महाराष्ट्र दिन भाषण - माहिती
Maharashtra Din Bhashan
Maharashtra Day Speech in Marathi
महाराष्ट्र दिन माहिती ( Maharashtra Din Mahiti | Information )
महाराष्ट्र दिन ( Maharashtra Din ) म्हटल की मराठी भाषिक व महाराष्ट्रात वास्तव्य करणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी जणू काही एक उत्सवच असतो.
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी….. ॥२॥
- गोविंदाग्रज
अतिशय सुंदर शब्दात गोविंदाग्रज यांनी गीतातून महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? संयुक्त महाराष्ट्रासाठी एक मोठा संघर्ष करावा लागला. स्वतंत्र भारतात मराठी भाषकांचे राज्य स्थापन करण्यासाठी जर संयुक्त महाराष्ट्र चळवळीने लढा उभारला नसता तसेच त्यात १०५ आंदोलकांनी प्राण गमावले नसते तर आज आपल्याला महाराष्ट्राचा नकाशा काहीसा वेगळा व अर्धवट दिसला असता. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा व त्या १०५ आंदोलकांचा मोठा वाटा आहे.
हे पण पहा :- ९ ऑगस्ट - क्रांती दिन
महाराष्ट्र राज्यात मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा व खानदेश भाग मराठी भाषा बोलणारे आहेत परंतु अजूनही डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे मराठी भाषीक भाग महाराष्ट्रात समाविष्ट होऊ शकले नाहीत. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही एक सर्वांगीण चळवळ होती त्यामध्ये साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक व राजकीय या सर्वांचा समावेश होता.
इंग्रजांनी आपल्या आलेल्या देशावर १५० वर्ष राज्य केलं. त्यांचा राज्यकारभ व्यवस्थित चालावा यासाठी त्यांनी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. त्यामुळे इ.स. १९२० रोजी नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा महात्मा गांधींनी मान्य केला तसेच लोकमान्य टिळक हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र काँग्रेस पक्षाला संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला मारक वाटू लागला. तसेच मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: महाराष्ट्रीय नव्हते, त्यांचा देखील मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
हे पण पहा :- मराठी बोधकथा
महाराष्ट्र एकीकरणाचा विषय इ.स. १९३८ रोजी पटवर्धन व इ.स. १९४० मध्ये ग.त्र्यं. माडखोलकरांनी देखील उपस्थित केला होता. माडखोलकरांनी महाराष्ट्रत व्यापार व उद्योग भूमिपुत्रांच्या ताब्यात नसल्याचं व महाराष्ट्राचे काँग्रेस पुढारी एकीकरणासाठी प्रयत्न करत नसल्याचे म्हटले होते. इ.स. १९४६ चे साहित्य संमेलन माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. या संमेलनात 'संयुक्त महाराष्ट्र समिती' स्थापन झाली व संयुक्त महाराष्ट्राची मागणी करणारे तीन ठराव साहित्यकांनी पाठवले ज्याला राजकीय नेत्यांनी देखील पाठिंबा दिला होता.
इ.स. १९४६ रोजी महाराष्ट्र एकिकरण परिषद भरलेली त्यात स.का.पाटील यांनी मुंबईला महाराष्ट्राची राजधानी करण्यास विरोध केला होता. तसेच डिसेंबर १९४८ रोजी प्रसिद्ध झालेल्या दार कमिशनच्या अहवालात भाषावर प्रांतरचनेला विरोध दर्शविण्यात आला होता व महाराष्ट्रीय लोकांवर अपमानास्पद टिप्पणी केलेली होती. जे.व्ही.पी कमिटीने देखील महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मागणीला पाठिंबा दिला नाही व मुंबई महाराष्ट्रात देण्यास विरोध केला होता.
हे पण पहा :- मराठी म्हणी व त्याचे अर्थ
महाराष्ट्रातील डाव्या पक्षांचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुरुवातीपासूनच मुंबईसह महाराष्ट्राला पाठिंबा दिला होता. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चळवळीला पाठिंबा दर्शविण्याकरिता अनेक ठिकाणी सभा त्यांनी घेतल्या होत्या. Republican Party of India हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतील एक घटक पक्ष होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी आचार्य अत्रे व डॉ. आर.डी. भंडारे यांनी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव ‘मुंबईसह महाराष्ट्र’चा ठराव Scheduled Caste Federation च्या वतीने मांडला. स्वातंत्र्यानंतर भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. परंतु भाषावार प्रांतरचेनेसाठी नेमलेल्या कमिशनाने महाराष्ट्र राज्याची ही मागणी डावलली.
हे पण पहा :- विरुद्धार्थी शब्द
फाजलअली यांच्या अध्यक्षेतेखाली १९५३ रोजी डिसेंबर मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. आयोगाचा निवाडा १९५५ रोजी जाहीत झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना वेगवेगळी लागू केलेली होती आणि त्यात संगती नव्हती. हैद्राबादसाठी एक भाषिकाच तत्त्व तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचं. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट होते तर मराठी भाषिक विदर्भ ,बेळगाव-कारवार बाहेर ठेवले होते. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळे ठेवणे योग्य नाही आणि बेळगाव भाग कर्नाटकाशी 'आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे कारण देण्यात आले तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त्व कमी होईल असे अहवालात नमूद करण्यात आले.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या बाबींच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा निर्माण झाला. त्यामुळे पंतप्रधान नेहरूनी सौराष्ट्रासह गुजरात, , विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशा त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठी लोकांमध्ये पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' हे या आंदोलनाचे घोषवाक्य बनलं. महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. असल्याचा आरोप करण्यात आला यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरली असे म्हटले जाते.
हे पण पहा :- मराठी प्रत्यय व प्रत्ययघटीत शब्द
महाराष्ट्रातील प्रजा, कम्युनिस्ट, सोशालीस्ट व समाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसेतरांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एस.एम.जोशी, प्रल्हाद केशव अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, भाई उद्धवराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. एस.एम. जोशी, श्रीपाद डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्र्यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकात संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला तर विरोधकांवर बोचरी व कठोर टीका केली. त्यांच्या भाषणातून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्याचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमर शेख, शाहिर अण्णाभाऊ साठे, शाहिर गव्हाणकर ह्यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.
२१ नोव्हेंबर १९५५ रोजी झालेल्या आंदोलनावेळेस पोलिसांनी केलेल्या गोळीबारामुळे १५ जणांना प्राण गमवावा लागला. इ.स. १९५६ रोजी जाने-फेब्रु महिन्यात केंद्रशासित मुंबईची घोषणा करण्यात आली त्यामुळे लोक रस्त्यावर उतरली. त्यांनी हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. तेव्हा आंदोलनात गोळीबार करण्यात आला त्यात ८० लोकांना प्राण गमवावे लागले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण १०५ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे प्रचंड सत्याग्रह घडवून आणला. चळवळीच्या काळात जनतेच्या असंतोषामुळे पंतप्रधान नेहरुंना महाराष्ट्रात सुरक्षारक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होत असे. भारताचे अर्थमंत्री सी.डी.देशमुखांनी महाराष्ट्रावरील होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.
हे पण पहा :- देशभक्ति गीत
१ नोव्हेंबर १९५६ ला केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून विशाल द्विभाषिक राज्य स्थापले. परंतु त्यात त्यांनी बेळगाव-कारवार वगळून टाकला. या द्विभाषिकाचे महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. या समितीने १९५७ सालची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. त्यात बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात निवडणुकीत या समितीला ३९८ जागांपैकी तब्बल १५५ जागांवर विजय मिळाला. स्वाभाविकच ही समिती प्रमुख विरोधी पक्ष बनली. आणि डाॅ. आर.डी.भंडारे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या विरोधी पक्षनेते पदाचा मान भुषविला. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व १९६२ ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. द्वैभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरात राज्याला १० कोटी द्यायचे व पुढील ४ वर्षात ती रक्कम कमी करत आणायची अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास व उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली असा दावा गुजराती भाषिक करत होते व त्याचं 'व्याज' म्हणून एकूण ५० कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. पंतप्रधान नेहरूंनी राज्याला हवे असलेले 'मुंबई' नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र' असे नाव ठरवले व राज्याची स्थापना १ मे १९६० साली कामगारदिनी झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी व नागपूर उपराजधानी निश्चित झाली. परंतु यासाठी महाराष्ट्रातील १०५ आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले.
हे पण पहा :- शब्दसमूहाबद्दल एक शब्द
२१ नोव्हेंबर १८५६ रोजी संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणारे हुतात्म्यांची नावे
- धर्माजी गंगाराम नागवेकर
- रामचंद्र लक्ष्मण जाधव
- के. जे. झेवियर
- पी. एस. जॉन
- रघुनाथ सखाराम बीनगुडे
- काशीनाथ गोविंद चिंदरकर
- करपैया किरमल देवेंद्र
- चुलाराम मुंबराज
- बालमोहन
- यशवंत बाबाजी भगत
- गोविंद बाबूराव जोगल
- सिताराम बनाजी पवार
- शरद जी. वाणी
- वेदी सिंग
- रामचंद्र भाटीया
- गंगाराम गुणाजी
- गजानन ऊर्फ बंडू गोखले
- निवृत्ती विठोबा मोरे
- आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर
- बालप्पा मुतण्णा कामाठी
- धोंडू लक्ष्मण पारडूले
- भाऊ सखाराम कदम
- शंकर खोटे
- पांडूरंग धोंडू धाडवे
- गोपाळ चिमाजी कोरडे
- पांडूरंग बाबाजी जाधव
- बाबू हरी दाते
- अनुप माहावीर
- विनायक पांचाळ
- सिताराम गणपत म्हादे
- सुभाष भिवा बोरकर
- गणपत रामा तानकर
- सिताराम गयादीन
- गोरखनाथ रावजी जगताप
- महमद अली
- तुळशीराम पुंजाजी बेलसरे
- देवाजी सखाराम पाटील
- शामलाल जेठानंद
- सदाशिव महादेव भोसले
- भिकाजी पांडूरंग रंगाटे
- तुकाराम धोंडू शिंदे
- विठ्ठल गंगाराम मोरे
- रामा लखन विंदा
- एडवीन आमब्रोझ साळवी
- बाबा महादू सावंत
- वसंत द्वारकानाथ कन्याळकर
- विठ्ठल दौलत साळुंखे
- रामनाथ पांडूरंग अमृते
- परशुराम अंबाजी देसाई
- घनश्याम बाबू कोलार
- धोंडू रामकृष्ण सुतार
- मुनीमजी बलदेव पांडे
- मारुती विठोबा म्हस्के
- भाऊ कोंडीबा भास्कर
- धोंडो राघो पुजारी
- ह्रुदयसिंग दारजेसिंग
- पांडू माहादू अवरीरकर
- शंकर विठोबा राणे
- विजयकुमार सदाशिव भडेकर
- कृष्णाजी गणू शिंदे
- रामचंद्र विठ्ठल चौगुले
- धोंडू भागू जाधव
- जोसेफ डेव्हिड पेजारकर
- चिमणलाल डी. शेठ
- भास्कर नारायण कामतेकर
- रामचंद्र सेवाराम
- अनंता
- गंगाराम विष्णू गुरव
- रत्नु गोंदिवरे
- सय्यद कासम
- भिकाजी दाजी
- अनंत गोलतकर
- किसन वीरकर
- सुखलाल रामलाल बंसकर
- पांडूरंग विष्णू वाळके
- फुलवरी मगरु
- गुलाब कृष्णा खवळे
- रावजीभाई डोसाभाई पटेल
- होरमसजी करसेटजी
- गिरधर हेमचंद लोहार
- सत्तू खंडू वाईकर
- गणपत श्रीधर जोशी
- माधव राजाराम तुरे(बेलदार)
- मारुती बेन्नाळकर
- मधूकर बापू बांदेकर
- लक्ष्मण गोविंद गावडे
- महादेव बारीगडी
- कमलाबाई मोहिते
- सीताराम दुलाजी घाडीगावकर
- शंकरराव तोरस्कर
- वासुदेव सुर्याजी मांजरेकर
- भिकाजी बाबू बांबरकर
- सखाराम श्रीपत ढमाले
- नरेंद्र नारायण प्रधान
- शंकर गोपाल कुष्टे
- दत्ताराम कृष्णा सावंत
- बाबूराव देवदास पाटील
- लक्ष्मण नरहरी थोरात
- ठमाबाई विठ्ठल सूर्यभान
- गणपत रामा भुते
- मुनशी वझीऱअली
- दौलतराम मथुरादास
- विठ्ठल नारायण चव्हाण
- देवजी शिवन राठोड
- बबन बापू भरगुडे
- विष्णू सखाराम बने
- सिताराम धोंडू राडये
सर्व हुतात्म्यांना माझा कोटोकोटी प्रणाम. जय महाराष्ट्र
हे पण पहा :- जागतिक आदिवासी दिन
तुम्हाला महाराष्ट्र दिन माहिती | Maharashtra Din Mahiti ( Information ) | Maharashtra Din bhashan | Maharashtra Din Speech in Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box