मराठी सर्वनाम व त्याचे प्रकार
Type of Pronoun in Marathi
Sarvnamache Prakar | Sarvnam V Tyache Prakar
मराठी सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार ( Type of Pronoun in Marathi | Sarvnamache Prakar | Sarvnam V Tyache Prakar ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार ( Type of Pronoun in Marathi | Sarvnamache Prakar | Sarvnam V Tyache Prakar माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार ( Type of Pronoun in Marathi | Sarvnamache Prakar | Sarvnam V Tyache Prakar ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
हे पण पहा :- मराठी शब्दांच्या जाती
सर्वनाम म्हणजे काय ?[ Pronoun / Sarvnam ]
मराठी व्याकरणात एकूण नऊ सर्वनामे आहेत.
मराठी सर्वनामे
[ Marathi Sarvnam / Marathi Pronoun ]
क्र मराठी सर्वनामे १ मी २ तू ३ तो - ( ती, ते, त्या ) ४ हा - ( ही. हे, ह्या ) ५ जो - ( जी, जे, ज्या ) ६ कोण ७ काय ८ आपण ९ स्वतः
सर्वनामांची विविध रूपे [ Different forms of pronouns ]
क्र | मराठी सर्वनामे |
---|---|
१ | मी |
२ | तू |
३ | तो - ( ती, ते, त्या ) |
४ | हा - ( ही. हे, ह्या ) |
५ | जो - ( जी, जे, ज्या ) |
६ | कोण |
७ | काय |
८ | आपण |
९ | स्वतः |
सर्वनामांची विविध रूपे [ Different forms of pronouns ]
सर्वनामाची रूपे
सर्वनामे सर्वनामाची रूपे मी मला, माझी, माझ्यात, माझ्याशी. आम्ही आम्हांला, आमच्याशी, आमची, आमच्यात. तुम्ही तुम्हांला, तुमच्याशी, तुमची, तुमच्यात. तू तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्यात. तो तुला, त्याने, त्याला, त्याच्याशी, त्याची, त्याच्यात ती तिला, तिने, तिच्याशी, तिची, तिच्यात. ते त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी, त्यांची, त्यांच्यात. जो ज्याला, ज्याने, ज्याच्याशी, ज्याची, ज्याच्यात. जी जिला, जिने, जिच्याशी, जिची, जिच्यात. जे ज्यांना, ज्यांनी, ज्यांच्याशी, ज्यांची, ज्यांच्यात. हा ह्याला, ह्याने, ह्याच्याशी, ह्याची, ह्याच्यात ही हिला, हिने, हिच्याशी, हिची, हिच्यात. हे ह्यांना, ह्यांनी, ह्यांच्याशी, ह्यांची, ह्यांच्यात. काय कसला, कशाने, कशाला, कशाचे, कशात. कोण कोणी, कोणास, कोणाला, कोणाशी, कोणाची, कोणाच्यात. आपण आपणाला, आपणांस, आपणाशी, आपणात. स्वतः स्वतः ने, स्वतःस, स्वतःला, स्वतःची, स्वतःत.
सर्वनामे | सर्वनामाची रूपे |
---|---|
मी | मला, माझी, माझ्यात, माझ्याशी. |
आम्ही | आम्हांला, आमच्याशी, आमची, आमच्यात. |
तुम्ही | तुम्हांला, तुमच्याशी, तुमची, तुमच्यात. |
तू | तुला, तुझ्याशी, तुझी, तुझ्यात. |
तो | तुला, त्याने, त्याला, त्याच्याशी, त्याची, त्याच्यात |
ती | तिला, तिने, तिच्याशी, तिची, तिच्यात. |
ते | त्यांना, त्यांनी, त्यांच्याशी, त्यांची, त्यांच्यात. |
जो | ज्याला, ज्याने, ज्याच्याशी, ज्याची, ज्याच्यात. |
जी | जिला, जिने, जिच्याशी, जिची, जिच्यात. |
जे | ज्यांना, ज्यांनी, ज्यांच्याशी, ज्यांची, ज्यांच्यात. |
हा | ह्याला, ह्याने, ह्याच्याशी, ह्याची, ह्याच्यात |
ही | हिला, हिने, हिच्याशी, हिची, हिच्यात. |
हे | ह्यांना, ह्यांनी, ह्यांच्याशी, ह्यांची, ह्यांच्यात. |
काय | कसला, कशाने, कशाला, कशाचे, कशात. |
कोण | कोणी, कोणास, कोणाला, कोणाशी, कोणाची, कोणाच्यात. |
आपण | आपणाला, आपणांस, आपणाशी, आपणात. |
स्वतः | स्वतः ने, स्वतःस, स्वतःला, स्वतःची, स्वतःत. |
मराठीत सर्वनामाचे सहा प्रकार आहेत.
मराठी सर्वनामाचे प्रकार
[ Marathi Sarvnamache Prakar / Type of Pronoun in Marathi ]
क्र मराठी सर्वनामाचे प्रकार १ पुरुषवाचक सर्वनाम
Personal pronoun / Purushvachak Sarvnam
२ दर्शक सर्वनाम
Demonstrative Pronoun / Darshak Sarvnam
३ संबंधी सर्वनाम
Relative Pronoun / Sambandhi Sarvnam
४ प्रश्नार्थक सर्वनाम
Interrogative Pronoun / Prashnarthak Sarvnam
५ सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम
Common or Indefinite Pronouns / Samany Kinva Anishchit Sarvnam
६ आत्मवाचक सर्वनाम.
Reflexive Pronoun / Aatmvachak Sarvnam
क्र | मराठी सर्वनामाचे प्रकार |
---|---|
१ | पुरुषवाचक सर्वनाम Personal pronoun / Purushvachak Sarvnam |
२ | दर्शक सर्वनाम Demonstrative Pronoun / Darshak Sarvnam |
३ | संबंधी सर्वनाम Relative Pronoun / Sambandhi Sarvnam |
४ | प्रश्नार्थक सर्वनाम Interrogative Pronoun / Prashnarthak Sarvnam |
५ | सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम Common or Indefinite Pronouns / Samany Kinva Anishchit Sarvnam |
६ | आत्मवाचक सर्वनाम. Reflexive Pronoun / Aatmvachak Sarvnam |
१] पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय ?
[Personal pronoun / Purushvachak Sarvnam ] :-
व्यक्ती विषयी वापरल्या जाणार्या सर्व नामांना पुरुषवाचक सर्वनाम [Personal pronoun / Purushvachak Sarvnam ] असे म्हणतात.
पुरुष वाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत.
पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार
क्र पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार १ प्रथम पुरूषवाचक सर्वनाम
First Personal Pronoun / Pratham Purushvachak Sarvnam
२ द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम
Second Personal Pronoun / Dvitiy Purushvachak Sarvnam
३ तृतीय पुरूषवाचक सर्वनाम
Third Personal Pronoun / Trutiy Purushvachak Sarvnam
क्र | पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार |
---|---|
१ | प्रथम पुरूषवाचक सर्वनाम First Personal Pronoun / Pratham Purushvachak Sarvnam |
२ | द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम Second Personal Pronoun / Dvitiy Purushvachak Sarvnam |
३ | तृतीय पुरूषवाचक सर्वनाम Third Personal Pronoun / Trutiy Purushvachak Sarvnam |
क] प्रथम पुरूषवाचक सर्वनाम म्हणजे काय?
[ First Personal Pronoun / Pratham Purushvachak Sarvnam ] :-
बोलणारी व्यक्ती स्वतः च्या नामा ऐवजी जी सर्वनामे वापरते त्यास प्रथम पुरूषवाचक सर्वनाम [ First Personal Pronoun / Pratham Purushvachak Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :- मी, आम्ही, आपण
१] मी उद्या गावाला जाणार आहे.
२] आम्ही तुला जेवण देणार.
३] आपण खेळायला जाणार आहोत.
ख] द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम म्हणजे काय?
[ Second Personal Pronoun / Dvitiy Purushvachak Sarvnam ]
बोलणारी व्यक्तीने समोरच्या व्यक्ती विषयी बोलतांना जी सर्वनामे वापरतो त्यास द्वितीय पुरूषवाचक सर्वनाम [ Second Personal Pronoun / Dvitiy Purushvachak Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :- तू, तुम्ही, आपण
१] तू उद्या गावाला जाणार आहेस का?
२] तुम्ही एवढे काम कराच.
३] आपण आलात बरे वाटले.
ग] तृतीय पुरूषवाचक सर्वनाम म्हणजे काय?
[ Third Personal Pronoun / Trutiy Purushvachak Sarvnam ]
बोलणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला तेथे नसल्येल्या व्यक्ती विषयी बोलतांना जी सर्वनामे वापरतो त्यास तृतीय पुरूषवाचक सर्वनाम [ Third Personal Pronoun / Trutiy Purushvachak Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :- तो, ती, ते, त्या
१] तो म्हणे पुण्याला गेला.
२] ती चांगली गाते.
३] ते माझ्यावर रागावले होते.
४] त्या चांगल्या नृत्य करतात.
२] दर्शक सर्वनाम म्हणजे काय ?
[ Demonstrative Pronoun / Darshak Sarvnam ]
एखादी वस्तू जवळ आहे कि दूर आहे हे दाखवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना दर्शक सर्वनाम [ Demonstrative Pronoun / Darshak Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :-
दूरची वस्तू / व्यक्ती दाखवण्याची :- तो, ती, ते, त्या
जवळची वस्तू / व्यक्ती दाखवण्याची :- हा, ही, हे, ह्या
१] तो हुशार मुलगा आहे.
२] ती कब्बडी खेळाडू आहे.
३] ते सर्वात मोठे जहाज आहे.
४] त्या चांगल्या नृत्य करत आहेत.
५] हा हुशार मुलगा आहे.
६] ही माझी जवळची मैत्रिण आहे.
७] हे माझे काका आहेत.
८] ह्या माझ्या आजी आहेत.
३] संबंधी सर्वनामे म्हणजे काय ?
[ Relative Pronoun / Sambandhi Sarvnam ]
दर्शक सर्वानामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वानामाना संबंधी सर्वनाम [ Relative Pronoun / Sambandhi Sarvnam ] असे म्हणतात.
उदारणार्थ :- जो, जी, जे, ज्या
१] जो करेल तो भरेल.
२] जे कष्ट घेतात ते यशस्वी होतात.
३] जी वस्तू हवी असते ती वेळेवर मिळत नाही.
४] तळे राखील तो पाणी चाखी. ( जो तळे राखील तो पाणी चाखी.)
४] प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय ?
[ Interrogative Pronoun / Prashnarthak Sarvnam ]
प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वानामाना प्रश्नार्थक सर्वनामे [ Interrogative Pronoun / Prashnarthak Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :- कोण, काय
१] ही कोण आहे?
२] तुझे नाव काय आहे?
५] सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय ?
[ Common or Indefinite Pronouns / Samany Kinva Anishchit Sarvnam ]
जेव्हा कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येत नाहीत आणि कोणत्या विशिष्ट नामाचा निर्देश करीत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम [ Common or Indefinite Pronouns / Samany Kinva Anishchit Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :- कोण , काय
१] रमेशच्या पिशवीत काय आहे ते पाहूया.
२] कविता कोणी लिहिली ती माहीत नाही.
६] आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय ?
[ Reflexive Pronoun / Aatmvachak Sarvnam ]
स्वतः या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाना आत्मवाचक सर्वनाम [ Reflexive Pronoun / Aatmvachak Sarvnam ] म्हणतात.
उदारणार्थ :- आपण, स्वतः, निज
१] पक्षी निज बाळांसह बागडते.
२] तो आपणहून माझ्याकडे आला.
३] मी स्वतः त्या भेटलो.
'आपण' हे सर्वनाम वापराचे नियम पुढील प्रमाणे आहे.
'आपण' हे सर्वनाम आम्ही याअर्थाने आल्यास तो प्रथम परुषवाचक सर्वनाम असतो.उदारणार्थ :- आपण आता खेळूया.
'आपण' हे सर्वनाम तुम्ही या अर्थाने आल्यास तो द्वितीय परुषवाचक सर्वनाम असतो.
उदारणार्थ :- आपण आलात आम्हाला समाधान वाटले.
'आपण' हे सर्वनाम स्वतः या अर्थाने आल्यास तो आत्मवाचक सर्वनाम असतो.
उदारणार्थ :- त्याने आपणहून गुन्हा कबूल केला.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box