वाक्याचे प्रकार | Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi | Marathi Vakyache Prakar - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 10, 2023

वाक्याचे प्रकार | Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi | Marathi Vakyache Prakar

वाक्याचे प्रकार

Vakyache prakar in Marathi with example

Types of sentences in Marathi

Vakyanche Prakar Marathi

वाक्याचे प्रकार | Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi

वाक्याचे प्रकार | Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi ) :- 

            वाक्याचे प्रकार ( Vakyache prakar in Marathi with example ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला वाक्याचे प्रकार (  Vakyanche Prakar Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी वाक्याचे प्रकार ( Types of sentences in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया वाक्याचे प्रकार ( Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi ).



वाक्य म्हणजे काय ?

            ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तरच त्यास वाक्य ( Vaky ) असे म्हणतात.
            पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजेच वाक्य ( Vaky ) होय.

वाक्य उदाहरण :-
  • माझे नाव सुयश आहे.
  • मला आंबा आवडतो.
  • केशव उत्तम गातो.
  • मी शाळेत जातो.
  • मी जेवण करतो.
  • मला फिरायला आवडते.
  • सुनिता उत्तम स्वयंपाक करते.
  • राहुलचे अक्षर छान आहे.
  • सुयश उत्तम नृत्य करतो.
  • चोर चोरी करून पळाला. 

मराठी वाक्याचे प्रकार | Marathi Vakyache Prakar

वाक्याचे प्रकार | Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi

वाक्याचे तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.

वाक्याचे प्रकार

क्रवाक्याचे प्रकार
वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून
वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने
वाक्याच्या विधानावर आधारित


१ ] वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून चार प्रकार आहेत.

        [ Vakyache prakar in Marathi with example ]

वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.

वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावरून तीन प्रकार

क्रवाक्याचे प्रकार
स्वार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
विध्यर्थी वाक्य
संकेतार्थी वाक्य


अ ] स्वार्थी वाक्य :- 

            वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास स्वार्थी वाक्य ( Swarthi Vaky ) असे म्हणतात.

स्वार्थी वाक्य उदाहरण :- 

१) गौतम झोपी गेला. 
२) रमेश शाळेत जातो.
३) शाळेची सहल जाणार आहे.
४) माझा दादा क्रिकेटपटू होणार.
५) सप्टेंबर महिण्यात माझा वाढदिवस आहे.
६) रणजीत मुंबईला जाणार आहे.
७) सुनिता जेवण केले.
८) यंदा गावची जत्रा आहे.
९) माझी शाळा जून मध्ये सुरु होणार.
१०) पुढच्या वर्षी साबळे गुरुजी निवृत्त होणार.

ब ] आज्ञार्थी वाक्य :- 

            वाक्यातील क्रियापदावरून बोलणाऱ्याचा हेतू, आज्ञा, विनंती, आशीर्वाद, उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्य ( Aadnyarthi Vaky ) असे म्हणतात.

आज्ञार्थी वाक्य उदाहरण :-

१) मुलांनो, नियमितपणे अभ्यास करा. (आज्ञा)
२) देवा, आम्हाला चांगली बुद्धी दे. (प्रार्थना)
३) देव तुमचे भले करो. (आशीर्वाद)
४) शुभम, कृपया मला पुस्तक दे. (विनंती)
५) बाबा, कृपया मला दहा रुपये द्या. (विनंती)

क ] विध्यर्थी वाक्य :-

            वाक्यातील क्रियापद आवरून बोलणाऱ्याचा हेतू, कर्तव्य किंवा इच्छा व्यक्त होत असेल तर त्या वाक्याला विध्यर्थी वाक्य ( Vidhyarthi Vaky ) असे म्हणतात.

विध्यर्थी वाक्य उदाहरण :-

१) सर्व विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल.
२) भारताचा संघ वर्ल्ड कप जिंकेल.
३) तूच हे गाणे गाऊ शकशील.
४) तूच मला या संकटातून बाहेर काढशील.

ड ] संकेतार्थी वाक्य :- 

          वाक्यातील क्रियापदावरून जेव्हा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून असल्याचा बोध होतो तेव्हा त्यास संकेतार्थी वाक्य ( Sanketarthi Vaky ) असे म्हणतात. 
               अशा वाक्यांमध्ये अट घातलेली असते.

संकेतार्थी वाक्य उदाहरण :-

१) जर काम केले तर भाकरी मिळेल.
२) रोपे लावली तर सावली मिळेल.
३) जर तू कष्ट केले तरच तुला यश मिळेल.
४) अभ्यास चांगला केला तर तुम्हाला जरूर शिष्यवृत्ती मिळेल.


२ ] वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने पाच प्रकार आहेत. 

[ Types of sentences in Marathi ]

वाक्याचे अर्थाच्या दृष्टीने पाच प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे.

वाक्याचे अर्थाच्या दृष्टीने पाच प्रकार

क्रवाक्याचे प्रकार
विधानार्थी वाक्य
प्रश्नार्थक वाक्य
उद्गारार्थी वाक्य
होकारार्थी वाक्य
नकारार्थी वाक्य 

अ ] विधानार्थी वाक्य :-

            ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य ( Vidhanarthi Vaky ) असे म्हणतात. 
            अशा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व शेवटी पूर्णविराम असतो. कोणतेही माहिती सांगणारे वाक्य विधानार्थी वाक्य असते.

विधानार्थी वाक्य उदाहरण :-

१) गुरुजी रजेवर गेले.
२) माझे बाबा नाशिकला गेले.
३) मी इयत्ता बारावीत शिकतो.
४) आमची शाळा डोंगराच्या पायथ्याशी आहे.
५) आमच्या गावात महाडपंथीय शंकराचे मंदिर आहे.

ब ] प्रश्नार्थक वाक्य :-

            ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य ( Prashnarthak Vaky ) असे म्हणतात. 
            जर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तरच त्याला प्रश्नार्थक वाक्य समजावे.

प्रश्नार्थक वाक्य उदाहरण :-

१) तुझे नाव काय आहे?
२) हा कागद कोणी फाडला?
३) माझी वही कोणी घेतली?
४) सर्वात मोठा ग्रह कोणता?
५) तुमचे उपकार मी कसे विसरेन?

क ] उद्गारार्थी वाक्य :-

            ज्या वाक्यात भावनेचा उदगार काढलेला असतो, त्यास उद्गारार्थी वाक्य ( Udgararthi Vaky ) असे म्हणतात. 
            अशा वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते.

उद्गारार्थी वाक्य उदाहरण :-

१) बापरे ! केवढा मोठा प्राणी!
२) दादा गेले! अरेरे! खूपच वाईट झाले!
३) शाब्बास ! छान काम केलंस.
४) वाह! खूप मोठे आहे.
५) अबब! केवढा मोठा साप हा!

ड ] होकारार्थी वाक्य :-

            ज्या वाक्यातून होकार दर्शविला जातो, त्यास होकारदर्शक किंवा करणरूपी वाक्य ( Hokararthi Vaky / karanrupi Vaky ) म्हणतात.

होकारार्थी वाक्य उदाहरण :- 

१) सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे.
२) विनोद नेहमी खरे बोलतो.
३) सोनम आज गावाला जाणार आहे.
४) आमची शाळा फार सुंदर आहे.
५) सुयश हुशार मुलगा आहे.

इ ] नकारार्थी वाक्य :- 

         ज्या वाक्यातून नकार दर्शविलेला असतो, त्यास नकारदर्शक किंवा अकरणरूपी वाक्य ( Nakararthi Vaky / Akaranrupi Vaky ) म्हणतात. 
            अशा वाक्यामध्ये नाही, नको, नये, न अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केलेला असतो.

नकारार्थी वाक्य उदाहरण :- 

१) कधीही खोटे बोलू नये.
२) दुसऱ्याची निंदा करू नये.
३) विशाल घाण करू नकोस.
४) मला सतत अभ्यास करायला सांगू नका.
५) मी आज जेवणार नाही.


३ ] वाक्याच्या विधानावर आधारित तीन प्रकार आहेत.

[ Vakyanche Prakar Marathi ]

वाक्याच्या विधानावर आधारित तीन प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे आहेत.

वाक्याच्या विधानावर आधारित तीन प्रकार

क्रवाक्याचे प्रकार
केवल वाक्य
संयुक्त वाक्य
मिश्र वाक्य 

अ ] केवल वाक्य :- 

            ज्या वाक्यात एकच उद्दिष्ट व एकच विधेय असते, त्या वाक्यास केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य ( Keval Vaky / Shudha Vaky ) असे म्हणतात. 
            अशा प्रकारच्या वाक्यात एकच मुख्य क्रिया असते.

केवल वाक्य उदाहरण :- 

१) सुर्या रोज पूर्वेला उगवतो.
२) मधु पुस्तक वाचतो.
३) गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले.
४) मी बाजारात जाऊन भाजी आणतो.
५) निमंत्रण देऊनही तो आला नाही.
६) उद्या सुट्टी मिळाल्यावर, मी गावाला जाईल.
७) गौतम नियमित खेळाचा सराव करतो.

ब ] संयुक्त वाक्य :-

            जेव्हा दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा अशा वाक्यांना संयुक्त वाक्य ( Sayukt Vaky ) असे म्हणतात.

संयुक्त वाक्य उदाहरण :-

१) पाऊस आला आणि मोर नाचू लागला.
२) देह जावो अथवा राहो.
३) तो चांगला धावला पण नशिबाने साथ दिली नाही.
४) तो आजारी होता म्हणून त्याला यायला उशीर झाला.
५) बाबा कामावरून घरी येतात आणि अभ्यास घेतात

क ] मिश्र वाक्य :-

            जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला मिश्र वाक्य ( Mishr Vaky) असे म्हणतात.

मिश्र वाक्य उदाहरण :-

१) माझा विश्वास आहे की मी नक्की पास होईल.
२) त्याचे डोळे लाल झाले कारण की तो उन्हात फिरला.
३) शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो.
४) जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल.
५) जर पाऊस पडला तर चांगले पीक येईल.
६) तू चांगला अभ्यास केलास तर पास होशील.


          तुम्हाला वाक्याचे प्रकार | Vakyache prakar in Marathi with example | Types of sentences in Marathi | Vakyanche Prakar Marathi | Marathi Vakyache Prakar ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad