उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 10, 2023

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar

 उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार

Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar


उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार ( Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar ) :- 

            उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार ( Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार ( Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार ( Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार ( Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar ).


उभयान्वयी अव्यय

उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          जेव्हा दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य एखादया शब्दाने जोडले जाते त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय ( Ubhayanvayi Avyay ) असे म्हणतात.


उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत.

क्रउभयान्वयी अव्ययाचे प्रकार
प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय
गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय

प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे चार प्रकार

क्रप्रधानत्व सूचक उभायान्वयी अव्ययाचे प्रकार
समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय
न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय
विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय
परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय


गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे चार प्रकार

क्रगौणत्व सूचक उभायान्वयी अव्ययाचे प्रकार
स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय
कारण बोधक उभयान्वयी अव्यय
उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय
संकेत बोधक उभयान्वयी अव्यय


प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय

१) प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडणारी वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतील म्हणजेच दोन्ही वाक्य अर्थ दृष्ट्या स्वतंत्र, पूर्ण किंवा प्रधान असतील तर अशा उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
  • दोन्ही वाक्य प्रधान असतात.
  • हे एक प्रकारचे संयुक्त वाक्य असते.

प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार :-

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar

अ) समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय हे पहिल्या विधानात आणखी भर घालतात म्हणून त्यांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :- 
आणि, व, अन्, न, नि, शिवाय, आणखी, अधिक इ.

उदाहरण :-
१) तो उठून उभा राहिला आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
२) सकाळ झाली  पक्षी गाऊ लागले.
३) सेनापतीने इशारा केला अन् सैन्य शत्रूवर तुटून पडले.
४) त्याने काम केले नाही शिवाय तो पैसे मागू लागला.

ब) न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययात पहिल्या वाक्यात काही उणीव, दोष किंवा कमीपणा असल्याचे सुचवितात म्हणून त्यांना न्यूनत्व बोधक किंवा विरोध दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :- 
 पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु इ.

उदाहरण :-
१) सर्व मुले उत्तीर्ण झाली परंतु गुणवत्ता यादीत कोणीच नाही आली.
२) पारध्याने जाळे टाकले पण त्यात सावज अडकले नाही.
३) मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
४) मनाला थोडा त्रास होतो तरी त्याचे काही वाटत नाही.
५) ताईच्या पायाला थोडे लागले होते बाकी सर्व खुशाल आहे.

क) विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?
          विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये वाक्यात दोन्हीपैकी एक असा अर्थ सुचवितात त्या अव्ययाना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
          जर एखाद्या वाक्यात दोन विकल्प उभयान्वयी अव्यय दिले असतील त्याला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :- 
 अथवा, किंवा, वा, की इ.

उदाहरण :-
१) साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच.
२) विचार कर वा नाकर घडायचे ते घडणारच.
३) तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार.
४) तुला संपत्ती हवी की सुख हवे.
५) तुम्हाला प्रत्यक्षात भेटेल किंवा पत्राने कळवेल.


ड) परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असतो म्हणून त्यास परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :-
 म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, याकरिता इ.

उदाहरण :-
१) त्याची बस चुकली म्हणून त्याला उशीर झाला.
२) मला काल ताप आला सबब मी शाळेत काल गैरहजर राहिलो.
३) त्यांनी मला मारले याकरिता मी त्यांच्याशी बोलत नाही.
४) त्याने आपले आयुष्य खर्च केले तेव्हा त्याला हे वैभव प्राप्त झाले.



गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय

२) गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ?

          उभयान्वयी अव्ययांनी जोडणाऱ्या दोन वाक्यांपैकी एक प्रधान वाक्य व दुसरे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य असेल तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययांना गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
  • एक वाक्य प्रधान व दुसरे गौण वाक्य असते.
  • हे एक प्रकारचे मिश्र वाक्य आहे.

गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्ययाचे प्रकार :-

उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार | Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar

अ) स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचे स्वरूप गौणत्व वाक्यामुळे कळते म्हणून त्यास स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

स्वरूप दर्शक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :-
 म्हणजे, की, म्हणून, जे इ.

उदाहरण :-
१) बारा वस्तू म्हणजे एक डझन.
२) एक डझन म्हणजे बारा वस्तू.
३) एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस.
४) विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला.
५) तो उद्गारला की मी जिंकलो.
६) गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे.
७) विनंती अर्ज ऐसा जे..

ब) कारण बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          कारण बोधक उभयान्वयी अव्ययांमध्ये जोडलेली दोन वाक्य ही एका प्रधान वाक्याचे कारण हे दुसरे गौण वाक्य असते म्हणून त्यास कारण बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

कारण बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :-
 कारण, का, की इ.
 
उदाहरण :-
१) त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली.
२) धोनी सामनावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या.
३) मला माझ्या देशाविषयी अभिमान वाटतो कारण की ही माझी माय भूमी आहे.

क) उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          उद्देश्य बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शवले जाते म्हणून त्यास उद्देश बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

उद्देश बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :-
 म्हणून, सबब, यात्सव, कारण, की इ.
 
उदाहरण :-
१) नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला.
२) पहिला क्रमांक यावा यात्सव रमेशने खूप अभ्यास केला.
३) तप करता यावे म्हणून त्याने सन्यास घेतला.
४) शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो.

ड) संकेत बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

          संकेत बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये संकेत किंवा अट दाखवितात म्हणून त्यांना संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

संकेत बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येणारे शब्द :-
 जर...तर, जरी....तरी, जेव्हा.....तेव्हा, म्हणजे, की इ.

उदाहरण :-
१) जर प्रयत्न केला तर यश मिळेल.
२) जरी त्याच्या पायाला लागले तरी त्याने धावण्याची शर्यत जिंकली.
३) डॉक्टर झालास म्हणजे आमच्या आयुष्याचे सार्थक झाले.
४) तू इशारा केला की मी येईन.
५) त्याने मध्यस्थी केली तर भांडण मिटेल.
६) पास झालो की पेढे वाटेल.


सरावासाठी प्रश्न

खालील अधोरेखित शब्दाचे अव्यय ओळखा

१) मी वेळेवर गेलो म्हणून तो मला भेटला.
२) तो भेटला आणि चटकन निघून गेला.
३) देह जावो अथवा राहो.
४) बाका प्रसंग आलाच तर डगमगू नये.
५) तो इतका हसला की त्याचे पोट दुखू लागले.
६) पैसा आला की माणुसकी संपते.
७) तुला यायचे की नाही तूच ठरव.
८) डॉक्टर झालास म्हणजे आमच्या आयुष्याचे सार्थक झाले.
९) तप करता यावे म्हणून त्याने सन्यास घेतला.
१०) धोनी सामनावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या.
११) विक्रमादित्य म्हणून एक राजा होऊन गेला.
१२) मला काल ताप आला सबब मी शाळेत काल गैरहजर राहिलो.
१३) साथ मिळो अथवा न मिळो मी जाणारच.
१४) मरावे परी कीर्ती रुपी उरावे.
१५) त्याने काम केले नाही शिवाय तो पैसे मागू लागला.

          तुम्हाला उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार ( Ubhayanvayi Avyay V Tyache Prakar )  ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad