रस व त्याचे प्रकार | Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 18, 2023

रस व त्याचे प्रकार | Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi

TYPES OF RASA IN MARATHI

रस व त्याचे प्रकार

Rasa and its types in marathi

रस व त्याचे प्रकार | Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi

रस व त्याचे प्रकार ( Types of Rasa in Marathi | Rasa and its types in marathi ) :-

          रस व त्याचे प्रकार ( Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी रस व त्याचे प्रकार | Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी रस व त्याचे प्रकार | Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
          चला तर मग आपण बघूया रस व त्याचे प्रकार | Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi ) .


रस म्हणजे काय ?

            रस ( Rasa ) (सौंदर्य) हे मनाची भावनिक स्थिती किंवा भावनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, ज्यात प्रामुख्याने सादरीकरण असलेल्या कलांचा समावेश होतो. रस ही नाट्यशास्त्र, नाटक, अभिनय, साहित्य आणि संगीत ह्या कलाशाखांच्या संदर्भात वापरण्यात येणारी संज्ञा आहे. भारतीय साहित्यविचारात रसविचारांची मांडणी प्रथम भरतमुनी यांनी केली. याचे विस्तारित विवेचन अभिनवगुप्त यांनी केले. एकूण नऊ रस आहेत. भारताने आठ रस व त्यांचे आठ स्थायीभाव सांगितले आहेत. पुढच्या अभ्यासकानी शांत हा नववा रस व त्याचा शांती हा स्थायी सांगितला आहे.

रसांचे प्रकार किती व कोणते?

रसाचे नऊ प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.

रसाचे नऊ प्रकार

क्ररसांचे प्रकार
शृंगार रस [ Shrungar Ras ]
वीर रस [ Veer Ras ]
करुण रस [ Karun Ras ]
हास्य रस [ Hasy Ras ]
रौद्र रस [ Raudr Ras ]
भयानक रस [ Bhayanak Ras ]
बीभत्स रस [ Bibhatsa Ras ]

अद्भुत रस [ Adbhut Ras ]
शांत रस [ Shant Ras ]


रसाचे प्रकार :-

१] शृंगार रस म्हणजे काय?

        शृंगार रस [ Shrungar Rasa ] हा स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून व आकर्षणातून वैयक्तिक भावना जागृत होउन शृंगार रसाची [ Shrungar Rasa ] निर्माण होते.

शृंगार रस उदारण :-

या कातरवेळी पाहिजेस तू जवळी
सखे शेजारणी तू हसत रहा; हास्यात फुले गुंफित रहा.


२] वीर रस म्हणजे काय ?

        वीर रसात [ Veer Rasa ] उत्साह हा स्थायीभाव असतो. हा रस प्रामुख्याने पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग यांच्या वर्णनातून निर्माण होतो.

वीर रस उदारण :-

जिंकू किंवा मरू, भारतभूच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरु.


३] करुण रस म्हणजे काय ?

        करुण रसात [ Karun Rasa ] प्रामुख्याने दु:ख ही भावना जाणवते. शोक किंवा दुःख, वियोग, संकट आणि हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनातून करुण रस निर्माण झालेला दिसतो.

करुण रस उदारण :-

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी.

४] हास्य रस म्हणजे काय ?

        हास्य रस [ Hasy Rasa ] हा प्रामुख्याने विडंबन, चेष्टा, विसंगती ह्यातून निर्माण होणारा विनोद किंवा आनंद वर्णन केलेला असतो. हा रस विनोदी नाटकांतून्, विनोदी पुस्तकातून जाणवतो.

हास्य रस उदारण :-

परटा, येशिल कधी परतून?

५] रौद्र रस म्हणजे काय ?

        रौद्र रसाची [ Raudr Rasa ] निर्मिती अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून होतो.

रौद्र रस उदारण :-

'सह्यागिरीतील वनराजांनो या कुहरांतुनि आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे.'


६] भयानक रस म्हणजे काय ?

        भयानक रस [ Bhayanak Rasa ] भीती या भावनेतून निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, अपघात, आपत्ती, स्मशान इत्यादींच्या वर्णनातून भयानक रस [ Bhayanak Rasa ] आढळतो.

भयानक रस उदारण :-

त्या ओसाड माळावर, दाट सावलीच्या पिंपरणीखाली तो अगदी एकटा होता आणि रात्र अमावस्येची होती.


७] बीभत्स रस म्हणजे काय ?

        किळस, तिरस्कार या सारख्या वर्णनातून बीभत्स रसाची [ Bibhatsa Rasa ] निर्मिती होते.

बीभत्स रसाची उदारणार्थ :-

ही बोटे चघळीत काय बसले हे राम रे - लाळ ही!


८] अद्भुत रस म्हणजे काय ?

        अदभुत रसाचा [ Adbhut Rasa ] विस्मय हा स्थायीभाव असून प्रामुख्याने अलीबाबा आणि चाळीस चोर, अल्लाउद्दिन व जादूचा दिवा, अरेबियन नाईट्स, परीकथा अशा प्रकारच्या आश्चर्यकारक गोष्टींचे वर्णन अदभुत रस [ Adbhut Rasa ] आढळते.

अदभुत रस उदारण :-

यापरी नगरांतले मग सर्व उंदीर घेऊनी
ठाकता क्षणि गारुडी नदिच्या तिरावर येउनी;
घेती शिघ्र उड्या पटापट त्या नदीमधि उंदिर,
लोपला निमिषांत संचय तो जळांत भयंकर.


९] शांत रस म्हणजे काय ?

        शांत रसात [ Shant Rasa ] प्रामुख्याने परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांचे संगती पवित्र वातावरणाचे वर्णन आढळतो. हा रस भूपाळी, अभंग यात असतो.

शांत रस उदारण :-

आनंद न माय गगनी ! वैष्णवा नाचती रंगणी !




            आम्ही तुम्हाला येथे रस म्हणजे काय ? , रसाचे उदाहरण, रसाचे प्रकार ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला क्रियापदाच्या संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला रस व त्याचे प्रकार ( Types of Rasa in Marathi | Rasa and its types in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad