सेवापुस्तिकेवरील नोंदी
Service Book Nondi
Entries on the service book
सेवापुस्तिकेवरील नोंदी ( Service Book Nondi | Entries on the service book ) :-
शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी विभागात प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ( Service Book Nondi ) ठेवले जाते. त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या नोकरीदरम्यान केलेल्या कारवाईचा किंवा मिळालेल्या प्रशंसाचा संपूर्ण तपशील असतो. सेवापुस्तक हे कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. सेवापुस्तक ही प्रत्येक कर्मचाऱ्याची महत्त्वाची नोंद असते, त्यात कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक तपशील, पात्रता, पगार, सेवा पडताळणी, वेळोवेळी नियुक्ती, पोस्टिंग, बढती, एसीपी, बदली झाल्यावर जॉईन / डिपार्चर, CCA नियमांनुसार विभागीय कार्यवाही, तपास यांचा समावेश असतो.
तसेच सेवापुस्तकात निलंबन, पुनर्स्थापना, दंड, बडतर्फी, सेवा संपुष्टात आणण्याच्या नोंदीसह, विविध प्रकारच्या रजे जसे की PL / HPL / कम्युटेड रजा / मातृत्व रजा / पितृत्व रजा / समर्पित रजा / CCL / अभ्यासाची रजा / पगारी रजा इ. रजेची नोंद सर्व्हिस बुकमध्ये केली जाते. त्यात कर्मचाऱ्यांच्या पहिल्या नियुक्तीपासून ते सेवानिवृत्ती किंवा मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास आणि तपशील त्यात ठेवला जातो आणि त्याच्या आधारे पेन्शन कुलकही तयार केला जातो आणि पेन्शन प्रकरणासोबत मूळ सेवापुस्तिकाही जोडावी लागते.
सेवापुस्तिकेवरील नोंदी
Service Book Nondi
Entries on the service book
अ.क्र. | सेवापुस्तिकेवरील नोंदी |
---|
१ | सेवापुस्तिकेच्या पहिल्या पानावरील कर्मचाऱ्याच्या जन्मतारखेची नोंद पडताळणे. |
२ | पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे आवश्यक असते. |
३ | कर्मचाऱ्याच्या वैद्यकिय दाखल्यांच्या नोंदी वेळच्या वेळी नोंदी करणे. |
४ | सेवापुस्तिकेत जात पडताळणी बाबतची नोंद करणे. |
५ | सेवापुस्तिकेत भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांकाची नोंद करणे. |
६ | सेवापुस्तिकेत निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद करणे. |
७ | मृत्यू व सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
|
८ | गटविमा योजणेच्या वर्गणीची सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार नोंद करणे. |
९ | गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद. |
१० | सेवापुस्तिकेत गटविमा नामनिर्देशनाची नोंद करणे. |
११ | विहीत संगणक (M.S.CIT) अर्हता परिक्षा उत्तीर्ण असल्याबाबतची नोंद सेवापुस्तिकेत करणे. |
१२ | सेवांतर्गत प्रशिक्षणाची केल्याची नोंद सेवापुस्तिकेत करणे. |
१३ | सेवापुस्तिकेत वार्षिक वेतनवाढीची नोंद करणे. |
१४ | वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी असावी. |
१५ | कर्मचार्याने नावात बदल केलेला असल्यास तशी सेवापुस्तिकेत नोंद करावी. |
१६ | कर्मचार्याची बदली, पदोन्नती किंवा अन्य नियुक्ती असल्यास त्या आदेशाची नोंद असावी. |
१७ | कर्मचार्याची बदली, पदोन्नती किंवा अन्य नियुक्ती असल्यास त्या नुसार कार्यमुक्त, हजर किंवा पदग्रहण अवधीची नोंद असावी. |
१८ | कर्मचाऱ्यास सेवेत कायम केल्याची नोंद असावी. |
१९ | स्वग्राम घोषनापत्राची नोंद असावी.
|
२० | वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची नोंद व पडताळणीची नोंद असावी. |
२१ | कर्मचाऱ्याची पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना व एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद असावी.
|
२२ | पुरस्कार व त्याअनुशंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी कराव्यात.
|
२३ | कर्मचार्याने घेतलेल्या अर्जीत किंवा परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद सेवापुस्तिकेत करावी. |
२४ | कर्मचार्याने घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद सेवापुस्तिकेत करावी. |
२५ | रजा प्रवास सवलत नोंद सेवापुस्तिकेत करावी. |
२६ | कर्मचार्याने दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद सेवापुस्तिकेत करावी. |
२७ | कर्मचार्याने मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी सेवापुस्तिकेत कराव्यात. |
२८ | कर्मचार्याने सेवा पडताळणीची नोंद सेवापुस्तिकेत करावी. |
२९ | सुट्टीच्या कालावधीत जर कर्मचार्याने प्रशिक्षण घेतलेले असेल तर तशी रजा नोंदवावी. |
३० | कर्मचारी हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची तसेच सुट मिळाल्याची नोंद असावी.
|
३१ | कर्मचार्याने जनगणनेचे काम केले असेल तर त्याची रजा नोंद करावी. |
तुम्हाला सेवापुस्तिकेवरील नोंदी | Service Book Nondi | Entries on the service book ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box