YOGA ASANAS
YOGASANA POSES
योगासन व त्याचे प्रकार व फायदे
योगासन म्हणजे काय?
योगासन व त्याचे प्रकार | Yoga Asanas Names
क्र योगासने Yogasane १ हलासन Halasana २ पवनमुक्तासन Pawanmuktasana ३ पश्चिमोत्तासन Paschimottasana ४ सर्वांगासन Sarvangasana ५ चक्रासन Chakrasana ६ नौकासन Naukasana ७ आकर्णधनुरासन Aakrndhanurasan ८ पादअंगुष्ठ /
नससर्पासन Padangushtha Asan /
Nasasarpasan ९ बद्धपद्मासन Badhapdmasan १० हस्तपादासन Hastpadasan ११ ताडासन Tadasan १२ शीर्षासन Shirshasan १३ भुजंगासन Bhujangasan १४ बकासन Bakasan १५ पर्वतासन Parvtasan
क्र | योगासने | Yogasane |
---|---|---|
१ | हलासन | Halasana |
२ | पवनमुक्तासन | Pawanmuktasana |
३ | पश्चिमोत्तासन | Paschimottasana |
४ | सर्वांगासन | Sarvangasana |
५ | चक्रासन | Chakrasana |
६ | नौकासन | Naukasana |
७ | आकर्णधनुरासन | Aakrndhanurasan |
८ | पादअंगुष्ठ / नससर्पासन | Padangushtha Asan / Nasasarpasan |
९ | बद्धपद्मासन | Badhapdmasan |
१० | हस्तपादासन | Hastpadasan |
११ | ताडासन | Tadasan |
१२ | शीर्षासन | Shirshasan |
१३ | भुजंगासन | Bhujangasan |
१४ | बकासन | Bakasan |
१५ | पर्वतासन | Parvtasan |
योगासन त्याचे प्रकार व फायदे
[ Yogasanas and their types in Marathi ]
१] हलासन (Halasana):-
हलासनाची कृती :-
१] प्रथम जमिनीवर पाठ ठेवून सरळ झोपावे.
२] दोन्ही पाय एकमेकांना जुळवूनच ठेवावेत.
३] दोन्ही हात कंबरेला चिकटवून सरळ ताठ ठेवावेत.
४] दोन्ही हात उचलून डोक्याच्या वर कानाला लावून सरळ ताठ ठेवावेत.
५] आता हळूहळू दोन्ही जुळवलेले पाय एकत्रित उचलावे.
६] नंतर डोक्याच्या मागे घेऊन पायाची पावले जमिनीवर टेकवावी.
७] पायांचे अंगठे वर नेलेल्या हाताने धरावेत.
८] हाताने धरलेले अंगठे सोडून हात आता हळूहळू कंबरेलगत खाली आणून जमिनीवर ठेवावेत.
९] हाताचे पंजे जमिनीवर टेकवावे. व पाय जमिनीला टेकलेले असावेत.
१०] अशा स्थितीत पंधरा ते वीस सेकंद रहावे.
११] आता हळूहळू पाय उचलून खाली आणून जमिनीवर ठेवावेत.
हलासनाचे फायदे (Benefits of Halasana ) :-
१] हलासन उंचीवाढीसाठी अत्यंत उपयोगी आहे.
२] पायाचे व मांडीचे स्नायू मजबूत होतात.
३] पाठीचा कणा ताणला जाऊन तो लवचिक होतो.
हे पण पहा :- मोबाईलचे व्यसन लक्षणे, तोटे व उपाय
२] पवनमुक्तासन ( Pawanmuktasana ) :-
पवनमुक्तासनाची कृती :-
१] प्रथम जमिनीवर पाठ ठेवून सरळ झोपावे.
२] दोन्ही पायांमध्ये अंतर न ठेवता पाय सरळ व ताठ ठेवावेत.
३] डावा पाय सावकाश गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांच्या बोटांनी धरावा.
४] हाताने धरलेल्या गुडघ्याला हनुवटी टेकवावी.
५] हळुवार पाय सरळ खाली करावा.
६] आता उजवा पाय सावकाश गुडघ्यात वाकवून गुडघा दोन्ही हातांच्या बोटांनी धरावा.
७] हाताने धरलेल्या गुडघ्याला हनुवटी टेकवावी.
८] हळुवार पाय सरळ खाली करावा.
९] आता दोन्ही पाय सावकाश गुडघ्यात वाकवून दोन्ही गुडघे हातांच्या बोटांनी धरावे.
१०] हाताने धरलेल्या गुडघ्यांना हनुवटी लावावे.
११] नंतर हळुवार दोन्ही पाय सरळ खाली करावेत.
पवनमुक्तासनाचे फायदे ( Benefits of Pawanmuktasana ) :-
१] पाठीच्या कण्याला व पायांतील सांधे यांना चांगला व्यायाम होतो.
२] उंची वाढण्यास मदत होते.
३] पश्चिमोत्तासन (Paschimottasana):-
पश्चिमोत्तासनाची कृती :-
१] जमिनीवर पुढे पाय पसरून सरळ ताठ, काटकोनात बसावे.
२] पसरलेले पाय एकमेकांना जुळवून घ्यावेत.
३] दोन हात ताणून कानालगत वर करावेत.
४] आता हळूहळू कंबरेतून वाकत दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडावेत.
५] परंतू खाली वाकताना श्वास बाहेर सोडावा व पाय गुडघ्यांत अजिबात वाकवू नयेत.
६] हाताचे कोपरे पायाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर टेकवावेत व डोके गुडघ्याला लावावे.
७] अशा अवस्थेत कमीत कमी दीड मिनिट बसावे.
८] नंतर हळूहळू पायाचे, पकडलेले अंगठे सोडून सरळ ताठ अवस्थेत पूर्वस्थितीत यावे.
पश्चिमोत्तासनाचे फायदे ( Benefits of Paschimottasana ) :-
१] आसनामुळे शरीर लवचिक बनते.
२] पाठीचा कणा, पायाचे व मांडीचे स्नायू बळकट होतात.
३] मणक्यांना चांगला व्यायाम झाल्यामुळे उंची निश्चितच वाढते.
४] पोटाचे स्नायू मजबूत होऊन, पोट कधीही सुट नाही.
५] पाठीचे दुखणे असलेल्यांनी डॉक्टरी सल्ल्यानेच सुरुवात करावी.
४] सर्वांगासन (Sarvangasana) :-
सर्वांगासनाची कृती :-
१] प्रथम जमिनीवर पाठ ठेवून सरळ झोपावे.
२] पाय एकमेकांना जुळवूनच ठेवावे.
३] दोन्ही पाय एकत्रित घेऊन कंबरेजवळ वाकवून पोटाला काटकोन असे ताठ पाय करावेत.
४] आता दोन्ही हात कंबरेखाली घालून हे दोन्ही पाय हळूहळू आणखीन वर उचलून मानेला काटकोनात ताठ करावे.
५] असे करताना हाताने पायाला दिलेला आधार काढू नये.
६] या अवस्थेत कमीत कमी तीस सेकंद थांबावे.
७] आता दोन्ही पाय खाली आणून हात काढावेत व नंतर पाय सरळ करावेत.
सर्वांगासनाचे फायदे (Benefits of Sarvangasana ) :-
१] या व्यायामामुळे शरीराला ताण पडून उंची वाढण्यास मदत होते.
२] रक्ताभिसरण वाढते.
हे पण पहा :- अभ्यास करतांना घ्यावयाची काळजी
५] चक्रासन ( Chakrasana ) :-
चक्रासनाची कृती :-
१] जमिनीवर सरळ पाठ ठेवून झोपावे.
२] पाय सरळ पसरून त्यांच्यामध्ये अंतर ठेवू नये.
३] दोन्ही हात वळवून कानालगत मागे ताठ ठेवावेत,
४] दोन्ही पाय एकत्रित घेऊन गुडघ्यांत वाकवावेत.
५] पावले जमिनीला लागतील असे पाय ठेवावेत.
६] डोक्याच्या वर घेतलेल्या हाताचे पंजे जमिनीवर टेकवावेत.
७] आता हळूहळू शरीर कंबरेपासून उचलावे.
८] शरीराचा भार दोन्ही हातांवर व दोन्ही पायांवर उचलावा.
९] हळूहळू सर्व शरीर वर उचलून या सर्व शरीराला अर्धवर्तुळाकार द्यावा.
१०] अशा अवस्थेत कमीत कमी तीस सेकंद रहावे.
११] त्यानंतर अगदी सावकाशपणे शरीर खाली आणावे.
१२] प्रथम कंबरेचा भाग, नंतर पाठीचा कणा असे क्रमाक्रमाने खाली जमिनीला टेकवावे.
१३] त्यानंतर हळूहळू हात व पाय पूर्वस्थितीत आणावेत.
चक्रासनाचे फायदे (Benefits of Chakrasana) :-
१] चक्रासनामुळे पोटाच्या स्नायूंना व पाठीच्या कण्याला भरपूर फायदा होतो.
२] पोटाचे स्नायू मजबूत होतात.
३] मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो.
४] पाठीच्या कण्याची वाढ होते.
५] उंची वाढते.
६] नौकासन (Naukasana) :-
नौकासनाची कृती :-
१] प्रथम जमिनीवर पालथे म्हणजेच पोटावर झोपावे. पायात अंतर ठेवू नये.
२] हनुवटी जमिनीला टेकेल अशा स्थितीत चेहरा ठेवावा. दोन्ही हात मांड्यांना लागून ठेवावे.
३] आता हळूहळू दोन्ही जुळलेले पाय गुडघ्यात वाकवून वर उलट्या दिशेने कंबरेजवळ आणावेत.
४] उजव्या हाताने वाकवलेला उजवा पाय पकडावा व डाव्या हाताने वाकवलेला डावा पाय पकडावा.
५] आता हे पाय दोन्ही हातांनी जोर लावून ओढावेत.
६] डोके जमिनीपासून जितके वर उचलता येईल तेवढे छातीपासून जास्तीत जास्त उचलावे.
७] हाताने ओढलेला पायसुद्धा मांड्यांपासून, कंबरेपासून जेवढे जास्त उचलता येतील तेवढे उचलावेत
८] या स्थितीमुळे शरीराला नौकेप्रमाणे आकार येईल.
९] या स्थितीत कमीत कमी अडीच मिनिटे थांबावे.
१०] त्यानंतर पाय सोडवून हळूहळू पूर्वस्थितीत यावे.
नौकासनाचे फायदे (Benefits of Naukasana) :-
१] शरीर चांगले ताणले जाते व शरीराची उंची वाढते.
२] पोटातील स्नायू पिळदार होतात.
७] आकर्णधनुरासन (Aakrndhanurasan) :-
आकर्णधनुरासन कृती :-
१] प्रथम जमिनीवर पाय पुढे पसरून सरळ ताठ बसावे.
२] डाव्या हाताने कंबरेत वाकून उजव्या पायाचा अंगठा धरावा.
३] त्याप्रमाणेच उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरावा.
४] असे करताना हात कोपऱ्यात व पाय गुडघ्यात वाकवू नयेत.
५] त्यानंतर आधी डाव्या हाताने धरलेला उजव्या पायाचा अंगठा छातीकडे ओढावा व डाव्या कानाला तो अंगठा लावावा.
६] या स्थितीत कमीत कमी तीस सेकंद थांबावे व तो पाय पूर्वस्थितीत त्याचा धरलेला अंगठा सोडू नये.
७] उजव्या हाताने कंबरेत वाकून डाव्या पायाचा अंगठा धरावा.
८] त्याप्रमाणेच डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरावा.
९] असे करताना हात कोपऱ्यात व पाय गुडघ्यात वाकवू नयेत.
१०] त्यानंतर आधी उजव्या हाताने धरलेला डाव्या पायाचा अंगठा छातीकडे ओढावा व उजव्या कानाला तो अंगठा लावावा.
११] या स्थितीत कमीत कमी तीस सेकंद थांबावे व तो पाय पूर्वस्थितीत त्याचा धरलेला अंगठा सोडू नये.
१२] तीस सेकंद तसेच थांबून पूर्वपदावर यावे.
१३] अशी क्रिया प्रत्येक पायाने चार-चार वेळा करावी.
आकर्णधनुरासनाचे फायदे (Benefits of Aakrndhanurasan) :-
१] कोपर्याचे स्नायू मजबूत करण्यास मदत करते.
२] पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
३] पायांचे स्नायू ताणून त्यांना बळकट करते.
४] जुनाट बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
५] श्वसन आणि फुफ्फुसाच्या कड्यांना आराम मिळतो.
६] याच्या सरावाने शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.
७] याचा नियमित सराव केल्यास शरीरातील लवचिकता वाढते.
८] पादअंगुष्ठ / नससर्पासन ( Padangushtha Asan / Nasasarpasan ) :-
पादअंगुष्ठ / नससर्पासन कृती :-
१] प्रथम जमिनीवर दोन्ही पायांवर समान भार देऊन सरळ उभे रहावे.२] एक पाय पुढे ठेवावा. दुसऱ्या पाय जेवढा मागे घेता येईल तेवढा मागे घ्यावा.
३] दोन्ही हात मागे घेऊन पाठीवर हातांची घडी घालावी.
४] हळूहळू कंबरेतून वाकत पुढच्या पायाच्या गुडघ्याच्या दिशेने वाकावे.
५] खाली वाकताना दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता खाली वाकून नाकाचा स्पर्श पुढे पाय असलेल्या गुडघ्याला करावा.
६] या स्थितीत कमीत कमी तीस सेकंद थांबावे व तोल सांभाळत पूर्वपदावर येऊन उभे रहावे.
७] यानंतर मागे असलेला पाय पुढे घेऊन वर दिल्याप्रमाणेच कृती करावी.
८] अशी एक आड एक प्रत्येक पायाने कमीत कमी तीन-तीन वेळा कृती करावी.
पादअंगुष्ठ / नससर्पासनाचे फायदे (Benefits of Padangushtha Asan / Nasasarpasan) :-
१] पायांना व पाठीच्या कण्याला ताण पडून उंची वाढते.
९] बद्धपद्मासन (Badhapdmasan) :-
बद्धपद्मासन कृती :-
१] प्रथम जमिनीवर ताठ बसावे.२] पाय समोर पसरावेत.
३] आता डावा पाय उचलून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.
४] उजवा पाय उचलून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवावा.
५] दोन्ही पायांची पावले जास्तीत जास्त कंबरेजवळ ठेवावीत.
६] वरीलप्रमाणे केल्याने पद्मासनाची क्रिया होईल.
७] डावा हात पाठीमागून घ्यावा व त्या हाताने कंबरेजवळ असलेल्या उजव्या पायाचा अंगठा धरावा.
८] या स्थितीतच उजवा हात पाठीमागून घेऊन कंबरेजवळील डाव्या पायाचा अंगठा पकडावा.
९] दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे साठ सेकंद पकडून बसण्याचा प्रयत्न करावा.
१०] त्यानंतर हळूहळू हात व पाय सोडून, हात सोडून पूर्वस्थितीत यावे.
बद्धपद्मासनाचे फायदे (Benefits of Badhapdmasan) :-
१] पाठीच्या मणक्यांना व्यायाम होतो.
२] पाय ताणले जाऊन पायाचे स्नायू बळकट होतात.
३] उंची वाढण्यास मदत होते.
४] हे आसन लठ्ठ मुलांना करायला अवघड जाते; परंतु सवयीने ते सर्वांनाच जमेल. त्यांना याचा फायदा होईल.
१०] हस्तपादासन (Hastpadasan):-
हस्तपादासन कृती :-
१] प्रथम सरळ ताठ उभे रहावे.
२] दोन्ही पाय एकमेकांना जुळवून ठेवावेत.
३] दोन्ही हात कानालागत डोक्याच्या वर खांद्याच्या सरळ रेषेत ताठ करावेत.
४] आता पायाच्या टाचा उचलाव्यात.
५] शरीराला टाचेपासून हातांपर्यंत जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे.
६] आता पाय संपूर्ण जमिनीला टेकवावेत.
७] कंबरेतून वाकून हाताचे तळवे जमिनीला लावावेत.
८] असे करताना गुडघे वाकवू नयेत.
९] हात जमिनीला टेकवल्यानंतर डोके गुडघ्याला लावावे.
१०] या स्थितीमध्ये कमीत कमी पन्नास सेकंद राहण्याचा प्रयास करावा.
११] त्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीत यावे.
१२] असे आसन एकाच वेळी तीन ते चार वेळा करावे.
हस्तपादासनाचे फायदे (Benefits of Hastpadasan) :-
१] गुडघ्यामागून पाय व पाठीचा कणा ताणला जाऊन त्यांचा चांगला व्यायाम होतो.
२] उंची वाढण्यास खूपच मदत होते.
३] मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो.
४] पोटाचा व्यायाम होतो.
११] ताडासन (Tadasan) :-
ताडासन कृती :-
१] प्रथम दोन्ही पायांवर समान भार देऊन सरळ, ताठ उभे रहावे.
२] दोन्ही हात ताठ कंबरेपर्यंत सरळच ठेवावेत.
३] दोन्ही हात हळूहळू वर करावेत.
४] हात खांद्याच्या सरळ रेषेत कानालगत अगदी ताठ ठेवावेत.
५] जमिनीपासून टाचा उंच कराव्यात.
६] सर्व शरीराला भरपूर ताण द्यावा.
७] या अवस्थेत दोन ते तीन मिनिटे चालण्याचाही प्रयत्न करावा.
८] तसेच या अवस्थेत थोडे वेळ उभे राहण्याचाही प्रयत्न करावा.
ताडासनाचे फायदे (Benefits of Tadasan) :-
१] उंची वाढण्याच्या योगासनांतील ताडासन हे अगदी सोपे वा फार महत्त्वाचे आहे.
२] यामध्ये सर्वच शरीर ताणले जात असल्याने उंची वाढते.
३] वाढत्या मुलांना नियमितपणे हे आसन न चुकता करावयास लावावे.
१२] शीर्षासन (Shirshasan):-
शीर्षासन कृती :-
१] प्रथम जमिनीवर एक चादर पसरून त्यावर टॉवेल अंथरावा.
२] आता पातळ मऊसर धोतराप्रमाणे कापड घेऊन त्याची चांगली गुंडाळी करावी.
३] आपले डोके त्यावर राहील एवढ्या आकाराची गुंडाळी करावी.
४] दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून ती डोक्याच्या मागे ठेवावी.
५] प्रथम खाली बसून हाताचे कोपरे जमिनीला टेकून डोके गुंडाळीवर ठेवावे.
६] त्यानंतर कंबर हळूहळू उचलून पाय छातीकडे उंच करावे.
७] पाय सावकाशपणे ताठ करावे.
८] दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता एकत्र जुळवून ठेवावे.
९] शरीराचे संपूर्ण वजन हाताचे कोपरे, हातांची बोटे व गुंडाळीवर असलेल्या मस्तकावर पेलावे.
१०] अशा अवस्थेत कमीत कमी तीस सेकंद रहावे.
११] नंतर सवयीनुसार दीड ते दोन मिनिटे रहावे.
१२] हे आसन करताना डोळे बंद ठेवावेत.
१३] शीर्षासन हे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या हजेरीतच करावे.
१४] पहिल्यांदा या आसनासाठी भिंतीचा आधार घ्यावा.
१५] हे आसन खूपच काळजीपूर्वक करावे.
शीर्षासनाचे फायदे (Benefits of Shirshasan) :-
१] नैसर्गिकरीत्या उंची वाढते.
२] यकृताचे आरोग्य चांगले रहाते.
३] बुद्धी व स्मरणशक्ती वाढते.
४] माणूस शतायुषी होतो.
५] दात किडत नाहीत.
६] केस गळत नाहीत व काळे राहतात.
७] पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
८] पचन सुधारते.
९] मेंदूच्या लहान लहान पेशींनासुद्धा चांगला रक्तप्रवाह होतो.
१०] उत्साह व जोम येतो.
११] निरोगी आयुष्य लाभते.
१२] चेहरा तेजस्वी होतो.
१३ शीर्षासन सर्व आसनांमध्ये श्रेष्ठ असून त्याला आसनांचा राजा म्हणतात.
१३] भुजंगासन (Bhujangasan):-
भुजंगासन कृती :-
१] प्रथम जमिनीवर पालथे म्हणजेच पोटावर झोपावे.
२] दोन हात कोपऱ्यात वाकवून हातांचे तळवे खांद्याजवळ घ्यावेत.
३] डोके हळूहळू वर करून छताकडे बघावे.
४] याच वेळी कंबरेपासून शरीराचा भाग जेवढा जास्त उचलता येईल तेवढा उचलावा.
५] या अवस्थेत हातांच्या तळव्यांवर जोर द्यावा व हात ताठ करावेत.
६] या अवस्थेत दोन ते तीन मिनिटे थांबण्याचा प्रयत्न करावा.
भुजंगासनाचे फायदे (Benefits of Bhujangasan) :-
१] मान, पोट, कंबर, पाय ताणले जाऊन त्यांना व्यायाम मिळतो.
२] त्यामुळे उंची वाढते.
३] पोटाचे आरोग्य सुधारते.
१४] बकासन (Bakasan) :-
बकासन कृती :-
१] प्रथम जमिनीवर पालथे झोपावे.
२] नाक जमिनीला टेकवावे.
३] हात कोपऱ्यात दुमडावेत.
४] हातांचे दुमडलेले कोपरे पोटाच्या मध्यभागी आणावेत.
५] हळूहळू संपूर्ण शरीर हातांच्या पंज्यावर भार देऊन जमिनीपासून वर उचलावे.
६] सर्व शरीराचा तोल सांभाळून करावे.
७] या अवस्थेत साठ सेकंद थांबावे.
बकासनाचे फायदे (Benefits of Bakasan) :-
१] उंची वाढण्यास मदत होते.
पर्वतासन कृती :-
१] प्रथम पद्मासन घालून ताठ बसावे.
२] दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत कानालगत उंच करावेत.
३] दोन्ही हात वर एकमेकांना जोडून नमस्काराची मुद्रा करावी.
४] या स्थितीत कमीत कमी दोन मिनिटे राहण्याचा प्रयत्न करावा.
५] आसन पूर्ण झाल्यावर हळूहळू पूर्वपदावर यावे.
पर्वतासनाचे फायदे (Benefits of Parvtasan) :-
१] या स्थितीमुळे शरीर कंबरेपासून ताणले गेल्याने उंची निश्चितच वाढते.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box