मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
Phrases in Marathi | Vakprachar in Marathi with Meaning
मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ ( Vakprachar in Marathi with Meaninig | Marathi Vakprachar | Phrases in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ ( Vakprachar in Marathi with Meaninig | Marathi Vakprachar | Phrases in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी मराठी वाक्प्रचार व त्याचे अर्थ ( Vakprachar in Marathi with Meaninig | Marathi Vakprachar | Phrases in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
चला तर मग आपण बघूया मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ ( Vakprachar in Marathi with Meaninig | Marathi Vakprachar | Phrases in Marathi ) .
वाक्यप्रचार म्हणजे काय ?
Vakprachar meaning in Marathi ?
वाक्यप्रचार :- वाक्यप्रचार म्हणजे काही शब्दसमूहांचा मराठी भाषेत वापर करताना त्यांचा नेहमीचा अर्थ न राहता, त्यांना दुसरा अर्थ प्राप्त होतो, त्यांना वाक्प्रचार ( Phrases in Marathi | Vakprachar in Marathi ) म्हणतात.
शब्दश: होणाऱ्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार ( Phrases in Marathi | Vakprachar in Marathi ) अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात. यालाच कोणी वाक्संप्रदाय असेही म्हणतात. वाक्प्रचार ( Phrases in Marathi | Vakprachar in Marathi ) म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.
मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
Vakprachar in Marathi with Meaninig
Marathi Vakprachar | Phrases in Marathi
अ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi with Meaninig )
अक्षता पडणे - विवाह उरकणे.
अन्न अन्न करणे - अन्नासाठी फिरणे.
अवतार संपणे - मारणे, स्थित्यंतर होणे.
अळवावरचे पाणी - क्षणभंगूर.
अमर होणे - कायमची कीर्ती प्राप्त होणे.
अनिमिषपणे पाहणे - टक लावून पाहणे.
अस्वस्थता शिगेला जाणे - अस्वस्थता पराकोटीला पोहोचणे.
हे पण पहा :- नाम
अग्निदिव्य करणे - प्राणांतिक संकटातून जाणे.
अति परिचयात अवज्ञा - एखाद्याच्या घरी सतत जाण्याने आपले महत्त्व कमी होणे.
अरेरावी करणे - मग्रुरीने वागणे.
अव्हेर करणे - दूर लोटणे.
अत्तराचे दिवे जाळणे - भरपूर उधळपट्टी करणे.
अद्वा तद्वा बोलणे - एखाद्याच्या मनाला लागेल असे बोलणे.
अन्नास जागणे - उपकार स्मरणे, उपकाराची जाणीव ठेवणे.
अनर्थ गुदरणे (ओढवणे) - भयंकर संकट येणे.
अनावर होणे - भावविवश होणे.
अन्नास मोताद होणे - उपासमार होणे, अन्न मिळण्यास कठीण होणे.
अवगत असणे - ठाऊक असणे.
अभय देणे - सुरक्षितपणाची हमी देणे.
अभिवादन करणे - वंदन करणे.
अर्पण करणे - वाहणे.
अनुग्रह करणे - उपकार करणे, कृपा करणे.
अवसान चढणे - स्फुरण चढणे.
अधःपात होणे - विनाश होणे.
अवलोकन करणे - निरीक्षण करणे, पाहणे.
अवकळा येणे - वाईट अवस्था येणे.
अडकित्यात धरणे - अडचणीत टाकणे.
अद्दल घडणे - शिक्षा मिळणे.
अक्षत देणे - बोलावणे.
अन्नावर तुटून पडणे - खूप भूक लागल्याने भराभर जेवणे.
अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.
अदृश्य होणे - लुप्त होणे, नाहीसे होणे.
अनुलक्षून असणे - एखाद्याला उद्देशून असणे.
अगतिक होणे - उपाय न चालणे, निरुपाय होणे.
अतिप्रसंग करणे - अयोग्य वर्तन करणे.
अनुमताने चालणे - संमतीने वागणे.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशानेच गर्व करणे.
अवदसा आठवणे - वाईट बुद्धी सुचणे.
अवगत होणे - प्राप्त होणे.
अवहेलना करणे - दुर्लक्ष करणे, अपमान करणे.
अवाक् होणे - स्तब्ध होणे.
अळम टळम करणे - टाळाटाळ करणे.
अपराध पोटात घालणे - क्षमा करणे.
अपाय करणे - नुकसान करणे.
अभंग राहणे - भंग न होणे.
अति तेथे माती होणे - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट होणे.
अक्कल पुढे करणे - बुद्धीचा भलताच उपयोग करणे.
अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीतून पार पडणे, प्राणांतिक संकटातून जाणे.
अकांड तांडव करणे - रागाने आदळआपट करणे.
अवलंब करणे - स्वीकार करणे, आधार घेणे.
अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजविणे.
अटीतटीने खेळणे - चुरशीने खेळणे.
अठरा विश्वे दारिद्र्य असणे - अतिशय गरिबी असणे.
अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे, मोठ्या अडचणीत सापडणे.
अडचणींचा डोंगर असणे - अनेक अडचणी येणे.
अवाक्षर न काढणे - एकही अक्षर न बोलणे.
अनुमती विचारणे - परवानगी मागणे.
आ पासून सुरु होणारे वाक्प्रचार ( Marathi Vakprachar )
आक्रोश करणे - शोक करणे.
आकाशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
आकर्षक असणे - मोह असणे.
आकृष्ट होणे - आकर्षित होणे.
आकाशमातीचे संवाद होणे - श्रेष्ठ कनिष्ठ एकत्र येणे.
आखाड्यात उतरणे - विरोधकांशी सामना देण्यास तयार होणे.
आगीत तेल ओतणे - अगोदर झालेल्या भांडणात भर घालणे, भांडण विकोपाला जाईल असे करणे.
आगीतून निघून फोफाट्यात जाणे - लहान संकटातून मोठ्या संकटात सापडणे.
आकाश कोसळणे - फार मोठे संकट येणे.
आभाळ कोसळणे - फार मोठे संकट येणे.
आकाश ठेंगणे होणे - अतिशय गर्व होणे, गर्वाने फार फुगून जाणे.
आकाश पाताळ एक करणे - आरडाओरड करुन गोंधळ घालणे.
आकाश फाटणे - चारही बाजूंनी संकटे येणे.
आघाडीवर असणे - मुख्य व महत्त्वाचे असे गणले जाणे, पुढे असणे.
आच लागणे - झळ लागणे.
आचरणात आणणे - अमलात आणणे.
आक्रमण करणे - हल्ला करणे.
आकांत करणे - आरडाओरड करणे.
आकाशाचा ठाव घेणे - असाध्य ते साध्य करण्याचा प्रयत्न करणे.
आर्जवे करणे - पुन्हा पुन्हा विनविणे.
आग पाडणे - चहाड्या सांगून नाशास कारण होणे.
आठवण ठेवणे - ध्यानात ठेवणे.
आठवणींना उजाळा देणे - जुन्या आठवणी पुन्हा येणे.
आहारी जाणे - पूर्णपणे स्वाधीन होणे.
आवृत्ती करणे - पुन्हा पुन्हा नाचणे, नाव झळकणे.
आडव्यात बोलणे - कोणतीही गोष्ट सरळपणे न बोलणे.
आधार देणे - सांभाळ करणे.
आनंदाने डोळे डबडबणे - डोळे आनंदाश्रृंनी भरून येणे.
आपल्या पोळीवर तूप ओढणे - साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.
आडवे होणे - निजणे.
आडून गोळी मारणे - स्वतः पुढाकार न घेता दुस-यांच्या हातून हवे ते काम करवून घेणे.
आत्मसात करणे - पूर्णपणे माहीत करून घेणे.
आत्मा जळणे - खूप दुःख होणे.
आदर सत्कार करणे - मान सन्मान करणे.
आभाळ पेलणे - अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
आपुलकी वाटणे - प्रेम व आस्था वाटणे.
आपत्याच पायावर घाव घालणे - स्वतःच आपले नुकसान करून घेणे.
आंधळ्याची माळ लावणे - विचार न करता जुन्या परंपरेनुसार वागणे.
आठवणींचा खंदक असणे - स्मरण शक्तीचा अभाव असणे.
आढेवेढे घेणे - एकदम तयार न होणे.
आण घेणे - शपथ घेणे.
आनंदाला पारावार न उरणे - अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
आनंद गगनात न मावणे - अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
आनंदाला सीमा न उरणे - अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
आनंदाला उधाण येणे - अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
आनंदाचे भरते येणे - अतिशय आनंद होणे, अमर्याद आनंद होणे.
आबाळ होणे - दुर्लक्ष होणे, हाल होणे.
आयत्या पिठावर रेषा (रेघोट्या) ओढणे - आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.
आयुष्य वेचणे - एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यभर झटणे.
आवळा देऊन कोहळा काढणे - स्वल्प (लहानशी) देणगी देऊन त्याच्या मोबदल्यात दुस-यांकडून मोठे कार्य करून घेणे.
आश्रय घेणे - मदत घेणे.
आश्चर्यचकित होणे - आश्चर्याने थक्क होणे.
आश्चर्याने तोंडात बोट घालणे - फार आश्चर्य वाटणे.
आवाज लागणे - प्रसंगाला साजेल असा आवाज गळ्यातून येणे.
आश्वासन देणे - कबूल करणे.
आमूलाग्र बदलणे - संपूर्णपणे बदलणे.
आळा घालणे - नियम लावून देणे, नियंत्रण ठेवणे.
आ वासणे - आश्चर्याने तोंड उघडणे.
आळोखे पिळोखे देणे - आळस झाडणे.
आळ घालणे - आरोप करणे.
आडवे येणे - अडवणे.
आवाज चढविणे - रागावून खूप मोठ्याने बोलणे.
आड येणे - अडथळा निर्माण करणे.
आहुती देणे - प्राण अर्पण करणे.
आस्वाद घेणे - आनंद लुटणे.
आव आणणे - खोटा अविर्भाव करणे, उसने अवसात आणणे.
आसमान ठेंगणे होणे - ताठ्याचा कळस होणे (स्वर्ग दोन बोटे उरणे).
हे पण पहा :- वाक्याचे प्रकार
इ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
इतिश्री करणे - शेवट करणे.
इमानास जागणे - इमान कायम ठेवणे.
इकडचे तोंड तिकडे करून टाकणे - अतिशय जोराने थोबाडात मारणे.
इंगा जिरणे - गर्व नाहीसे होणे, खोड मोडणे.
इंगा दाखविणे - धाक बसविणे, जरब बसविणे.
इहलोक सोडणे - मरणे.
इनमीन साडेतीन - थोडेसे, नगण्य.
इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे कार्य पार पाडणे.
इरेला पेटणे - इर्षेने खेळू लागणे.
इशारा देणे - सावधगिरीची सूचना देणे.
इन्कार करणे - नकार देणे.
इरेस पडणे - एखादी गोष्ट करण्याची जिद्द असणे.
इंगळ्या डसणे - मनाला झोंबणे, वेदना होणे.
उ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Phrases in Marathi )
उचल खाणे - एखादी गोष्ट करण्याची अनिवार इच्छा होणे.
उचल बांगडी करणे - जबरदस्तीने हलविणे.
उच्चाटन करणे - घालवून देणे, नष्ट करणे.
उच्छाद मांडणे - उपद्रव देणे.
उचंबळून येणे - भावना तीव्र होणे.
उजाड माळरान - ओसाड जमीन.
उठून दिसणे - शोभून दिसणे, नजरेत भरणे.
उत्तेजन देणे - पाठिंबा देणे.
उकळी फुटणे - खूप आनंद होणे.
उखळ पांढरे होणे - पांढरे होणे - खूप द्रव्य मिळणे.
उखाळ्या पाखाळ्या काढणे - एकमेकांचे उणेदुणे काढणे.
उघडा पडणे - खरे स्वरूप प्रकट होणे.
उतराई होणे - उपकार फेडणे.
उत्तीर्ण होणे - यशस्वी होणे.
उत्कंठा असणे - उत्सुक असणे.
उदक सोडणे - त्याग करणे.
उदरी शनी येणे - संपत्तीचा लाभ होणे.
उदास वाटणे - फार खिन्न वाटणे.
उद्धार करणे - प्रगती करणे.
उधाण येणे - चेव येणे, ओसंडून वाहणे, भरती येणे.
उजेड पडणे - मोठे कृत्य करणे.
उल्लेख करणे - उच्चार करणे, सांगणे.
उंटावरून शेळ्या हाकणे - मनापासून काम न करणे.
उध्वस्त होणे - नाश पावणे.
उधळून देणे - पसरून देणे.
उन्मळून पडणे - मुळासकट कोसळून पडणे.
उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.
उन्हाचा जाळ पेटणे - अतिशय कडक ऊन पडणे.
उद्योगात चूर होणे - कामात गुंग असणे, मग्न असणे.
उतू जाणे - कल्पनेपेक्षाही अधिक असणे.
उपासना करणे - पूजा करणे, आराधना करणे.
उभ्या उभ्या चक्कर टाकणे - सहज जाऊन पाहून येणे.
उरकून घेणे - पार पाडणे.
उराशी बाळगणे - अंतःकरणात जतन करून ठेवणे.
उरापोटावर बाळगणे - सांभाळ करणे.
उरस्फोड करणे - काळीज फाटेपर्यंत कष्ट करणे.
उरी फुटणे - अतिशय दुःख होणे.
उरकून घेणे - आटोपणे, संपवणे.
उलगडा होणे - अगदी स्पष्टपणे समजणे.
उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.
उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला काहीही मदत न करणे.
उसळी घेणे - जोराने वर येणे.
उसासा सोडणे - विश्वास सोडणे.
उपसर्ग होणे - त्रास होणे.
उपपादन करणे - बाजू मांडणे.
उपद्व्याप करणे - खूप त्रास सहन करणे.
उपदेशाचा डोस पाजणे - उपदेश करणे.
उंबरठा चढणे - प्रवेश करणे.
उबगणे - कंटाळा येणे.
उमाळा येणे - तीव्र इच्छा होणे.
ऊ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi with Meaninig )
ऊर दडपणे - अतिशय भीती वाटणे.
ऊर भरून येणे - भावना दाटून येणे.
ऊर बडवून घेणे - आक्रोश करणे.
ऊत येणे - अतिरेक होणे, चेव येणे.
ऊन खाली येणे - सायंकाळ होणे.
ऊर फाटणे - अतिशय दुःख होणे.
ऊस मळे फुलणे - ऊसमळे चांगले वाढीस लागणे.
ऊहापोह करणे - चर्चा करणे (उहापोह करणे).
ए पासून सुरु होणारे वाक्प्रचार ( Marathi Vakprachar )
एकमत होणे - सर्वांचा सारखा विचार असणे.
एकमेवाव्दितीय असणे - अतुलनीय व सर्वोत्कृष्ठ असणे.
एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात आणणे.
एकजीव होणे - पूर्णपणे मिसळून जाणे.
एकेरीवर येणे - भांडायला तयार होणे.
एखाद्या वस्तूवर डोळा असणे - एखादी वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा असणे.
एकटक पाहणे - स्थिर नजरेने पाहणे.
एका पायावर तयार असणे - फार उत्कंठीत होणे.
एकाग्रचित्त होणे - मन केंद्रित करणे.
एका वट्टात बोलणे - एका दमात बोलणे.
ओ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
ओढ लागणे - तीव्र इच्छा होणे.
ओढ घेणे - आकर्षण वाटणे.
ओली सुकी करणे - नाणे फेक करून निर्णय घेणे.
ओटीत घालणे - संगोपनासाठी दुस-यांच्या हवाली करणे.
ओवाळून टाकणे - तुच्छ समजून फेकून देणे.
ओस होणे - रिकामे होणे.
औ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Phrases in Marathi )
औषध नसणे - उपाय नसणे.
औषधालाही नसणे - अजिबात नसणे, मुळीच नसणे.
अं पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar )
अंगीकारणे - स्वीकारणे.
अंगाचा खुर्दा होणे - शरीराला त्रास होणे.
अंगावर घेणे - एखाद्या गोष्टीचा स्वीकार करणे.
अंगाचे पाणी पाणी होणे - घाम येणे.
अंगावर शेकणे - मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे.
अंगाचा तीळपापड होणे - अतिशय संताप येणे.
अंगाची लाही लाही होणे - क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे.
अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.
अंग चोरणे - अंग रारवून काम करणे.
अंग टाकणे - शरीराने कृश होणे, रोडावणे.
अंगावर रोमांच उभे राहणे - भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.
अंगावर काटा उभा राहणे - भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे.
अंगवळणी पडणे - सवय होणे.
हे पण पहा :- स्वर संधी
अंगावर मास नसणे - कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे.
अंग शहारून टाकणे - अंगावर रोमांच उभे राहणे.
अंग चोरून बसणे - अवघडून बसणे.
अंग मारून बसणे - अवघडून बसणे.
अंग मोडून काम करणे - खूप मेहनत करणे.
अंग काढून घेणे - अलिप्त राहणे, संबंध तोडणे.
अंगाचा भडका उडणे - क्रोधामुळे अंगाची आग आग होणे.
अंतर देणे - सोडून देणे, त्याग करणे.
अंग झाडून मोकळे होणे - संबंध तोडणे.
अंगात त्राण नसणे - अंगातील शक्ती नाहीशी होणे.
अंगाने चांगला आडवा असणे - सशक्त असणे.
अंगात कापरे सुटणे - भीतीने थरथरणे.
अंगावर धावून येणे - मारावयास येणे.
अंगावर तुटून पडणे - जोराचा हल्ला करणे.
अंतःकरण भरून येणे - हृदयात भावना दाटून येणे, भावनानी गहिवरून येणे.
अंतःकरणाला पाझर फुटणे - दया येणे.
अंतःकरण विरघळणे - दया येणे.
अंतःकरण तीळतीळ तुटणे - अतिशय वाईट वाटणे.
अंतःकरण विदीर्ण होणे - अतिशय दुःख होणे.
अंतःकरणाचा कोठा साफ असणे - मन स्वच्छ असणे.
अंतरीचा तळीराम गार होणे - इच्छा तृप्त होणे.
अंतर्मुख होणे - खोलवर विचार करणे.
अंतर्धान पावणे - नाहीसे होणे.
अंकित राहणे - गुलाम होणे, वश होणे.
अंत पाहणे - अखेरची मर्यादा येईपर्यंत थांबणे.
अंथरूण पाहून पाय पसरणे - ऐपतीच्या मानाने खर्च करणे.
अंमल बनावणी करणे - अंमलात आणणे.
हे पण पहा :- मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार
क पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
कलम होणे - पकडणे.
कसूर न करणे - आळस न करणे, चूक न करणे.
कब्जा घेणे - ताब्यात घेणे.
कळस होणे - चांगल्या किंवा वाईट गोष्टीचा अतिरेक होणे.
कस धरणे - सत्व निर्माण होणे.
करार मदार करणे - लेखी स्वरुपात निर्णय घेणे.
कळा पालटणे - स्वरूप बदलणे.
कढी पातळ होणे - दुखण्यामुळे जर्जर होणे.
कल्पांत करणे - मोठा कल्लोळ करणे.
कपाळाला आठ्या पडणे - नाराजी दिसणे.
कपाळी (भाळी) लिहिलेले नसणे - नशिबात नसणे.
कंबर कसणे (कंबर बांधणे) - हिंमत दाखविणे, तयार होणे.
कष्टाने विद्या करणे - परिश्रम करून विद्या संपादन करणे.
कपाळावर हात मारणे - दुःख होणे, निराश होणे.
कपाळावर हात लावणे - निराश होणे.
कःपदार्थ असणे - क्षुल्लक वाटणे.
कपाळाचे कातडे नेणे - सगळया जन्माचे मातेरे करणे.कपोतवृत्तीने वागणे - काटकसरीने वागणे.
कसोटीस उतरणे - अपेक्षित गोष्ट यशस्वीपणे करून दाखविणे.
करुणा भाकणे - विनविणे.
कबूल करणे - मान्य करणे.
कसाला लागणे - कसोटी पाहणे, एखाद्याची परीक्षा होणे.
कसास लावणे - कसोटी पाहणे, एखाद्याची परीक्षा होणे.
कंबर खचणे - धीर संपणे, धीर खचणे.
कळसास पोचणे - शेवटच्या टोकाला जाणे, पूर्णत्वाला पोहोचणे.
कळी उमलणे - चेहरा प्रफुल्लीत होणे.
कमाल करणे - मर्यादा वा सीमा गाठणे.
करणी करणे - चेटूक करणे.
कलुषित करणे - मलीन बनविणे, गढूळ करणे, एखाद्या विषयी वाईट मत करणे.
कळ लावणे - भांडण लावणे.
करकर दात चावणे - क्रोधाचा अविर्भाव करणे.
कल्ला फाडणे - गोंगाट करणे.
कसर काढणे - एकीकडे झालेली कमतरता दुसरीकडे भरून काढणे.
कष्टी होणे - खिन्न होणे, दुःखी होणे.
कवडीही हातास न लागणे - एका पैशाचीही प्राप्ती न होणे.
करंट येणे - झटका येणे, आवेश येणे.
कृत कृत्य होणे - धन्यता वाटणे.
का कू करणे - मागे पुढे पाहणे, काम करण्यास टाळाटाळ करणे.
काटा काढणे - दुःख देणारी गोष्ट काढून टाकणे, समूळ नाहीसे होणे.
काडीमोड करणे (देणे) - संबंध तोडणे.
काळझोप घेणे - मृत्यू येणे.
काट्याने काटा काढणे - एका शत्रूच्या सहाय्याने दुस-या शत्रूचा पराभव करणे.
काथ्याकूट करणे - व्यर्थ चर्चा करणे.
कापूस महाग होणे - कृश होणे.
कान उपटणे - चुकीबद्दल शिक्षा करणे.
काढण्या लावणे - दोरीने बांधणे.
कान टवकारून ऐकणे - अगदी लक्षपूर्वक ऐकणे.
कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.
कान धरणे - शासन करणे.
कानाचा चावा घेणे - कानात सांगणे.
कानी घालणे - सांगणे, लक्षात आणून देणे.
कान लांब होणे - ऐकण्यासाठी उत्सुक असणे, अक्कल कमी होणे (गाढवाचे कान?)
काखा वर करणे - आपल्या जवळ काही नाही असे दाखविणे, ऐनवेळी अंग काढून घेणे.
काळजाचे कोळसे होणे - मनाला अतिशय वेदना होणे.
काळीज फत्तराचे होणे - अंतःकरणातील दया, माया इ. कोमल भावना नाहीशा होणे.
काकण भर सरस ठरणे - थोडेसे जास्त वा अधिक असणे.
कागाळी करणे - तक्रार किंवा गा-हाणे करणे.
कान फुकणे / कान भरणे - चुगली करणे, चहाड्या करणे, मनात किल्मिश निर्माण करणे.
कान उघाडणी करणे - खरमरीत उपदेश करणे, कडक शब्दात चूक दाखवून देणे.
कानठळ्या बसणे - मोठा आवाज ऐकल्याने काही काळ काहीच ऐकू न येणे.
काना डोळा करणे - दुर्लक्ष करणे.
कानावर पडणे - सहजगत्या माहीत होणे, ऐकण्याचा योग येणे.
कानावर येणे - माहीत असणे, ऐकणे, कळणे.
काळे करणे - देशांतरास जाणे.
कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे, नकारात्मक भूमिका घेणे.
कानोसा घेणे - दूरवरचे लक्षपूर्वक ऐकणे, चाहूल घेणे.
कानीकपाळी ओरडणे - वारंवार बजावून सांगणे.
कास धरणे - आश्रय घेणे.
कानाशी लागणे - चहाड्या करणे.
कानाला खडा लावणे - पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे, धडा शिकणे.
कान टवकारणे - ऐकण्यास उत्सुक होणे.
काडी मोडून घेणे - विवाहसंबंध तोडून टाकणे.
कामगिरी पार पाडणे - सोपविण्यात आलेले काम पूर्ण करणे.
कामगिरी बजावणे - काम पार पडणे.
कानशील रंगविणे - मारणे.
कानशिलात देणे - मारणे.
कालवा कालव होणे - मनाची चलबिचल होणे.
काळीमा लागणे - कलंक लागणे, अपकीर्ती होणे.
कान फुटणे - ऐकू न येणे.
काट्याचा नायटा करणे - साधी गोष्ट वाईट थराला जाणे.
काट्याचा नायटा होणे - क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.
कामाला भिडणे - जोरात काम करू लागणे.
कानात घुमून राहणे - आठवणीत पक्के रुजून राहणे.
कायापालट होणे - पूर्णपणे स्वरूप बदलणे.
कावरा बावरा होणे - बावरणे, घाबरणे.
काळजाचे पाणी पाणी होणे - दुःखी होऊन धैर्य व उत्साह नाहीसा होणे, अतिशय घाबरणे.
काळाची पावले ओळखणे - बदलत्या परिस्थितीची भान असणे.
काळजाचा ठेवा असणे - अत्यंत आवडती गोष्ट असणे.
काळाच्या उदरात गडप होणे - नष्ट होणे.
कानामागे टाकणे - दुर्लक्ष करणे.
कानात मंत्र सांगणे - गुप्त रीतीने सल्लामसलत करणे.
कान टोचणे - एखादी गोष्ट समजावून सांगणे.
कानाने आवाज टिपणे - लक्षपूर्वक ऐकणे.
काळजाचा लचका तुटणे - अत्यंत दुःख होणे.
कागदी घोडे नाचविणे - ज्याच्या पासून काही लाभ होण्याजोगे नाही अशा लेखनाचा खटाटोप करणे.
काळे करणे - निघून जाणे.
कान किटणे - तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगून कंटाळा आणणे.
कणव येणे - दया येणे.
कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे, मोठी आपत्ती कोसळणे.
कपाळमोक्ष होणे - मरणे, नाश पावणे, डोके फुटून मृत्यू येणे.
कपाळ उठणे - कपाळ दुखू लागणे.
कपाळ ठरणे - नशिबात लिहिण्यासारखी एकादी गोष्ट घडणे.
कपाळ पांढरे होणे - वैधव्य येणे.
कच खाणे - माघार घेणे.
कणीक मऊ होणे - मार बसणे.
कट करणे - कारस्थान करणे.
कडुसे पडणे - सायंकाळ होणे.
कणीक तिंबणे - खूप मारणे.
कटाक्ष टाकणे - एक नजर टाकणे, नजर फिरविणे.
कपाळी येणे - नशीबी येणे.
कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, दुःखाचा आवेग येणे.
कंठस्नान घालणे - ठार मारणे, शिरच्छेद करणे.
कंठशोष करणे - ओरडून गळा सुकविणे, उगाच घसाफोड करणे.
कामास येणे - उपयोगी पडणे, लढाईत मारले जाणे.
काकदृष्टीने पाहणे - अतिशय बारकाईने पाहणे.
कासावीस होणे - व्याकूळ होणे.
कालवश होणे - मरण पावणे.
काडीने औषध लावणे - दुरून दुरून दुस-याचे उपयोगी पडणे.
काहूर माजणे - विचारांचा गोंधळ होणे.
किमया करणे - जादू करणे.
कित्ता गिरविणे - अनुकरण करणे.
किळस वाटणे - शिसारी वाटणे.
कोड पुरविणे - कौतुकाने हौस पुरविणे.
कोरड पडणे - सुकून जाणे.
कोंड्याचा मांडा करणे - काटकसरीने संसार करणे.
कोलाहल माजणे - आरडाओरड होणे.
कोप-यापासून हात जोडणे - संबंध न यावा अशी इच्छा करणे.
कोंडी फोडणे - वेढा तोडून बाहेर जाणे.
कोपर्याने खणणे - एखाद्याच्या चांगुलपणाचा फायदा घेणे.
कोंडमारा होणे - मन अस्वस्थ होणे.
कोंबडे झुंजविणे - दुस-यांचे भांडण लावून आपण मजा बघणे.
कोप-यात घेणे - एका टोकाला घेऊन कोंडी करणे.
कोणाचा पायपोस कोणाचे पायात नसणे - मोठा गोंधळ होणे.
कौशल्य पणास लावणे - अतिशय चतुराईने काम करणे.
कौतुक करणे - तारीफ करणे.
किल्ली फिरविणे - युक्तीने मन बदलणे.
किडून घोळ होणे - कीड लागल्यामुळे खराब होणे.
किंतु येणे - संशय वाटणे.
कीस काढणे - बारकाईने चर्चा करणे.
कुंपणाने शेत खाणे - विश्वासातील माणसाने फसविणे, रक्षणकर्त्याने भक्षण करणे.
कुत्र्याच्या मोलाने मरणे - मरताना माणूस म्हणून काहीही किंमत न राहणे.
कुर्बानी करणे - बलिदान करणे.
कुजत पडणे - आहे त्या स्थितिपेक्षा अधिक वाईट अवस्था प्राप्त होणे.
कुजबूज करणे - आपापसात हळूहळू बोलणे.
कुकारा घालणे - मोठ्याने हाक मारणे.
कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.
कुत्र्यासारखे मळा धरून पडणे - घरातील कटकटींना कंटाळून सारखे घराबाहेर राहणे.
कुरघोडी करणे - वर्चस्व स्थापित करणे.
कुंद होणे - उदास होणे.
कुरुक्षेत्र माजविणे - भांडण तंटे करणे.
कुणकुण लागणे - चाहूल लागणे.
कुरापत काढणे - भांडण उकरून काढणे.
कुस धन्य करणे - जन्म दिल्याबद्दल सार्थक वाटणे.
कूच करणे - पुढे जाणे, कामगिरीवर निघणे.
केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे.
केसालाही धक्का न लावणे - अजिबात त्रास न होणे.
केसांच्या अंबाड्या होणे - वृद्धावस्था येणे.
क्लेश पडणे - यातना सहन कराव्या लागणे.
कोणाच्या अध्यांत मध्यांत नसणे - कोणाच्या कामात विनाकारण भाग न घेणे.
कोंडीत पकडणे - पेचात सापडणे.
ख पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi with Meaninig )
खल करणे - करणे - खोलवर चर्चा करणे.
खबर नसणे - माहिम नसणे.
खस्ता स्थाणे - खूप कष्ट करणे.
खच्चून भरणे - पूर्णपणे भरणे.
खनपटीस बसणे - सारखे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.
खटू होणे - नाराज होणे.
खटपट करणे - प्रयत्न करणे.
खजील होणे - होणे - लाज वाटणे.
खडा पहारा होणे - काळजीपूर्वक करणे.
खडसून विचारणे - विचारणे - ताकीद देऊन विचारणे.
खंड नसणे - सतत चालू राहणे.
खंड पडणे - मध्येच काही काळ बंद असणे.
खच्चून जाणे - धीर सुटणे.
खर्ची पडणे - वापरावी लागणे.
खंत वाटणे - खेद वा दुःख वाटणे.
खडा टाकून पाहणे - अंदाज घेणे.
ख्याली-खुशाली विचारणे - हालहवाल विचारणे.
खो खो हसणे - हसू न आवरणे, जोर जोराने हसणे.
खोर्याने पैसे ओढणे - पुष्कळ पैसे मिळविणे.
खोड मोडणे - एखाद्याची वाईट सवय तीव्र उपायाने घालविणे.
खोड ठेवणे - दोष ठेवणे.
खरपूस ताकीद करणे - निक्षून सांगणे.
खडी ताजीम देणे - उभे राहून शिस्तीने मानवंदना देणे.
खरडपट्टी काढणे - रागावून बोलणे.
खड्यासारखा बाहेर पडणे - निरूपयोगी ठरून वगळला जाणे.
खसखस पिकणे - खूप हसणे.
खडे फोडणे - दूषण देणे.
खर्ची पडणे - लढाईत मृत्युमुखी पडणे.
खा खा सुटणे - खाण्याची एकसारखी इच्छा होणे, अधाशीपणाने खूप खात जाणे.
खिळवून ठेवणे - एकाच जागी स्थिर करून ठेवणे.
खिळखिळी होणे - मोडकळीला येणे.
खुट्ट होणे - अचानक बारीक आवाज होणे.
खुळे करणे - वेड लावणे.
खाल्ल्या मिठाला जागणे - उपकाराची जाणीव ठेवणे.
खाजवून खरुज काढणे - खरुज काढणे - मुद्दाम भांडण उकरून काढणे.
खांदा देऊन काम करणे - झटून काम करणे.
खापर फोडणे - दोष देणे.
खायला काळ अन् भुईत्या भार असणे - स्वतः काही ही काम नकरता दुस-यावर भार होऊन राहणे.
खायला उठणे - असह्य होणे.
खाल्ल्या घरचे वासे मोजणे - उपकार करणा-यांचे वाईट चिंतणे.
खार लागणे - झीज सोसावी लागणे.
खाईत पडणे - संकटात किंवा दुःखात पडणे.
खाऊन ढेकर देणे - गिळंकृत करणे.
खटाटोप चालविणे - प्रयत्न करणे.
खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे, पराभव करणे.
खळखळ करणे - हट्ट करणे.
खरवड काढणे - कान उघडणी करणे.
खूणगाठ बांधणे - पक्के ध्यानात ठेवणे.
खो घालणे - अडचण आणणे, विघ्न निर्माण करणे.
ग पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
गमजा करणे - हुशारी मारणे.
गृहीत धरणे - मनात निश्चित कल्पना करणे.
गराडा घालणे - वेढा घालणे, घेराव घालणे.
गटांगळ्या खाणे - नाकातोंडात पाणी जाऊन जीव घाबरा होणे.
गत्यंतर नसणे - नाईलाज असणे, दुसरा उपाय नसणे.
गंध नसणे - अजिबात माहीत नसणे.
गाणित पक्के बसणे - ठाम समजूत होणे.
गतप्राण होणे - मरणे.
गर्क असणे - गुंग असणे.
गर्क होणे - गढून जाणे.
गळ घालणे - आग्रह करणे.
गळ्यात पडणे - अतिशय आग्रह करणे.
गंगेत घोडे न्हाणे - एखादे मोठे काम पूर्ण होणे.
गहिवरून जाणे - दुःखाने कंठ दाटून येणे.
'ग' ची बाधा होणे - गर्व होणे.
गयावया करणे - दीनवाणी प्रार्थना करणे, विनवणी करणे.
गडप होणे - नाहीसे होणे.
गजर करणे - एकाच तालात सर्वांनी एकदम जयजयकार करणे.
गणना करणे - समाविष्ट करणे.
गढून जाणे - रंगून जाणे.
गंगार्पण करणे - कायमचे विसरणे.
गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे, भयभीत होणे.
घ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Phrases in Marathi )
घोळ घालणे - त्वरित निर्णय न घेता विचार करीत बसणे.
घोरपड येणे - संकट येणे.
घोरपडी सारखे चिकटणे - न थकता चिवटपणे काम करीत राहणे.
घाम न फुटणे - दया न येणे.
घर सुने सुने वाटणे - उदास वाटणे.
घर बुडविणे - सर्व कुलाचा घात करणे.
घर भरणे - फायदा करून घेणे.
घर बसणे - कुटुंबास विपत्ती येणे.
घडा भरणे - परिणाम भोगण्याची वेळ येणे.
घामाघूम होणे - खूप घाम येणे.
घायाळ करणे - जखमी करणे.
घर डोक्यावर घेणे - घरात अतिशय गोंगाट करणे.
घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे, सर्वस्वाचा अपहार करणे.
घडी भरणे - विनाशकाल जवळ येणे.
घात होणे - नाश होणे.
घालून पाडून बोलणे - दुस-याला लागेल असे बोलणे.
घोडे मारणे - नुकसान करणे.
घोडे मध्येच अडणे - प्रगतीत खंड पडणे.
घोषित करणे - जाहीर करणे.
घामाचे पाझर फुटणे - खूप घाम येणे.
घाम गाळणे - खूप कष्ट करणे.
घाट घालणे - बेत करणे.
घाव घालणे - प्रहार करणे.
घाला घालणे - हल्ला करणे.
घोडे थकणे - उद्योग धंदा मंदावणे.
घोडे दामटणे - उद्योग धंदा मंदावणे.
घोडे पुढे ढकलणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.
घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.
घोडा मैदान जवळ असणे - एखाच्या गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे.
घोर लागणे - काळजी निर्माण होणे.
घोटाळा होणे - गोंधळ होणे, गडबड होणे.
च पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
चहा असणे - आस्था असणे.
चकाय्या पिटणे - गप्पा-गोष्टी करणे.
चकार शब्द ही न काढणे - जराही न बोलणे.
चहा करणे - वाहवा करणे.
चन्हाट वळणे - कंटाळा आणण्याजोगी गोष्ट सांगणे.
चटणी उडविणे - नाश करणे.
चढवून ठेवणे - एखाद्याला वाजवीपेक्षा जास्त महत्व देणे.
चव्हाट्यावर आणणे - उघडकीस आणणे, जाहीर करणे.
चकित होणे - आश्चर्य वाटणे.
चकरा मारणे - फे-या मारणे.
चलबिचल सुरू होणे - अनिश्चिता निर्माण होणे.
चटका बसणे - फार दुःख होणे.
चालना देणे - प्रोत्साहन देणे.
चाहूल लागणे - माहीत होणे.
चाड असणे - जाणीव असणे.
चाड न वाटणे - जाणीव नसणे.
चढाओढ सुरू होणे - स्पर्धा लागणे.
चंदन करणे - नाश करणे.
चक्री गुंग होणे - अक्कल गुंग होणे.
चाहूल लागणे - हालचालीची जाणीव होणे.
चालून जाणे - हल्ला करणे.
चाकांवर पट्टा चढणे - वेग येणे
चारांचा पोशिंदा असणे - कर्ता पुरुष असणे
चार पैसे गाठीला बांधणे - थोडी फार बचत करणे
चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य असणे.
चालत्या गाड्याला खीळ घालणे - व्यवस्थित चाललेल्या कामात व्यत्यय येणे.
चित्त विचलित होणे - काय करावे ते न सुचणे.
चिरी मिरी घेणे - बक्षीस घेणे.
चिंताक्रांत बनणे - आत्यंतिक काळजी वाटणे.
चिमणीसारखे तोंड करणे - एवढेसे तोंड करणे.
चिटपाखरू नसणे - पूर्ण शांतता असणे.
चीज करणे - सार्थक करणे.
चांदी उडणे - त्रेघा उडणे.
चालना मिळणे - गती मिळणे.
चाळा लावणे - नाद लावणे.
चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे.
चार हात दूर असणे - एकाद्या गोष्टीपासून हेतू पुरस्सर दूर राहणे.
चिंता लागणे - काळजी वाटणे.
चिंतातूर होणे - अतिशय काळजी वाटणे.
चिरडून टाकणे - नाश करणे.
चित्त खेचून घेणे - मन आकर्षित करणे.
चित्रा सारखे स्तब्ध असणे - फार शांत असणे.
चेव चढणे - जोर चढणे.
चेहरा उजळणे - संकट टळल्यामुळे आनंदित होणे.
चेहरा आंबट करणे - नाराजी दर्शविणे.
चीतपट मारणे - पूर्ण पराभव करणे.
चुटपुट लागणे - मनास टोचणी लागणे, हुरहुर लागणे.
चुकल्या चुकल्यासारखे होणे - अस्वस्थता प्राप्त होणे.
चुणूक दाखविणे - झलक दाखविणे.
चुलीतून निघून वैलात पडणे - आगीतून निघून फोफाट्यात पडणे, लहान संकाटातून मोठ्या संकटात सापडणे.
चूल पेटणे - स्वयंपाक केला जाणे.
चूल खोळंबणे - उपवास पडणे.
चूर होणे - गढूत जाणे, बुडून जाणे.
चोराला सोडून संन्याशाला सुळी देणे - ख-या अपराध्यास सोडून निरपराधी व्यक्तीस शिक्षा करणे.
चौगडे अडणे - जयजयकार अथवा प्रशंसा होणे.
चौदावे रत्न दाखविणे - शिक्षा करणे, खूप मार देणे.
चौखुर उधळणे - स्वैर सुटणे.
चेहरा खुलणे - अतिशय आनंदित होणे.
चेहरा पालटणे - रंगरुप बदलणे.
चेहरा काळवंडणे - चिंतेने मन खिन्न होणे.
चेह-यावर चिंतेची काळजी पसरणे - काळजीने भरून जाणे.
चैन न पडणे - अस्वस्थ होणे.
चोहोंचा आकडा घालणे - प्रशस्तपणे मांडी घालून बसणे.
चोख बजावणे - अगदी बरोबर पार पाडणे.
चोरावर मोर होणे - वाईट गोष्टीच्या बाबतीत एखाद्यावर वरकडी करणे.
छ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi with Meaninig )
छात्र हरवणे - पोरके होणे.
छाती दडपणे - भीती वाटणे.
छाती न होणे - धीर न होणे, न धजणे, हिंमत न होणे.
छाती दाखवत बसणे - भीती न बाळगता बसणे.
छाती फुगणे - अभिमान वाटणे.
छक्के पंजे करणे - हात चलाखीने फसविणे.
छतीसाचा आकडा असणे - मतभेद असणे.
छाती आनंदाने फुलणे - खूप आनंद होऊन अभिमान वाटणे.
छाती करणे - धैर्य दाखविणे.
छातीत कालवायला लागणे - जीव कासावीस होणे.
छाप पडणे - मनावर खोल परिणाम होणे.
छेड काढणे - मुद्दाम चिडविणे.
छाती धडधडणे - खूप भीती वाटणे.
छातीला हात लावून सांगणे - खात्रीपूर्वक सांगणे.
छातीचा कोट करणे - प्राणपणाने संकटाशी मुकाबला करणे.
ज पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi with Meaninig )
जिवाचे रान करणे - अतिशय कष्ट करणे.
जिवाला जीव देणे - एखाद्यासाठी प्राण देण्याची तयारी असणे.
जिवावर उठणे - आत्यंतिक नुकसान करण्यास तयार होणे.
जिवात जीव येणे - काळजी नाहीशी होऊन पुन्हा धैर्य येणे, हायसे वाटणे.
जिवाची पर्वा न करणे - प्रत्यक्ष प्राणाचीही फिकीर न करणे.
जिवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार असणे.
जिवास खाणे - मनाला लागणे.
जिव्हारी लागणे - अतिशय वाईट वाटणे.
जिद्द असणे - ईर्षा असणे.
जन्माचे दारिद्रय फिटणे - गरिबी कायमची नाहीशी होणे.
जन्माचे सार्थक होणे - सफलता लाभणे.
जमीन अस्मानाचे अंतर (फरक) असणे - खूप मोठा फरक असणे.
जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.
जयजयकार करणे - आनंदाने जयघोष करणे, गुणगान करणे. (जयघोष करणे).
जय्यत तयारी करणे - अगदी पूर्ण तयारी करणे.
जन्माचे कल्याण करणे - कायमचे हित होणे.
जड पावलांनी निघणे - व्यथित होऊन निघणे.
जगजाहीर करणे - सर्वांना माहिती करणे.
जतन करून ठेवणे - काळजीपूर्वक सांभाळ करणे (जपून ठेवणे)
जखमेवर मीठ चोळणे - दुःखद स्थितीत अधिक भर घालणे.
जगातून उठणे - सर्वस्वी बुडणे.
जगणे जनावरांचे असणे - अत्यंत निकृष्ट प्रतीचे जीवन जगणे.
जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ जाणे.
जशास तसे असणे - तोडीस तोड असणे.
जगणे नकोसे होणे - जीव त्रासणे.
जमदग्नीचा अवतार असणे - अतिशय संतापणे.
जाळ्यात गोवणे - अडचणीत पकडणे.
जाब विचारणे - उत्तर विचारणे.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळणे - स्वतः अनुभवून सुखदुःख जाणणे.
जिभेस हाड नसणे - वाटेल तसे अमर्याद बोलणे, बेजबाबदारपणे बोलणे.
जिवाची तगमग होणे - बेचैन होणे, अस्वस्थ होणे.
जिवाचा कान करून ऐकणे - लक्षपूर्वक ऐकणे.
जेरीस आणणे - शरण यायला भाग पाडणे.
जेवणावर हात मारणे - भरपूर जेवणे.
जोडे फाटणे - खेटे घालणे.
जेर करणे - कैद करणे.
जो जो करणे - निजविणे.
जोखडात बांधणे - बंधनात बांधणे.
जोम येणे - शक्ती येणे.
जिवाचा धडा करणे - निश्चय करणे.
जिवाची उलाघाल होणे - जीव वालीवर होणे.
जिवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.
जिवाचा आटापिटा करणे - खूप धडपड करणे.
जिवाची मुंबई करणे - खूप चैन करणे.
जंगजंग पछाडणे - निरनिराळया रीतीने प्रयत्न करणे.
जगाचा निरोप घेणे - मरण पावणे.
जवळीक वाटणे - आपलेपणा वाटणे.
जवळ करणे - आपलेसे करणे.
जिवावर बेतणे - जीव धोक्यात येणे.
जिवापाड सांभाळणे - काळजीपूर्वक सांभाळणे.
जिवापाड श्रम करणे - अतिशय कष्ट करणे.
जिवात जीव घालणे - धैर्य देणे, काळजी नाहीशी होणे.
जिंदगी बस्तर होणे - जीवन नष्ट होणे.
जिभेला पाणी सुटणे - खाण्याची इच्छा होणे.
जिज्ञासा वाटणे - जाणून घेण्याची तीव्र इच्छा होणे.
जिवा पलीकडे जपणे - खूप काळाजी घेणे.
जिवावर येणे - नकोसे वाटणे.
जिवात जीव असणे - जिवंत असणे, शरीरात प्राण असणे.
जिवावर उड्या मारणे - दुस-यावर अवलंबून राहून चैन करणे.
जीव अधीर होणे - उतावीळ होणे.
जिवाचा हिय्या करणे - हिम्मत बांधणे.
जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.
जीव खाली पडणे - काळजीतून मुक्त होणे.
जीव खालीवर होणे - अतिशय काळजी वाटणे, अत्यंत अस्वस्थ वाटणे.
जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे, सर्वस्व अर्पण करणे.
जीव घेऊन पळणे - प्राणाच्या रक्षणासाठी पळणे.
जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे, अतिशय काळजी वाटणे.
जीव तीळतीळ तुरणे - एखाद्या गोष्टीसाठी तळमळणे, खूप हळहळ वाटणे.
जीव धोक्यात घालणे - संकटात उडी घेणे.
जीव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.
जीव असणे - प्रेम असणे.
जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे.
जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.
जीवदान देणे - वाचविणे.
जीवनज्योत विझणे - मरण पावणे, आयुष्य संपणे.
जीव पाण्यात पडणे - शांत होणे.
जीव ओतणे - मनापासून एखादे काम करणे.
जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.
ज्योत पेटवणे - भावना चेतावणे.
ज्योतीसम जीवन जगणे - हुतात्मे स्वतः नष्ट होतात व दुस-यांचे कल्याण साधतात तसे करणे.
जीव कासावीस होणे - जीव तळमळणे.
जीव लावणे - लळा लावणे.
जीवन सर्वस्व देणे - संपूर्ण आयुष्य अर्पण करणे.
जीव अर्धा होणे - भयभीत होणे.
जीव झाडामाडात असणे - झाडामाडाविषयी विलक्षण जिव्हाळा वाटणे.
जीव कानात गोळा करणे - सर्व शक्ती कानात केंद्रित करून ऐकणे.
जीव अधीर होणे - उतावीळ होणे.
जीव ओवाळून टाळणे - अतिशय प्रेम करणे.
जीव गोळा होणे - कासावीस होणे.
जीव नकोसा होणे - त्रासणे, कंटाळून जाणे.
जीव मुठीत घेणे - अंतःकरण धडधडत असणे.
जीभ लांब करून बोलणे - वरिष्ठांशी मर्यादेच्या बाहेर बोलणे.
जीभ चावणे (पाघळणे) - एखादी गोष्ट बोलायची नसताना बोलून जाणे.
झ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
झोप उडविणे - अस्वस्थ करुन सोडणे.
झोट धरणी होणे - मारामारी होणे.
झोप उडणे - अतिशय भयभीत होणे.
झुलत ठेवणे - काही निर्णय न घेता अडकवून ठेवणे.
झुंजूमुंजू होणे - उजाडणे.
झुंबड उडणे - खूप गर्दी व रेटारेटी होणे.
झुलू लागणे - लयीत तालावर डोलणे.
झडप घालणे - अचानक उडी मारणे.
झळ लागणे (पोहोचणे) - एखाद्या गोष्टीचा थोडाफार परिणाम भोगावा लागणे.
झटापट करणे - झगडणे.
झाडून नेणे - जवळ असलेले सर्व नेणे.
झिंग चढणे - नशा चढणे.
झक मारणे - मूर्खपणा करणे.
झक मारीत करणे - इच्छा असो नसो करणे.
झेप घेणे - काही अंतरावरून उडी टाकणे.
झेंडा फडकविणे - विजय मिळविणे.
झेंडा नाचविणे - मोठे कृत्य केले असे जाहीर करणे.
ट पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
टिवल्या बावल्या करणे - कसातरी वेळ घालविणे.
टुरटुर लावणे - थोडा वेळ कर्तृत्वाची ऐट मिरविणे.
टेकू देणे - पाठिंबा देणे.
टक्केटोणपे खाणे - ठेचा खाणे, चांगल्या वाईट अनुभवाने शहाणपण येणे.
ट, फ करणे - अक्षर ओळख होणे.
ट ला ट जुळविणे - अक्षराला अक्षर जुळविणे.
टकाटका पाहणे - एकासारखे लक्ष देऊन पाहणे.
टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.
टाके ढिले होणे - अतोनात श्रमामुळे कोणतेही काम करण्याची अंगी ताकद न राहणे.
टाकीचे घाव सोसणे - त्रास सहन करणे.
टेकीला येणे - दमणे, थकणे, त्रासून जाणे.
टेंभा पाजळणे - डौल मारणे.
टेंभा मिरविणे - दिमाख दाखविणे, ऐट दाखविणे.
टोमणा मारणे - मनाला लागेल असे बोलणे.
टाकून बोलणे - लागेल असे बोलणे.
टाळूवर मिया वाटणे - अंमल गाजविणे.
टाचा घासणे - चरफडणे.
टाप असणे - हिंमत असणे.
टक लावून पाहणे - बारीक नजरेने न्याहाळणे, एकसारखे रोखून पाहणे.
टकामका (टकमका) पाहणे - चकित होऊन पाहणे.
टंगळमंगळ करणे - काम टाळणे, कामचुकारपणा करणे.
ठ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Marathi Vakprachar )
ठाव घेणे - मनाची परीक्षा करणे.
ठपका देणे - दोष देणे.
ठाण मांडणे - निर्धाराने उभे राहणे, निश्चयपूर्वक स्थिर राहणे.
ठिय्या देणे - (एका जागेवरून) मुळीच न हलणे.
ठाणबंद करणे - एका जागेवर उभे करणे.
ड पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi )
डुबी देणे - पाण्यात खाली क्षणभर बुडविणे.
डोळे वटारणे (करणे) - डोळे मोठे करून रागाने पाहणे.
डोळे पांढरे होणे - अत्यंत घाबरणे, मरायला टेकणे.
डाव साधणे - संधीचा फायदा घेऊन इच्छित कार्य साधणे, योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.
डाळ शिजणे - दाद लागणे.
डाळ शिजू देणे - चालू देणे.
डागडुजी करणे - दुरुस्ती करणे.
डावे उजवे करणे - व्यवहार ज्ञान कळणे.
डुलत डुलत चालणे - आळसावलेल्या मनःस्थितीत हळूहळू चालणे.
डोळे फाटणे - आश्चर्यचकित होणे.
डोळे आनंदाने डबडबून जाणे - डोळयात आनंदाश्रू येणे.
डोळ्यात प्राण ठेवणे - अंतसमयी आतुरतेने वाट पाहणे.
डोळ्यावर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.
डोळे सिळून राहणे - एकसारखे एखाद्या गोष्टीकडे बघत राहणे.
डोळयात प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.
डोळे फाडून बघणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे, टक लावून पाहणे.
डोळे चढवून बोलणे - संतापाने बोलणे.
डबघाईला येणे - वाईट अवस्था येणे.
डल्ला मारणे - लुटणे.
डांगोरा पिटणे - जाहीर करणे.
डोळे निवणे - समाधान होणे.
डोळ्याचे पारणे फिटणे - एखादे दृश्य पाहून मनाचे समाधान होणे.
डोळा चुकविणे - भेट घेण्याचे टाळणे, हातोहात फसविणे.
डोळ्यात धूळ फेकणे - सहजा सहजी फसविणे.
डोळ्यात स्तुपणे (सलणे) - सहन न होणे.
डोळ्यास डोळा लागणे - झोप येणे.
डोळ्यात खून चढणे - त्वेश येणे.
डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे.
डोळे झाक करणे - दुर्लक्ष करणे.
डोळ्यात भरणे - पसंत पडणे.
डोळे फुटणे - आंधळे होणे.
डोळे ताणून पाहणे - लक्षपूर्वक पाहणे.
डोळे दिपविणे (दिपणे) - थक्क करून सोडणे, आश्चर्यचकित होणे.
डोळे पाणावणे - डोळ्यात पाणी येणे, डोळ्यात आनंदाश्रू येणे.
डोळ्यात प्राण येणे - मरायला टेकणे, अतिशय आतूर होणे.
डोळा लागणे - डुलकी लागणे, झोप लागणे.
डोळे उघडणे - अनुभवाने शहाणे होणे, सावध होणे, पश्चात्ताप होणे.
डोळे खडकन उघडणे - ताबडतोब खरे काय ते समजणे, जागे होणे.
डोळे भरून येणे - भावना दाटून आल्यामुळे डोळ्यात पाणी येणे.
डोळ्यात प्राण उरणे - अगदी मृत्यू पंथाला लागणे.
डोळ्यावर धूर येणे - संपत्ती वगैरे गोष्टीनी उन्माद येणे.
डोळ्याशी डोळा भिडविणे - नजर भिडविणे.
डोळा असणे - एखादी वस्तू मिळावी अशी इच्छा असणे.
डोक्यात घोळणे - एक सारखे मनात येणे.
डोळे फिरणे - गर्वाने ताठणे.
डोळे विस्फारून बघणे - आश्चर्याने बघणे.
डोळ्यात तेल घालून जपणे - अतिशय काळजी घेणे, दक्ष राहणे.
डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडणे - अतिशय राग येणे.
डोळे थंड होणे - समाधान होणे.
डोळे घालणे - खुणेने सुचविणे.
डोळ्यांत साठविणे - चौकशी करणे.
डोळे वाटेकडे लागणे - आतुरतेने वाट पाहणे.
डोळे मिटणे - मृत्यू येणे.
डोळ्यांच्या खाचा होणे - आंधळे होणे.
डोळ्यात गंगा यमुना येणे - रडू येणे, अश्रू ओघळणे.
डोक्यावरून पाणी जाणे - व्यर्थ जाणे.
डोक्यावर बसणे - वरचढ होणे.
डोईवर हात फिरविणे - फसविणे.
डोईवर शेकणे - नुकसान पोचणे.
डोंगर पोखरून उंदीर काढणे - मोठे प्रयास करून थोडी कार्यनिष्पत्ती होणे.
डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.
डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.
डोके वाजविणे - विचार करणे.
डोक्याला हात लावून बसणे - चिंताग्रस्त होऊन बसणे.
डोक्यावर बसविणे - लायकीपेक्षा अधिक मान देणे.
डोक्यावरचे खांद्यावर येणे - ओझे, कर्ज इ. हलके होणे.
डोके टेकणे - हताश होणे.
डोके सुन्न होणे - काही एक विचार न सुचणे.
डोक्यात थैमान घालणे - एकच विचार पुन्हा पुन्हा मनात येऊन मन अस्वस्थ होणे.
डोके वर काढणे - उदयास येणे.
डोके मारणे - शिरच्छेद करणे.
डोके बधीर होणे - काय करावे ते न सुचणे.
डोक्यावरून पाणी फिरणे - एखाद्या गोष्टीचा कळस होणे, परमावधी होणे.
डोईजड वाटणे - शिरजोर होणे, भारी असणे.
डोईवर हात ठेवणे - आशीर्वाद देणे.
ढ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Marathi Vakprachar )
ढसढसा रडणे - खूप रडणे.
ढोर कष्ट करणे - खूप कष्ट करणे.
ढवळाढवळ करणे - हस्तक्षेप करणे.
ढुंकून पाहणे - मुद्दाम डोके वळवून पाहणे.
त पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Vakprachar in Marathi with Meaninig )
तोंड सांडणे - अमर्याद बोलणे.
तोंडाचे बोळके होणे - तोंडातले दात पडणे.
तोंडावर तुकडा टाकणे - गप्प बसावे म्हणून थोडेसे काही देणे.
तोंडावर हात फिरविणे - गोड बोलून फसविणे.
तोंड धरणे - बोलण्याची मनाई करणे.
तोंड दिसणे - बोलणारा वाईट ठरणे.
तोंड दाबणे - उलट बोलू न देणे.
तोंड घालणे - दोघांच्या संभाषणात तिस-याने बोलू लागणे.
तोंड पहात बसणे - विवंचनेत पडणे.
तोंड वाजविणे - बडबडणे.
तोंड करणे - रागावणे.
तटस्थ राहणे - अलिप्त राहणे, आश्चर्याने स्तब्ध होणे.
तडीस नेणे (जाणे) - यशस्वी रीतीने एखादे काम पूर्ण करणे.
तहान भूक विसरणे - तन्मय होणे, तल्लीन होणे.
तळ देऊन बसणे - सैन्याचा मुक्काम देणे.
तडाखा देणे - प्रहार करणे, आघात करणे.
तळ देणे - मुक्काम करणे.
तलवार गाजवणे - पराक्रम करणे.
तळहाताच्या फोडासारखे वागविणे - काळजीपूर्वक सांभाळणे.
तळीराम गार करणे - जवळ द्रव्य जमवून मनाची तृप्ती करणे.
तरातरा चालणे - भरभर चालणे.
तडास्थ्यापासून सुटणे - तावडीतून सुटणे.
तत्वज्ञान लंगडे पडणे - कोणताही विचार लंगडा (अपुरा) वाटणे.
तळी भरणे - मदत करणे.
तमा न वाटणे - पर्वा न वाटणे. (तमा नसणे)
तळी उचलणे - अनेकजण मिळून एखाद्याला अधिकारच्युत करणे.
तदाकार होणे - एकरुप होणे.
तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे, गडबड उडणे.
ताणून देणे - निवांत झोपणे.
तावडीत सापडणे - कचाट्यात सापडणे.
तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे - मिळालेल्या संधीचा फायदा उठविणे.
तिष्ठत बसणे - वाट पहात बसणे.
तिलांजली देणे - वस्तूवरचा हक्क सोडणे.
तिखटमीठ लावून सांगणे - अतिशयोक्ती करून सांगणे.
तिरपीट उडणे - गोंधळून जाणे.
तिळपापड होणे - अंगाचा संताप होणे.
तुटून पडणे - निकाराचा हल्ला करणे, जोराने कामास लागणे.
तुणतुणे वाजवणे - क्षुल्लक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत सुटणे.
तुच्छ लेखणे - हलके मानणे, कमी मानणे.
तुच्छतेने पाहणे - तिरस्काराने पाहणे.
तूट येणे - नुकसान होणे.
तेळपट येणे - नाश होणे.
त्रेधा तिरपीट उडणे - धांदल उडणे.
त्रेधा उडणे - हाल होणे.
तोरा मिरविणे - दिमाख दाखविणे.
तोलास तोल देणे - बरोबरी करणे.
तोफ डागणे - रागावून खूप बोलणे, तोफेतून गोळे सोडणे.
तोल सुटणे - ताबा सुटणे.
तोफेच्या तोंडी देणे - संकाटात लोटणे.
तोड नसणे - उपाय नसणे.
तोडगा काढणे - मार्ग शोधून काढणे. (तोड काढणे)
तोंड टाकणे - वाटेल ते बोलणे.
तोंड गोड करणे - आनंद व्यक्त करण्यासाठी गोड पदार्थ खायला देणे.
तोंड शिवणे (मूग गिळून गप्प) - गप्प राहणे, काही न बोलणे.
तोंड देणे - सामना करणे, झुंजणे.
तोंडात काही न राहणे - माहीत असलेली गोष्ट मनात ठेवता न येणे.
तोंडाचा पट्टा सुरु करणे - एक सारखे बोलत राहणे.
तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे, भयभीत होणे.
तोंडाची वाफ दवडणे - निष्फळ बोलणे.
तोंडात बोट घालणे - आश्चर्य वाटणे, अश्चर्यचकित होणे.
तोंडाला पाने पुसणे - चांगलेच फसविणे, दगा देणे.
तोंडाला पाणी सुटणे - हाव निर्माण होणे, लोभ उत्पन्न होणे.
तोंडावाटे ब्र न काढणे - एक ही शब्द न उच्चारणे.
तोंड लागणे - युद्धास सुरुवात होणे.
तोंड सोडणे - अपशब्द बोलणे, वाटेल तसे बोलणे.
तोंडाला कुलूप लावणे - एकदम गप्प बसणे.
तोंडात शेण घालणे - समाजात छिःथू होणे, फजिती होणे.
तोंडावर येणे - अगदी जवळ येणे.
तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे, नाहीसे होणे.
तोंडाला मिठी बसणे - वीट येणे, कंटाळा येणे.
तोंड गोरेमोरे होणे - ओशाळणे.
तोंड चुकविणे - तोंड लपविणे.
तोंडी लागणे - उलट उत्तर देणे.
तोंडी खीळ पडणे - तोंड बंद होणे.
तोंडास तोंड लागणे - भांडणाला सुरवात करणे.
तोंड फिरविणे - नाराजी प्रकट करणे.
तोंड दाबून बुक्क्यांचा मार - मुकाय्याने दुःख सहन करणे.
तोंड आवरणे - गप्प बसणे.
तोंडावाटे ब्र काढण्याची चोरी असणे - एकही शब्द उच्चारण्याची सोय नसणे.
तोंडावर सांगणे - समक्ष सांगणे.
तोंडास तोंड देणे - प्रत्युत्तर करून भांडण वाढविणे.
तोंड सुख घेणे - यथेच्छ बोलणे.
तोंड सुरु होणे - बोलणे सुरू होणे.
ताव चढणे - जोर चढणे, राग येणे.
तावडीतून सुटणे - कचाट्यातून सुटणे.
ताळमेळ नसणे - एका गोष्टीचा दुस-या गोष्टीशी काहीही संबंध नसणे.
ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.
ताटाखालचे मांजर होणे - अंकित जाणे, लाचार होणे.
ताल (ताळ) सोडणे - घरबंद नसणे.
तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.
तहान लागली की विहीर खणणे - गरज लागली की धावाधाव करणे.
तळहातावर शीर घेणे - जिवाची पर्वा न करता लढणे, जिवावर उदार होणे.
तंबी देणे - धाक घालणे, दटावणे.
तोंडघशी पाडणे - फशी पडणे, जाळ्यात अडकणे, विश्वासघात करणे.
तोंड उतरणे - तोंड निस्तेज दिसणे.
तोंड उजळ करणे - कलंक काढून टाकणे, कीर्ती मिळविणे.
तोंड आंबट करणे - निराशेमुळे तोंड वाईट करणे.
तोंड पसरणे - याचना करणे.
तोंड पूजा करणे - खोटी स्तुती करणे.
ताकाला जाऊन भांडे लपविणे - एखाद्या गोष्टीबद्दल इच्छा असूनही लज्जेने ती इच्छा नाही असे
दाखविणे.
तारे तोडणे - वेड्यासारखे भाषण करणे.
तार छेडली जाणे - भावना उत्कटपणे जागृत होणे.
तांडवनृत्य करणे - थयथयाट करणे. ताप देणे - त्रास देणे.
ताबूत थंडे होणे - आवेश ओसरणे.
थ पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Marathi Vakprachar )
थोपवून धरणे - थांबवून ठेवणे.
थोबाड रंगविणे - तोंडात मारणे.
थंडा फराळ करणे - काही न खाता राहणे.
थांग न लागणे - कल्पना न येणे.
थोतांड निर्माण करणे - लबाडीने खोट्या गोष्टी करणे.
थोबाड फोडणे - तोंडात मारणे.
थुंकी झेलणे - हांजी हांजी करणे, सुशामत करणे.
थयथय नाचणे - अधीरपणे नाचणे.
थक्क होणे - आश्चर्य वाटणे, चकित होणे.
थेर करणे - वाईट गोष्ट करणे.
थैमान घालणे - आरडाओरड करणे.
द पासून सुरु होणारे वाक्यप्रचार ( Marathi Vakprachar )
दगडाखाली हात सापडणे - अडचणीत सापडणे.
दाद न देणे - पूर्णपणे दुर्लक्ष करणे, न जुमानणे.
दाद लागणे - न्याय मिळणे.
दाद लावून घेणे - न्याय मिळविणे.
दबा धरून बसणे - एखादी गोष्ट अनपक्षित रीतीने पार पाडण्यासाठी टपून बसणे, आड लपून बसणे.
दरबार बरखास्त करणे - दरबार संपविणे.
दणाणून जाणे - व्यापून जाणे, भरून जाणे.
दृष्ट लागणे - नजर लागणे.
दृग्गोचर होणे - दिसणे.
दवंडी पिटणे - जाहीर करणे.
दृष्टीआड होणे - नजरे आड होणे, दुर्लक्षित होणे.
दृष्टीभेट होणे - एकमेकाकडे पाहणे.
दगाबाजी करणे - विश्वासघात करणे.
दृष्टीच्या टप्प्याय येणे - दिसू शकेल इतके जवळ येणे.
दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर होणे, अचानक उपस्थित होणे.
दम न निघणे - अतिशय आतुर होणे.
दशा होणे - स्थिती होणे.
दंडवत घालणे - नमस्कार घालणे.
दरारा वाटणे - जरब वाटणे.
दगा देणे - फसविणे.
दृष्टीत न मावणे - अपेक्षेपेक्षा खूप मोठे जाणवणे.
दृष्टीला दृष्टी भिडविणे - टक लावून पाहणे.
दडी मारणे - लपून बसणे.
दम धरणे - धीर धरणे.
दम मारणे - झुरका घेणे, एखाद्यावर रागावणे.
दृष्टी खिळून राहणे - नजर स्थिर होणे.
दातास दात लावून बसणे - काही न खाता उपाशी बसणे.
दाताच्या कण्या करणे - अनेकवेळा विनंती करून सांगणे.
दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे, अभिमान सोडून शरण जाणे.
द्राविडी प्राणायाम करणे - सरळ मार्ग सोडून लांबच्या मार्गाने जाणे.
दातओठ खाणे - रागाने चरफडने.
दाद मागणे - तक्रार करून किंवा गा-हाणे सांगून न्याय मागणे.
दातखिळी (दातखीळ) बसणे - बेशुध्ध होणे, तोंड उघडता न येणे, गप्प राहणे, स्तूप घाबरणे.
दात धरणे - वैर बाळगणे, व्देश करणे.
दाढी धरणे - विनवणी करणे.
दात कोरून पोट भरणे - मोठ्या व्यवहारात कृपणपणाने थोडीशी काटकसर करणे.
दुःखावर डागण्या देणे - दुःखी माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखीन दुःख देणे.
दुकान काढणे - दुकान सुरू करणे.
दुस-यांच्या ओंजळीने पाणी पिणे - दुस-यांच्या तंत्राने चालणे.
दुःखाची छाया पसरणे - सगळीकडे दुःखी वातावरण निर्माण होणे.
दुवा देणे - एखाद्याचे भले व्हावे असे मनापासून चिंतणे.
दुसरी गती नसणे - दुसरा उपाय नसणे.
दादाबाबा करणे - गोड बोलून मन वळविणे.
दाणे टाकून कोंबडे झुंजविणे - पदरचे खचून भांडण लावून देणे.
दाद देणे - प्रतिसाद देणे.
दात काढणे - हसणे.
दातावर मांस नसणे - द्रव्यानुकूलता नसणे.
दाताच्या घुगया होणे - फार बोलावे लागणे.
दाताच्या कण्या होणे - एखाद्या गोष्टीमुळे त्रास होणे.
दात विचकणे - याचना करणे.
दात वासून पडणे - दुखण्याने अंथरूणाला खिळून राहणे.
दात खाणे - द्वेषाचा अविर्भाव दाखविणे.
दात पाडणे - वादात पराजय करणे.
दावणीला बांधणे - ताब्यात ठेवणे.
दामटी भरणे - दुखवस्ता होणे.
दिवस फिरणे - वाईट दिवस येणे.
दिवस पालटणे - चांगले दिवस येणे.
दिग्विजय करणे - स्वतःच्या पराक्रमाने चारी दिशातील लोकांना जिंकणे.
दिङ्मूढ होणे - काय करावे ते न सुचणे.
दिरंगाई करणे - उशीर करणे.
दिवे लावणे - दुलौकिक संपादन करणे.
दिवसा मशाल लावणे - पैशाची उधळपट्टी करणे.
दिवे ओवाळणे - कमी किमतीचा समजणे.
दिव्यत्वचा साक्षत्कार होणे - देवी अनुभव येणे.
दिव्य करणे - लोकोत्तर गोष्ट करणे.
दीनवाणे होणे - काकुळतीला येणे.
दीक्षा घेणे - एखादी आचार पद्धती स्वीकरणे.
दुधात साखर पडणे - अधिक चांगले घडणे.
देहभान विसरणे - स्वतःची जाणीव न राहणे.
दैना उडणे - दुर्दशा होणे.
दोन हात करणे - सामना देणे, मारामारी करणे.
दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.
दुर्दशा होणे - अत्यंत वाईट अवस्था होणे.
दुस-यांच्या तोंडाकडे बघणे - दुस-यांच्या आश्रयाची अपेक्षा करणे.
दुधाचे बळ पणाला लावणे - आईला धन्य वाटणे.
दुरावा निर्माण करणे - अंतर निर्माण करणे.
दुधाचे दात जाऊन पक्के दात येणे - बालपण संपून कुमार अवस्था येणे.
दुरान्वघे संबंध नसणे - कुठत्याही अर्थाने संबंध नसणे.
दुखणे विकोपास जाणे - आजार खूप वाढणे.
दूर लाथाडणे - तिरस्कार करणे.
देवाघरी निघून जाणे - निधन पावणे.
देखभाल करणे - काळजी घेणे.
देश पेटणे - एखादी चळवळ देशभर पसरणे.
देव्हा-यात बसविणे - एखाद्या व्यक्तीस देव समजून पूजा करणे.
देव देव-यात नसणे - जो मालक तो स्थानावर नसणे, फिकिरीत असणे.
आम्ही तुम्हाला येथे वाक्प्रचार अर्थ म्हणजे काय ? , वाक्प्रचाराचे उदाहरण, वाक्प्रचार व त्याचे अर्थ ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला वाक्प्रचारा संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ ( Vakprachar in Marathi with Meaninig | Marathi Vakprachar | Phrases in Marathi | Vakprachar Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box