National Pledge of India
भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा
भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा - National Pledge of India हे कोणी, केव्हा, कसे लिहिले व त्याला केव्हा, कशी मान्यता मिळाली यसारख्या सर्वच बाबतची माहिती येथे मिळणर आहे.
भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा कशी कोणी तयार केली ?
आंध्रप्रदेशातील नालगोंडा ह्या जिल्ह्यातील अन्नेपर्थी ह्या गावचे रहिवासी पैदिमरी व्यंकट सुब्बाराव यांनी संस्कृत, तेलगू, इंग्रजी आणि अरबी ह्या भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तसेच ते निसर्गोपचार-तज्ज्ञ म्हणून देखील परिचित होते. विशाखापट्टणम् जिल्ह्याचे जिल्हा कोषागार अधिकारी ते अनेक वर्षे म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांनी लिहिलेली ‘कालाभरवाहू’ नावाची तेलगू कादंबरी विशेष गाजली होती.
१९६२ मध्ये पैदिमरी व्यंकट सुब्बाराव ह्यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणण्यासाठी एक प्रतिज्ञा लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडल्याने आंध्रप्रदेशचे तत्कालीन शिक्षणमंत्री पी. व्ही. जी. राजू ह्यांना ही प्रतिज्ञा दाखविली. त्यांनी ती शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.
भारतीय शिक्षण-विकास (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया) ह्या भारतीय केंद्रशासनाच्या शिक्षणविभागाद्वारे स्थापन करण्यात आलेल्या ३१वी सभा तिचे पदसिद्ध अध्यक्ष तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला होते. यांच्या अध्यक्षतेखाली ११-१२ ऑक्टोबर १९६४ रोजी बंगळुरू येथे झाली होती. त्यात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारशीनुसार शाळा, महाविद्यालये ह्यांमध्ये तसेच राष्ट्रीय दिनांच्या दिवशी विद्यार्थ्यांना म्हणण्यासाठी एक प्रतिज्ञा असावी. त्यावेळी पैदिमरी व्यंकट सुब्बाराव ह्यांनी लिहिलेली प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आलेकी, ही प्रतिज्ञा देशपातळीवर २६ जानेवारी १९६५ पासून लागू करावी.
या प्रतिज्ञेचा देशपातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि १९६५ पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. ह्य प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकांतील प्रतिज्ञेचा दर्जा न देता, तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला. आशा प्रकारे आपल्याला भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा - National Pledge of India मिळाली.
प्रतिज्ञा (मराठी)
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.
जय हिंद, भारत माता की जय
प्रतिज्ञा (हिंदी)
भारत मेरा देश है। सभी भारतीय मेरे भाई-बहन हैं।
मुझे अपने देश से प्यारा है। अपने देश की समृद्ध तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है।
मैं हमेशा प्रयत्न करूँगा / करूँगी कि उन परंपराओं का सफल अनुयायी बनने की क्षमता मुझे प्राप्त हो।
मैं अपने माता-पिता, गुरुजनों और बडों का सम्मान करुंगा / करुंगी और हर एक से सौजन्यपूर्ण व्यवहार करूंगा / करुंगी।
मैं प्रतिज्ञा करता / करती हूँ कि मैं अपने देश और देशवासियों के प्रति निष्ठ रखूँगा / रखूँगी। उनकी भलाई और समृद्धि में ही मेरा सुख निहित है।
जय हिंद, भारत माता की जय
PLEDGE
India is my country. All Indians are my brothers and sisters.
I love my country, and I am proud of it's rich and varied heritage. I shall always strive to be worthy of it.
I shall give my parents, teachers and all elders respect and treat everyone with courtesy.
To my country and my people, I pledge my devotion. In their well-being and prosperity alone, lies my happiness.
Jay Hind, Bharat Mata Ki Jay
तुम्हाला भारताची राष्ट्रीय प्रतिज्ञा - National Pledge of India ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box