Marathi Vishash Sandhi
मराठीच्या विशेष संधी
Vishash Sandhi in Marathi
मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) :-
मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) हा मराठी व्याकरणातील फार महत्वाचा घटक आहे. या घटकावर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास एक तरी प्रश्न विचारलाच जातो. नवोदय परीक्षा, ५ वी स्कॉलरशिप, ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, TET Exam, TIAT Exam, CTET Exam, MPSC, UPSC व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे आपल्याला मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला या घटकातील गुण मिळतील.
आम्ही मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) ही माहिती होतकरू व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) ही माहिती तुमच्या उपयोगी येईल.
चला तर मग आपण मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ).
मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) बघण्यागोदर आपल्याला संधी म्हणजे काय ते माहित असणे गरजेचे आहे. आपण बोलत असताना आपल्याला नवनवीन शब्दांची ओळख होत असते. बऱ्याच वेळी काही शब्द असतात जे दोन वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेले असतात परंतु आपण त्यांचा उच्चार एकत्र करत असतो.
उदाहरणार्थ :-
'गुरूपदेश' हा शब्द गुरू + उपदेश या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. तसेच
विग्रह | वर्णसंधी | संधी |
---|
ज्ञान + ईश्वर | अ + ई = ए | ज्ञानेश्वर |
अरूण + उदय | अ + उ = ओ | अरूणोदय |
राजा + औदार्य | आ + औ = औ | राजौदार्य |
यश: + धन | - | यशोधन |
सम् + आचार | म् + आ | समाचार |
सत् + जन | त् + ज् = ज् | सज्जन |
वरील प्रमाणे जे जोडशब्द तयार होतात त्यांनाच संधी असे म्हणतात.
संधी म्हणजे काय ?
➤ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' ( Sandhi ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-
विग्रह | वर्णसंधी | संधी |
---|
ज्ञान + ईश्वर | अ + ई = ए | ज्ञानेश्वर |
अरूण + उदय | अ + उ = ओ | अरूणोदय |
राजा + औदार्य | आ + औ = औ | राजौदार्य |
यश: + धन | - | यशोधन |
सम् + आचार | म् + आ | समाचार |
सत् + जन | त् + ज् = ज् | सज्जन |
तसेच जेव्हा जोडशब्दांना आपण वेगळे करत असतो त्याला आपण त्या जोडशब्दाचा विग्रह म्हणजेच संधीचा विग्रह करणे असे म्हणतो.
संधीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.
➤ स्वरसंधी [ Swar Sandhi ]
➤ व्यंजनसंधी [ Vyanjan Sandhi ]
➤ विसर्गसंधी [ Visarg Sandhi ]
चला तर मग आता पाहूया 'मराठी विशेष संधी कोणत्या आहेत ( Marathi Vishash Sandhi ).
मराठीच्या विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi )
अ क्र | मराठीतील विशेष संधी |
---|
१ | पूर्वरूप संधी [ Purv Roop Sandhi ] |
२ | पररूप संधी [ Par Roop Sandhi ] |
हे पण पहा :- वचन व त्याचे प्रकार
१] पूर्वरूप संधी ( Purv Rup Sandhi ) :-
जेव्हा संधी होताना दोन स्वर एकापुढे एक आले असता पहिला स्वर तसाच राहतो व दुसरा लोप पावतो तेव्हा त्या संधीला पूर्वरूप संधी ( Purv Roop Sandhi ) असे म्हणतात.
पूर्वरूप संधीचे उदाहरण
विग्रह | वर्ण | संधी |
---|
नदी + आत | ई + आ | नदीत |
खिडकी + आत | ई + आ | खिडकीत |
आळी + आत | ई + आ | आळीत |
नाही + असा | ई + आ | नाहीसा |
साजे + असा | ए + अ | साजेसा |
चांगले + असे | ए + अ | चांगलेसा |
२] पररूप संधी ( Par Rup Sandhi ) :-
जेव्हा संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर तसाच राहतो तेव्हा त्या संधीला पररूप संधी ( Par Roop Sandhi ) असे म्हणतात.पररूप संधीचे उदाहर :-
विग्रह | वर्ण | संधी |
---|
घाम + ओळे | अ + ओ | घामोळे |
चिंधी + ओटी | ई + ओ | चिंधोटी |
एक + एक | अ + ए | एकेक |
हर + एक | अ + ए | हरेक |
घर + ई | अ + ई | घरी |
भरड + ऊन | अ + ऊ | भरडून |
हात + ऊन | अ + ऊ | हातून |
कर + ऊन | अ + ऊ | करून |
न + उमजे | अ + उ | नुमजे |
३] दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची मागील स्वराशी बहुतेक करून संधी होत नाही.
उदाहरणार्थ :-
विग्रह | वर्ण | संधी |
---|
खा + ऊन | आ + ओ | खाऊन |
घे + ईल | ए + ई | घेईल |
हो + ऊ | ओ + ऊ | होऊ |
जा + ऊ | आ + ऊ | जाऊ |
४] ‘ही’ शब्दयोगी अव्यय मागील संख्याविशेषनाबरोबर संधी होताना दोन प्रकारे लिहिले जाऊ शकतो.
उदाहरणार्थ :-
विग्रह | पहिल्या प्रकारे | दुसऱ्या प्रकारे |
---|
दोन + ही | दोन्ही | दोनही |
तिन + ही | तिन्ही | तिनही |
चार + ही | चाऱ्ही | चारही |
५] अनुसार, अनुरूप यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन पूर्वरूप संधी होते.
उदाहरणार्थ :-
विग्रह | संधी |
---|
गरज + अनुसार | गरजेनुसार |
रक्कम + अनुसार | रक्कमेनुसार |
विषय + अनुसार | विषयानुसार |
काम + अनुसार | कामानुसार |
विषय + अनुरूप | विषयानुरूप |
शाळा + अनुरूप | शाळेनुरूप |
६] बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकात मिसळून नवीन रूपे तयार होतात.उदाहरणार्थ :-
विग्रह | संधी |
---|
गेली + आहेस | गेलीय |
बसला + आहात | बसलात |
आलो + आहे | आलीय |
येतो + आहे | येतोय |
आम्ही तुम्हाला येथे पररूप संधी म्हणजे काय ? , पूर्वरूप संधी म्हणजे काय ?, त्याची उदाहरणे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi ) संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi | Purv rup sandhi | Par rup sandhi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box