Teachers Day Speech in Marathi | शिक्षक दिन भाषण | शिक्षक दिन माहिती - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 30, 2023

Teachers Day Speech in Marathi | शिक्षक दिन भाषण | शिक्षक दिन माहिती

TEACHERS DAY SPEECH

शिक्षक दिन भाषण

शिक्षक दिन माहिती

            शिक्षक दिन भाषण ( Teachers Day Speech in Marathi ) हे शाळा, कॉलेज किवा इतर ठिकाणी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या दिवशी ( Teachers Day ) करावे लागते. तेव्हा भाषण तयार करायला माहितीची आवश्यकता असते ती गोळा करून शिक्षक दिन भाषण ( Teachers Day Speech ) तयार करावे लागते. तुमचा भार थोडासा कमी करण्याचा आम्ही इथे एक छोटासा प्रयत्न केला. तरी अशा करतो की तुम्हाला हे शिक्षक दिन भाषण ( Teachers Day Speech ) आवडेल.

Teachers Day Speech in Marathi | शिक्षक दिन भाषण | शिक्षक दिन माहिती


Teachers Day Speech 

शिक्षक दिन भाषण | शिक्षक दिन माहिती

            आदरणीय मंचस्त, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बंधू - बघिनिनो आज आपण येथे ५ सप्टेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवस संपूर्ण भारत भर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. आज आपण येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत.
 

          भारत देश हा संस्कृति व परंपरा जोपासण्यासाठी ओळखला जातो. त्यातही आपल्या देशात गुरूला एक अनन्य साधारण महत्व आहे म्हणूनच आपण म्हणतोना

गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः। 

          कारण गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. आपल्या जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आपल्याला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय आपल्या आई – वडिलांनाच जाते त्यामुळे आपल्या जीवनातील सर्वात पहिले गुरु आपले आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात.


          गुरूंच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण लहान मुले म्हणजे मातीचा गोळाच असतो त्याला जसा आकार दिला तशी मूर्ती घडते व करण्याचे काम गुरु करतात. गुरु हा सामाजाचा निर्माण कर्ता असतो लहान बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य गुरुला कारायचे असते तेव्हाच भविष्यातले शास्त्रज्ञ, इंजिनियर, डॉक्टर, खेळाडू, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर गुरूंकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच गुरूंना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे गुरूंचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद गुरूंमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि गुरूंप्रती प्रेम, आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा केला जातो.


          भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबर या जन्म-दिवसाच्या निमित्ताने दरवर्षी शिक्षकांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञतेची भावना तसेच सन्मान प्रकट करण्यासाठी शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ या आठ वर्षांच्या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये भारत सरकारने रशियातील भारताचा राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती केली. तेथेही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. १९५२ मध्ये ते भारतात परतले, त्यानंतर १९५२ ते १९६२ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. १४ मे १९६२ रोजी ते भारताचे राष्ट्रपती झाले. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. सर्वपल्ली यांना नोबेल साहित्य पुरस्कारासाठी १६ वेळा तर नोबेल शांतता पुरस्कारासाठी ११ वेळा नामांकन मिळाले होते. १७ एप्रिल १९७५ मध्ये त्यांचे चेन्नई येथे निधन झाले.


          भारतामध्ये १९६२ मध्ये शिक्षक दिन ( Teacher's Day) साजरा करण्यात आला. आपल्याकडे जरी हा दिवस ५ सप्टेंबरला साजरा करण्यात येत असला तरी जगभरात वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन (Teacher's Day) साजरा करण्यात येतो. पाच ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन असतो. इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.


          प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे अनन्य साधारण महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. त्यामुळेच अनेक शाळांमध्ये शिक्षक दिन (Teacher's Day) वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही शाळांमध्ये मुलांना खाऊचे वाटप केले जाते. तर काही शाळांमध्ये मोठ्या इयत्तेमधील विद्यार्थी शिक्षक होतात आणि लहान इयत्तेमधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकवतातही. आई-वडिलांनंतर आपल्याला घडविण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा कोणाचा असेल तर तो आपल्या शिक्षकांचा असतो असे म्हटले जाते. म्हणूनच आज अनेकजण आपल्या शिक्षकांबरोबरच पालकांनाही शुभेच्छा देताना देताना दिसतात. त्याचमुळे या दिवसाला फार महत्त्व आहे.

सर्वाना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Teacher's Day


          तुम्हाला शिक्षक दिन भाषण | शिक्षक दिन माहिती | Teacher's Day Speech ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad