स्वर संधी व त्याचे नियम | Swar Sandhi Marathi | Swar Sandhi in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 8, 2023

स्वर संधी व त्याचे नियम | Swar Sandhi Marathi | Swar Sandhi in Marathi

Swar Sandhi Marathi

स्वर संधी व त्याचे नियम

Swar Sandhi in Marathi

स्वर संधी व त्याचे प्रकार | Swar Sandhi Marathi | Swar Sandhiche Prakar

स्वर संधी व त्याचे नियम ( Swar Sandhi Marathi  | Swar Sandhi in Marathi )  :- 

            स्वर संधी व त्याचे नियम ( Swar Sandhi Marathi | Swar Sandhi in Marathi ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी स्वर संधी ( Marathi Swar Sandhi | Swar Sandhi in Marathi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी स्वर संधी मराठी ( Swar Sandhi in Marathi | Swar Sandhiche Marathi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया स्वर संधी व त्याचे नियम | Swar Sandhi v Tyache Niyam | Swar Sandhi in Marathi | Swar Sandhi Marathi ).

        स्वर संधी बघण्यागोदर आपल्याला संधी म्हणजे काय ते माहित असणे गरजेचे आहे. आपण बोलत असताना आपल्याला नवनवीन शब्दांची ओळख होत असते. बऱ्याच वेळी काही शब्द असतात जे दोन वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेले असतात परंतु आपण त्यांचा उच्चार एकत्र करत असतो.

उदाहरणार्थ :-
'गुरूपदेश' हा शब्द गुरू + उपदेश या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. तसेच

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन

            वरील प्रमाणे जे जोडशब्द तयार होतात त्यांनाच संधी असे म्हणतात.


संधी म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' ( Sandhi ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन


        तसेच जेव्हा जोडशब्दांना आपण वेगळे करत असतो त्याला आपण त्या जोडशब्दाचा विग्रह म्हणजेच संधीचा विग्रह करणे असे म्हणतो.



संधीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

     स्वरसंधी [ Swar Sandhi ]

     व्यंजनसंधी [ Vyanjan Sandhi ]

     विसर्गसंधी [ Visarg Sandhi ]

            चला तर मग आता 'स्वर संधी' ( Swar Sandhi ) म्हणजे काय ?



स्वर संधी म्हणजे काय ?

एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असल्यास त्यास ‘स्वर संधी’ ( Swar Sandhi ) असे म्हणतात.

➤ एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला ‘स्वर संधी’ ( Swar Sandhi ) असे म्हणतात.

 एकमेकांच्या शेजारील वर्ण जर स्वर असेल तर त्यास ‘स्वर संधी’ ( Swar Sandhi ) म्हणतात.

स्वरसंधी = स्वर + स्वर

स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
पर + उपकारअ + उ = ओपरोपकार
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
पितृ + औदार्यऋ + औ = रपित्रोदार्य
पितृ + आज्ञाऋ + आ = रपित्राज्ञा
गै + अकऐ + अ = आयगायक
नै + अकऐ + अ = आयनायक
ब्रम्ह + ऋषीअ + ऋ = अर्ब्रम्हर्षी
गंगा + उदकआ + उ = ओगंगोदक
अनु + अर्थउ + अ = वअन्वर्थ
मनु + अंतरउ + अं = वमन्वंतर
अति + उत्तमइ + उ = यअत्युत्तम
किती + एकई + ए = यकित्येक
महा + औदार्यआ + औ = औमहौदार्य
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
क्षण + एकअ + ए = ऐक्षणैक
एक + एकअ + ए = ऐएकैक
पर + उपकारअ + उ = ओपरोपकार
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
वनिता + आश्रमआ + आ= आवनिताश्रम
गीता + अर्णवआ + अ = आगीतार्णव


स्वरसंधीचे नियम पुढीलप्रमाणे आहे.

नियमस्वरपुढील स्वरबदल

सजातीय स्वर

सजातीय स्वर

दीर्घ स्वर

अ किंवा आइ किंवा ई
अ किंवा आउ किंवा ऊ
अ किंवा आए किंवा ऐ
अ किंवा आओ किंवा औ
इ किवा ईविजातीय स्वर
उ किंवा ऊविजातीय स्वर
विजातीय स्वर

विजातीय स्वर

अय

१०विजातीय स्वरआय
११विजातीय स्वरअव
१२विजातीय स्वरआव


नियम १] दोन सजातीय स्वर एकमेकांशेजारी आले असता त्या दोहोंबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो. यालाच ‘दीर्घत्व संधी’ असे म्हणतात.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
गीता + अर्णवआ + अ = आगीतार्णव
वनिता + आश्रमआ + आ= आवनिताश्रम
गुरु + उपदेशउ + उ = ऊगुरूपदेश
मुनि + इच्छाइ + इ = ईमुनीच्छा
सूर्य + अस्तअ + अ = आसूर्यास्त
कवी + इच्छाई + इ = ईकवीच्छा



नियम २] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
गण + ईशअ + ई = एगणेश
महा + इंद्रआ + इ = एमहेंद्र
ईश्वर + इच्छाअ + इ = एईश्वरेच्छा
यथा + इष्टआ + इ = एयथेष्ट
रमा +ईशआ + ई = एरमेश

नियम ३] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
अरूण + उदय2अ + उ = ओअरूणोदय
पर + उपकारअ + उ = ओपरोपकार
गंगा + उदकआ + उ = ओगंगोदक
समुद्र + ऊर्मीअ + ऊ = ओसमुद्रोर्मी
गंगा + उर्मीआ + उ = ओगंगोर्मी
महा + उत्सवआ + उ = ओमहोत्सव



नियम ४] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
उदाहरणार्थ :-

विग्रहस्वरसंधी
एक + एकअ + ए = ऐएकैक
क्षण + एकअ + ए = ऐक्षणैक
सभा + ऐक्यआ + ऐ = ऐसभैक्य
मत + ऐक्यअ + ऐ = ऐमतैक्य
जन + ऐक्यअ + ऐ = ऐजनैक्य
विद्या + ऐश्वर्यआ + ऐ = ऐविद्यैश्वर्य

हे पण पहा :- आलंकारिक शब्द


नियम ५] ’ किंवा ’ यांच्यापुढे ’ किंवा ’ आल्यास त्या दोहोंएवजी ’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
महा + औदार्यआ + औ = औमहौदार्य
वृक्ष + औदार्यअ + औ = औवृक्षौदार्य
वन + औषधीअ + औ = औवनौषधी
यमुना + ओघआ + ओ = औयमुनौघ
जल + ओघअ + ओ = औजलौघ



नियम ६] ’ किंवा ’ यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘य’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
किती + एकई + ए = यकित्येक
अति + उत्तमइ + उ = यअत्युत्तम
अति + अल्पइ + अ = यवृक्षौदार्य
प्रति + अंतरइ + अं = यप्रत्यंतर
अति + आचारइ + आ = याअत्याचार
अति + आनंदइ + आ = याअत्यानंद



नियम ७] ’ किंवा ’ यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘व’ होतो.
स्वर संधीचे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
मनु + अंतरउ + अं = वमन्वंतर
अनु + अर्थउ + अ = वअन्वर्थ
सु + अल्पउ + अ = वस्वल्प
सु + आनंदउ + आ = वास्वानंद
गुरु + आज्ञाउ + आ = वागुर्वाज्ञा
भानू + ईश्वरऊ + ई = वीभान्वीश्वर



नियम ८] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘र’ होतो.
स्वर संधीचे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
धृ + अनऋ + अ = रधरण
मातृ + इच्छाऋ + इ = रमत्रीच्छा
भातृ + ऐक्यऋ + ऐ = रभ्रात्रैक्य
मातृ + उत्सवऋ + उ = रमात्रुत्सव
पितृ + आज्ञाऋ + आ = रपित्राज्ञा
पितृ + औदार्यऋ + औ = रपित्रोदार्य

नियम ९] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘अय’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
ने + अनए + अ = अयनयन
शे + अनए + अ = अयशयन



नियम १०] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘आय’ होतो.
उदाहरणार्थ :-

विग्रहस्वरसंधी
नै + अकऐ + अ = आयनायक
गै + अकऐ + अ = आयगायक
गै + अनऐ + अ = आयगायन



नियम ११] ’ च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘अव’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
गो + ईश्वरओ + ई = अवगवीश्वर
गो + अक्षओ + अ = अवगवाक्ष
पो + अनओ + अ = अवपवन



नियम १२]  च्यापुढे विजातीय स्वर आल्यास ‘आव’ होतो.
स्वर संधी चे उदाहरण :-

विग्रहस्वरसंधी
पौ + अकऔ + अ = आवपावक
पौ + अनऔ + अ = आवपावन
नौ + इकऔ + इ = आवनाविक

          तुम्हाला स्वर संधी व त्याचे नियम | Swar Sandhi Marathi | Swar sandhi in marathi   ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad