दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
10th-12th Exam Probable Timetable announced
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक ( 10th-12th Exam Probable Timetable ) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) जाहीर करण्यात आले आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रकानुसार इयत्ता १० वी ची परीक्षा १ मार्चपासून २२ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. तर इयत्ता १२ वी (सर्वसाधारण, द्विलक्षी विषय आणि व्यवसाय अभ्यासक्रम) ची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान आयोजित केली आहे. ही लेखी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येते.
हे पण पहा :- शब्दांच्या जाती
संभाव्य लेखी परीक्षेचे वेळापत्रक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या हेतूने देण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी.
हे पण पहा :- संख्यांचे प्रकार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळाव्यतिरिक्त अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉटस्ॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण राज्य मंडळाने केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्र्यपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे ओक यांनी सांगितले आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक :- www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
हे पण पहा :- पर्यायवाची शब्द
तुम्हाला दहावी व बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर | 10th-12th Exam Probable Timetable announced ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box