मराठी बाल गीत | Marathi Balgeet Lyrics | Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, September 20, 2023

मराठी बाल गीत | Marathi Balgeet Lyrics | Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics

Marathi Balgeet Lyrics

मराठी बाल गीत

Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics

मराठी बाल गीत | Marathi Balgeet Lyrics | Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics

मराठी बाल गीत ( Marathi Balgeet Lyrics | Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics )

            मराठी बाल गीत ( Nursery Rhymes | Bal Geet ) बालकांच्या मनोरंजनासाठी गायली जातात. बालकांच्या मनोरंजन तसेच परिसरातील गोष्टींची माहिती व्हावी यासाठी असे बाल गीत ( Nursery Rhymes | Bal Geet ) गायले जातात. असेच काही मराठी बाल गीत व त्यांचे लिरिक्स ( Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics | Marathi Bal Geet ) येथे दिलेले आहेत. आशा करतो की ते तुम्हाला आवडतील
            चला तर पाहूया मराठी बाल गीत व त्यांचे लिरिक्स ( Marathi Balgeet Lyrics | Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics )



Marathi Balgeet Lyrics

बाल गीत

Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics

अ.क्रबाल गीत
०१कशासाठी पोटासाठी 
०२ए आई मला पावसात जाउ दे 
०३असावा सुंदर चॉकलेटचा बंगला 
०४अग्गोबाई ढग्गोबाई 
०५अ आ आई, म म मका 
०६झुक झुक झुक झुक आगीनगाडी
०७छडी लागे छमछम 
०८चांदोबा चांदोबा भागलास का ? 
०९कोणास ठाऊक कसा ?
पण सिनेमात गेला ससा !
१०पप्पा सांगा कुणाचे ?
११नाच रे मोरा, अंब्याच्या वनात 
१२तुझ्या गळा, माझ्या गळा 
१३सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
१४शाळा सुटली, पाटी फुटली
१५रविवार माझ्या आवडीचा


कशासाठी पोटासाठी

Kashasathi potasathi balgeet


कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी ?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दो डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी ? पोटासाठी !


हे पण पहा :- मराठी बोधकथा

ए आई मला पावसात जाउ दे

Ae aai mala pavasat jau de balgeet


ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल्‌ ते होऊ दे


असावा सुंदर चॉकलेटचा बंगला

Asava sundar chokaletcha bangala balgeet


असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला



अग्गोबाई ढग्गोबाई

Agaobai Dhagobai Balgeet


अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव


हे पण पहा :- देशभक्ति गीत

अ आ आई, म म मका

A aa aai balgeet


मी तुझा मामा दे मला मुका

प प पतंग आभाळात उडे
ढ ढ ढगांत चांदोमामा दडे
घ घ घड्याळ, थ थ थवा
बाळ जरि खट्याळ, तरि मला हवा

ह ह हम्मा गोड दूध देते
च च चिऊ अंगणात येते
भ भ भटजी, स स ससा
मांडिवर बसा नि खुदकन हसा

क क कमळ पाण्यावर डुले
ब ब बदक तुरुतुरु चाले
ग ग गाडी झुक झुक जाई
बाळ माझे कसे गोड गाणे गाई


झुक झुक झुक झुक अगीनगाडी

Zuk zuk agingadi balgeete


धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

छडी लागे छमछम

Chhadi lage chham chham balgeet


छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोर्‍या मूर्खा !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌

चांदोबा चांदोबा भागलास का ?

Chandoba chandoba bhaglas ka balgeet


चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !

आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?

आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?

चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला 'ओ' माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हांला दिसशील का ?



कोणास ठाऊक कसा ? 

पण सिनेमात गेला ससा !

Konas thauk kasa balgeet


कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा !
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान,
सा नि ध प म ग रे सा रे ग म प
दिग्दर्शक म्हणाला, "वाहवा !", ससा म्हणाला, "चहा हवा !"

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा !
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, "छान छान !", ससा म्हणाला, "काढ पान !"

कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा !
सशाने म्हंटले पाढे
बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रीक सहा, बे चोक आठ आणि घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, "शाब्बास !", ससा म्हणाला, "करा पास !"



पप्पा सांगा कुणाचे ?

Papa sanga kunache balgeet


पप्पा सांगा कुणाचे ? पप्पा माझ्या मम्मीचे !
मम्मी सांगा कुणाची ? मम्मी माझ्या पप्पांची !

इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहातात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती !

आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीनें घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा !

पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे !



नाच रे मोरा, अंब्याच्या वनात

Nach re mora ambyachy banat balgeet


नाच रे मोरा, अंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच !

ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !

तुझ्या गळा, माझ्या गळा

Tuzya gala mazy gala balgeet


"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखी कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखी गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखी शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."

"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"



सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?

Sang sang bholanath balgeet


सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

Read Also :- Body Parts Name

शाळा सुटली, पाटी फुटली

Shala sutali pati futali balgeet


शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली

शाळा सुटता धावत सुटले
ठेच लागुनी मी धडपडले
आई मजला नंतर कळले
नवीन कोरी पाटी फुटली

धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली

सायंकाळी जाउ दे मला
पटांगणावर खेळायाला
तिथे सोबती वाट पाहती
दे ना खाऊ, भूक लागली



रविवार माझ्या आवडीचा

Ravivar mazya avdicha balgeet


एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा

सोमवारचा असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा

भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा

घेऊन तोफा आणि तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझा नावडीचा


हे पण पहा :- इंग्रजी बोधकथा

            तुम्हाला बाल गीत | Nursery Rhymes in Marathi lyrics | Bal Geet in Marathi Lyrics | Children's songs| Marathi Bal Geet | Bal Geet Marathi ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad