International Labor Day
आंतरराष्ट्रीय कामगार दिन
International Workers Day
आंतरराष्ट्रीय कामगार दिन माहिती ( Labor Day | International Workers Day | International Labor Day ) :-
१ मे हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन माहिती ( Labor Day | International Workers Day | International Labor Day ) म्हणून साजरा केला जातो. या मागे एक मोठा इतिहास आहे. १८ व्या शतकात कामगारांच्या हितासाठी काही मागण्या करण्यात आल्या होत्या. पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांनी दिवसाचे कामाचे तास ठराविक असावेत यासंदर्भात ही मागणी केली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडामधील कामगार संघटनांनी पुढाकार घेत १८८६ मध्ये कामगारांच्या हितासाठी मोर्चे काढण्यास सुरुवात केली. परंतु दुर्दैवाने एका मोर्च्यामध्ये शिकागो मधील सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. ज्याबद्दल कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्याचाच परिणाम म्हणून पोलिसांवर राग व्यक्त करण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीने बॉंम्ब टाकला आणि त्यात आठ पोलिसांचा मृत्यू आणि पन्नास पोलीस जखमी झाले होते. त्यामुळे आठ आंदोलन कर्त्यांना फाशी देण्यात आली होती.
परंतु ज्या आठ आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्यांनी तो बॉंम्ब फेकलेलाच नव्हता. म्हणून जगभरात संतापाची लाट पसरली. याचा परिणाम म्हणून आंदोलनाला एक भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले. १८९० ला कामगारांची ही चळवळ यशस्वी झाली. शिकागोमधील या घटनेचे स्मरण करण्यासाठी रेमंड लेविन यांनी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी केली. त्यांनी ही मागणी १८८९ साली आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरीस परिषदेत केली होती. त्या परिषदेमध्ये १ मे १८९० हा दिवस जागतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. पुढे १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक मान्यता देण्यात आली. ज्यामुळे आज जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम ( The theme of International Workers Day) :-
आंतरराष्ट्रीय कामगार दिन ( International Workers' Day | International Labor Day ) साजरा करण्यासाठी दररर्षी एखादी विशिष्ट अशी थीम ठरवण्यात येते. ठरवलेली थीम नुसार जगामध्ये सर्वत्र परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच मागील काही वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिन ( International Workers' Day | International Labor Day ) निमित्ताने थीम ठरवण्यात आलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे.
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम
The theme of International Labor Day
The theme of International Workers Day
वर्ष आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम २०१६ आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचा उत्सव साजरा करणे. २०१७
राष्ट्रीय वारशाचे जतन करणे. २०१८
सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे . २०१९
सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे. २०२०
कोरोना व्हायरस महामारीमुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षितता राखणे. २०२१
आताच कृती करा, बालमजुरी बंद करा. २०२२
बालमजुरीविरूद्ध जनजागृती करणे आणि बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष केद्रिंत करणे.
वर्ष | आंतरराष्ट्रीय कामगार दिनाची थीम |
---|---|
२०१६ | आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीचा उत्सव साजरा करणे. |
२०१७ | राष्ट्रीय वारशाचे जतन करणे. |
२०१८ | सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे . |
२०१९ | सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी कामगारांना एकत्र आणणे. |
२०२० | कोरोना व्हायरस महामारीमुळे कामाच्या ठिकाणी संरक्षण आणि सुरक्षितता राखणे. |
२०२१ | आताच कृती करा, बालमजुरी बंद करा. |
२०२२ | बालमजुरीविरूद्ध जनजागृती करणे आणि बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांवर लक्ष केद्रिंत करणे. |
तुम्हाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन ( International Workers' Day | Labor Day ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box