्वंद्व समास
वैकल्पिक द्वंद्व समास
समाहार द्वंद्व समास

अ) इतरेतर द्वंद्व समास म्हणजे काय?

          ज्या समासात आणि, व या समुच्चय दर्शक उभयान्वयी अव्यव्यांचा वापर करून सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो त्या समासास इतरेतर द्वंद्व समास  ( Itaretar Dvandva Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-


इतरेतर द्वंद्व समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
डोंगरदऱ्याडोंगर आणि दऱ्या
कृष्णार्जुनकृष्ण आणि अर्जुन
ताटवाटीताट आणि वाटी
पतीपत्नीपती आणि पत्नी
नाकडोळेनाक आणि डोळे
रामलक्ष्मणराम आणि लक्ष्मण
हरीहरहरी आणि हर
बहीणभाऊबहीण आणि भाऊ
हळदकुंकूहळद आणि कुंकू
मामामामीमामा व मामी
नेआणने आणि आण
दक्षिणोत्तरदक्षिण आणि उत्तर
भिमार्जुनभीम आणि अर्जुन
आईवडीलआई आणि वडील 


ब) वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय?

          ज्या समासाचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या  वैकल्पिक उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो त्या समासास वैकल्पिक द्वंद्व समास  ( Vaikalpik Dvandva Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

वैकल्पिक द्वंद्व समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
विधीनिषेधविधी किंवा निषेध
न्यायअन्यायन्याय अथवा अन्याय
भेदाभेदभेद अथवा अभेद
चूकभूलचूक अथवा भूल
लहानमोठालहान किंवा मोठा
सत्यअसत्यसत्य किंवा असत्य
पासनापासपास किंवा नापास
चारपाचचार किंवा पाच
बरेवाईटबरे अथवा वाईट
सत्यासत्यसत्य वा असत्य
न्यायान्यायन्याय वा अन्याय
पापपुण्यपाप किंवा पुण्य 

क) समाहार द्वंद्व समास म्हणजे काय?

          ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्था शिवाय त्यात जातीच्या इतर पदार्थांचाही अंतर्भाव केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास  ( Samahar Dvandva Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

समाहार द्वंद्व समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
पानसुपारीपान, सूपारी व इतर पदार्थ
चहापाणीचहा, पाणी इतर फराळाचे पदार्थ
मीठमिरचीमीठ, मिरची, तिखट व इतर स्वयंपाकातील वस्तू
पाणपत्रावळपाण, पत्रावळ व जेवणासाठीचे साधने
नदीनालेनदी, नाले वगैरे
भाजीपालाभाजी, पाला वगैरे
केरकचराकेर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
शेतीवाडीशेती, वाडी व इतर मालमत्ता
घरदार घर, दार किंवा इतर मालमत्ता
जीवजंतूजीव, जंतू वगैरे 


४] बहुव्रीहि समास

बहुव्रीहि समास व त्याचे प्रकार | Bahuvrihi Samas in Marathi | Marathi Bahuvrihi Samas | Bahuvrihi Samas

बहुव्रीहि समास म्हणजे काय?

            ज्या सामाजिक शब्दांचे दोन्ही पदे महत्वाची नसतात त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तसेच हा सामाजिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते त्या सामाजिक शब्दाला बहुव्रीहि समास ( Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

बहुव्रीहि समासाचे चार प्रकार आहेत.

बहुव्रीहि समासाचे प्रकार

क्रसमासाचे नाव
नत्र बहुव्रीहि समास
सह बहुव्रीहि समास
प्रादि बहुव्रीहि समास
विभक्ती बहुव्रीहि समास

१] समानाधिकरण बहुव्रीहि समास

२] व्याधिकरण बहुव्रीहि समास 


अ) नत्र बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीहि समासाचे पहिले पद अ, अन, न, ना, नि असे नकार दर्शक असते तेव्हा त्या समाजाला नत्र बहुव्रीहि समास ( Natra Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

नत्र बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
अनंतज्याला अंत नाही असा तो
निर्धननाही ज्याच्याकडे धन असा तो
निरसनाही रस ज्यात असे तो
अनाथनाही नाथ ज्याला असा तो
अनादीनाही आदी ज्याला तो
अनिकेतनाही निकेत ज्याला असा
अव्ययनाही व्यय ज्याला तो 

ब) सह बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीहि समासाचे पहिले पद स किंवा सह अशी अव्यय असून हा सामासिक शब्द एखादे विशेषणाचे कार्य करतो त्याला सह बहुव्रीहि समास ( Sah Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

सह बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
सानुजअनुजासहित आहे असा तो
सुपुत्रपुत्रासहित आहे असा तो
सनाथनाथासहित आहे असा तो
सानंदआनंदासहित आहे असा तो
सादरआदरासहित आहे असा तो
सवर्णवर्णासहित आहे असा तो
सबळबळासहित आहे असा तो
सहपरिवारपरिवारासहित आहे असा तो
सहकुटुंब कुटुंबासहित आहे असा तो


क) प्रादि बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या समासाचे पहिले पद प्र, परा, आप, सु, दूर, वि, नि असा उपसर्ग युक्त असते त्याला प्रादि बहुव्रीहि समास ( Pradi Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

प्रादि बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
विख्यातविशेष ख्याती असलेला
विरागीराग नसलेला
प्रज्ञावंतबुद्धी असलेला
सुनयनासु नयन असलेली स्त्री
दुर्गुणीगुणा पासून दूर आहे असा तो
प्रबळअधिक शक्तिशाली आहे असा तो
सुमंगलचांगले पवित्र आहे असे ते 


ड) विभक्ती बहुव्रीहि समास म्हणजे काय?

ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एकच संबंधी सर्वनाम येते अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्ती चे नाव समासाला दिले जाते. अशा समासाला विभक्ती बहुव्रीहि समास ( Vibhakti Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

विभक्ती बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
विद्याधनविद्या आहे धन ज्याचे तो
पूर्णजलपूर्ण आहे जल ज्यात असे
प्राप्तधनप्राप्त आहे धन ज्याला तो
जीतशत्रूजीत आहे शत्रू ज्याने तो
त्रिकोणतीन आहेत कोन त्याला तो
गतप्राणगत आहे प्राण ज्यापासून तो 

विभक्ती बहुव्रीहि समासाचे दोन प्रकार आहेत.

१) समानाधिकरण बहुव्रीहि समास २) व्याधीकरण बहुव्रीहि समास 

१) समानाधिकरण बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीहि समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे एकाच विभक्ती मध्ये असतात तेव्हा त्या समासाला समानाधिकरण बहुव्रीहि समास ( Samanadhikaran Bahuvrihi Samas ) असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

समानाधिकरण बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
वक्रतुंडवक्र आहे तोंड ज्याचे असा तो - गणपती
नीलकंठनिल आहे कंठ असा तो - शंकर
लक्ष्मीकांत
लक्ष्मी आहे कांता ज्याची असा तो - विष्णू 


२) व्याधीकरण बहुव्रीहि समास म्हणजे काय?

          ज्या बहुव्रीही समाजाचा विग्रह करताना दोन्ही पदे जेव्हा भिन्न विभक्ती मध्ये असतात तेव्हा त्या समासाला व्याधीकरण बहुव्रीहि समास असे म्हणतात.

उदाहरणार्थ :-

व्याधीकरण बहुव्रीहि समास उदाहरणे

सामासिक शब्दविग्रह
गजाननगजाचे आहे आनन असा तो - गणपती
सुधाकरसुधा आहे करात ज्याच्या असा तो - कृष्णा
भालचंद्रभाळी आहे चंद्र असतो - शंकर
चक्रपाणिचक्र आहे पाणीत असा तो - विष्णू 

चौकोन
= चार कोण आहे ज्याला असा तो 
            - बहुव्रीहि समास   
            = चार कोणाचा समूह 
            - तत्पुरुष समास

पितांबर
= पिवळे आहे वस्त्र ज्याचे तो 
             - बहुव्रीहि समास
            = पिवळे असे वस्त्र 
            - कर्मधारेय समास


          तुम्हाला समास व त्यांचे प्रकार | Marathi Samas | Samas V Tyanche Prakar in Marathi | Samas in Marathi | Samas Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad