काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi | Marathi Tenses - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 19, 2023

काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi | Marathi Tenses

TENSE AND ITS TYPES IN MARATHI

काळ आणि त्यांचे प्रकार

 Tense and Types of Tense in Marathi

Tenses in Marathi

काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi |  Marathi Tenses

काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi | Kal v Tyache Prakar | Kalache Prakar )  :- 

            काळ आणि त्यांचे प्रकार ( Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi | Tenses in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi | Marathi Tesnse | Kalache Prakar ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi | Kal ani Tyanche Prakar ) .


काळ म्हणजे काय?

        क्रियापदावरून आपल्याला ज्याप्रमाणे वाक्यात दिलेल्या क्रियेचा बोध होतो. तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे यावरून आपल्याला जो बोध होतो त्याला काळ (Tense) असे म्हणतात.

काळाचे मुख्य प्रकार कोणते?

काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.


काळाचे प्रकार

[ Kalache Prakar | Types of Tense ]

क्रकाळाचे प्रकार
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ


काळाचे उपप्रकार कोणते?

        काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत व त्यांचे प्रत्येकी चार उपप्रकार आहेत ते पुढील प्रमाणेआहेत.


हे पण पहा :- समास व त्यांचे प्रकार


वर्तमान काळाचे उपप्रकार

क्रप्रकार
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमान काळ
पूर्ण वर्तमान काळ
रिती वर्तमान काळ


भूतकाळाचे उपप्रकार

क्रप्रकार
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रिती भूतकाळ



भविष्यकाळाचे उपप्रकार

क्रप्रकार
साधा भविष्यकाळ
अपूर्ण भविष्यकाळ
पूर्ण भविष्यकाळ
रिती भविष्यकाळ

हे पण पहा :- सिद्ध शब्द

👉 बऱ्याच वेळा विद्यार्थी गोंधळतात त्याचे कारण म्हणजे परीक्षेत कधी कधी चालू काळ ओळख किंवा चालू पूर्ण काळ ओळखा असे प्रश्न येतात तेव्हा गोंधळून जाण्याचे काही कारण नाही.

मराठीत अपूर्ण काळाला चालू काळ असे देखील म्हटले जाते.

उदाहरणार्थ :-
काळाच्या उपप्रकारचे नावदुसरे नाव
अपूर्ण वर्तमान काळचालू वर्तमान काळ
अपूर्ण भूतकाळचालू भूतकाळ
अपूर्ण भविष्यकाळचालू भविष्यकाळ


मराठीत रिती काळाला चालू - पूर्ण काळ असे देखील म्हटले जाते.

उदाहरणार्थ :-
काळाच्या उपप्रकारचे नावदुसरे नाव
रिती वर्तमान काळचालू - पूर्ण वर्तमान काळ
रिती भूतकाळचालू - पूर्ण भूतकाळ
रिती भविष्यकाळचालू - पूर्ण भविष्यकाळ

  
हे पण पहा :- साधित शब्द

वर्तमानकाळ व त्याचे प्रकार

१] वर्तमानकाळ म्हणजे काय?

        जेव्हा क्रियापदावरुन किंवा क्रियापदाच्या रुपावरून क्रिया आता घडत आहे. किंवा घडते असा बोध होतो. तेव्हा त्या काळाला वर्तमान काळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) मी लाडू खातो.
    २) तो वर्तमानपत्र वाचतो.
    ३) आम्ही कबड्डी खेळतो.
    ४) ती गाणे गाते.
    ५) ते पेपर सोडवितात. 
    ६) ती सकाळी लवकर उठते.
    ७) वाघ शिकार करतो.
    ८) साहेबांनी पत्र लिहिले आहे.
    ९) बाबा वृत्तपत्र वाचत आहेत.
    १०) आई तांदूळ निवडत आहे.
 
        वरील सर्व वाक्यांमध्ये घडलेल्या घटना ह्या सध्याच्या परिस्थितीत घडणाऱ्या आहेत असा बोध होतो, म्हणून या काळाला वर्तमान काळ असे म्हणतात.


वर्तमान काळाचे चार उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.

वर्तमान काळाचे उपप्रकार

क्रप्रकार
साधा वर्तमान काळ
अपूर्ण वर्तमान काळ
पूर्ण वर्तमान काळ
रिती वर्तमान काळ


अ) साधा वर्तमान काळ म्हणजे काय?

        जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळात घडते तेव्हा त्याला साधा वर्तमानकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) मी पेरू खातो.
    २) राम खो-खो खेळतो.
    ३) संगीता कविता गाते.
    ४) संतोष गाणे ऐकतो.
    ५] बाळू पाणी पितो.
    ६) गाय गवत खाते.
    ७) पोलीस येतात, तोच चोर गायब!
    ८) तुम्ही पुढे व्हा, मी येतोच.
    ९) जानेवारीनंतर फेब्रुवारी येतो.
    १०) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.


ब) अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय?

ब] चालू वर्तमान काळ म्हणजे काय?

        जेव्हा एखादी क्रिया ही वर्तमान काळात असून ती अपूर्ण किंवा चालू असेल तेव्हा त्या वर्तमानकाळाला अपूर्ण किंवा चालू वर्तमानकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) सुयश शुद्धलेखन लिहत आहे.
    २) राजेश कविता पाठांतर करीत आहे. 
    ३) सतिश पुस्तक वाचत आहे.
    ४) मुले अंगणात खेळत आहेत.
    ५) संतोष अभ्यास करीत आहे.
    ६) बाबा फेरफटका मारत आहे.
    ७) आम्ही आरती करीत आहोत.
    ८) आई स्वयंपाक बनवत आहे.
    ९) प्रथमेश जेवण करीत आहे.
    १०) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवत आहेत.


क) पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय?

        जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) रामने लाडू खाल्ला आहे.
    २) आईने स्वयंपाक बनविला आहे.
    ३) जान्हवीने अभ्यास केला आहे.
    ४) राजेश झोपला आहे.
    ५) मुलांनी पेपर सोडविला आहे.
    ६) मी 'मेला' चित्रपट पाहिला आहे.
    ७) बाबांनी केक आणला आहे.
    ८) काकांनी सफरचंद कापले आहे.
    ९) मुलांनी मैदान आखले आहे.
    १०) गुरुजींनी कविता शिकवली आहे.


ड) रिती वर्तमान काळ म्हणजे काय?

ड] चालू-पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय?

        वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रित दाखविली तर त्याला रिती वर्तमान काळ म्हणतात. यालाच चालू-पूर्ण वर्तमानकाळ असेही म्हणतात.
        रिती / चालू-पूर्ण वर्तमान काळात क्रिया अगोदर होऊन गेलेली असते, सध्या होत असते व भविष्यामध्ये देखील होईल अशी अपेक्षा असते.
उदाहरणार्थ :-
    १) राम दररोज फिरायला जातो.
    २) सुयश रोज अभ्यास करतो.
    ३) राधिका नेहमीच वर्तमानपत्र वाचते.
    ४) सुनिल रोज व्यायाम करतो.
    ५) संगीता पुस्तक वाचत असते.
    ६) राहुल रोज शाळेत उशिरा यतो.
    ७) आमच्या शाळेत दररोज प्रार्थना म्हणतात.
    ८) सीताचे बाबा नेहमी कामात व्यस्त असते
    ९) राणीच्या नाकाला नेहमीच पाणी असते.
    १०) आमच्या गुरुजींचा आवाज नेहमीच वरच्या स्वरात असतो.


वर्तमान काळाचे काही अपवाद :-

        प्रत्येक गोष्टीना काही अपवाद असतात तसेच अपवाद वर्तमानकाळाला देखील आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.

१] त्रिकालाबाधित सत्य असलेल्या बाबी साध्या वर्तमान काळात बोलल्या जातात
उदाहरणार्थ :-
    i) सूर्य पूर्वेस उगवतो (लंबवर्तुळाकार)
    ii) पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
    iii) सूर्य पश्चिम दिशेस मावळतो.
    iv) चंद्र पृथ्वीभोवती फिरतो.

२] इतिहासातील काही घटना या भूतकाळात घडलेल्या असलेल्या तरी त्या वर्तमानकाळात सांगितल्या जातात. त्याला ऐतिहासिक वर्तमान काळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    i) बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांना म्हणतात.
    ii) अर्जुन कृष्णाला म्हणतात.
    iii) देव लाकूडतोड्याला म्हणतात.
    iv) तान्हाजी मालुसरे शिवाजींना म्हणतात.


३] लवकर सुरू होणारी क्रिया दर्शवितांना जेव्हा जवळच्या भविष्यकाळाचा आधार घेतला जातो तेव्हा त्याला संनिहित भविष्यकाळ म्हणून देखील ओळखले जाते.
उदाहरणार्थ :-
    i) तुम्ही पुढे जा मी सायकलवर येतो.
    ii) तुम्ही बाजारात जा मी तुम्हाला भेटतो.
    iii) तुम्ही जेवण सुरू करा मी देखील घेतो.
    iv) तू पोहणे सुरू कर मी देखील उडी घेतो.

हे पण पहा :- समानार्थी शब्द

४] जेव्हा एखादे वाक्य हे अवतरण चिन्हामध्ये बोलले जाते. तेव्हा त्याचा देखील बोध वर्तमानकाळासारखा दिसतो.
उदाहरणार्थ :-
    i) पंडित नेहरू म्हणतात, "आराम हराम है"
    ii) डॉ. आंबेडकर म्हणतात, “शिका संघटित व्हा, संघर्ष करा"
    iii) समर्थ रामदास म्हणतात, "जगी सर्व सुखी असा कोण आहे?"
    iv) लो. टिळक म्हणतात," स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे. तो मी मिळविणारच. "

५] नुकतीच घडलेली क्रिया सांगतांना म्हणजे च लगतचा भूतकाळ व्यक्त करताना वर्तमानकाळाचा वापर केला जातो त्याला संनिहित भूतकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    i) नाव घेताच तुम्ही हजर
    ii) मी सिनेमाला निघालो तोच माझा मित्र हजर झाला.
    iii) मी वर्गातून पळून जात होतो तोच कस्तुरे सर तेथे आले.
    iv) मी अभ्यासाला बसतोच तोच मित्राचा फोन आला.


भूतकाळ व त्याचे प्रकार

२] भूतकाळ म्हणजे काय?

        जेव्हा क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया ही पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) रोहित शाळेत गेला.
    २) सिताने अभ्यास केला.
    ३) राजेश जेवण केले.
    ४) आम्ही सिनेमा बघितला.
    ५) सोहमने अभ्यास केला होता.
    ६) सुयाशने गाणे गाईले होते.
    ) सरला सायकल चालवत होती.
    ८) मी दहावी पास झालो.
    ९) रवीने पुस्तक वाचले.
    १०) शिवाजी नेहमी सिनेमा पाहत होतो/असे.

        वरील सर्व वाक्यांमध्ये घडलेल्या घटना ह्या घडून गेलेल्या आहेत असा बोध होतो, म्हणून या काळाला भूतकाळ असे म्हणतात.

भूतकाळाचे पुन्हा चार उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.

भूतकाळाचे उपप्रकार

क्रप्रकार
साधा भूतकाळ
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रिती भूतकाळ

हे पण पहा :- समूह दर्शक शब्द

अ) साधा भूतकाळ म्हणजे काय?

        जेव्हा एखादी क्रिया ही अगोदरच घडून गेलेली असते. त्या संदर्भात जेव्हा बोलल्या जाते तेव्हा त्या काळाला साधा भूतकाळ असे म्हटल्या जाते.
उदाहरणार्थ :-
    १) सुनीलने अभ्यास केला
    २) भारतीने नाटक पाहिले.
    ३) मी दहावी पास झालो.
    ४) रवीने पुस्तक वाचले.
    ५) रोहितने गाणे गायिले.
    ६) राधाने गोष्ट वाचली.
    ७) आम्ही ताजमहाल पहिला.
    ८) बाबांनी पूजा केली.
    ९) आईने स्वयंपाक केला.
    १०) सचिनने शंकराच्या पिंडीला फुल वाहिले.


ब) अपूर्ण भूतकाळ म्हणजे काय?

ब] चालू भूतकाळ म्हणजे काय?

        क्रियापदावरून ज्या वेळी मागील काळात ती क्रिया घडत होती किंवा ज्या संदर्भात बोलायचे आहे ती क्रिया चालू होती म्हणजेच अपूर्ण क्रिया अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ म्हणून ओळखले जाते.
उदाहरणार्थ :-
    १) सुयश शुद्धलेखन लिहत होता
    २) राजेश कविता पाठांतर करीत होता. 
    ३) सतिश पुस्तक वाचत होता.
    ४) मुले अंगणात खेळत होती.
    ५) संतोष अभ्यास करीत होता.
    ६) बाबा फेरफटका मारत होते.
    ७) आम्ही आरती करीत होतो.
    ८) आई स्वयंपाक बनवत होती.
    ९) प्रथमेश जेवण करीत होता.
    १०) गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवत होते.

क) पूर्ण भूतकाळ म्हणजे काय?

        जेव्हा क्रियापदावरून मागील काळात एखादी क्रिया ही पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ म्हणून ओळखले जाते.
उदाहरणार्थ :-
    १) रामने लाडू खाल्ला होता.
    २) आईने स्वयंपाक बनविला होता.
    ३) जान्हवीने अभ्यास केला होता.
    ४) राजेश झोपला होता.
    ५) मुलांनी पेपर सोडविला होता.
    ६) मी 'मेला' चित्रपट पाहिला होता.
    ७) बाबांनी केक आणला होता.
    ८) काकांनी सफरचंद कापले होते.
    ९) मुलांनी मैदान आखले होते.
    १०) गुरुजींनी कविता शिकवली होती.


ड) रिती भूतकाळ म्हणजे काय?

ड] चालू-पूर्ण भूतकाळ म्हणजे काय?

        भूतकाळामध्ये एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून काही वेळा ती पूर्णदेखील झालेली असते अशा काळाला चालू-पूर्ण भूतकाळ किंवा रिती भूतकाळ म्हणून ओळखले जाते.
उदाहरणार्थ :-
    १) राम दररोज फिरायला जात होता / असे
    २) सुयश रोज अभ्यास करत होता / असे
    ३) राधिका नेहमीच वर्तमानपत्र वाचत होती / असे
    ४) सुनिल रोज व्यायाम करत होता / असे
    ५) संगीता नियमित पुस्तक वाचत करीत होता / असे
    ६) राहुल रोज शाळेत उशिरा येत होता / असे
    ७) आम्ही शाळेत दररोज प्रार्थना म्हणत होता / असे
    ८) सीताचे बाबा नेहमी कामात व्यस्त राहत होते / असे
    ९) सविता दररोज मंदिरात जात होती/असे.
    १०) शिवाजी नेहमी सिनेमा पाहत होतो/असे.

भूतकाळाचे काही अपवाद :-

        प्रत्येक गोष्टीना काही अपवाद असतात तसेच अपवाद वर्तमानकाळाला देखील आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत.
१] संनिहित भविष्यकाळ दर्शविण्यासाठी ज्याप्रमाणे वर्तमानकाळाचा वापर केला जातो तसाच भूतकाळाचा देखील वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) तू जेवायला बैस, मी आलोच .
या वाक्यामध्ये मी आलोच यामध्ये दर्शविला जातो. परंतु तरी देखील असे वाक्य ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबद्दल वापरली जातात.


२] एखादी क्रिया भविष्यामध्ये निश्चित होणार या अर्थी निःसंशय भविष्यकाळ सांगितला जातो. त्यामध्ये भूतकाळाचा वापर झालेला दिसतो.
उदाहरणार्थ :-
    i) वर्गामध्ये लक्ष दिले नाही तर कस्तुरे सरांनी शिक्षा केलीच म्हणून समज.
याठिकाणी वर्गात लक्ष न दिल्याने कस्तुरे सर शिक्षा करतातच याची खात्री झालेली असते.


हे पण पहा :- विराम चिन्हे


३] एखादा संकेतार्थ असल्यास किंवा एखादा संभव असेल तर अशा वेळी देखील उल्लेख केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) पाऊस चांगला आला असता तर पीक चांगले आले असते.
    ii) अभ्यास केला असता तर नापास झाला नसता.
वरील वाक्यामध्ये एक विशिष्ट संकेत किंवा संभव सांगितलेला दिसून येतो.


४] चालू वर्तमान काळातील क्रिया पूर्ण होण्याच्या अगोदरच भूतकाळात बोलली जाते.
उदाहरणार्थ :-
    i) तो पाहा तुझा मित्र आला.
वरील उदाहरणामध्ये मित्र थोड्या अंतरावरच आहे व आपल्याकडे येत आहे त्याची येण्याची क्रिया ही सध्या चालूच आहे. तरीदेखील अशा वेळी तो पहा तुझा मित्र आला. या वाक्यातून भूतकाळ सांगितला जातो.
अशा प्रकारे भूतकाळात काही वेगवेगळे अपवाद दिसून येतात.


भविष्यकाळ व त्याचे प्रकार

३) भविष्यकाळ  म्हणजे काय?

        जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याचा बोध होते अशा काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) अविनाश सिनेमाला जाईल.
    २) उद्या पाऊस पडेल.
    ३) उद्या परीक्षा संपेल.
    ४) अंशुमन गावाला जात असेल.
    ५सुनिता अभ्यास करील.
    ६) वेदांतने बक्षिस स्वीकारलेले असेल.
    ७) सुयशने अभ्यास केला असेल.
    ८) सविता नियमित वर्तमानपत्र वाचत जाईल.
    ९) सुनिता रोज अभ्यास करीत जाईल.
    १०) राहुल शिक्षक बनेल.

        वरील सर्व वाक्यांमध्ये घटना ह्या पुढे घडतील असा बोध होतो, म्हणून या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात.


भविष्यकाळाचे पुन्हा चार उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे.

भविष्यकाळाचे उपप्रकार

क्रप्रकार
साधा भविष्यकाळ
अपूर्ण भविष्यकाळ
पूर्ण भविष्यकाळ
रिती भविष्यकाळ


अ) साधा भविष्यकाळ म्हणजे काय?

        जेव्हा एखादी क्रिया पुढील काळात घडणार असेल अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो.
उदाहरणार्थ :-
    १) उद्या पाऊस पडेल.
    २) उद्या परीक्षा संपेल.
    ३) सीता सिनेमाला जाईल.
    ४) राम आंबा खाईल.
     ५) श्याम डोंगर चढेल
     ६) ललिता गाणे गाईल.
     ७) रमेश खेळायला जाईल.
     ८) आम्ही उद्या सहलीला जावू.
     ९) भारत क्रिकेटचा सामना जिंकेल.
     १०) मला उद्या बक्षीस मिळेल.

ब] अपूर्ण भविष्यकाळ  म्हणजे काय? 

ब) चालू भविष्यकाळ  म्हणजे काय?

        जेव्हा क्रियापदाने दर्शविलेली कृती ही भविष्याकाळामध्ये चालू असते किंवा पूर्ण झालेली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :- 
    १) लक्ष्मण आंबा खात असेल.
    २) अंशुमन गावाला जात असेल.
    ३) गीता अभ्यास करत असेल.
    ४) रजनी गाणे गात असेल.
    ५) सीता सिनेमाला जात असेल.
    ६) श्याम डोंगर चढत असेल.
    ७) रमेश खेळायला जात असेल.
    ८) राम व्यायाम करीत असेल.
    ९) सविता वर्तमानपत्र वाचत असेल.
    १०) राजेश शाळेत जात असेल.


क) पूर्ण भविष्यकाळ  म्हणजे काय?

        जेव्हा क्रियापदाने दर्शविलेली कृती ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) सुनिलने आंबा खाल्ला असेल.
    २) वेदांतने बक्षिस स्वीकारले असेल.
    ३) सुयशने अभ्यास केला असेल.
    ४) राहुल गावाला पोहचला असेल.
    ५) विशालने गाणे गायले असेल.
    ६) बाबांनी नटराज नाटक बघितले असेल.
    ७) दादा डोंगर चढला असेल.
    ८) रामने व्यायाम केला असेल.
    ९) सविता वर्तमानपत्र वाचले असेल.
    १०) राजेश शाळेत गेला असेल.


ड) रिती भविष्यकाळ  म्हणजे काय?

ड] चालू-पूर्ण भविष्यकाळ  म्हणजे काय?

        जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर असे दर्शविल्यास त्याला चालू-पूर्ण भविष्यकाळ म्हणून ओळखले जाते. यालाच रिती भविष्यकाळ असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
    १) राम रोज व्यायाम करीत जाईल.
    २) सविता नियमित वर्तमानपत्र वाचत जाईल.
    ३) सुनिता रोज अभ्यास करीत जाईल.
    ४) राजेश नियमित शाळेत जाईल.
    ५) लक्ष्मण रोज काजू-बदाम खात असेल.
    ६) अंशुमन नियमित महादेवाच्या मंदिरात जात असेल.
    ७) रजनी नियमित गाण्याचा सराव करीत असेल.
    ८) सीता नियमित सिनेमाचे गाणे गात असेल.
    ९) सविता नियमित वर्तमानपत्र वाचत असेल.
    १०) राजेश रोज शाळेत जात असेल.


भविष्यकाळाचे काही अपवाद

१] अशक्य गोष्ट असेल तर बऱ्याच वेळा भविष्यकाळाचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) एकदा पृथ्वीवर हिटलर आला पाहिजे.

२] एखादी इच्छा व्यक्त करतानादेखील भविष्यकाळाचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) मी सिनेमात काम करायला पाहिजे होते.
    ii) मी पंतप्रधान व्हायला हवे होते.
    iii) मला सोन्याचा हंडा सापडायला हवा.

३] एखादा संकेत व्यक्त करतांना देखील भविष्यकाळाचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) तू मदत करशील तर मी तुझ्या उपकारात राहील.

४] एखादा संभव दर्शविण्यासाठीदेखील या काळाचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) अभ्यास न केल्यामुळे कस्तुरे सर विद्यार्थ्यांना शिक्षा करीत असतील.

५] एखादी क्रिया पुढे घडणार असेल तर या काळाचा वापर केला जातो.
उदाहरणार्थ :-
    i) उद्या काय तो परीक्षेचा निकाल करेल.

काळ म्हणजे काय? , काळाचे मुख्य प्रकार कोणते? , काळाचे उपप्रकार कोणते? , काळाचे उदाहरण , काळांचे अपवाद


            आम्ही तुम्हाला येथे काळ म्हणजे काय? , काळाचे मुख्य प्रकार कोणते? , काळाचे उपप्रकार कोणते? , काळाचे उदाहरण , काळांचे अपवाद, काळांचे वाक्य ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी काळ आणि त्यांचे प्रकार | Tense and Types of Tense in Marathi | Tense and its types in Marathi |  Marathi Tenses ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad