समूहदर्शक शब्द | Marathi Samuh Darshak Shabd - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 3, 2023

समूहदर्शक शब्द | Marathi Samuh Darshak Shabd

SAMUH DARSHAK SHABD

समूहदर्शक शब्द

Marathi Samuh Darshak Shabd

समूहदर्शक शब्द | Samuh Darshak Shabd

            समूहदर्शक शब्द ( Samuh Darshak Shabd ) या घटकावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी समूहदर्शक शब्द ( Marathi Samuh Darshak Shabd | Samuh Darshak Shabd Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी समूहदर्शक शब्द मराठी  ( Samuh Darshak Shabd Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया समूहदर्शक शब्द ( Samuh Darshak Shabd ) .   

समूहदर्शक शब्द

[ Samuh Darshak Shabd ]

शब्द अर्थ
आंब्याच्या झाडाचीआमराई, राई
उंटांचातांडा
उतारुंचीझुंड, झुंबड
उपकरणांचासंच
ऊसाचीमोळी
करवंदाचीजाळी
कलिंगडाचाढीग
काजूंचीगाथण
किल्ल्यांचाजुडगा
केळ्यांचालोंगर , घड
केसांचापुंजका, झुबका
केसांचीबट, जट
खेळाडूंचासंघ, चमू
गवताचाभारा
गवताचीगंजी , पेंढी
गाईगुरांचेखिल्लार
गुरांचाकळप
गुलाबाचाताटवा


समूहदर्शक शब्द

शब्द अर्थ
घरांचीचाळ
चाव्यांचाजुडगा
चोरांचीटोळी
चाकत्यांचीचळत
जहाजांचाकाफिला
ढगांचाघनमंडल
तारकांचापुंज
तार्‍यांचापुंजका
दरोडेखोरांचीटोळी
दुर्वांचीजुडी
द्राक्षांचाघड,घोस
धान्यांचीरास
नाण्यांचीचळत
नारळांचाढीग
नारळांचीपेंड 
नोटांचीथप्पी
नोटांचेपुडके


समूहदर्शक शब्द

शब्द अर्थ
पक्ष्यांचाथवा
पाठ्यपुस्तकांचासंच
पालेभाजीचीजुडी, गड्डी
पिकत घातलेल्या आंब्यांचीअढी
पुस्तकांचागट्ठा, संच
पोत्यांचीथप्पी
पोळ्यांचीचवड, चळत
प्रवाशांचीझुंबड
प्रश्नपत्रिकांचासंच
प्रश्नांचासंच
फळाचाढीग
फुल झाडांचाताटवा
फुलांचागुच्छ
बांबूंचेबेट
भाकरीचीचळड
महिलांचेमंडळ
माणसांचाजमाव, घोळका
मातीचाढिगारा
माशांचीगाथण
मुंग्यांचीरांग
मुलांचाघोळका
मेंढयांचाकळप
मडक्यांचीउतरंड


समूहदर्शक शब्द

शब्द अर्थ
यात्रेकरूंचीजत्रा
रुपयांचीचवड
लमाणांचातांडा
लाकडांचीमोळी
लुटारूंचीझुंड
वस्तूंचासंच
वह्यांचागट्ठा
वाद्यांचावृंद
वानरांचीटोळी
वाळूचाढीग
विटांचाढिगारा, ढीग
विद्यार्थ्यांचागट
विमानांचाताफा
वेलिंचाकुंज
वारकऱ्यांचीदिंडी 
साधूंचाजथा
सैनिकांचीतुकडी, पलटण
सैनिकांचेपथक
शेळ्यांचाकळप
शिक्षकांचावृंद 
हत्तींचाकळप

हे पण पहा :- समानार्थी शब्द

समूहदर्शक शब्दासाठी योग्य  पर्याय सुचवा :

१] तांडा : --------------

    अ] किल्ल्यांचा
    ब] विमानांचा
    क] लमाणांचा

२] मंडळ : -----------

    अ] शिक्षकांचा
    ब] महिला 
    क] साधूंचा

३] रास : ------------

    अ] धान्यांची
    ब] वाळूचा
    क] मातीचा

४] जथा : --------------

    अ] वस्तूंचा
    ब] साधूंचा
    क] शिक्षकांचा


५] कुंज : ------------

    अ] फळाचा
    ब] तार्‍यांचा
    क] वेलिंचा

हे पण पहा :- आलंकारिक शब्द


            तुम्हाला मराठी समूहदर्शक शब्द (Samuh Darshak Shabd | Marathi Samuh Darshak Shabd | Samuh Darshak Shabd Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad