मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 6, 2023

मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh

मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार

Viram Chinh In Marathi

Punctuation Marks in Marathi

मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh

मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh :-

            जेव्हा आपल्या बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते तेव्हा तेथे आपल्याला विराम चिन्हांचा (Viram Chinh in Marathi | Punctuation Marks in Marathi) वापर करावा लागतो. आपल्याला कोठे किती थांबावे, कोणत्या शब्दाला जास्त महत्व द्यायचे कोणत्या शब्दाला कमी महत्व द्यायचे हे सर्व आपल्याला लिहिताना हे ध्यानात येण्यासाठी ह्या विशिष्ट चिन्हांनचा वापरतात करतात त्यालाच विराम चिन्हे (Viram Chinh | Punctuation Marks) असे म्हणतात. विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो. 
            विराम चिन्हांचा (Viram Chinh | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh ) वापर आपण आपल्या भावना, विचार, मत समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे समजावे म्हणून वापरतो. विरामचिन्हे हा भाग व्याकरनाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे कारण स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यावर हमखास प्रश्न येत असतात. त्यामुळे या विराम चिन्हांचा ( Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi) अभ्यास करणे आवश्यक आहे.


मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh :-

मराठी भाषेत मुख्य नऊ प्रकारची विरामचिन्हे असून ती पुढीलप्रमाणे आहेत.

०१ पूर्णविराम - (Full Stop )

०२ अर्धविराम - Semi Colon

०३ स्वल्पविराम - Comma

०४ अपूर्णविराम - Colon

०५ प्रश्नचिन्ह - Question Mark

०६ उद्गारवाचक चिन्ह - Exclamation Marks

०७ संयोगचिन्ह - Coincidence Marks

०८ अपसरणचिन्ह - Subtraction mark

०९ अवतरणचिन्ह - Quotation Marks

        अ] एकेरी अवतरणचिन्ह
        A] Single Inverted Comma

        ब] दुहेरी अवतरणचिन्ह
        B] Double Inverted Comma



विरामचिन्ह व त्यांच्या प्रकारांना ( Viram Chinh In Marathi | Punctuation Marks in Marathi ) बद्दल सविस्तर माहिती आता आपण बघणार आहोत.

१] पूर्णविराम ( . ) (Full Stop) (Purn Viram Chinh) :-

वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाले असे दर्शवण्यासाठी पूर्णविराम (Full Stop) हे चिन्ह वापरतात. तसेच पूर्ण नावाला संक्षिप्त रुपात लिहिण्यासाठी देखील पूर्णविराम (Full Stop) या चिन्हाचा वापर केला जातो. पूर्ण विराम देण्यासाठी (Full Stop) पुढील चिन्ह ( . ) वापरतात.

उदाहरण :-
१] माझे स्वप्न पूर्ण झाले.
२] सुयाशने सायकल आणली.
३] पियुषला पैसे सापडले.
४] माझे नाव मंदार आहे.
५] वि.दा.सावरकर ( विनायक दामोदर सावरकर )
६] गो. कृ. गोखले ( गोपाळ कृष्ण गोखले )
७] वि.स. खांडेकर ( विष्णू सखाराम खांडेकर )
८] प्र.के.घाणेकर ( प्रफुल्ल केशवराव घाणेकर )




२] अर्धविराम ( ; ) (Semi Colon) (Ardh Viram Chinh) :-

जेव्हा आपल्याला दोन छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते. अर्धविरामसाठी (Semi Colon) पुढील चिन्ह ( ; ) वापरले जाते.

उदाहरण :-
१] त्याची बस चुकली; म्हणून त्याला उशीर झाला.
२] नोकरी मिळावी; म्हणून तो शहरात आला.
३] शरीर सुदृढ व्हावे; म्हणून मी व्यायाम करतो
४] त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.
५] 'मी डॉक्टर झालो असतो; परंतु मला चांगले मार्क मिळाले नाही.
६] मी खूप पैसा मिळवला; पण तेवढाच खर्च देखील केला.
७] आकाशात काळे ढग दाटून आले; पण पाऊसच पडत नाही.
८] मी बरा व्हावा; म्हणून देवाची प्रार्थना करते.

३] स्वल्पविराम ( , ) (Comma) (Swalp Viram Chinh) :-

जेव्हा आपल्याला वाक्यात थोडसे थांबून वाक्य पूर्ण करायचे असते तसेच एकाच विभागातील अनेक शब्द वाक्यात सलग आल्यास ते शेवटचे दोन शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी स्वल्पविराम (Comma) चिन्ह वापरतात तर शेवटच्या दोन शब्दांमध्ये व किंवा आणि हे शब्द वापरतात. एखाद्याला हाक मारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे स्वल्पविराम (Comma) चिन्ह वापरतात. स्वल्पविरामसाठी (Comma) पुढील चिन्ह ( , ) वापरतात.

उदाहरण :-
१] सुयश, बाहेर खेळायला जा.
२] नाशिक, जळगाव, धुळे, परभणी, ठाणे आणि नंदुरबार हे महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत.
३] मला आंबा, चिकू, केळी व सफरचंद ही फळे आवडतात.
४] दिवाळीत करंज्या, शंकरपाळ्या, चकल्या, चिवडा, लाडू असे पदार्थ करतात.
५] आंब्याला मोहर आला की, त्याचा घमघमट सर्वत्र पसरतो.
६] खूप पाऊस पडला की, शाळेला सुट्टी मिळते.
७] झाडांपासून आपल्याला फळे, फुले, सावली व शुद्ध हवा मिळते.
८] इतिहासाच्या साधनांचे भौतिक, लिखित व मौखिक अशा तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले.



४] अपूर्णविराम ( : ) ( Colon) ( Apurn Viram Chinh)

जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी अपूर्णविराम ( Colon) चिन्ह वापरतात. अपूर्णविरामसाठी ( Colon) पुढील चिन्ह ( : ) वापरतात. अपूर्णविराम ( Colon) हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही ते स्वतंत्र लिहतात.

उदाहरण :-
१] गटातील वेगळा शब्द निवडून लिहा : स्मारके, नाणी, लेणी, कथा.
२] संकल्पना स्पष्ट करा : संघराज्य
३] न्यायचे तीन प्रकार : १) सामाजीक न्याय २)आर्थिक न्याय ३) राजकीय न्याय
४] ऋतूंचे मुख्य तीन प्रकार : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा.
५] संसदेचे दोन सदन : लोकसभा व राज्यसभा
६] पुढील क्रमाकाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली : २,५,७,८,९,११,२६


हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार

५] प्रश्नचिन्ह ( ? ) ( Question Mark) (Prashn Chinh)

एखाद्या वाक्यात प्रश्न विचारला असेल तर तेथे प्रश्नचिन्ह ( Question Mark) वापरतात. प्रश्नचिन्ह ( Question Mark) वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. प्रश्नचिन्हसाठी ( Question Mark) पुढील चिन्ह ( ? ) वापरतात.

उदाहरण :-
१) भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
२) तुझ्या शाळेचे नाव काय आहे?
३) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
४] संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
५] तुझा आवडता खेळ कोणता?
६] भारताच्या राजमुद्रेत कोणते चिन्ह आहे?
७] भारताची राजधानी कोणती?
८] आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक रन काढणारा खेळाडू कोण?



६] उद्गारवाचक चिन्ह ( ! ) (Exclamation Marks) ( Udgarvachak Viram Chinh):-

ज्यावेळी वाक्यात व्यक्तीला आपल्या मनातील भावना ( राग, द्वेष, दुख, आनंद, भीती, आश्चर्य, घृणा इ.) दर्शवायच्या असतात तेव्हा उद्गारवाचक चिन्ह (Exclamation Marks) त्या वाक्यात वापरले जाते. उद्गारवाचक चिन्ह (Exclamation Marks) हे भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. अनेकदा एकापाठोपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता देखील दर्शवली जाते. उद्गारवाचक चिन्ह साठी (Exclamation Marks) पुढील चिन्ह ( ! ) वापरतात.

उदाहरण :-
१] बापरे! किती मोठा हा अजगर!
२] पण बेटे मन स्वस्थ राहीना!
३] अबब! किती उंच डोंगर हा!
४] अरेरे! फार वाईट झाले हे!
५] शी! काय हे कपडे तुझे!
६] वा! काय धमाल उडवली त्याने!
७] छेः! मी तसे म्हणालोच नाही.
८] 'हाय-हाय'! मोठा विषप्रयोग आहे हा!


७] संयोग चिन्ह ( - ) (Hyphen) (Sanyog Viram Chinh):-

संयोग चिन्ह (Hyphen) याचा उपयोग वाक्यातील दोन शब्द जोडतांना किंवा परस्पर संबंधी शब्द लिहितांना केला जातो. तसेच कालावधी दाखविण्यासाठी, तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी, ' ते ' अथवा ' किंवा ' अशा अर्थाने विग्रह चिन्ह म्हणून देखील वापर केला जातो. सहसा जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. संयोग चिन्ह साठी (Hyphen) पुढील चिन्ह ( - ) वापरतात.

उदाहरण :-
१] नदी-नाले पाण्याने भरून राहतात.
२] पती-पत्नी हे एकमेकांचे आयुष्यभर सोबती असतात.
३] राम-कृष्ण याचे प्रमे अमर आहे.
४] गंगा-यमुना या नद्या मला फार आवडतात.
५] सर्वांनी मैदानात ५-६ या वेळेत उपस्थित राहावे. ( ५ ते ६)
६] राजू जातांना ३-४ दगड घेऊन जा. ( ३ किंवा ४)
७] महात्मा गांधीजी यांचा जीवनकाळ १८६९-१९४८ ( १८६९ ते १९४८)
८] आज दिनांक २१-०९-२०२१ आहे.



८] अपसरणचिन्ह / निर्देशक चिह्न ( — ) (Dash) (Apsran / Nirdeshak Chinh)

अपसरणचिन्ह / निर्देशक चिह्न (Dash) हे एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी खुलाशाच्या अगोदर वापरतात. अपसरणचिन्ह / निर्देशक चिह्न (Dash) चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते.

उदाहरण :-
१] राजू तेथे गेला, पण —
२] ती स्री—जिच्या डाव्या हातावर तीळ आहे.
३] अनुज — ज्याचा सर्वात शेवटी जन्मलेला असा तो
४] एकेश्वरी — एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे
५] र्‍हस्व स्वर — ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो असे स्वर.

हे पण पहा :- आलंकारिक शब्द

९] अवतरण चिन्ह (Quotation Marks / Inverted Comma) (Avtarn Chinh)

अवतरण चिन्हाचे पुढील दोन प्रकार पडतात.

अ] एकेरी अवतरणचिन्ह (‘…’) (Quotation Marks / Single Inverted Comma) (Ekeri Avtarn Chinh):-

एकेरी अवतरणचिन्ह (‘…’) याचा उपयोग एखाद्या शब्दावर विशेष जोर देण्यासाठी केला जातो. एकेरी अवतरणचिन्ह (Quotation Marks / Single Inverted Comma) साठी हे पुढील चिन्ह (‘…’) वापरतात.

उदाहरण :-
१] लोक एकमेकांना 'शुभ दीपावली' ची भेटकार्ड पाठवतात.
२] माझ्या शाळेचे नाव 'साने गुरुजी ज्ञानमंदिर' असे आहे.
३] आज आपण 'एक तरी झाड लावा व झाडे जगवा,' हा मंत्र शिकूया.
४] शहजीराजांना 'स्वराज्य संकल्पक' असे म्हणतात.
५] 'जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले'
६] 'कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी'
७] वस्तू आणि वास्तू किवा त्याचे अवशेष यांना 'भौतिक साधने' असे म्हणतात.
८] छत्रपती संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा ग्रंथ लिहिला.


ब] दुहेरी अवतरण चिन्ह (“…”) (Quotation Marks / Double Inverted Comma) (Duheri Chinh):-

जेव्हा बोललेले वाक्य जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल तेव्हा वाक्यात दुहेरी अवतरण चिन्हचा उपयोग केला जातो. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते. दुहेरी अवतरणचिन्हसाठी (Quotation Marks / Double Inverted Comma) पुढील चिन्ह (“…”) वापरतात.

उदाहरण :-
१] सुयश म्हणाला,"मला लाडू फार आवडतात".
२] "माझे आजोबा थोर पुरुष होते." असे रावबा म्हणाला.
३] "अस्स होय!" म्हणत गुरुजी पुढे निघून गेले.
४] बाबांनी घरातून हाक मारली,"राम, अरे राम."
५] रोहित म्हणाला,"गाव आले. आता मला जाऊद्या."
६] डॉक्टर म्हणाले, " अरे, यात कसले उपकार."
७] सतीशने विचारले, "कोण ओरडत आहे?"
८] सीता म्हणाली,"दादा, आता तूच ही घाण उचल."


💥 विराम चिन्हांन व्यतिरिक्त लेखनात इतरही काही चिन्हे वापरली जातात त्यांच्यापैकी काही चिन्हे पुढीलप्रमाणे आहे.

१] काकपद ( ^ ) ( Kakpad)

आपण लेखन करत असतांना एखादा शब्द लिहायचा विसरला तर तो ओळीच्या वर लिहून तो शब्द ज्या ठिकाणी हवा त्या जागी काकपद हे चिन्ह दिले जाते. काकपद साठी पुढील चिन्ह ( ^ ) वापरतात.

उदाहरण :-
          स्वप्न
१] माझे ^ पूर्ण झाले.
                 मूर्ख
२] तुम्ही एक ^ माणूस आहांत.
                                      'बुधभूषण'
३] छत्रपती संभाजी महाराजांनी ^ हा ग्रंथ लिहिला.
              राजमुद्रेत
४] भारताच्या ^ कोणते चिन्ह आहे?
                                                घमघमट
५] आंब्याला मोहर आला की, त्याचा ^ सर्वत्र पसरतो.
                पैसे
६] पियुषला ^ सापडले.
                          प्रेम
७] राम-कृष्ण याचे ^ अमर आहे.
                        विषप्रयोग
८] 'हाय-हाय'! मोठा ^ आहे हा!



२] विकल्प चिन्ह ( / ) (Vikalp Chinh)

विकल्प दर्शविण्यासाठी अथवा 'किंवा' या शब्दाऐवजी विकल्प चिन्ह वापरतात. विकल्प चिन्ह दाखवण्यासाठी पुढील चिन्ह ( | ) वापरतात.

उदाहरण :-
१] प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.
२[ परीक्षेस येतांना निळ्या / काळ्या शाहीचा पेन आणावा.
३] विद्यार्थ्यांनी कबड्डी / खो-खो खेळ निवडावा.
४[ माझी आई मला सकाळी दुध / चहा देते.
५] बाबा मला वाढदिवसाला सायकल / संगणक भेट देणार आहे.


हे पण पहा :-शब्दांच्या शक्ती

३] जास्तीचा काना ( | )

पूर्वीच्या काळी साहेब या शब्दाचे संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना दिला जात असे. जास्तीचा काना दाखवण्यासाठी पुढील चिन्ह ( | ) वापरतात.

उदाहरण :-
१] 'रावसाहेब' साठी रावसोा
२] 'आप्पासाहेब' साठी आप्पासोा
३] 'तात्यासाहेब' साठी तात्यासोा


४] घातांकासारखे चिन्ह :-

जेव्हा 'संदर्भ अंक' ग्रंथात किंवा पुस्तकांत खुलासे परिशिष्टात केले असतील तर जितके खुलासे असतील त्यांना क्रमाने नंबर दिले जातात. ते शब्दाच्यापुढे घातांकासारखे लिहिले जातात..

उदाहरण :-
नचिकेत²
वज्रबाहू³ 


५] एकेरी व दुहेरी खंजीर' चिन्ह (†)(‡)

ज्यावेळी मजकुरातल्या एखाद्या शब्दाचे किंवा वाक्याचे स्पष्टीकरण आपल्याला पानाच्या तळाशी द्यायचे असते, तेव्हा त्या शब्दाला लागून 'एकेरी खंजीर' (†) हे चिन्ह वापरता येते. तसेच जर एकापेक्षा अधिक खुलासे द्यायचे असतील तर दुहेरी खंजीराचा (‡) वापर करता येतो.


६] परिच्छेद चिन्ह / पिलक्रो ( ¶ )

परिच्छेद चिन्हाचा वापर परिच्छेद चिन्ह ( ¶ ) दार्शविण्यासाठी केला जातो.


          तुम्हाला मराठी विराम चिन्हे व त्यांचे प्रकार | Viram Chinh In Marathi | Punctuation Mark in Marathi | Marathi Punctuation Mark | Marathi Viram Chinh ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad