संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 25, 2023

संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar

Sandhi v Tyache Prakar

संधी व त्याचे प्रकार

Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar 

संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar

संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar | Sandhi in Marathi )  :- 

            संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar | Sandhi in Marathi ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar | Sandhi in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar | Sandhi in Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar | Sandhi in Marathi ).


        आपण बोलत असताना आपल्याला नवनवीन शब्दांची ओळख होत असते. बऱ्याच वेळी काही शब्द असतात जे दोन वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेले असतात परंतु आपण त्यांचा उच्चार एकत्र करत असतो.

उदाहरणार्थ :-
'गुरूपदेश' हा शब्द गुरू + उपदेश या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. तसेच

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन

            वरील प्रमाणे जे जोडशब्द तयार होतात त्यांनाच संधी असे म्हणतात.

हे पण पहा :- नाम व त्याचे प्रकार


संधी म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' ( Sandhi ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन


        तसेच जेव्हा जोडशब्दांना आपण वेगळे करत असतो त्याला आपण त्या जोडशब्दाचा विग्रह म्हणजेच संधीचा विग्रह करणे असे म्हणतो.



संधीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

     स्वरसंधी [ Swar Sandhi ]

     व्यंजनसंधी [ Vyanjan Sandhi ]

     विसर्गसंधी [ Visarg Sandhi ]       


स्वर संधी व त्याचे नियम

Swar Sandhi in Marathi | Swar Sandhi Marathi

स्वर संधी व त्याचे प्रकार | Swar Sandhi Marathi | Swar Sandhiche Prakar

स्वर संधी म्हणजे काय ?

 एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असल्यास त्यास ‘स्वर संधी’ ( Swar Sandhi ) असे म्हणतात.

➤ एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला ‘स्वर संधी’ ( Swar Sandhi ) असे म्हणतात.

 एकमेकांच्या शेजारील वर्ण जर स्वर असेल तर त्यास ‘स्वर संधी’ ( Swar Sandhi ) म्हणतात.



स्वरसंधी = स्वर + स्वर

स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
पर + उपकारअ + उ = ओपरोपकार
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
पितृ + औदार्यऋ + औ = रपित्रोदार्य
पितृ + आज्ञाऋ + आ = रपित्राज्ञा
गै + अकऐ + अ = आयगायक
नै + अकऐ + अ = आयनायक
ब्रम्ह + ऋषीअ + ऋ = अर्ब्रम्हर्षी
गंगा + उदकआ + उ = ओगंगोदक
अनु + अर्थउ + अ = वअन्वर्थ
मनु + अंतरउ + अं = वमन्वंतर
अति + उत्तमइ + उ = यअत्युत्तम
किती + एकई + ए = यकित्येक
महा + औदार्यआ + औ = औमहौदार्य
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
क्षण + एकअ + ए = ऐक्षणैक
एक + एकअ + ए = ऐएकैक
पर + उपकारअ + उ = ओपरोपकार
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
वनिता + आश्रमआ + आ= आवनिताश्रम
गीता + अर्णवआ + अ = आगीतार्णव

हे पण पहा :- बहुव्रीहि समास

स्वरसंधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे.

नियमस्वरपुढील स्वरबदल

सजातीय स्वर

सजातीय स्वर

दीर्घ स्वर

अ किंवा आइ किंवा ई
अ किंवा आउ किंवा ऊ
अ किंवा आए किंवा ऐ
अ किंवा आओ किंवा औ
इ किवा ईविजातीय स्वर
उ किंवा ऊविजातीय स्वर
विजातीय स्वर

विजातीय स्वर

अय

१०विजातीय स्वरआय
११विजातीय स्वरअव
१२विजातीय स्वरआव



नियम १] दोन सजातीय स्वर एकमेकांशेजारी आले असता त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. यालाच ‘दीर्घत्व संधी’ असे म्हणतात.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
गीता + अर्णवआ + अ = आगीतार्णव
वनिता + आश्रमआ + आ= आवनिताश्रम
गुरु + उपदेशउ + उ = ऊगुरूपदेश
मुनि + इच्छाइ + इ = ईमुनीच्छा
सूर्य + अस्तअ + अ = आसूर्यास्त
कवी + इच्छाई + इ = ईकवीच्छा



नियम २] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
गण + ईशअ + ई = एगणेश
महा + इंद्रआ + इ = एमहेंद्र
ईश्वर + इच्छाअ + इ = एईश्वरेच्छा
यथा + इष्टआ + इ = एयथेष्ट
रमा +ईशआ + ई = एरमेश



नियम ३] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
अरूण + उदय2अ + उ = ओअरूणोदय
पर + उपकारअ + उ = ओपरोपकार
गंगा + उदकआ + उ = ओगंगोदक
समुद्र + ऊर्मीअ + ऊ = ओसमुद्रोर्मी
गंगा + उर्मीआ + उ = ओगंगोर्मी
महा + उत्सवआ + उ = ओमहोत्सव

हे पण पहा :- तत्सम शब्द


नियम ४] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
उदाहरणार्थ :-

विग्रहस्वरसंधी
एक + एकअ + ए = ऐएकैक
क्षण + एकअ + ए = ऐक्षणैक
सभा + ऐक्यआ + ऐ = ऐसभैक्य
मत + ऐक्यअ + ऐ = ऐमतैक्य
जन + ऐक्यअ + ऐ = ऐजनैक्य
विद्या + ऐश्वर्यआ + ऐ = ऐविद्यैश्वर्य



नियम ५] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
महा + औदार्यआ + औ = औमहौदार्य
वृक्ष + औदार्यअ + औ = औवृक्षौदार्य
वन + औषधीअ + औ = औवनौषधी
यमुना + ओघआ + ओ = औयमुनौघ
जल + ओघअ + ओ = औजलौघ



नियम ६] ’ किंवा ’ यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘य’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
किती + एकई + ए = यकित्येक
अति + उत्तमइ + उ = यअत्युत्तम
अति + अल्पइ + अ = यवृक्षौदार्य
प्रति + अंतरइ + अं = यप्रत्यंतर
अति + आचारइ + आ = याअत्याचार
अति + आनंदइ + आ = याअत्यानंद



नियम ७] ’ किंवा ’ यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘व’ होतो.
स्वर संधीचे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
मनु + अंतरउ + अं = वमन्वंतर
अनु + अर्थउ + अ = वअन्वर्थ
सु + अल्पउ + अ = वस्वल्प
सु + आनंदउ + आ = वास्वानंद
गुरु + आज्ञाउ + आ = वागुर्वाज्ञा
भानू + ईश्वरऊ + ई = वीभान्वीश्वर



नियम ८] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘र’ होतो.
स्वर संधीचे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
धृ + अनऋ + अ = रधरण
मातृ + इच्छाऋ + इ = रमत्रीच्छा
भातृ + ऐक्यऋ + ऐ = रभ्रात्रैक्य
मातृ + उत्सवऋ + उ = रमात्रुत्सव
पितृ + आज्ञाऋ + आ = रपित्राज्ञा
पितृ + औदार्यऋ + औ = रपित्रोदार्य



नियम ९] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘अय’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
ने + अनए + अ = अयनयन
शे + अनए + अ = अयशयन



नियम १०] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘आय’ होतो.
उदाहरणार्थ :-

विग्रहस्वरसंधी
नै + अकऐ + अ = आयनायक
गै + अकऐ + अ = आयगायक
गै + अनऐ + अ = आयगायन


नियम ११] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘अव’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
गो + ईश्वरओ + ई = अवगवीश्वर
गो + अक्षओ + अ = अवगवाक्ष
पो + अनओ + अ = अवपवन


नियम १२]  च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘आव’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
पौ + अकऔ + अ = आवपावक
पौ + अनऔ + अ = आवपावन
नौ + इकऔ + इ = आवनाविक


व्यंजन संधी व त्याचे नियम

Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi | Vyanjan Sandhi v Tyache Niyam

व्यंजन संधी व त्याचे नियम ( Vyanjan Sandhi Marathi | Vyanjan Sandhi in Marathi Vyanjan Sandhi v Tyache Niyam )

व्यंजन संधी म्हणजे काय ?

➤ दोन शब्दाची संधी होताना जेव्हा जवळ जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिला वर्ण व्यंजन असेल व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा ती 'व्यंजन संधी' ( Vyanjan Sandhi ) असते.


[ व्यंजन संधी = व्यंजन + व्यंजन / स्वर ]

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहस्वर / व्यंजनसंधी
विपद् + कालद् + क् = तविपत्काल
वाग् + पतिग् + प् = कवाक्पति
अच् + अंतच् + अं = जअजंत
वट् + आननट् + आ = डवडानन
सत् + इच्छात् + इ = दसदिच्छा
जगत् + नाथत् + न् = न्जगन्नाथ
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन


वर्ण वर्ग तक्ता

वर्ण वर्ग

'क' वर्ग

'च' वर्ग

'ट' वर्ग

'त' वर्ग

'प' वर्ग

म्

 १ व २ हे कठोर वर्ण आहेत.

 ३ व ४ हे मृदू वर्ण आहेत.

 ५ हे अनुनासिके आहेत.



व्यंजन संधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे.

नियम १] पहिल्या पाच वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. त्याला 'प्रथम व्यंजन संधी' ( Pratham Vyanjan Sandhi ) असे म्हणतात.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहबद्दल पहिले वर्णसंधी
आपद् + कालद् = तआपत्काल
षड् + शास्त्रड = टषट्शास्त्र
वाग् + पतिग् = कवाक्पति
क्षुध् + पिपासा = तक्षुत्पिपासा

 


नियम २] पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाशिवाय स्वर किंवा मृदू व्यंजन आले असल्यास त्याच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. त्याला 'तृतीय व्यंजन संधी' ( Trutiy Vyanjan Sandhi ) असे म्हणतात.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहबद्दल तिसरे वर्णसंधी
सत् + आनंदत् = दसदानंद
अप् + ज = बअब्ज
वट् + आनन = डवडानन
अच् + अंत = जअजंत
वाक् + देवी = गवाग्देवी



नियम ३] पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते. त्याला 'अनुनासिक संधी' ( Anunasik Sandhi ) असे म्हणतात.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहकठोर व्यंजनसंधी
सत् + मार्गत् = न् सन्मार्ग
सत् + मतीत् = न् संमती
जगत् + नाथत् = न् जगन्नाथ
षट् + मास = णषण्मास
वाक् + निश्चय = वाड्निश्चय




 'त्' चे नियम


नियम १] ‘त्’ च्यापुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास ‘त्’ चा ‘च्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधी
चलत् + चित्रत् + च = चचलच्चित्र
सत् + चरित्रत् + च = चसच्चरित्र
उत् + छेद + छ = चउच्छेद

 

नियम २] ‘त्’ च्यापुढे ‘ज्’ किंवा ‘झ्’ आल्यास ‘त्’ चा ‘ज्’ होतो.

व्यंजन संधी उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
सत् + जनत् + ज = जसज्जन
शरत् + झंझावात + झ = जशरज्झंझावात
उत् + ज्वल + ज = जउज्ज्वल

 


नियम ३] ‘त्’ च्यापुढे ‘ड्’ आल्यास ‘त्’ चा ‘ड्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
भगवत् + डमरूत् + ड = डभगवड्डमरू
उत् + डानत् + ड = डउड्डान

 

नियम ४] ‘त्’ च्यापुढे ‘ट्’ आल्यास ‘त्’ चा ‘ट्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
तत् + टीकात् + ट = टतट्टीका

 



नियम ५] ‘त्’ च्यापुढे ‘ल्’ आल्यास ‘त्’ चा ‘ल्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
तत् + लीनत् + ल = लतल्लीन
उत् + लंघनत् + ल = लउल्लंघन

 


नियम ६] ‘त्’ च्यापुढे ‘श्’ आल्यास ‘त्’ चा ‘च्’ होतो. व ‘श्’ चा ‘छ्’ होतो.

व्यंजन संधीचे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
सत् + शीलत् + श = च + छसच्छील
उत् + श्वासत् + श = च + छउच्छवास
सत् + शिष्यत् + श = च + छसच्छिष्य

 'म्' चे नियम

नियम १] ‘म्’ च्यापुढे स्वर आल्यास तो स्वर मागील ‘म्’ मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास ‘म्’ बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

व्यंजन संधी चे उदाहरण :-

विग्रहवर्णसंधी
सम् + आप्तम् + आसमाप्त
सम् + आचारम् + आसमाचार
सम् + आलोचनम् + आसमालोचन
सम् + तापम् + त् संताप
सम् + गतीम् + ग् संगती
सम् + चयम् + च् संचय
सम् + कल्पम् + क् संकल्प
किम् + करम् + क् किंकर

विसर्ग संधी

Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi

विसर्ग संधी |  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi

विसर्ग संधी म्हणजे काय ?

 जेव्हा दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा त्या संधीला ‘विसर्ग संधी’ Visarg Sandhi ) असे म्हणतात.

[ विसर्ग संधी = विसर्ग + स्वर / व्यंजन ]

विसर्ग संधीचे नियम

नियम १] विसर्गाच्या मागे ‘अ’ व पुढे मृदू वर्ण असल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिसळून त्याचा ‘ओ’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
यश: + धनयशोधन
मन: + रथमनोरथ
तप: + वनतपोवन
तेज: + निधीतेजोनिधी
मन: + राज्यमनोराज्य
अध: + मुखअधोमुख
अध: + वदनअधोवदन
यश: + गिरीयाशोगिरी



नियम २] विसर्गाच्या मागे ‘अ’ किंवा ‘आ’ सोडून कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा ‘र्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + अंतरनिरंतर
नि: + विकारनिर्विकार
नि: + लोभनिर्लोभ
दु: + जनदुर्जन
दु: + आत्मादुरात्मा
दु: + वासनदुर्वासन
धनु: + विद्याधनुर्विद्या
आशी: + वचनआशीर्वचन



नियम ३] पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘स्’ येऊन दुसऱ्या शब्दाच्या सुरवातीला कोणतेही व्यंजन आल्यास ‘स्’ चा विसर्ग होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
तेजस् + कणतेज:कण
मनस् + पटलमन:पटल

नियम ४] विसर्गाच्या मागे ‘अ’ किंवा ‘आ’ सोडून कोणताही स्वर असून पुढे ‘र्’ आल्यास विसर्गाचा ‘र्’ होऊन त्याचा लोप होतो व मागचा ऱ्हस्व स्वर दीर्घ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + रसनीरस
नि: + रवनीरव


नियम ५] पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ येऊन दुसऱ्या शब्दाच्या सुरवातीला कठोर व्यंजन आल्यास ‘र्’ चा विसर्ग होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
अंतर + करणअंत:करण
चतुर + शृंगीचतु:शृंगी

नियम ६] पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ व त्याच्या मागे ‘अ’ असून दुसऱ्या शब्दाच्या सुरवातीला मृदू व्यंजन आल्यास तो ‘र्’ तसाच राहून संधी होते.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
पुनर् + जन्मपुर्नजन्म
अंतर् + आत्माअंतरात्मा
नि: + लोभनिर्लोभ


अपवाद :-  अंतरस्थ = अंतर् + स्थ

नियम ७] विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे क्, ख्, प्, फ् यांपैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो मात्र पुढे व्यंजना ऐवजी स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो.

उदाहरणार्थ :- 

विसर्गा पुढे व्यंजना आल्यास विसर्गाचा कायम राहतो.

विग्रहसंधी
प्रात: + कालप्रात:काल
अध: + पतनअध:पतन
रज: + कणरज:कण
अंत: + पटलअंत:पटल
तेज: + पुंजतेज:पुंज


हे पण पहा :- मराठी बोधकथा


विसर्गा पुढे स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो.

विग्रहसंधी
अत: + एवअतएव
इत: + उत्तरइतउत्तर


नियम ८] विसर्गाच्या मागे ‘इ’ किंवा ‘उ’ असून पुढे क्, ख्, प्, फ् यांपैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘ष’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + कारणनिष्कारण
बहि: + कारबहिष्कार
चतु: + कोषचतुष्कोप
दु: + काळदुष्काळ
नि: + कपटनिष्कपट
नि: + फळनिष्फळ
नि: + पापनिष्पाप
बहि: + कृतबहिष्कृत
दु: + परिणामदुष्परिणाम
नि: + कामनिष्काम


नियम ९] विसर्गाच्या पुढे ‘कृ’ या धातूचे कोणतेही रूप (कर/कार) असल्यास विसर्गाचा ‘स्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
पूर: + कारपुरस्कार
पुर: + कर्तापुरस्कर्ता
पुर: + कारपुरस्कार
भा: + करभास्कर
तिर: + कारतिरस्कार
नम: + कारनमस्कार

 नियम १०] विसर्गाच्या पुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास विसर्गाचा ‘श्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + चलनिश्चल
नि: + चयनिश्चय
दु: + चिन्हदुश्चिन्ह
मन: + चक्षुमनश्चक्षु


नियम ११] विसर्गाच्या पुढे ‘त्’ किंवा ‘थ्’ आल्यास विसर्गाचा ‘स्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + तेजनिस्तेज
मनः + तापमनस्ताप
अध: + तलअधस्तल


मराठीच्या विशेष संधी

Marathi Vishash Sandhi | Vishash Sandhi in Marathi

मराठी विशेष संधी | Marathi Vishash Sandhi

मराठीच्या विशेष संधी ( Marathi Vishash Sandhi )

अ क्रमराठीतील विशेष संधी
पूर्वरूप संधी Purv Roop Sandhi ]
पररूप संधी Par Roop Sandhi ]


१] पूर्वरूप संधी Purv Rup Sandhi ) :-

जेव्हा संधी होताना दोन स्वर एकापुढे एक आले असता पहिला स्वर तसाच राहतो व दुसरा लोप पावतो तेव्हा त्या संधीला पूर्वरूप संधी ( Purv Roop Sandhi ) असे म्हणतात.

पूर्वरूप संधीचे उदाहरण

विग्रहवर्णसंधी
नदी + आतई + आनदीत
खिडकी + आतई + आखिडकीत
आळी + आतई + आआळीत
नाही + असाई + आनाहीसा
साजे + असाए + असाजेसा
चांगले + असेए + अचांगलेसा


२] पररूप संधी ( Par Rup Sandhi ) :-

जेव्हा संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर तसाच राहतो तेव्हा त्या संधीला पररूप संधी ( Par Roop Sandhi ) असे म्हणतात.

पररूप संधीचे उदाहर :-

विग्रहवर्णसंधी
घाम + ओळेअ + ओघामोळे
चिंधी + ओटीई + ओचिंधोटी
एक + एकअ + एएकेक
हर + एकअ + एहरेक
घर + ईअ + ईघरी
भरड + ऊनअ + ऊभरडून
हात + ऊनअ + ऊहातून
कर + ऊनअ + ऊकरून
न + उमजेअ + उनुमजे


३] दीर्घ स्वरापुढे येणाऱ्या स्वराची मागील स्वराशी बहुतेक करून संधी होत नाही.

उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधी
खा + ऊनआ + ओखाऊन
घे + ईलए + ईघेईल
हो + ऊओ + ऊहोऊ
जा + ऊआ + ऊजाऊ





४] ‘ही’ शब्दयोगी अव्यय मागील संख्याविशेषनाबरोबर संधी होताना दोन प्रकारे लिहिले जाऊ शकतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहपहिल्या प्रकारेदुसऱ्या प्रकारे
दोन + हीदोन्हीदोनही
तिन + हीतिन्हीतिनही
चार + हीचाऱ्हीचारही



५] अनुसार, अनुरूप यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन पूर्वरूप संधी होते.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
गरज + अनुसारगरजेनुसार
रक्कम + अनुसाररक्कमेनुसार
विषय + अनुसारविषयानुसार
काम + अनुसारकामानुसार
विषय + अनुरूपविषयानुरूप
शाळा + अनुरूपशाळेनुरूप

हे पण पहा :- संख्यांचे प्रकार


६] बोलण्याच्या ओघात मराठीत काही शब्द एकमेकात मिसळून नवीन रूपे तयार होतात.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
गेली + आहेसगेलीय
बसला + आहातबसलात
आलो + आहेआलीय
येतो + आहेयेतोय


मराठी संधी आदेश

Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh

मराठी संधी आदेश  | Sandhi Aadesh in Marathi | Marathi Sandhi Aadesh

आदेश म्हणजे काय ? 

संधी आदेश म्हणजे काय ?

➤ संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे यालाच 'आदेश' (Adesh) असे म्हणतात.

संधीचे प्रकार किवा संधीचे आदेश पुढील प्रमाणे.

अ क्रघटकाचे नाव
गुणादेश [ Gunadesh ]
वृध्यादेश [ Vrudhyadesh ]
यणादेश [ Yanadesh ]


१] गुणादेश ( Gunadesh ) :-

गुणादेश म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन ए, ओ आणि अर् असे बदल होत असतील तर त्याला 'गुणादेश' ( Gunadesh ) म्हणतात.

गुणादेश उदाहरण मराठी :-

पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णदुसर्या शब्दातील पहिला वर्णहोणारा बदल
अ किंवा आइ किवा ई
अ किंवा आउ किंवा ऊ
अ किंवा आअर्

गुणादेश उदाहरण मराठी :-

विग्रहस्वरसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
ईश्वर + इच्छाअ + इ = एईश्वरेच्छा
महा + इंद्रआ + इ = एमहेंद्र
रमा + ईशआ + ई = एरमेश
समुद्र + ऊर्मीअ + ऊ = ओसमुद्रोर्मी
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
गंगा + उदकआ + उ = ओगंगोदक
ब्रम्ह + ऋषीअ + ऋ = अर्ब्रम्हर्षी
राजा + ऋषीआ + ऋ = अर्राजर्षी

२] वृध्यादेश ( Vrudhyadesh ) :- 

वृध्यादेश म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन ऐ आणि औ असे बदल होत असतील तर त्याला 'वृध्यादेश' ( Vrudhyadesh ) म्हणतात.

वृध्यादेश उदाहरण मराठी

पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णदुसर्या शब्दातील पहिला वर्णहोणारा बदल
अ किंवा आए किवा ऐ
अ किंवा आओ किंवा औ


वृध्यादेश उदाहरण मराठी

विग्रहस्वरसंधी
एक + एकअ + ए = ऐएकैक
मत + ऐक्यअ + ऐ = ऐमतैक्य
सभा + ऐक्यआ + ऐ = ऐसभैक्य
सदा + एवआ + ए = ऐसभैक्य
वृक्ष + औदार्यअ + औ = औवृक्षौदार्य
जल + ओघअ + ओ = औजलौघ
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यमुना + ओघआ + ओ = औयमुनौघ


३] यणादेश ( Yanadesh ) :- 

यणादेश म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसर्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन ऐ आणि औ असे बदल होत व त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. त्यालाच 'यणादेश' ( Yanadesh ) असे म्हणतात.

यणादेश उदाहरण :-

पहिल्या शब्दातील शेवटचा वर्णदुसर्या शब्दातील पहिला वर्णहोणारा बदल
इ किंवा ईविजातीय स्वर
उ किंवा ऊविजातीय स्वर
विजातीय स्वर


यणादेश उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
किती + एकई + ए = यकित्येक
अति + उत्तमइ + उ = यअत्युत्तम
गुरु + आज्ञाउ + आ = वागुर्वाज्ञा
भानू + ईश्वरऊ + ई = वीभान्वीश्वर
धृ + अनऋ + अ = रधरण


            आम्ही तुम्हाला येथे संधी आदेश म्हणजे काय ? , स्वर संधी म्हणजे काय ?, व्यंजन संधी म्हणजे काय ?, विसर्ग संधी म्हणजे काय ?, त्याची उदाहरणे ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला मराठी संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar ) संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला संधी व त्याचे प्रकार | Sandhi v tyache prakar | Marathi Sandhi | Sandhi v Sandhiche Prakar ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad