जगातील सर्वात मोठे कुटुंब कोणते?
World Biggest Family
आज जग २१ व्या शतकात आहे आपण प्रगती पण करतो आहे पण आपले कुटुंब मात्र छोटे होत चालले आहे. कारण आताच्या महागाईच्या कळात कोणालाही ते झेपवणारे नाही. चार सदस्यांवाले कुटुंब देखील फार कमी वेळ सोबत राहतात तर विचार करा मोठ्या परिवाराचे काय होत असेल. आपण आता तुमच्या प्रश्नाकडे येऊ की जगातील सर्वात मोठे कुटुंब कोणते? आज मी तुम्हाला अशाच एका १८१ सदस्य असणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाची ओळख करून देणार आहे.
भारतातील उत्तर - पूर्व भागातील मिजोराम राज्यातील बकत्वांग (Baktwang) या गावात असेच एक १८१ सदस्य असलेले कुटुंब राहते. श्री. जिवोना चाना हे या कुटुंबाचे प्रमुख आहेत.
श्री. जिवोना चाना |
श्री. जिवोना चाना यांच्या कुटुंबात ३९ पत्नी, ९४ मुले, १४ सुना , ३३ नातू आणि १ पंतू असे १८१ सदस्य असतात.
श्री. जिवोना चाना परिवार |
असे म्हटले जाते की ते जर फुटबॉल खेळायला गेले तर त्यांचे एकूण १६ संघ तयार होतात.
श्री. जिवोना चाना यांचे घर |
एवढ्या मोठ्या कुटुंबाचा स्वयंपाक देखील तसाच असतो त्यांच्या स्वयंपाक खोलीत साधारणतः प्रतिदिन १०० किलो तांदूळ, ६० किलो बटाटे, ३९ चिकन बनवतात. हे तर लहान कुटुंबाचे साधारण ४ ते ५ महिण्याच जेवण असेल.
सर्व कुटुंब खूप आनंदाने राहते व घरातील सर्वच सदस्य काम करतात पुरुष मंडळी कारपेंटर चे काम करतात व वर्कशॉप पण सांभाळतात व स्रीया शेतीची कामे करतात.
हे सगळ ऐकल्यावर तुम्हाला आता नाही विचारव लागणार की जगातील सर्वात मोठे कुटुंब कोणते?
आजही भारतात एकत्र कुटुंब पद्धतीला महत्व दिले जाते. एकत्र कुटुंब पद्धती हेच तर खऱ्या भारताचे वैशिष्ट आहे.
तुम्हाला जगातील सर्वात मोठे कुटुंब कोणते? World Biggest Family ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box