अभ्यस्त शब्द | Abhyast shabd in Marathi | Abhyast shabd - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 5, 2023

अभ्यस्त शब्द | Abhyast shabd in Marathi | Abhyast shabd

ABHYAST SHABD

अभ्यस्त शब्द

Abhyast shabd in marathi

अभ्यस्त शब्द | Abhyast shabd in Marathi | Abhyast shabd

अभ्यस्त शब्द ( Abhyast shabd in Marathi ) :-

            अभ्यस्त शब्द ( Abhyast shabd in Marathi ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी अभ्यस्त शब्द ( Marathi Abhyast shabd ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी अभ्यस्त शब्द ( Abhyast shabd ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया अभ्यस्त शब्द ( Abhyast shabd in Marathi ) .


हे पण पहा :- काळ व त्याचे प्रकार

अभ्यस्त शब्द

[ Abhyast shabd ]

अभ्यस्त शब्द म्हणजे काय?

            ज्या शब्दात एका शब्दाची अथवा काही अक्षरांची पुनरावृती झालेली असते तेव्हा अशा शब्दांना अभ्यस्त शब्द ( Abhyast shabd ) असे म्हणतात.

अभ्यस्त शब्दांचे प्रकार तीन आहेत. ते पुढील प्रमाणे.

क्रअभ्यस्त शब्दाचे प्रकार
पूर्णाभ्यस्त शब्द [ Purnabhyasta Shabd ]
अंशाभ्यस्त शब्द [ Anshabhyast Shabd ] 
अनुकरणवाचक शब्द [ Anukaran Vachak Shabd ]

हे पण पहा :- वचन व त्याचे प्रकार

पूर्णाभ्यस्त शब्द 

[ Purnabhyasta Shabd ]

पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे काय ?

            जेव्हा एक पूर्ण शब्द पुन्हा: पुन्हा येऊन एक जोडशब्द बनतो तेव्हा त्याला पूर्णाभ्यस्त शब्द (Purnabhyasta Shabd ) असे म्हणतात.

पूर्णाभ्यस्त शब्द उदाहरण :- 

शब्दशब्दशब्दशब्द

पैसाचपैसा  

पाढेचपाढे

गोरागोरा

आतल्याआत

हळूहळूखळबळलखलखउगीचचेउगीच
गारगारलुटुलुटुऊनऊनलालचलाल
लाललालतुरूतुरूमऊमऊखाऊनखाऊन
पुढेपुढेचुकचुकचिवचिवमजाचमजा
हिरवेहिरवेमळमळगुरगुरमधल्यामध्ये
लवलवखवखवगुणगुणबारीकबारीक
बडबडकायकायतिळतिळकाळाकाळा

कळकळ

छनछन

खडखड

समोरासमोर

चटवटभडभडमळमळपीठचपीठ


अंशाभ्यस्त शब्द

[ Anshabhyast Shabd ]


अंशाभ्यस्त शब्द  म्हणजे काय ?

            जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जसाच्या तसा पुन्हा न येता एखादे अक्षर बदलून येतो. त्या जोडशब्दांना अंशाम्यस्त शब्द Anshabhyast Shabd ) असे म्हणतात.

अंशाभ्यस्त शब्द उदाहरण :- 

शब्द

शब्द

शब्द

शब्द

अदलाबदल

धुसफूस

लटपट

कडमड

जळफळ

तळमळ

भीडभाड

आरपार

जिकडेतिकडे

लगबग

अलमटलम

गडबड

आडवातिडवा

ताळमेळ

गोडधोड

इडापीडा

उरलासुरला

उष्टीमाष्टी

अर्धमुर्ध

पडझड

किडूकमिडूक

घरबीर

लेचापेचा

सटरफटर

दगडबिगड

स्टूखुट्ट

झाड़बीड

झाडझूड

बारीकसारीक

जाळपोळ

लिंबूटिंबू

चुळबूळ

सोक्षमोक्ष

रमतगमत

लाडीगोडी

धुसफूस

शेजारीपाजारी

खाणाखुणा

तडफड

लगबग


काही वेळा पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून 'अंशाभ्यस्त शब्द' तयार होतात. 

अंशाभ्यस्त शब्द उदाहरण :-

शब्दशब्दशब्दशब्द

मानमराबत

धनदौलत

कामधंदा

डावपेच

हालअपेष्टाहोमहवणधागादोराधरपकड
साधाभोळारीतीरिवाजदीनदुबळा

अनुकरणवाचक शब्द

[ Anukaran Vachak Shabd ]


अनुकरणवाचक शब्द म्हणजे काय ?

            जेव्हा शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती साधलेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द ( Anukaran Vachak Shabd ) असे म्हणतात. 

अनुकरणवाचक शब्द उदाहरण :- 

शब्दशब्दशब्दशब्द

खडखड

फडफड

धुसफूस

किरकिर

पिरपिरकडकडाटखडकडाटखळखळाट
मुळूमुळूहळूहळूलुटुलुटुदुडूदुडू
रिमझिमफडफडाटहुरहूरफिदीफिदी
गुणगुणभूनभूनघणघणाटटिकटिक
सळसळगडगडघणघण


हे पण पहा :- नाते संबंध 

          तुम्हाला अभ्यस्त शब्द | Abhyast shabd | Abhyast shabd in marathi ही माहिती आवडली असेल तर शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad