Smartphone Addiction | Mobile Addiction Symptoms, Causes, Side effects and Solutions | मोबाईलचे व्यसन - कारणे, लक्षणे, दुष्परिणाम व उपाय - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 10, 2023

demo-image

Smartphone Addiction | Mobile Addiction Symptoms, Causes, Side effects and Solutions | मोबाईलचे व्यसन - कारणे, लक्षणे, दुष्परिणाम व उपाय

Smartphone Addiction

Mobile Addiction Symptoms, Causes, Side effects and Solutions

मोबाईलचे व्यसन - कारणे, लक्षणे,  दुष्परिणाम व उपाय

मोबईलचे व्यसन (Mobile addiction / Smartphone addiction) ही आजच्या काळात फार गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे आपल्याला मोबाईलचे व्यसन - कारणे, लक्षणे,  दुष्परिणाम व उपाय ( Smartphone addiction | Mobile Addiction Symptoms, Causes, Side effects and Solutions ) माहित असणे गरजेचे आहे.

MA

साध्यच युग हे यांत्रिकयुग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आज मानव मोबाईल सारख्या यंत्राच्या इतका आहारी गेला आहे की, शेजारी बसलेल्या माणसाशी देखील बोलायला त्याला वेळ नाही. त्यातही मोबईलच्या तर अधिकच अशा व्यक्ती मोबईलच्या पूर्ण पणे आहारी गेल्या आहेत. काही दिवसांनी लोक म्हणतील इस मोबाईल की लत से कैसे बच्चे कारण त्याचे मानवावर गंभीर असे दुष्परिणाम होतात, त्याची लक्षणे व त्यावरील उपाय या सर्व बाबींचा आज आपण येथे विचार करणार आहोत.


            चला तर मग बघूया की, 
व्यसन म्हणजे काय?
What is addiction?

मोबाईलचे व्यसन म्हणजे काय?
What is mobile addiction?

मोबाईल व्यसनाची लक्षणे कोणती?
Mobile addiction symptoms
What are the symptoms of mobile addiction?

मोबाईल व्यसनाचे दुष्परिणाम किवा तोटे कोणते?
What are the side effects or disadvantages of mobile addiction?

मोबाईल व्यसन घालवण्याचे उपाय कोणते?
What are the solutions to get rid of mobile addiction?
Mobile addiction treatment

लहान मुलांना मोबाईल व्यसनापासून वाचवण्यासाठी उपाय कोणते?
What are the solutions to protect children from mobile addiction?
How to get rid of mobile addiction for child?

याविषय आज माहिती पाहूया.


व्यसन (Addiction) म्हणजे काय?

व्यसन म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला हानी पोहचवू शकते हे माहित असूनही आपण त्याचा त्याचा वापर किंवा उपभोग घेतो त्याला ‘व्यसन’ (Addiction) असे म्हणतात.

मोबाईलचे व्यसन (Mobile addiction) म्हणजे काय?

मोबाईलच्या अति वापराणे आपल्याला नुकसान होणार आहे हे माहित असूनही त्याच्यावर नियंत्रण न करू शकणे म्हणजे ‘मोबाईलचे व्यसन’ (Mobile addiction) होय.


मोबाईलचे व्यसनाची कारणे
Mobile addiction causes

१] कोणतीही माहिती सहज उलब्ध होते म्हणून सवय लागते.

२] रिकाम्या वेळी वेळ घालवण्यास सहज उलब्ध.

३] लांबच्या प्रवासात वेळ जात नाही तेव्हा मनोरंजणासाठी.

४] लहान मुले रडत असताना शांत करण्यास सोपे.

५] मोबाईलवर व्हिडीओ, गेम, रील्स बघण्यात आनंद मिळतो.

६] सोशल अॅप मुळे चाटिंग करण्यात मज्जा येते.



मोबाईलचे व्यसनाची लक्षणे.
Mobile addiction symptoms

१] मोबाईल न मिळाल्यास राग येणे, चिडचिड करणे व दु:ख होणे.

२] मोबाइल न दिसल्यास पटकन उठून तो शोधणं.

३] मोबाईल मिळताच त्याचा मूड चांगला होणे, आनंद होणे, चेहऱ्यावर समाधान व हसू येणे.

४] घरातील व्यक्तींशी बोलण्यात आणि एकत्र वेळ घालवण्यात रस नसणे.

५] मोबाईलच्या वापराशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत रस नसतो.

६] मोबाईल स्वत:पासून दूर न ठेवता सतत सोबत ठेवणे.

७] मोबाईल खिशात नसतानाही ‘व्हायब्रेट’ झाल्याचा भास होणं.

८] मोबाईला काही झाल्यास अस्वस्थ होणे.

९] त्यांच्या हातातून मोबाईल घेतल्यास राग येणे.

१०] सतत मोबाईल मध्ये काहीतरी पाहत राहणे.

११] रात्री लवकर न झोपणे.

१२] रात्री झोपेतून जाग आल्यावर उशाशी ठेवलेला मोबाइल फोन चाचपून पाहणं.

१३] सकाळी उठल्याबरोबर मोबाईल शोधणे.


मोबाईलचे व्यसनाचे तोटे किवा दुष्परिणाम.
Disadvantages or side effects of mobile addiction

१] मोबाईल मधून निघणार्या रेडीएशन मुळे आपल्या मेंदूवर व शरीरावर आघात होतो.

२] मोबाईल स्क्रीनच्या लाईट मुळे आपल्या डोळ्यावर परिणाम होऊन डोळ्यांचे आजार होतात.

३] मोबाईल बघताना आपण डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करण्याचा वेळ मंदावतो त्यामुळे डोळ्यातील बुबुळ कोरडे पडते व डोळ्याला खाज येते.

४] सतत व जास्त वेळ मोबाईल बघितल्याने डोळ्यावर तान तर पडतोत्याचा परिणाम मेंदूवर देखील होतो.

५] मेंदुवर अति तान व झोप पूर्ण न झाल्याने स्मरण शक्ती कमी होते.

६] मोबाईल मध्ये अति मग्न होऊन झोपेचे भान राहत नाही व हळूहळू झोप कमी होऊन निद्रानाश होतो.

७]  शरीराची हालचाल न झाल्याने भूक लागत नाही.

८] झोप पूर्ण न होता मेंदुवर अति तान पडतो म्हणून अशक्तपणा येतो.

९] डोळ्यावर तान पडून सतत डोके जड पडते.

१०] शारीरिक हलाचाल कमी होते.

११] एकाच ठिकाणी बसून शरीराची हालचाल न झाल्याने पाठीवर व मानेवर तान पडून पाठदुखी सुरु होते.

१२] एकाच ठिकाणी बसून शरीराची हालचाल होत नाही म्हणून शरीरात चरबी जमा होते व वजन वाढते.

१३] डोळ्यावर अति ताण व स्क्रीनची लाईट पडून चष्मा लागणे.

१४] डोळ्यावर अति ताण व स्क्रीनची लाईट पडूनडोळ्यांचा नंबर वाढणे.

१५] करिअर आणि नातेसंबंध याकडे दुर्लक्ष झाल्याने दुरावा निर्माण होणे



मोबाईलचे व्यसन घालवण्याचे उपाय
Solutions to get rid of mobile addiction

१] मोबाईल ठेवण्याची जागा :-

मोबाईल आज आपला जीव की प्राण होऊन बसला आहे. आपण कोणती ही गोष्ट विसरतो पण मोबाईल नाही. आपल्या हीच सवय अगोदर बदलायची आहे. आपल्याला मोबाईल सहज हातात येईल अशा ठिकाणी ठेऊ नये त्याची जागा बदला. तुम्हाला मोबाईल उजव्या खिशात ठेवायची सवय असेल तर डाव्या खिशात ठेवा किंवा सर्वात सोपे आपल्या ब्याग मध्ये ठेवा. जेणेकरून तो सहज व सारखा आपल्या हातात येणार नाही व त्याचा वापर कमी होईल.

२] मोबाईल फोन मधील नोटिफिकेशन :-

मोबाईल फोन मधील नोटिफिकेशन चालू ठेवले आपले लक्ष सारखे त्या मोबाईल आवाजाकडे असते नोटिफिकेशनचा आवाज आला की आपल्याला वाटते की काहीतरी महत्त्वाचा संदेश आला असेल व चटकन आपला हात त्याकडे जातो म्हणून अगोदर मोबाईल फोन मधील नोटिफिकेशन बंद करावे.

३] मेसेज ऐवजी कॉल :-

आपल्या एखादे काम आठवले तर मेसेज ऐवजी फोन करणे कधीही उत्तम असते कारण मेसेज करण्यात वेळ तर जातोच पण मेसेज बरोबर आपण दुसरे मेसेजही वाचण्यात आपला वेळ घालवतो व आलेल्या मेसेजेचा रिप्लाय देण्याचा नादात चाटिंग करत बसतो. त्यामुळे मेसेज ऐवजी फोन कधीही चांगले असते.

४] मोबाईलचे इंटरनेट बंद :-

मोबाईलचे इंटरनेट बंद ठेवणे आवश्यक असेल तेव्हाच चालू करणे हे आपल्याला मोबाईलची सवय सोडवण्यास फार प्रभावी रामबाण उपाय आहे. कारण आपण मोबाईल जास्तीत बघतो तो इंटरनेट चालणार्या अॅप्समुळे त्यामुळे इंटरनेट चालू ठेवले तर त्यांचे नोटिफिकेशन येत रहाणार व आपले लक्ष त्यांच्याकडे जाणार म्हणून मोबाईलचे इंटरनेट बंद ठेवावे व आवश्यक असेल तेव्हाच चालू करावे.


५] इंटरनेटचा वापर कमी :-

मोबाईलमध्ये इंटरनेटचा वापर कमी करावा जेणेकरून आपल्याला मोबाईलमध्ये काहीतरी नवीन आहे याची सवय लागनार नाही. इंटरनेटचा वापर कमी झाल्यास आपोआप तुमचे मोबाईल बघणे कमी होऊन जाईल.

६] मेसेज बघण्याची वेळ निश्चित :-

मोबाईल मेसेज बघण्याची वेळ निश्चित करायला हवी जसे की आपण आपण आपल्या मोबाईल दर दोन किंवा तीन तासाची वेळ सेट करून ठेवणे त्यानंतरच मोबाईलचे सर्व मेसेजेस बघणे. म्हणजे आपले अपडेट पण राहू व आपल्याला मोबाईल सारखी बघण्याची सवय पण कमी होईल.

७] सकाळी मोबाईचा वापर टाळणे :-

प्रतिदिन आपण सकाळी उठल्यावर आपल्याला सर्वात अगोदर मोबाईल बघण्याची सवय असते ही सवय फार चुकीची आहे त्यामुळे आपल्या डोळ्यावर त्याचा फार मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही एक निश्चय करावा की, जो पर्यंत तुमची सकाळची सर्व कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मोबाईचा वापर करणार नाही.

८] रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापर टाळणे :-

सर्वांनाच सवय असते झोपण्यापूर्वी मोबाईलवर काही तर बघत बसने परंतु ही फार वाईट सवय आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आपल्याला शांत झोप देखील लागत नाही तसेच आपला निद्रानाश होतो व आपल्याला अशक्तपपणा जाणवतो. त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी एक तास मोबाईल पासून दूर रहाण्याची सवय करून आपण ही सवय बदलू शकतो.

९] जेवताना मोबाईल दूर ठेवणे :-

जेवताना मोबाईल जवळ घेवून बसण्याची सवय असते. त्यामुळे ते जेवणाबरोबर मोबाईलवर बोलत असतात किंवा एखादा व्हिडीओ बघण्याची सवय असते त्यामुळे त्यांचे जेवणाकडे लक्ष नसते व पचनही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जेवण करताना मोबाईल फोन आपल्या पासून दूर ठेवावा.

१०] मोबाईल हातात घेऊन न बसणे :-

आपल्याला काही काम नसेल तर आपण आराम करायला हवा पण आपण तसे न करता आपण मोबाईल हातात घेऊन बसतो. त्यामुळे आपण त्याच्यात आपण इतके रमतो की आपले बाकी असलेले काम पण त्याच्या नादात विसरून जातो. त्यामुळे आपण मोबाईल हातात घेऊन न बसता मोबाईल दूर ठेऊन आराम करावा.

१२] स्क्रीन टाइम ट्रैकर सारखे वापरणे :-

आपण दररोज किती वेळ कोणत्या अॅप्पवर खर्च करतो हे आपल्याला माहित असायला हवे त्या बदल्यात आपण काय मिळवले हे पण आपल्याला समजते. यामुळे तुम्हाला तुमचे झालेले वेळेचे नुकसान समजेल व तुम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी मोबाईल अति वापराच्या सवयी पासून दूर झाल.


१३] अठोवड्यातील एक दिवस नो मोबाईल डे :-

प्रत्येकाने अठोवड्यातील एक दिवस तरी मोबाईल शिवाय रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे बघा सुरवातीला तुम्हाला याचा थोडासा त्रास वाटेल पण नंतर तुम्हाला वाटेल आता अठोवड्यातील फक्त एकच दिवस मोबाईलचा डे असावा बाकीचे दिवस नो मोबाईल डे असावेत. या एका दिवसामुळे तुम्ही एक दिवस तरी स्वतः साठी जगाल नाहीतर आज सर्वच लोक मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत.

१४] सोशल मिडिया अॅप्पचा कमी वापर :-

आजकाल नवनवीन सोशल मिडिया अॅप्पस् आलेले आहेत. जसे LinkedIn, Snapchat, Facebook, Instagram, Twitter, WhatsApp, TikTok, Reddit, Telegram, WeChat, Messenger, Discord, LINE, Viber, ShareChat, Picsart, Moj, Tinder इ. एवढेच नाही तर यापेक्षा जास्त आहेत. यामध्ये आपला खूप वेळ आपण वाया घालवत असतो. त्यामुळे अशा सोशल मिडिया अॅप्पचा कमी वापर करावा व आपली सवय सोडवावी.

१५] ध्यान (Meditation) करणे :-
मोबाईलची सवय सोडवण्यासाठी आपल्यावर आपले नियंत्रण असणे फार आवश्यक असते. आपल्याला यासाठी ध्यान (Meditation) करण्याची गरज आहे. ध्यान (Meditation) मुळे आपण आपल्या मेंदूवर पूर्ण पणे ताबा मिळवू शकतो त्यामुळे आपण कोणत्याही चांगल्या सवयी लावू शकतो व वाईट सवयी पासून दूर जाऊ शकतो.

१६] वाचनाची सवय लावा :-

मोबाईलचे व्यसन घालवण्यासाठी आपल्याला आवडत असलेल्या विषयावर पुस्तके वाचणे मग त्या गोष्टी, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णने इ. आपण त्यात आपले मन रमेल, ज्ञान वाढेल व मोबाईल पासून दूर राहू.

१७] घरावतील कामात मद्दत :-

घरात रिकामे बसल्यावर आपल्याला सारखे मोबाईल पाहावेसे वाटते त्यापेक्षा घरातील कामात इतरांना मद्दत केल्याने आपला वेळही जाईल, घरच्यांना पण चांगले वाटेल व मोबाईलची आठवण ही रहाणार नाही.

१८] फिरायला जाणे :-

सारखे घरात बसले की मोबाईल हाताळतात त्यामुळे थोडेसे बाहेर फिरायला गेल्याने काही नवीन लोक मिळतात त्याच्याशी गप्पा मारण्यात आपला वेळ निघून जाईल व काही नवीन गोष्टीही माहित होतील व आपले आपले मन व डोक्यातील नको असलेले विचारही मोकळे होतील.

१९] खेळ खेळणे :-

खेळांमध्ये आपले मन रमवणे हा मोबाईलचे व्यसन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. त्यामुळे आपले मोबाईल पूर्ण पणे दुर्लक्ष होते. तसेच आपला व्यायाम होऊन आरोग्य ही निरोगी राहते.

२०] घरातील लहान मुलांबरोबर वेळ घालवा :-

घरातील लहान मुलांबरोबर वेळ घालवा त्यामुळे तुमचा ही वेळ चांगला जाईल व मुलांनापण मोबाईलच्या सवयी पासून दूर ठेवण्यास मदत होईल.


२१] नवीन गोष्टी शिकणे :-

तुम्हाला आवडत असलेली कोणतीही एखादी कला शिकण्याचा प्रयत्न करा चित्रकला, नक्षीकाम, भरतकाम, पोहणे, गाणे म्हणणे, पेटी – तबला वाजवणे, कविता लिहिणे, लेख लिहिणे अशा अनेक कला तुम्ही संपादन करू शकता व मोबाईलमुळे वाया जाणारा वळ वाचवू शकता.

लहान मुलांना मोबाईल च्या व्यसनापासून कसे वाचवावे
Children Mobile Addiction T
reatment

१] त्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.

२] तुम्ही त्यांच्याबरोबर खेळा.

३] त्यांना गोष्टी सांगा, गप्पा मारा त्याच्याशी बोला.

४] तुम्ही स्वतःही त्यांच्या समोर जास्त मोबाईल वापरू नका.

५] त्याच्या बरोबर चित्रकला, संगीत, नृत्य करा.

६] त्यांना फिरायला घेऊन जा.

७] त्यांना मैदानी खेळात रमुद्या.

८] त्यांना खेळणे आणून द्या.

९] त्यांना मोबाईलचे दुष्परिणाम सांगा.

१०] त्यांना खेळण्याचे महत्व पटवून द्या.

११] त्यांना घर कामात मदत करायला शिकवा.

१२] त्यांना आवडत असलेल्या कलेचा क्लास लावून द्या.

१३] त्यांना नवनवीन गोष्टी दाखवा.

१४] पुस्तके वाचनाची आवड निर्माण करा.

१५] निसर्गरम्य परिसरात घेऊन जा व त्याचे महत्व पटवून द्या.

१६] मोबाईलला पासवर्ड लावा.

१७] मोबाईल वापराचे घरात सर्वानाच नियम बनवा.

१८] मुलांना क्रियाशील बनवा.

१९] घरात असताना घरगुती खेळ खेळा. जसे- चल्लस, सापशिडी, लुडो, पत्ते इ.

२०] मुलांना दिवस भरात एखादा उपक्रम द्या.

२१] मुल मोबाईल वापरताना त्यांच्यावर ध्यान ठेवा. नंतर मोबाईल ची हिस्टरी तपासात जा.

२२] मोबाईल डाटा लिमिट सेट करून नेट चालणार नाही अशी सेटिंग्ज करून ठेवा जेणेकरून मुलांना मोबाईल वापरण्याचा कंटाळा येईल.

२३] मोबाईल घेताना प्रेमाने घ्या रडला तर समजावून सांगा.

२४] तुमच्या नित्यक्रमात आध्यात्मिक क्रियाकलापांचा समावेश करा.


            तुम्हाला मोबाईलचे व्यसन - कारणे, लक्षणे, दुष्परिणाम व उपाय ( Smartphone addiction | Mobile Addiction Symptoms, Causes, Side effects and Solutions ) या लेखातून मोबाईलचे व्यसन म्हणजे काय? (What is mobile addiction?), मोबाईलचे व्यसनाची कारणे ( Mobile addiction causes ), मोबाईलचे व्यसनाची लक्षणे ( Mobile addiction symptoms ) , मोबाईलचे व्यसनाचे तोटे किवा दुष्परिणाम (Disadvantages or side effects of mobile addiction), मोबाईलचे व्यसन घालवण्याचे उपाय ( Solutions to get rid of mobile addiction ), लहान मुलांना मोबाईल च्या व्यसनापासून कसे वाचवावे ( Children Mobile Addiction Solutions ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad

Pages