एका शब्दाचे अनेक अर्थ | Eka Shabdache Anek Arth - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 1, 2023

एका शब्दाचे अनेक अर्थ | Eka Shabdache Anek Arth

एका शब्दाचे अनेक अर्थ

Eka Shabdache Anek Arth

एका शब्दाचे अनेक अर्थ मराठी | Eka Shabdache Anek Arth

एका शब्दाचे अनेक अर्थ ( Eka Shabdache Anek Arth ):- 

            एका शब्दाचे अनेक अर्थ ( Eka Shabdache Anek Arth ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी एका शब्दाचे अनेक अर्थ ( Marathi Eka Shabdache Anek Arth ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी एका शब्दाचे अनेक अर्थ ( Eka Shabdache Anek Arth in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया एका शब्दाचे अनेक अर्थ ( Eka Shabdache Anek Arth ) .


मराठीत एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
अभंगकाव्यरचनेचा  एक  प्रकार, न भंगलेला
अनंतअमर्याद, परमेश्वर
ओढाआकर्षण, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ
अंतरमन, लांबी, भेद, फरक
अंगशरीर, बाजू, भाग
अंबरआकाश, वस्त्र
अंकसंख्या, मांडी
आसइच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा
आनंदसुखाची कल्पना, मुलाचे नाव 


मराठीत एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
उत्तरप्रश्नाचे उत्तर (खुलासा), एका दिशेचे नाव 


मराठी एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
ऋणवजाबाकीचे चिन्ह, कर्ज, उपकार 


एका शब्दाचे अनेक अर्थ मराठी

शब्दअनेक अर्थ
कुबेरइंद्रदेवाचा खजाना, खूप श्रीमंत व्यक्ती
किरणउन्हाची तिरीप, व्यक्तीचे नाव
काळवेळ, मृत्यू, यम
कळवेदना, भांडणाचे कारण, गुप्त किल्ली, बटन
करहात, सरकारी सारा, किरण
कलमरोपांचे कलम, लेखणी
कर्णमहाभारतातील योद्धा, कान,
त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू
कांबळेघोंगडी, एक आडनाव
कीर्तीप्रसिद्धी, मुलीचे नाव 


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
गारथंड, बर्फाची गोटीन


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
घाटडोंगरातला रस्ता, नदीच्या पायऱ्या
घटझीज, मडके


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
चीजसार्थक, दुधापासून बनवलेला पदार्थ 
चिमणी एक पक्षी, गिरणीचे धुराडे
चरणपाय, ओळ
चक्रचाक, एक शस्त्र
चूक दोष, लहान खिळा
चिरंजीवमुलगा, दीर्घायुषी


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
छंदनाद, काव्यरचनेचा एक प्रकार


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
जोडाबूट, जोडपे
जनालोकांना, स्त्रीचे नाव
जलदलवकर, ढग 
जातसमाज, प्रकार 
जीवनआयुष्य, पाणी


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
डावकपट, कारस्थान, खेळी


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
तळीतळाला, ताम्हन, तलाव
तीर काठ, बाण, बांध
तटकडा, किनारा, किल्ल्याची भिंत 
ताव तापविणे, कागद


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
द्वीजपक्षी, दात, ब्राह्मण
दंडकाठी, शिक्षा, बाहू
दमश्वास अडकणे, धमकी 


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
नामनाव, व्याकरणातील पहिली शब्दाची जात
नावएखाद्याला वस्तूला दिलेले, होडी
नगवस्तू, पर्वत
नादछंद, आवाज, आवड
नसतपकीर, शरीरातील रक्त वाहिनी


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
पूरनगर, नदी- नाले-ओढे यांना येणारा पूर
परपीस, परका, दुसरा, श्रेष्ठ, पंख
पाचएक संख्या, रत्न
पत्ताराहण्याचे ठिकाण, खेळण्यातील पत्यांचा खेळ,
 (कडी) पत्ता-पान
पात्रलायक, योग्य, भांडे,
नाटक/चित्रपट/साहित्यातील व्यक्तीरेखा
पासपरवाना, उत्तीर्ण 
पणपरतुं, प्रतिज्ञा, अट, ठाम निश्चय
पालकआईवडील, पालनपोषण करणारे, एक पालेभाजी
पदव्याकरणातील प्रत्यय लागलेला शब्द,
अधिकारातील स्थान, पाय
पालसरपटणारा प्राणी, राहुटी 
पणतीतेलवातीचा मातीचा दिवा, नातीची/नातवाची मुलगी
पानजेवणाचे ताट, वहीचे पान, झाडाचे पान 
पटआकाश, वस्त्र, खेळाचा पट,
(बुद्धिबळाचा सारीपाट सोंगट्यांचा)
पारझाडाभोवतालचा ओटा, पलीकडे
पयपान, चिठ्ठी,एखाद्याला लिहिलेले पत्र
परीपंख असलेली काल्पनिक देवता 
पत्रपान, चिठ्ठी, एखाद्याला लिहिलेले पत्र
पक्षपंख, वादातील बाजू, पंधरवडा, राजकीय संघटना



एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
प्रवीणकुशल, मुलाचे नाव
प्रतापपराक्रम, मुलाचे नाव 


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
बोलशब्द, तबल्याचे बोल
बरोबरसह, बरोबर - चूक मधील
बाकवक्रता, शाळेतील बसण्याचे आसन


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
भाव(भक्ती) भावना किंवा श्रद्धा, वस्तूचा दर


एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
मुकालहान मुलाचा पापा, बोलता न येणारा
माळमोकळ जमीन, गळ्यातील हार
मित्रसोबती, दोस्त, सूर्य
मानशरीराचा एक अवयव-कंठ, समाजातील किंमत,
आदर, प्रमाण, मोठेपणा
मायाप्रेम, ममता, स्नेह, वात्सल्य, धन, संपत्ती, वेळेचे मोजमाप
माळफुलांचा सर, ओसाड जागा
मात्राइलाज, उपाय, ठरावीक प्रमाणातील औषधाचा डोस

हे पण पहा :- मराठी बोधकथा

एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
यजमानपती, यज्ञकरणारा, प्रमुख



एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
रक्षारक्षण, राख
रसद्रवपदार्थ, गोडी
रवीसूर्य, ताक घुसळण्याची रवी


एका शब्दाचे अनेक अर्थ मराठी

शब्दअनेक अर्थ
वजनतराजूत पदार्थ मापनासाठी वापरावयाचे माप,
प्रभाव
वारदिवस, घाव
वचनभाषण, प्रतिज्ञा
वाणी व्यापारी, उद्गार, बोलणे
वरआशीर्वाद, नवरा, वरची दिशा
वातज्योत, वारा, विकार
वळणप्रवृत्ती, वाकडा रस्ता


एका शब्दाचे अनेक अर्थ मराठीत

शब्दअनेक अर्थ
सुमनफूल, पवित्र मन



मराठी एका शब्दाचे अनेक अर्थ

शब्दअनेक अर्थ
हारपराभव, फुलांची माळ


          तुम्हाला एका शब्दाचे अनेक अर्थ मराठी | Eka Shabdache Anek Arth  ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad