कृषी क्षेत्रातील क्रांती | Agricultural Revolutions in India - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

कृषी क्षेत्रातील क्रांती | Agricultural Revolutions in India

 Agricultural Revolutions in India

कृषी क्षेत्रातील क्रांती

List of Agricultural Revolutions in India

कृषी क्षेत्रातील क्रांती | List of Agricultural Revolutions in India | Agricultural Revolutions in India | Revolutions in Agriculture


Revolutions in Agriculture

कृषी क्षेत्रातील क्रांती

क्र. क्रांतीउत्पादन
हरित क्रांती
Green Revolution
अन्नधान्य उत्पादनात वाढ
Increase in food grain production
करडी क्रांती
Kardi Revolution
Fertilizer Revolution
खत उत्पादनात वाढ
Increase in fertilizer production
श्वेतक्रांती /  धवल क्रांती
White Revolution
रेशीम व दुधाच्या उत्पादनात वाढ
Increase in silk & 
milk  production
पीतक्रांती
Yellow Revolution
तेलबिया उत्पादनात वाढ
Increase in oilseed production
नीलक्रांती
Blue Revolution
मत्स्यत्पादनात वाढ
Increase in fisheries production
लाल क्रांती
Red Revolution
मेंढी-शेळी उत्पादनात वाढ
Increase in sheep-goat production
सुवर्ण क्रांती
Golden Revolution
मधाचे उत्पादन
Honey production
तपकिरी क्रांती
Brown Revolution
कोकोचे उत्पादन वाढवणे
Increasing production of cocoa
गोलक्रांती
Round Revolution
बटाटा उत्पादनात वाढ
Increase in potato production
१०रजत धागा क्रांती
Silver Thread Revolution
अंडे उत्पादन
Increase in egg production
११गुलाबी क्रांती
Pink Revolution
कांदा उत्पादन
Increase in Onion production


हे पण पहा :- विविध क्षेत्राचे जनक

कृषी क्षेत्रातील क्रांती

Revolutions in Agriculture

Agricultural Revolutions in India

List of Agricultural Revolutions in India


१] हरित क्रांती ( Green Revolution ) :-

            भारतातील हरित क्रांतीचा ( Green Revolution ) टप्पा १९६० च्या सुरुवातीचा काळ होता. सुधारित कृषी तंत्रज्ञानामुळे बियाणांच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या वाणांमध्ये वाढ झाली. यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला कमी कृषी उत्पादकतेवर मात करण्यास मदत झाली व कृषी उत्पादकतेवर प्रचंड वाढ झाल्याचे बघावयास मिळाले.


२] करडी क्रांती ( Kardi Revolution / Fertilizer Revolution ) :-

            पिकाची लवकर वाढ करण्यासाठी खतांचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. अश्या खतांची गरज भागवण्यासाठी खतांच्या उत्पादन मोठ्या प्रमाणता वाढ करण्यात आली त्यालाच करडी क्रांती ( Kardi Revolution / Fertilizer Revolution ) असे म्हणतात.

३] श्वेतक्रांती / धवल क्रांती ( White Revolution ) :-

            धवल क्रांती यास श्वेतक्रांती ( White Revolution ) असेही म्हटले जाते. पशुपालन, पशुसंवर्धन व त्याच्याशी निगडीत दुुुग्ध व्यवसायाला चालना देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच त्या माध्यमातून हरितक्रांतीला बळकटी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री, प्रख्यात कृषितज्ज्ञ वसंतराव नाईक यांनी ७० च्या दशकात ही क्रांती महाराष्ट्रात घडवून आणली.


४] पीतक्रांती ( Yellow Revolution ) :-

            पीतक्रांती ( Yellow Revolution ) ही प्रामुख्याने तेलबियातील उत्पादनात वाढ करण्याच्या संदर्भातील आहे. ९० च्या दशकाच्या सुरुवातीस वार्षिक तेलबिया पिकांपासून २५ दशलक्ष टन तेलबिया उत्पादनाचा सर्वकालीन विक्रम प्राप्त झाला. ‘निव्वळ आयातदार’ राज्यातून उदयास आलेल्या पीत क्रांती मध्ये ( Yellow Revolution ) भारताने स्वयंपूर्ण आणि निव्वळ निर्यातदाराचा दर्जा प्राप्त केला.

५] नील क्रांती ( Blue Revolution ) :-

            नीलक्रांती ( Blue Revolution ) मध्ये मत्स्य उत्पादन केला जाते. या क्रांतीमध्ये मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या या निलक्रांती योजनेला मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्राने मत्स्य व्यवसायाला चालना किंवा उभारी देण्यासाठी ही निलक्रांती ( Blue Revolution ) योजना सुरू केली.


६] लाल क्रांती ( Red Revolution ) :-

            लाल क्रांती ( Red Revolution ) म्हणजे यामध्ये टोमॅटोच्या उत्पादन वाढ केली जातो. तसेच शेळी व मेंढी यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ केली जातो त्यास लाल क्रांती ( Red Revolution ) असे म्हणतात.

७] सुवर्ण क्रांती ( Goden Revolution ) :-

            फळांच्या व मधाच्या उत्पादन वाढ केली गेली यालाच सोनेरी किंवा सुवर्ण क्रांती ( Golden Revolution ) असे म्हणतात. इ.स. १९९१ ते २००३ हा काळ सोनेरी किंवा सुवर्ण क्रांतीचा ( Golden Revolution ) काळ म्हणून ओळखला जातो. यामुळे केळी, आंबा इत्यादींच्या उत्पादनात भारत जागतिक अग्रेसर बनला आणि शाश्वत उपजीविकेचे आणि पोषणाचे पर्याय उपलब्ध झाले.


८] तपकिरी क्रांती ( Brown Revolution ) :-

            चामडी किंवा कोकोच्या उत्पादन वाढ केली गेली यालाच तपकिरी क्रांतीचा ( Brown Revolution ) असे म्हणतात. कॉफी उत्पादनात वाढ करून विकसित राष्ट्रांकडून कॉफीची मागणी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करते. तपकिरी क्रांती ( Brown Revolution ) विशाखापट्टणमच्या आदिवासी भागाशी संबंधित आहे.


९] गोलक्रांती ( Round Revolution ) :- 

            प्रामुख्याने बटाट्याच्या उत्पादनाचा मोठ्या प्रमाणात वाढ केली जाते त्यास गोल क्रांतीचा ( Round Revolution )असे म्हणतात. 


१०] रजत धागा क्रांती ( Silver Thread Revolution ) :-

            चंदेरी किंवा रजत क्रांतीच्या चंदेरी किंवा रजत क्रांतीचा ( Silver Thread Revolution / Silver Revolution  ) टप्प्यात अंड्यांच्या उत्पादन प्रचंड वाढ होते. वैद्यकीय शास्त्र आणि कोंबड्यांना अधिक प्रथिनेयुक्त अन्न यामुळे अंड्यांचे उत्पादन वाढवणे शक्य झाले.


११] गुलाबी क्रांती ( Pink Revolution ) :-

            भारतातील मांस निर्यात आणि कोळंबी व कांदा उत्पादनाची भरभराट हा गुलाबी क्रांतीचा ( Pink Revolution ) काळ आहे. हे पोल्ट्री आणि मांस प्रक्रिया क्षेत्रातील तांत्रिक क्रांती दर्शवते.


          तुम्हाला कृषी क्षेत्रातील क्रांती | List of Agricultural Revolutions in India | Agricultural Revolutions in India | Revolutions in Agriculture ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad