Marathi Charolya
मराठी चारोळ्या
Marathi Charoli
मराठी चारोळ्या ( Marathi Charolya | Marathi Charoli ) :-
मराठी चारोळ्या ( Marathi Charolya | Marathi Charoli ) ह्या आपल्याला सूत्रसंचालन. भाषण, वक्तृत्व स्पर्धा तसेच आपले विचार वजनदार व प्रभावीपणे मांडण्यासाठी मराठी चारोळ्या ( Marathi Charolya ) फार उपयोगी आहेत. तुम्हाला यासर्वांचा नक्कीच फायदा होईल यास्तव आपल्यासाठी या लेखात अशाच काही मराठी चारोळ्या ( Marathi Charolya ) दिलेल्या आहेत यामध्ये प्रेरणादायी मराठी चारोळ्या ( Motivational charoli in marathi ) जीवनावर मराठी चारोळ्या ( Marathi Charolya on life ), रोमँटिक चारोळ्या मराठी ( Romantic charolya marathi ) मराठी चारोळ्या प्रेमाच्या Marathi Charolya Premachya.) (Marathi Charolya On Love) चला तर मग बघूया मराठी चारोळ्या ( Marathi Charolya ).
मराठी चारोळ्या
[ Marathi Charolya | Marathi Charoli ]
इतरांशी तुलना करून
इथं बरेच होतात दुःखी
जे स्वतःशी तुलना करतात
तेच असतात सुखी.
सुखात सोबत असणारे
सर्वच खरे नसतात
जे दुःखात साथ देतात
तेच फक्त हिरे असतात.
वेळ जीवनात
सर्वकाही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरं कुणीच शिकवत नसते.
हरण्या- जिंकण्यासाठी
कधीच खेळू नये
एकदा पुढे गेल्यावर
शिकल्याशिवाय मागे वळू नये.
हे पण पहा :- मराठी बोधकथा
ओले त्या धुंद क्षणांची
सर आठवणींची ओली
ओंजळीत मी धरलेला
पाऊस तुझा मखमली…
ना बोनस ना भत्ता
भीक मागते सत्ता,
लालदिवे बाकी अन
सरकार बेपत्ता.
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……
काल रात्री आकाशात
चांदण्या मोजत होतो,
निखळणा-या प्रत्येक
ता-याजवळ तुलाच मागत होतो.
तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण आहे,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
हस-या या चेह-यामागे,
खूपसं दुःख दडलेले…
काहींना ते हसणेही,
कधी ना पहावलेले
कुणी सत्तर वर्ष जगते
तर कुणी तिशीतच जाते
जो दुसऱ्यासाठी जगते
शेवटी तोच लक्षात राहते.
दररोजच्या आयुष्यात
फक्त पैसे कमावत न बसावं
आता किती श्वास शिल्लक आहेत
कधीतरी हे ही मोजून बघावं.
हे प्रेमाचं असचं असतं..
थोडसं अवघड अन थोडं सोप असतं..
पण एकदा जमायला लागलं की
ते आपोआपच घडत असतं..
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……
अंतर ठेवून ही
बरोबरी राखता येते
दूर राहून ही प्रेमाची
गोडी चाखता येते.
हे पण पहा :- साहित्यिक, कवी व लेखक आणि त्यांची टोपण नावे
रात्री वारा सुटलेला,
आणि पाऊस पडत होता,
सहज वर पहिले तर चक्क,
चंद्र रडत होता
मनातले सारे तिला सांगण्याचे
मी नेहमीच ठरवत होतो
समोर ति आल्यावर मात्र
नेहमीच मी घाबरलो होतो
अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस
आज परंतु सन्मानाने
सारे त्याला खाऊ घालती
वर्षाकाठी फक्त काही दिन
पूर्वज आपले त्यात पाहती..
चांदणं तेच असलं तरी,
रात्र अगदी नवीन आहे,
आयुष्य मात्र एकदाच का?
हा प्रश्न जरा कठीण आहे…
शब्दांना भावरूप देते तेच खरे पत्र
नात्यांना जोडून ठेवते तेच खरे गोत्र
नजरे पाड्याल पाहू शकतात तेच खरे नेत्र
दूर असूनही दुरावत नाहीत तेच खरे मित्र
हिवाळ्यातील ही गुलाबी हवा
सोबत तू ही असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी
तुझ्या न माझ्या प्रेमाला गंध,
कस्तुरीचा असावा.. जीवनातील
प्रत्येक क्षण, फक्त तुझ्या सहवासात
जावा, कधी आला दुरावा जीवनात,
तो क्षण शेवटचा असावा…
अकड तो मेरे फितरत में नही है
झुकना तो मेरे लिए मुश्किल नहीं हैं
फिर भी अड़े रहते है कुछ उसूल तसव्वुफ पर
बड़ी अजीब सी हैं गुरुर को मरोड़ के खाने में
घेता जवळी तू मला,
पारिजात बरसत राहतो…
हळव्या क्षणांच्या कळ्या
देहावर फुलवत राहतो…
आठवणी सांभाळणे सोप्प असत,
कारन मनात त्या जपून ठेवता येतात,
पण क्षण सांभाळणे फार अवघड असत,
कारण क्षणांच्या आठवणी होतात.
आठवणीतला पाऊस नेमका,
तुझ्या घरापाशी बरसतो,
माझा वेडा चातक पक्षी इथे,
एका थेंबासाठी तरसतो
कधी कधी अनोळखीच
जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र
नंतर.. अनेक वाटा फुटतात
गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमध्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,
हळुवार जपून ठेवलेले क्षण,
तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे
लढाईत हरलात
तर पुन्हा जिंकता येईल
पण मनाने हरलात तर
जगणं कठीण होईल.
पाहिजे असलेलं मिळवण्यासाठी
कुणाला काबाडकष्ट करावे लागते,
तर कुणाला ते जन्मजातच मिळते
मित्रहो जिंदगी ही अशीच असते.
दुःखाने कितीही घेरलं तरीही
चेहऱ्यावर आनंद असावा
जे मिळणार नाही प्रयत्नानंतरही
त्याचाही मनापासून स्वीकार करावा.
दुःख काय असतं
हे कळतं सगळ्यांना
मात्र दुःखात सुख शोधण
नसेल जमत सगळ्यांना.
सांग कसा गं राहू, तुझ्या
प्रेमापासून दूर असा..
वाट पाहणाऱ्या हृदयाला,
मी समजावणार कसा.
माया ममता गोड झाल्या
एक झाला लालू बालू
शरदाच्या चांदण्यात आपण
चला जय बांगला बोलु
हे पण पहा :- स्वर संधी
जन्माला आलास,मुठी वळून आलास
आयुष्यभर त्यात काही साठवत राहिलास
पण अंती काहीही नव्हते भरले त्यात,
जाताना तू रिक्त हस्तानेच गेलास.
आठवणींतल्या आठवणींना
हळुच आठवायचं असतं.
डोळे पान्हावलेले असले तरी
मंद गालातल्या गालात हसायचं असतं.
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
वाळकी पानं पडतात ना
सोसाट्याचा वारा सुटल्यावर
तशी तुझी स्वप्नं पडत राहतात
कधी चुकून डोळे मिटल्यावर
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं
शेवटचं आज जाताना ,
मागे वळून पाहणं नव्हतं…
तेव्हाच कळलं मला ,
सारंच आता संपलं होतं
शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो
गुण दोषांचा स्वीकार तू
माझ्यावरचा अधिकार तू,
शब्दांमध्ये आकार तू
प्रेमामध्ये साकार तू,
घट्ट लावुन घेतलेली दारं
बाहेर “वेल-कम”चं तोरण
अहो, हे कसलं घर बंद करुन
स्वागत करायचं धोरण..?
तुझ्या स्वप्नील डोळ्यांत
मी स्वतःला शोधत होतो
तुला हसताना पाहुन
मी नेहमीच हरवत होतो.
तो चंद्र आणि मी
आठवतं प्रिये तुला
दोघेपण कसे गोड हसतो
हे सांगत होतीस मला..
तो चंद्र नभीचा भुलवतो बघ
मज शीतल प्रेम लहरींनी
आंस परी जळण्याची मजला
मी तुझीच रे दिवाणी.
प्रेमाला नात्यात बसवणं
खुपदा प्रेमाला घातक ठरतं
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरतं.
तो चंद्र नभीचा भुलवतो बघ
मज शीतल प्रेम लहरींनी
आंस परी जळण्याची मजला
मी तुझीच रे दिवाणी.
प्रेमाला नात्यात बसवणं
खुपदा प्रेमाला घातक ठरतं
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या दृष्टीने पातक ठरतं.
थेंबोथेंबी मग दिसतो
मज हसणारा तो चेहरा
थोडासा सावळ, निळसर
अन् थोडा रंगबिलोरा.
कसं फुललं ना ?
तुझं अन् माझं नातं
एक चिंब दवबिंदु
अन् एक आळवाच पातं.
प्रेमात जरी “पडलो” तरी,
आम्हाला कधीच “लागत” नाही..
कारण एकीवर प्रेम करून,
आमचं कधीच “भागत” नाही…!
तू समोर असतेस,
तेव्हा बोलू देत नाहीस..
तू समोर नसतेस,
तेव्हा झोपू देत नाहीस…
निसर्गाला रंग हवा असतो,
फुलाला गंध हवा असतो,
माणूस हा एकटा कसा राहणार,
कारण, त्यालाही प्रेमाचा छंद हवा असतो…
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळी पडून हसेल ती,
कारण नसतांना खोटेच रुसेल ती,
काय माहित माझी प्रिया कशी असेल ती…
हे पण पहा :- म्हणी व त्याचे अर्थ
सरलेल्या आयुष्यात ही
थोड्या आठवणी आहेत,
सुखाचे क्षण जरी विसरले
त्या आठवणी सोबतीला आहेत
शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना
स्वप्नांच्या मागे धावु नकोस,
स्वप्न सगळीच पूर्ण होत नाहीत…
उरतात ते फक्त उसासे,
अश्रु पण खाली ओघळत नाहीत
हलकेच येऊन कानात ,
तुला सांगायचंय काही…
मिठीत तुझ्या येऊन ,
थोडं रहायचंय राणी…
कुणी आपल्याला दुखावल्यावर
चेहऱ्यावर आनंद ठेवता आला पाहिजे,
वादळे बरीच येतील जीवनात
त्यांच्याशी सामना करता आला पाहिजे.
कुणी सोबत असेल तर
खूप मस्त आहे जिंदगी
पण फक्त पैसाच असेल सोबती
तर मात्र त्रस्त आहे जिंदगी.
गरिबाला जेव्हा
हसताना पाहिलं,
पैशाचं महत्व माझ्यासाठी
तेव्हा कमी झालं.
कुणाला पैशाची कमतरता,
कुणाला आरोग्याची, अन नात्यांची चिंता
सर्वगुणसंपन्न इथं कुणीच नसते,
मित्रहो जिंदगी ही अशीच असते.
ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,
मंद-मंद असा सुवास आहे,
आजही आठवतोय तोच पाऊस,
अडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.
कुठेतरी कधीतरी तुला
डोळे भरून पाहावंसं वाटत.
पापण्या मिटता मिटता
डोळ्यातला पाणी टचकन खाली येत.
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात,
आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यानी आणि
पुन्हा तुझी आठवण आली…
नजरेत जरी अश्रू असले,
तरी ओठांवर हास्य असावं..
ओठांवरच्या हास्यामागे,
नजरेतल्या अश्रूंना लपवावं…
यश कुणासाठी, अपयश कुणासाठी
जीवनभर फक्त राग का इतरांसाठी
जो आला जन्माला, तो जाईल एकदिवस
मग एवढा मनात अहंकार कशासाठी.
आपले डोळे बंद झाल्यावर
इतरांच्या डोळ्यात अश्रू यायला हवे
ज्यांनी जीवनभर त्रास दिलाय
त्यांनीही गुणगान गायला हवे.
हे पण पहा :-शब्दांच्या शक्ती
ढग येतात पण पाऊस पडत नाही,
आठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,
काय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,
सांग प्रिये मी तुला कसे विसरू.
नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर.
आयुष्य हे तुझ्याशी बांधलेले ,
मन असे प्रीत सरीत भिजलेले ,
माझे मी पण कुठे उरले सख्या
कसे जपू परिस मज गवसलेले ?
आयुष्याचे क्षण म्हणजे
पाणी अलवावरचे
रित्या मनाची करून ओंजळ
जमतील तितके वेचायचे..
काही नको मला
फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात
येण्याची तुझी आस हवी..
काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये
पहाटेस फिरता फिरता
अवचित नजर पडली
सलाम तुला हे फुला,
तुझी जगण्याची जिद्द मी पहिली.
नाही स्थल नाही जल
सारीकडे पाषाण अन धूल
परी फुलणारे तुझे जीवन,
मला काहीतरी सांगून गेले.
गवतावरील दव-बिंदू
म्हणजे तुझे तारुण्य
तुझी मीठी म्हणजे
प्रेमाचे अरण्य.
चांद भरली रात आहे,
प्रियकराची साथ आहे..
मोगऱ्याच्या पाकळ्यांची
मखमली बरसत आहे.
कधी अचानक रुसतेस
मनापासुन हसतेस तू,
साद घालते मनास
ऐसे जीवन गाणे तू,
सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवी किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू..
अतुल प्रदीप राहुल हेमंत,
मित्र माझे केवढे, एक जण फक्त
ज्युस पितो, बाकी पक्के बेवडे…
हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ‘जातोय तोल?’
माझ्या मित्रा, माझ्या इतकी
पचवून दाखव, नंतर बोल…!
वाट पाहतो तुझ्या येण्याची,
तू येऊन माझी होण्याची,
सारे काही तुला देऊनी,
तुझ्यात हरवून जाण्याची…
तुझे मन आरशासारखे
स्वच्छ आहे, दुधासारखे
व पाण्यासारखे निर्मळ आहे,
म्हणूनच, तुझ्यावर फिदा आहे…
प्रेम एक आठवण आहे,
हळुवारपणे जिवलग माणसाशी,
हृदयात केलेली, साठवण आहे…
गाणाऱ्या पक्षाला विचार,
झुळझुळणाऱ्या वाऱ्याला विचार,
झगमगत्या ताऱ्याला विचार,
उसळत्या दर्याला विचार,
सारे तुला तेच सांगतील,
मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो…
पवित्र हे माझे प्रेम अर्थ वेगळा
काढू नकोस.. उठता बसता
आठवण येते ती हिरावून घेऊ
नकोस.. उत्तर मजला देशील का,
माझ्याशी मैत्री करशील का…?
हिरवे हिरवे पान,
त्याला हिरवा हिरवा देठ..
माझी आठवण आली कि,
मला स्टेशनवर येऊन भेट…
तुझा स्पर्श मला नवीनच जाणवला
कधीतरी सांडून पुन्हा नव्याने गावलेला
मरण असेल तर ते तुझ्या मिठीत असावं
नाहीतर आयुष्य जगणं तुझ्यासोबत असावं
सये रोज नव्याने दरवळतो
तुझ्या आठवणीचा सुगंध
मग उगाचच जडतो जीवाला
तुला आठवायचा वेडा छंद
सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते
हल्ली मला भावनांचा
थांगच लागत नाही ,
क्षणभरही मनाला आता
उसंत मिळत नाही
हे पण पहा :- रस व त्याचे प्रकार
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,
आहे जे मिळालेलं
ते मनापासून सांभाळावे
जे मिळवायचं असेल त्यासाठी
प्रामाणिक प्रयत्न करत रहावे.
ना कुणासोबत तुलना
ना कुणाचा द्वेष करावा
आपल्या ध्येयाचा पाठलाग
मनापासून करत राहावा.
पाऊस कधीचा पडतो,
झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने
वाट्यास सुखांपेक्षा दुःखेच जास्त
जाहली जरी स्वप्ने उद्ध्वस्त
दुःखातही सुखास पाहून घे,
प्रत्येक क्षण जगून घे.
जीवनाच्या या बुद्धिपटांत आपण
अथक खेळी खेळत असतो
वेळेचेही नियमित भान राखून,
स्व-कौशल्याने ती जिंकत असतो.
माजवला चक्री-वादळाने पुरता हाहाकार
भुईसपाट झाली होती झाडे समूळ
उखडून मातीतून आली वर कलेवरे,
वृक्ष आजानूबाहू पडलेत उन्मळून.
असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात…
असे नाते बनवा की, त्याचा
अंत केव्हाच नसावा…
प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश
शेवटपर्यंत असावा…
मला आवडतो पाऊस,
गुलमोहराला फुलावणारा,
अन, तेवढ्याच मायेने,
बाभळीला हि झुलवणारा.
मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून
सहवासाच्या वेलीवर प्रीतीचे फुल
केव्हा उमलल कळलच नाही,
तु माझी, तु माझी म्हणताना,
मी तुझा केव्हा झालो कळलचं नाही
सांग कसा गं राहू, तुझ्या
प्रेमापासून दूर असा..
वाट पाहणाऱ्या हृदयाला,
मी समजावणार कसा
हसतेस इतकी सुंदर की,
तुझ्याकडे बघत बसतो…
आठवणीत मग तुझे ते
गोड हसणेच पाहत असतो…
सत्ता हाती हवी म्हणून
तळवे चाटतात परकीयांचे
खोटी आश्वासाने देऊन देऊन
पैसे खातात स्वकियांचे
विश्वास स्वतःवर ठेवला
तर कठीण काहीच नाही
आणि दुसऱ्यावर ठेवत राहिले
तर या जगी सोपं काहीच नाही.
डोळ्यात ज्यांच्या कधी
अश्रू दिसत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्यांना कधी दुःख होत नाही.
जे मिळालेल आहे
ते सांभाळून ठेवावं
अन जे मिळवायचं आहे
त्यासाठी प्रयत्न करत राहावं.
आल्या कितीही अडचणी
तरी आनंदाने लढत राहावं
जीवन आपलंच आहे
त्याच्यावर प्रेम करत राहावं.
कुणी, आपल्यावर कोणाचा
भरवसा नाही म्हणून रडतो
तर कुणी, आपण इतरांवर
भरवसा ठेवला म्हणून रडतो.
जीवनाच्या प्रवासात
अनेक लोकं भेटतात
साथ देणारे कमी अन
सोडून जाणारेच जास्त असतात.
श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
ऊनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात
हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला
मैत्री या शब्दावरच माझं
मनापासून प्रेम आहे,
आणि… तुझंसुद्धा अगदी,
माझ्यासारखं सेम आहे…
सलाम मैत्रीला!
मैत्री म्हणजे, तुझे मन
आपोआप मला कळणं,
मैत्री म्हणजे, माझ्या मनाचं
नातं तुझ्याशी जुळणं…
प्रेमाचे गुंतवून धागे,
दूर अशी जाऊ नकोस..
मलासुद्धा मन आहे,
हे विसरून जाऊ नकोस…
एकदा मला ना, तू माझी
वाट पाहतांना पाहायचंय..
तेवढ्यासाठी आडोशाला,
हळूच लपून रहायचंय…
स्वतःच ह्रदय मात्र
माझ्याकडे ठेवून गेलंय.
तुझ्यात काही खास आहे
म्हणूनच तुझ्यावर मरतोय…
माझ्या कवितेची प्रत्येक
ओळ तुझ्याचसाठी लिहतोय.
जगतोय तुझ्या प्रेमासाठी,
हजारो संकटे झेलतोय तरी…
खरच तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही ……
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!
अखंडीत लिहिले
अनेक जणींना प्रेमपत्र
प्रेम नाही जुळले तरी
अक्षर सुधारले मात्र
हे पण पहा :- देशी शब्द
अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळण
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणे..
अलगद का होईना
तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काही काळ का असो
माझ्या खांद्याचा तू आधार घेतला होतास
अलगद धरलेला हात तू
अलगदच सोडला होतास
आणि स्वप्नात बांधलेला संसार
तू अलगदच मोडला होतास
इतरांच्या सुखावर जळणारे
इथं बरेच आहेत
दुःखाला सामोरे बघून
इथं पळणारे पण बरेच आहेत.
चेहऱ्यावरचा आनंद
कधी जायला नको
दुःखाला पाहून
डोळ्यात पाणी सुद्धा यायला नको.
हजार वेळा तुला पहावे
असेच काही तुझ्यात आहे
मिटुन ङोळे पुन्हा बघावे
असेच काही तुझ्यात आहे.
तुझ्या प्रेमाची चाहूल लागताच
झाडे वेलीं हलू लागतात
आणि माझ्या मनामध्ये
शब्द जुळू लागतात.
ओघळणारे अश्रू कधी
जिकंत वा हरत नाहीत,
भावनाच रडतात सार्या
आठवणी कशा सरत नाहीत?
ओठ माझे तुझ्या ओठांवर ,
येऊन विसावतात…
ते क्षण एकांतात आठवले ,
तरी लाजवतात…
आज वारा वाहतोय
त्या माळरोपाच्या लयीत,
आणि आता तूझंच नाव येतय
माझ्या प्रत्येक ओळीत…
आज सारे विसरली तू
नावही न येई ओठांवर…..
कसे मानू तू कधी
खरे प्रेम करशील कुणावर……
अबोल शब्दातही
प्रीतीचा एक अर्थ आहे
माझ्या मनाच्या स्वप्नासाठी
माझे प्रेम नि:स्वार्थ आहे..
अमृत समान आहे आईचे स्वरूप
त्यात सामावले विश्वरूप
तरी ती आहे मांगल्य रूप
तरी बनावे तीर्थरूप
जीवनात जो नेहमी
संघार्षाच्या वाटेवर चालतो
जो काळ्यारात्रीला सुद्धा हरवू पाहतो
तोच उद्याचा सूर्य म्हणून उगवतो.
जीवनात सर्वांना नेहमी
आनंदच मिळत असतो
इतरांचं सुख पाहून
उगाच आपण दुःखी होतो.
हसत राहतो नेहमीच
मनातले दुःख लपवण्यासाठी…
सुखच मिळत नाही
तेवढं खरंखुर हसवण्यासाठी…
जो बाण मारतो त्याला तो
विसरून जाणं सोपं असतं…
पण ज्याच्या हृदयावर बाण बसतो,
त्यालाच त्याच्या वेदना समजतात…
कधी तू कधी मी
एकमेकांशी भांडू ….
राग ओसरल्यावर मात्र
पुन्हा प्रेमाचा नवा डाव मांडू….
गुलाबासारखे
रूप तुझे देखणे
ओठातल्या शब्दांनी
धुंद मला करणे..
जीभेला सांभाळायला शिका,
तिचा तोल गेला की माणसं
गमवण्याची वेळ येऊ शकते.
मन हलक असावं पण हलकट नको
सर्यातूनी निसटता यावं पण तेलकट नको
मन माती सारखं असावं पण मातकट नको
मन खट्याळ असावं पण वात्रट नको..
घेता तुज जवळी एकदा
लक्षलक्ष या हातांनी
जळून होशील भस्म त्वरित
दिसशील मज ना पुन्हा कधी
फस्त केली दुःखे सारी मी ताटातली
नशीब पुन्हा पुन्हा का बाढून जाते
मी मांडली कुंडली डोळसपणे
आयुष्य अंधपणे फाडून जाते
किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही..
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही…
किती वाट पहायची ,
तुझ्या होकाराची ?
संपत आलीये आता
लेखनी माझ्या जीवनाची
आठवणी मात्र येत असतात,
मी अश्रू पुसत राहते..
जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहील.
आठवणी विसरता येतात,
पण प्रेम नाही विसरता येत…
मग तू मला कशी विसरलीस…
नाही सहन झालं दुःख
तर थोडं रडून घ्यावं
दुःख सावरताना मग
सुखासाठी पण तयार असावं.
हे पण पहा :- शब्दयोगी अव्यय
जे असतील नाराज
त्यांना एकवेळ समजावून बघावं
तरीही नाही समजतील
तर त्यांच्यापासून कायम दूर राहावं.
माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.
प्रेमात नसावा आकस
प्रेमात नसावी इर्षा
एकमेकांवरील विश्वास
हीच असते प्रेमाची अपेक्षा.
अजून आठवे ती रात पावसाळी,
मने धुंद वेडी भिजून चिंब झाली…
जरा स्पर्श होता सुटे कंप हाती,
नको बंध आता अशा धुंद राती…
अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना…
तुझ्या मनमोहक हास्यामध्ये,
माझे मीपण हरवून बसलो..
मला न माहित, कधी न कळले,
कसा कुठे अन केंव्हा फसलो…
माझ्या डोळ्यातील, कधीतरी
वाचून पहा भाव, त्यात फक्त
दिसेल तुला, प्रिये, तुझे नाव…
श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
सृष्टीने कधीतरी करून
फेडलेला नवस
सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो.
सनी गणेश अमोल सागर
मित्र माझे केवढे
एक जण पक्त ज्युस पितो
बाकी पक्के बेवडे.
लोक जवळ आले की
साळसूदपणे #परकी वागतात,
खोट्या #जखमा खोटीच फुंकर
बेमालूमपणे खोटं जगतात
सारखचं वाटतं पाऊस पडावा,
तू सोबत असताना…
ओढणी धरावीस डोक्यावर
पावसाचा थेंब पडताना
स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही
ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय
काहीच मागत नाही
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही
सोबतीला असे आज ही सांज ओली
अवेळी आठवांचे धुके दाटलेली…
ऋतू जीवघेणे किती विसरावे..
पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली
हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी
शिकार करायला लागल्यावर
तू गळ घेऊन आलास…
पाण्यात खूप मासे होते
पण तू जलपरी मागे धावलास
हताश नाही व्हायचं
प्रेमात धोका मिळाला तर,
जगायचं त्यांच्यासाठी ज्यांनी
जीव लावलायं आपल्यावर
स्वतःचं मन मारून
तुला बरं जगता आलं
आपल्यांशी देखील तुला
परक्यासारखं वागता आलं
आधीच नाक तुझं एवढे एवढे,
त्यावर रागाचे ऒझे केवढे.
नजर तर अशी करारी,
कि काळजाला नुसते जखमांचे धडे
आन्तरीचा भावन्नाना
शब्दाची गरज नसते.
निशब्द नजरेला ओळखण्याचे
सामर्थ्य मात्र लागते…….
हे पण पहा :- द्वंद्व समास
अर्जुनाला जेव्हा
प्रश्न पडला युद्धाचा
तेव्हापासून महाभारत
विषय बनला श्रध्देचा
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक “सभ्य” म्हणुन ओळखतात..
प्रेमात तुला दूर करणे कठीण आहे,
हा विरह सहन करणे कठीण आहे,
सोपे वाटते तुझ्या आठवणीत मरणे,
कारण तुला विसरून जगणे कठीण आहे…
सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना
संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत…
मनही काहिसं जुनचं
तेही नवी तार छेडतायत…
हातात टच फोन असणं
हे आजच्या वेळी गरजेचं आहे
पण सगळ्यांच्या टच मध्ये राहणं
हे चांगल्या जीवनासाठी गरजेचं आहे.
एकदा अहंकार चढला की मग
माणसाला माणूस दिसत नाही
दिव्याला जसा मग
त्याखालचा अंधार दिसत नाही.
कशीही असली जिंदगी
तरी नेहमी आनंदी राहावं
एक संकट गेलं तर
नेहमी दुसऱ्यासाठी सज्ज असावं.
क्षण सरून गेलेले
आज आठवती पुन्हा
जुण्या आठवांची जखम
देई दर्द पुन्हा पुन्हा..
क्षणात होत उदास मन
कस काही बोलत नाही?,
स्वप्नात ते हरवून जातं
त्या आठवणिं संपत नाहीत
खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या तरी
आपल्याच विश्वात रमणारं!
कोवळ्या उन्हात न्हाऊन
नखशिखांत तु नटलेली,
जणु सोंजळ ती फुलराणी
ओली आताच फुललेली.
क्षण असा एकही जात नाही
की तु माझ्यासवे नाही
नेहमीच असते मी तुझ्या सहवासात
सारखाच ध्यास असतो तुझ्याच मनात
खरचं तुझ्या आठवणींना
दुसरी कुठलीच तोड नाही..
तुझ्या आठवणी झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही…
सखे तू अशी नेहमी
वेड लावून का जातेस
डोळे मिटले कि तू
स्वप्नात येऊन जातेस
सख्या रे काय सांगु तुला
जीव माझाच मजवरी उधार झाला
या वेड्या सखीने तर तो ही
मजपासुनी दुर नेला
श्वासात फक्त मी नाही माझा
प्राण तुझ्यात जडला आहे,
शरीरं असल माझ, मनाने
तुझ्या रुपात हरवलो आहे
मानवतेच्या या दुनियेत
माहीत नाही किती दिवस राहू
पण इथून जातांना मात्र
लोकांच्या मनात घर करून जाऊ.
जंगली हिंस्र जनावर
फक्त शाररिक वेदना देतात
पण समाजातील वाईट लोकं
अवघी बुद्धीच पोखरून घेतात.
मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे !!!!
या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा …..
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा !!!!
हळूच चालत तुझ्या रूपाने
नशीब येईल दारी …
मला न कळता अशी अचानक
घडेल किमया सारी
आयुष्यातील सारे दुःख
या डोळ्यांसमोर फिके आहे
कारण आता नजरेसमोर
तुझ्या आठवणीचेच धुके आहे
आवडतो तो स्पर्श तुझा
अन जेव्हा माझ्या केसांतून
हात तुझा फिरायचा
तुझ्या हातातले ते फुल
माझ्या केसांत तू मळायचा …
हे माझे, ते माझे, सारेच माझे
हयात घालवलीस करण्यात सारे तुझे
पण भोपळा फुटला होता भ्रमाचा,
फुका माया-मोहात गुंतून राहण्याचा.
काही नाही घेऊन तू जाणार
सारे सारे काही येथेच रहाणार
फक्त तुझे सद्-वर्तनाचेच नाव होणार,
तुझ्या पाठी जग तुझे नाव घेणार.
सुख-दुःखाचे आहे काटयांनी भरलेले
खडतर जीवनही सहून घे
जीवनाचे आहेत रंग-ढंग न्यारे,
आनंदाचे उमाळे, दुःखाचे सुस्कारे.
क्षणभंगुर जीवनाचा हा दंव-बिंदू
अळवावरच्या पानावरील गतिमान जल-बिंदू
पहाता-पहाता जाईल विरून,
जाईल तुज जगही विसरून.
परिचयातुन जुळते ती मैत्री
विश्वासाने जपते ती मैत्री
सुखात साथ मागते ती मैत्री
आणि दुःखात साथ देते ती मैत्री
मैत्री म्हणजे, आपल्या विचारात,
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे, न मागता समोरच्याला,
भरभरून प्रेम देणं असतं…
पंखहीन असतील जरी अश्रू
तरी प्रवास अबोल भावनांतून होतो,
ह्या डोळ्यातला मोती क्षणात
समोरच्या डोळ्यातुन ओघळतो
हे पण पहा :- उपसर्गघटित शब्द
कोल्ह्यांची जमली टोळी
सिहांची शिकार करणार
सगळे भ्रष्टाचारी आत्ता
देश भ्रष्टाचार मुक्त करणार
पंखहीन असतील जरी अश्रू
तरी प्रवास अबोल भावनांतून होतो,
ह्या डोळ्यातला मोती क्षणात
समोरच्या डोळ्यातुन ओघळतो
कोल्ह्यांची जमली टोळी
सिहांची शिकार करणार
सगळे भ्रष्टाचारी आत्ता
देश भ्रष्टाचार मुक्त करणार
माझं आणि तुझं
यातच जीवन व्यस्त आहे
पण खरं तर ‘आपण’ म्हटलं
तरच जीवन मस्त आहे.
मोठ्या डोंगराच निर्माण जसं
छोट्याश्या दगडापासून होते
तसं मोठं स्वप्न साकारण्याची सुरुवात
पाहिलं पाऊल टाकल्यापासून होते.
दररोज आपल्याला पाहणारे
बरेच लोकं असतात
पण लक्षात जास्त तेच राहतात
जे पाहून न पाहिल्यासारखे करतात.
पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा……
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा….
पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन
अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले….
मग क्षण भर मी पाहतच राहिलो…
आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले..
अज़ून तरी मी तुला
काही निरुत्तर केले नाही….
तरीपण माझ्या प्रश्नांना
तू कधी उत्तर दिले नाही….
अजुन तरी काहीच नव्हते
तुझे माझे म्हणण्या जोगे
सर्व काही आपले होते
एकत्र प्रेम करण्या जोगे
आपले म्हणूनी आता ,
कोणास हाक मारु…
आपल्यांनीच सतावले इथे ,
परक्यांशी काय भांडू…
आपल्याला काही हव असणं
म्हणजेच आपलं जगणं आहे,
येणाऱ्या प्रत्येक क्षणाकडे
आपलं काही मागण आहे.
आपल्याला प्रेम करता येते
कोणताच तेढ न ठेवता
मग आपण ते व्यक्त का करत नाही
कोणतेच आढेवेढे न घेता ?
सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू
सखे कशी विसरशील तू
आठवणी तुझ्यात माझ्या गुम्फलेल्या,
पारम्ब्यांच्या झुल्यावर
माझ्यासोबत झुललेल्या
सागराला वाटलं
थोडसं व्हाव शांत
का नदीने हि त्या
पाहावा एवढा अंत ?
लहान मुलाकडून
एवढंच शिकावं
सर्वांचं प्रेम मिळवण्यासाठी
हसावं आणि गप्प बसून राहावं.
भूतकाळाकडून नेहमी
शिकत राहावं
भविष्य घडवण्यासाठी
दररोज प्रयत्न करत राहावं.
दुःख सोसल्याशिवाय
सुखाच महत्व कळत नाही
हातोड्याचे घाव सोसल्याशिवाय
दगडसुद्धा देव बनत नाही.
अडाणी अशा या वेड्याला तू
कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर
तू कधी भेटशील का ?
अडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा…
कोमल तुझ्या चेहर-या वरुन
अश्रु का ओघळावे
गालात फ़क्त खळीने फ़ुलायचे
हे डोळ्यांनाही न समजावे?
खरी जरी असेल प्रित तुझी…
का केली नाही तु व्यक्त…
सदा वाट बघण्यात तुझी…
आटले माझ्या देहाचे रक्त..
खळखळणारा झरा तू
चंचलतेचा वारा तू,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तू,
हे पण पहा :- विराम चिन्हे
या जगाला दाखवायचे होते,
तुझ्यासाठी किती प्रेम ठेवलंय साठवून.
तुझ्या नुसत्या ओठांच्या स्पर्शाने
कडू चहात गोडवा येतो…
साखर घातलेला चहाही मग तुझ्या
ओठांशिवाय कडवा होतो.
मिठीत जेव्हा तुला
हळूच माझ्या घेतले…
खरं सांग तू तेव्हा
कितीसे तुझ्यात उरले…
तुला पाहण्याचा अवकाश ,
आणि कविता जूळून येते …
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही.
तू मला हवी आहेस,
तू जशी आहेस तशीच…
जपेन तुला आयुष्यभर
राणी फक्त माझ्यासाठीच.
हळूच माझ्या ह्रदयाला
कोणीतरी चोरून नेलंय….
सांज वेळ येते रोजचं
रोजचं अशी ही वेगळी भासते…
सुर्य जातो पल्याड रोजचं
रोजचं मन ही उनाड भासते
हातात हात घेशील जेव्हा
भिती तुला कशाचीच नसेल…
अंधारातला काजवाही तेव्हा
सुर्यापेक्षा प्रखर असेल
समईला साथ असते ज्योतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची
अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही
प्रेमात डोळा दुसऱ्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही
अवचितच आकाशात,
मेघ भरून येतात…
तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,
मनाभोवती फेर घरून येतात…
अशाच एका वळणावरती
तुझी-माझी भेट झाली…
तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या
भेटीची ओढ लागली…
तुम्हाला या लेखातून नक्कीच रोमँटिक चारोळ्या मराठी, जीवनावर मराठी चारोळ्या, प्रेरणादायी मराठी चारोळ्या, Motivational charoli in marathi, Marathi Charolya on life, Marathi Charolya Premachya, Marathi Charolya On Love, Marathi Prem Charolya, Marathi Prem Kavita Charolya, Romantic charolya marathi या प्रकारची माहिती मिळाली असे अशी मी आशा करतो. तुम्हाला मराठी चारोळ्या | Marathi Charolya | Marathi Charoli ही माहिती आवडली असेल तर शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box