भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् | National song of India | Vande Mataram - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 2, 2023

भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् | National song of India | Vande Mataram

National song of India

भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम्

          भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ( National song of India Vande Mataram ) हे कोणी, केव्हा, कसे लिहिले व त्याला केव्हा, कशी मान्यता मिळाली यसारख्या सर्वच बाबतची माहिती येथे मिळणर आहे.

भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् | National song of India | Vande Mataram
     
            ७ नोव्हेंबर १८७६ साली बंगाल मधील कांतल पाडा गांव येथे बंकिमचंद्र चटर्जी यांनी 'वंदे मातरम' ( Vande Mataram ) या गीताची रचना केली. १८८२ मध्ये बंकिंमचंद्र चटोपाध्यय यांच्या प्रसिद्ध उपन्यास 'आनंद मठ' मध्ये सामील केले. मूळच्या 'वंदे मातरम' ( Vande Mataram ) मध्ये पहिले दोन पद संस्कृत भाषेत होते व उरलेले बांग्ला भाषेत होते. 'वंदे मातरम' ( Vande Mataram ) चे इंग्रजीत रूपांतर सर्वात अगोदर अरविंद घोष यांनी केले. कांग्रेस च्या कार्यकारिणीच्या डिसेंबर १९०५ च्या बैठकीत या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात आला.


          वंग,बंग आंदोलनाच्या वेळी या गीताला राष्ट्रीय नारा बनवण्यात आला. १९०६ मध्ये हे गीत देवनागरी सादर केले गेले. कांग्रेस च्या कलकत्ता अधिवेशनात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी याचे संशोधित रूप सादर केले. १९२३ च्या कांग्रेस अधिवेशनात वंदे मातरम या गीताला विरोध होऊ लागला.

          पं. नेहरू, मौलाना अब्दुल आजाद, सुभाष चंद्र बोस आणि आचार्य नरेंद देव यांच्या समितीने २८ ऑकटोबार १९३७ कांग्रेस च्या कलकत्ता अधिवेशनात आपला रिपोरट सादर केला. त्यात 'वंदे मातरम' या गीताला सक्तीतुन मुक्त करण्यात आले. या समितीचे मार्गदर्शन रवींद्रनाथ टागोर यांनी केले. १४ ऑगस्ट १९४७ ची रात्री संविधान सभेत वंदे मातरमचा समारोव करून 'जन गण मन' हे गीत ग्राह्य धरले.

          १९५० मध्ये 'वंदे मातरम या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम्  ( National song of India Vande Mataram ) हा दर्जा मिळालेला आहे. तर 'जन गन मन' या गीताला राष्ट्रीय गान (राष्ट्रगीत) हा दर्जा देण्यात आला.


          २००२ मध्ये बी.बी.सी. च्या सर्वेक्षनाच्या नुसार भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ( National song of India Vande Mataram ) हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिल लोकप्रिय गीत आहे.


भारताचे राष्ट्रीय गीत 
वंदे मातरम्

वन्दे मातरम्, वन्दे मातरम्
सुजलां, सुफलां, मलयज शीतलाम्
शश्य श्यामलाम् मातरम्
वन्दे मातरम्
सुब्रज्योत्स्ना पुलकित यामिनीम्
पुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीं  सुमधुर भाषिनीम्
सुखदां वरदां मातरम्
वन्दे मातरम्

- बंकिमचंद्र चटर्जी


          तुम्हाला भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ( National song of India Vande Mataram ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad