मराठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 15, 2023

मराठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi

TYPES OF ADJECTIVES IN MARATHI

  मराठी विशेषण व त्याचे प्रकार

विशेषण व विशेषणाचे प्रकार

Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi

मराठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi

मराठी विशेषण व त्याचे प्रकार ( Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi ) :- 

          मराठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी इंटरनेट वर  विशेषण वाक्य मराठीत( visheshan marathi sentence )मराठी विशेषण, मराठी विशेषण यादी, मराठी विशेषण वाक्य ( marathi visheshan sentence )मराठी विशेषण शब्द, विशेषणाची व्याख्या ( visheshan in marathi definition ), मराठी विशेषणाचा अर्थ (visheshan in marathi meaning )  या प्रकारची माहिती शोधतात. मराठी विशेषण व विशेषणाचे प्रकार यावर विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी विशेषण व विशेषणाचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.

          चला तर मग आपण बघूया मराठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi ) .



विशेषण म्हणजे काय?

[ Visheshan in marathi definition ]
[ Visheshan in marathi meaning ]

            नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण (Adjective | Visheshan ) असे म्हणतात.



विशेषणाविषयी महत्वाचे :-

क्रविशेषाणाविषयी महत्वाचे
विशेषणे एकाकी कधीच येऊ शकत नाहीत.
जेव्हा नाम नसताना विशेषण एकाकी येते तेव्हा तेच नाम होते.
विशेषण हे नामाला जोडून नामाच्या आधी येते.
विशेष्य - ज्याचे वर्णन केले जाते ते विशेष्य असते.
विशेषण - वर्णन करणारा शब्द विशेषण असतो.
नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द कोठेही असला तरी तो विशेषणाचा असतो.
   ती सुंदर आहे.
परंतु क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो.
   ती सुंदर खेळते.


मराठी विशेषण उदाहरण :-

[ Marathi visheshan example | Visheshan marathi example ]

हुशार विद्यार्थी , सुंदर फुलपाखरू, आंबट ताक, पाच, अर्धा, दोघे, पहिला, चौपट, एकेक, सर्व, इतर, काही, माझे घर, हे पुस्तक, कोणती गोष्ट, तुझे बाबा, वरचा मजला, खालचे पुस्तक. मागी मोटार,  पंचमुखी हनुमान, एकवचनी राम, नवरात्र महोत्सव, काही साखर, थोडे पाणी इत्यादी काही मराठी विशेषणाची उदाहरणे आहे. अधिक विस्तृत पहाण्यासाठी पूर्ण माहिती वाचावी.

मराठी विशेषण वाक्य :-

[ Marathi visheshan sentence ]
[ Visheshan in marathi examples sentences ]

    १] त्याचा चेहरा बोलका वाटतो. (बोलणे)
    २] कोकिळा गात आहे. (गाणे)
    ३] ती पडकी माडी  (पडणे)
    ४] हसरी मुले (हसणे)
    ५] आम्ही सिंहगडला चालत चालत गेलो. (चालणे).
    ६] गुलमोहर मोहक दिसतो.
    ७] माझ्या भावाचे कापड दुकान आहे.
    ८] त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.

            इत्यादी काही मराठी विशेषणाची वाक्य आहे. अधिक विस्तृत वाक्य पहाण्यासाठी पूर्ण माहिती वाचावी. 


विशेषणाचे प्रकार किती व कोणते ?

विशेषणाचे मुख्य चार प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे 

विशेषणाचे प्रकार मुख्य चार प्रकार

क्रविशेषाणाचे प्रकार
गुणवाचक विशेषण [ Gunvachak Visheshan ] 
संख्यावाचक विशेषण [ Sankhyavachak Visheshan ]
सार्वनामिक विशेषण [ Sarvnamik Visheshan ]
धातुसाधित विशेषण [ Dhatusadhit Visheshan ]


१] गुणवाचक विशेषण म्हणजे काय ?

[ Gunvisheshan in Marathi ]

            जेव्हा विशेषणाच्या माध्यमातून नामाचा गुण  दर्शविला जातो किंवा त्या गुणासंबंधीचा बोध होतो तेव्हा त्या विशेषणाला गुण विशेषण [ Gun Visheshan in Marathi ] असे म्हणतात.

            थोडक्यात नामाच्या गुनाविषयी माहिती सांगणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण [ Gunvisheshan in Marathi ] म्हणतात.

गुण विशेषणाचे उदाहरण :-

    हुशारसुंदरआंबट, खारट, गोडकोराकुरूपदयाळूनिर्दयी इत्यादी

गण विशेषणाचे वाक्य :-

    १] राजेश हुशार विद्यार्थी आहे.
    २] मी सुंदर फुलपाखरू बघितले
    ३] मला आंबट ताक आवडते.
    ४] आज भाजी खारट झाली.
    ५] लग्नात गुलाबजाम गोड होते.
    ६] मला कोरा कागद देणार का?
    ७] मला मंदिरासमोर कुरूप माणूस दिसला.
    ९] राम दयाळू राजा होता.
    १०] आमच्या गावात निर्दयी व्यापारी राहतो.
    
  गुण विशेषणातील गुणाला गुणविशेषण म्हणतात तर नामाला विशेष्य असे देखील म्हणतात.

२] संख्यावाचक विशेषण म्हणजे काय ?

[ Sankhyavisheshan in Marathi ]

            ज्या विशेषणाने नामाची संख्या दाखविली जाते, त्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण [ Sankhya Visheshan ] असे म्हणतात.

            थोडक्यात नामाची संख्या दाखविणाऱ्या विशेषणाला संख्यावाचक विशेषण [ Sankhyavisheshan ] असे म्हणतात.

संख्याविशेषणाचे उदाहरण :-

    पाच, अर्धा, दोघे, पहिला, चौपट, एकेक, सर्व, इतर, काही इत्यादी

संख्या विशेषणाचे वाक्य :-

    
१] माझ्याकडे पाच लाडू आहेत.
    २] मी अर्धा किलो साखर आणली.
    ३] आमचा पहिला तास ऑफ आहे.
    ४] माझी बहिण पाचवी इयत्तेत शिकते
    ५] नाटकाची तिसरी घंटा वाजली.
    ६] मला उद्या सावकाराला पाचपट रक्कम द्यावी लागेल.
    ७] मला बक्षीस व पैसे दोन्हीही मिळण्याने माझा आंनद द्विगुणीत झाला.
    ८
] मैदानात मुलांनी तीन-तीनच्या रांगा करा.
    ९] मला दोन-दोनचे नाणे मिळतील का?
    १०
] शाळेतील सर्व मुले हजर होती.
    


संख्याविशेषणाचे प्रकार किती व कोणते ?

संख्याविशेषणाचे पाच प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे 

संख्याविशेषणाचे प्रकार पाच प्रकार

क्रविशेषाणाचे प्रकार
गणनावाचक संख्याविशेषण 
क्रमवाचक संख्याविशेषण
आवृत्तीवाचक संख्याविशेषण
पृथक्त्ववाचक संख्याविशेषण
अनिश्चित संख्याविशेषण


अ] गणनावाचक संख्याविशेषण म्हणजे काय ?

            वस्तूची गणना करणाऱ्या संख्याविशेषणाला गणनावाचक संख्याविशेषण असे म्हणतात.

गणनावाचक संख्याविशेषणाचे वाक्य :-

    १] माझ्याकडे पाच लाडू आहेत.
    २] मी अर्धा किलो साखर आणली.
    ३] आम्ही दोघे मित्र आहोत.
    ४] माझ्याकडे बारा पेन आहेत.
    ५] मी एक पाव खाणार.


ब] क्रमवाचक संख्याविशेषण म्हणजे काय ?

            वस्तूच्या क्रमाचा बोध करणाऱ्या संख्याविशेषणाला क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात.

क्रमवाचक संख्याविशेषणाचे वाक्य :-

    १] आमचा पहिला तास ऑफ आहे.
    २] माझी बहिण पाचवी इयत्तेत शिकते
    ३] हा दहावीचा मुलगा आहे.
    ४] मी सातवी पायरीवर नवस फेडेन.
    ५] नाटकाची तिसरी घंटा वाजली.

हे पण पहा :- वाक्याचे प्रकार

क] आवृत्तीवाचक संख्याविशेषण म्हणजे काय ?

            वस्तूची किंवा संख्येची किती वेळा आवृत्ती झाली हे ज्या संख्याविशेषणाने समजते त्याला आवृत्तीवाचक संख्याविशेषण असे म्हणतात.

आवृत्तीवाचक संख्याविशेषणाचे वाक्य :-

    १] मला उद्या सावकाराला पाचपट रक्कम द्यावी लागेल.
    २] मला बक्षीस व पैसे दोन्हीही मिळण्याने माझा आंनद द्विगुणीत झाला.
    ३] सामन्याची आता दुहेरी फेरी सुरु झाली.
    ४] माझा पगार आता तिप्पट झाला.
    ५] चांगल्या बियाण्यामुळे आम्हाला दुप्पट धान्य मिळाले.


ड] पृथक्त्ववाचक संख्याविशेषण म्हणजे काय ?

            एखादी संख्या दोनदा उच्चारणे अर्थात पृथक्त्व ज्या संख्याविशेषणाने समजते त्याला पृथक्त्ववाचक संख्याविशेषण असे म्हणतात.

पृथक्त्ववाचक संख्याविशेषणाचे वाक्य :-

    १] मैदानात मुलांनी तीन-तीनच्या रांगा करा.
    २] मला दोन-दोनचे नाणे मिळतील का?
    ३] मी धड्याची एकेक ओळ पाठ केली.
    ४] शिक्षकांनी मुलांचे सात-सातचे गट तयार केले
    ५] कबड्डीसाठी शिक्षकांनी अकरा-अकराचे संघ तयार केले.

हे पण पहा :- विराम चिन्हे

इ] अनिश्चित संख्याविशेषण म्हणजे ?

            जेव्हा संख्याविशेषणात वस्तूच्या संख्येचा निश्चित असा बोध होत नसेल तेव्हा संख्याविशेषणाला अनिश्चित संख्याविशेषण असे म्हणतात.

अनिश्चित संख्याविशेषणाचे वाक्य :-

    १] शाळेतील सर्व मुले हजर होती.
    २] टोपलीतील काही फुले खराब झाली.
    ३] मराठी सोडून इतर पुस्तके पाण्यात भिजली.
    ४] आमच्याकडे घरी कुत्रा, मांजर, बैल इत्यादी प्राणी आहेत.
    ५] मला थोडे मासे मिळतील का?


३] सार्वनामिक विशेषण म्हणजे काय ?

            नामाबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणार्या सर्वनामाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात.

तसेच त्यामध्ये 
दर्शक सार्वनामिक विशेषण ( हा, ही, हे / तो, ती, ते) , 
संबंध सार्वनामिक विशेषण ( जो, जी, जे, ज्या) , 
प्रश्नार्थक सार्वनामिक विशेषण ( कोण, काय, किती, कोणती, कसली. केवढी) ,

सार्वनामिक विशेषणाचे वाक्य :-

    १] माझे घर 
    २] हे पुस्तक
    ३] कोणती गोष्ट
    ४] तुझे बाबा 
    ५] तो राजवाडा

४] धातुसाधित विशेषण म्हणजे काय ?

            धातू पासून कृदंत रुपे बनतात. काही कृदंत रुपांचा वाक्यात विशेषणासारखा उपयोग होतो. त्याना धातूसाधित विशेषणे असे म्हणतात.

धातुसाधित विशेषणाचे वाक्य :- 

    १] त्याचा चेहरा बोलका वाटतो. (बोलणे)
    २] कोकिळा गात आहे. (गाणे)
    ३] ती पडकी माडी  (पडणे)
    ४] हसरी मुले (हसणे)
    ५] आम्ही सिंहगडला चालत चालत गेलो. (चालणे).

बोलका, गात, पडकी, हसरी, चालत ही धातुसाधित विशेषणे होय.


इतर शब्दांचा विशेषणाप्रमाणे उपयोग

क्रविशेषणाप्रमाणे उपयोग
नामसाधित विशेषण [ Namsadhit Visheshan ] 
अव्ययसाधित विशेषण [ Avyaysadhit Visheshan ]
परिणामवाचक विशेषण [ Parinamvachak Visheshan ]
समासघटीत विशेषण [ Samasghatit Visheshan ]

अ] नामसाधित विशेषण म्हणजे काय ?

            एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचा वापर केला जातो तेव्हा त्यास नामसाधित विशेषण असे म्हणतात.


नामसाधित विशेषणाचे वाक्य :-

    १] माझ्या भावाचे कापड दुकान आहे.
    २] त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.
    ३] मला सातारी पेढे आवडतात.


ब] अव्ययसाधित विशेषण म्हणजे काय ?

            वर, खाली, मागे, पुढे या मुळ अव्ययांना प्रत्यय जोडून त्यांचा विशेषणाप्रमाणे उपयोग केला जातो.

अव्ययसाधित विशेषणाचे वाक्य :-

    १] तुझा वरचा मजला रिकामा आहे का?
    २] मला खालचे पुस्तक द्या.
    ३] मागी मोटार कोणची आहे.
    ४] पुढची गल्ली बंद आहे.


क] परिणामवाचक विशेषण म्हणजे काय ?

            संख्येत न मोजता येणाऱ्या नामापूर्वी वापरलेल्या प्रमाण दर्शक शब्दांना परिणामवाचक विशेषण म्हणतात.

परिणामवाचक विशेषणाचे वाक्य :-

    १] काही साखर पाण्यत विरघळू द्या.
    २थोडे पाणी पिऊन घे.


ड] समासघटित विशेषण म्हणजे काय ?

            सामासिक शब्दांचा सुद्धा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो त्याला समासघटित विशेषण म्हणतात.

समासघटित विशेषणाचे वाक्य :-

    १] आमच्या गावात पंचमुखी हनुमान आहे.
    २एकवचनी राम आता कोणी उरला नाही.
    ३नवरात्र महोत्सव सर्वाना आवडतो.
 

विशेषणाचे स्थानावरून दोन प्रकार पडतात :-

क्रविशेषणाचे स्थानावरून प्रकार
अधिविशेषण / पुर्वविशेषण
विधीविशेषण / उत्तरविशेषण

 अ] अधिविशेषण / पूर्वविशेषण म्हणजे काय ?

            नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण असे म्हणतात.

अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण विशेषणाचे वाक्य :-

    १] शहाणा मुलगा शांत असतो.
    २] शूर शिपाई कोणाला घाबरत नाही.
    ३] क्रुर राजाचा शेवट वाईटच झाला.
    ५] पांढरा कुत्रा मला आडवा गेला.


ब] विधीविशेषण / उत्तरविशेषण म्हणजे काय ?

            नामानंतर येणाऱ्या विशेषणांना विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण म्हणतात.

विधीविशेषण किंवा उत्तरविशेषण वाक्य :-

    १] गुलमोहर मोहक दिसतो.
    २] गुलाबजाम गोड होते.
    ३] लीलीचे फुल सुंदर होते.
    ४] घरासमोरील मोगरा सुगंधी होता.
    ५] आमचा मन्या लबाड आहे



            आम्ही तुम्हाला येथे विशेषण म्हणजे काय ? , विशेषणाचे उदाहरण, विशेषणाचे प्रकार, विशेषणाचे वाक्य ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी विशेषण व त्याचे प्रकार | Types of adjectives in marathi | Visheshanache Prakar in Marathi | Visheshan Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad