वचन व त्याचे प्रकार | Marathi Vachan | Vachan in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 3, 2023

वचन व त्याचे प्रकार | Marathi Vachan | Vachan in Marathi

MARATHI VACHAN

वचन व त्याचे प्रकार

 Vachan in Marathi

वचन व त्याचे प्रकार | Marathi Vachan |  Vachan in Marathi

            वचन व त्याचे प्रकार | Marathi Vachan |  Vachan in Marathi अशा प्रकारची माहिती आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहे व ही माहिती आहे पण तितकीच महत्वाची कारण ही माहित आपल्याला शाळेत असल्यापासुन तर स्कॉलरशिप, नवोदय, तलाठी, ग्रामसेवक, MPSC, UPSC अशा अनेक स्पर्धा परीक्षेसाठी विचारला जाणार हा घटक आहे. साध्या भाषेत सांगायचे झाले तर हा फार महत्वाचा भाग आहे.
            वचन  ( Vachan | Number ) म्हणजे काय? असा आपल्याला सर्वांनाच पडलेला असेल तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या आजूबाजूला असणार्या कोणत्याही नावावरून ती वस्तू एकच आहे की एकापेक्षा अधिक आहेत हे आपल्याला समजते यालाच त्या नामाचे वचन ( Vachan / Number) म्हणतात.


वचन म्हणजे काय ?

वचन :- [ Vachan / Number ] :- 
            सृष्टील कोणत्याही नामावरून ती वस्तू एकच आहे की अनेक आहेत हे आपल्याला समजते यालाच त्या नामाचे वचन ( Vachan / Number ) म्हणतात.

उदारणार्थ :- रुपया , बातम्या , संकट ,फुले , लाकूड , दिवस इ.


वचनाचे एकूण दोन प्रकार असतात.

क्रवचनाचे प्रकार
एकवचन [ Singular Number / Ek Vachan ]
अनेकवचन [ Plural Number / Anek Vachan ]


एकवचन म्हणजे काय ?

एकवचन [ Singular Number / Ek Vachan] :- 
            जेव्हा एखाद्या नामावरून ती वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एकवचन ( Singular Number / Ek Vachan ) आहे असे मानले जाते.

उदारणार्थ :- रुपया , बातमी , संकट , फुल , लाकूड , दिवस इ.

हे पण पहा :- समानार्थी शब्द

अनेकवचन म्हणजे काय ?

अनेकवचन [ Plural Number / Anek Vachan ] :- 
            जेव्हा एखाद्या नामावरून ती वस्तू एकच नसून अनेक आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेकवचन ( Plural Number / Anek Vachan ) आहे असे मानले जाते.

उदारणार्थ :-रुपये , बातम्या , संकटे , फुले , लाकडे , दिवस इ.


वचन बदल करणे म्हणजे काय ?

वचन बदल ( Vachan Badla) :- 
            जेव्हा एखाद्या एकवचनी नामाचे रुपांतर अनेकवचनी नामात  केले जाते किंवा अनेकवचनी नामाचे रुपांतर एकवचनी नामात केले जाते तेव्हा त्या नामाच्या बदलास वचन बदल ( Vachan Badla) असे म्हणतात.


वचन बदल नियम ( Vachan Badla Rules )

नियम १) :- 'आ' कारांत पुलिंगी एकवचनी नामाचे वचन बदलतांना त्याचे 'ए' कारांत होते.


एकवचनअनेकवचन
आवडता
आवडते
आरसाआरसे
कुत्राकुत्रे
चकवाचकवे
रुपयारुपये
सापळासापळे
आंबाआंबे
रस्तारस्ते
ओढाओढे
राजा
राजे
आठवडाआठवडे
बगीचाबगीचे
चेहराचेहरे
आंबाआंबे
फळाफळे
घोडाघोडे
अंगठाअंगठे
दांडादांडे
बोकाबोके
अनारसाअनारसे
पंखापंखे
झराझरे
मासामासे
वडावडे
झोकाझोके
रस्तारस्ते
धडाधडे
मुलगामुलगे
दवाखानादवाखाने
किल्लाकिल्ले
किनाराकिनारे
मासामासे
डोळाडोळे
कपडाकपडे
महिनामहिने
डबाडबे
आरसाआरसे
बटाटाबटाटे
धागा
धागे
सदरासदरे
गोठागोठे
वारावारे
पैसापैसे
गळागळे
वाडावाडे
खेकडाखेकडे
वक्तावक्ते
पिंजरापिंजरे
पावसाळापावसाळे
खिसाखिसे
कुत्रा
कुत्रे
राजाराजे
पंखापंखे
रुपयारुपये 




नियम २) :- 'अ' कारांत स्रीलिंगी एकवचनी नामाचे बदलतांना त्याचे काही वेळा 'आ' कारांत होते तर काही वेळा 'ई' कारांत होतो.

एकवचनअनेकवचन
विहीरविहिरी
साक्षसाक्षी
लहरलहरी
तक्रारतक्रारी
गंमतगमती
ओळओळी
म्हैसम्हैशी
तारीखतारखा
खारीकखारका
सूनसूना
लाजलाजा
विजविजा
भूकभुका
नोटनोटा
चिंचचिंचा



नियम ३) :- वचन बदल करतांना नामाच्या शेवटी 'य' नंतर 'ई' आल्यास उच्चारात 'य' चा लोप होतो.

एकवचनअनेकवचन
कोय( कोयी ) कोई
गाय( गायी ) गाई
माय( मायी ) माई
सोय( सोयी ) सोई




नियम ४) :- 'ई' कारांत स्रीलिंगी एकवचनी नामाचे बदलतांना त्याचे 'या' कारांत होते.

एकवचनअनेकवचन
कवळीकवळ्या
टाचणीटाचण्या
भाकरीभाकऱ्या
काठीकाठ्या
स्रीस्रीया
चांदणीचांदण्या
पणतीपणत्या
लेखणीलेखण्या
नळीनळ्या
नदीनद्या
शिडीशिड्या
बातमीबातम्या
दोरीदोर्या
टाळीटाळ्या
चौकशीचौकश्या
कैरीकैऱ्या



नियम ५) :- 'ऊ' कारांत स्रीलिंगी एकवचनी नामाचे बदलतांना त्याचे 'वा' कारांत होते.

एकवचनअनेकवचन
सासूसासवा
जाऊजावा
पिसूपिसवा
जळूजळवा


नियम ६) :- 'अ' कारांत नपुंसक लिंगी एकवचनी नामाचे बदलतांना त्याचे 'ए' कारांत होते.

एकवचनअनेकवचन
अक्षरअक्षरे
हाडहाडे
संकटसंकटे
वयवये
वजनवजने
राज्यराज्ये
फुलफुले
ठिकाणठिकाणे
जंगलजंगले
घरघरे




नियम ७) :- 'अ' कारांत नपुंसक लिंगी एकवचनी नामाचे बदलतांना त्याचे 'वा' कारांत होते.

एकवचनअनेकवचन
घरघरे
दारदारे
पुस्तकपुस्तके
फूलफुले
घड्याळघड्याळे
शेतशेते


नियम ८) :- 'ऊ' कारांत नपुंसक लिंगी एकवचनी नामाचे बदलतांना त्याचे 'ए' कारांत होते.

एकवचनअनेकवचन
लिंबूलिंबे
वासरूवासरे
पाखरूपाखरे
तट्टूतट्टे
पिल्लूपिल्ले


नियम ९) :- 'ए' कारांत नपुंसक लिंगी एकवचनी नामाचे वचन बदलतांना त्याचे 'ई' कारांत होते.

एकवचनअनेकवचन
१कुत्रेकुत्री
रताळेरताळी
तळेतळी
मडकेमडकी
केळेकेळी
खेडेखेडी

हे पण पहा :- साधित शब्द

नियम १०) :- पदार्थ वाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही.

एकवचनअनेकवचन
सोनेसोने
रूपेरूपे
पाणीपाणी
दुधदुध
लोणीलोणी
पेट्रोलपेट्रोल
साखरसाखर



नियम ११) :- काही वचनी नामांचे अनेक वचन अगदी वेगळ्या प्रकारे होते.

एकवचनअनेकवचन
पैपया
मोतीमोते / मोत्ये
मिरीमिरे / मिऱ्ये


नियम १२) :- काही नामांचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते किवा त्यात कोणताही बदल होत नाही.

एकवचनअनेकवचन
गहूदगड
फोटोपर्वत
राक्षसहत्ती
गरुडबैल
मनुष्यतेली
वाघपक्षी
सापतेली
गुरुलाडू
माळीशत्रू
खडूउंदीर
देवकवी
साबणतरुणी
समूहयुवती
शेतकरीलाली
लाडूबाजू
मित्रवस्तू
प्राणीवळू
पंखदृष्टी
देशदासी
दिवससभा
दातआज्ञा
तासविद्या
चेंडूदिशा
जीवपूजा
उपवासभाषा
आजारहिशोब



            आम्ही तुम्हाला येथे वचन म्हणजे काय ? , वचनाचे उदाहरण, वचनाचे प्रकार कोणते ?  ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला वचन व त्याचे प्रकार | Marathi Vachan |  Vachan in Marathi प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला वचन व त्याचे प्रकार ( Marathi Vachan |  Vachan in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad