लिंग व त्याचे प्रकार | Types of Gender in Marathi | Marathi Gender | Gender in Marathi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 22, 2023

लिंग व त्याचे प्रकार | Types of Gender in Marathi | Marathi Gender | Gender in Marathi

Types of Gender in Marathi

लिंग व त्याचे प्रकार

Marathi Gender | Gender in Marathi

मराठी लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi Gender | Gender in Marathi )

लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi Gender ) :- 

            लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi Gender ) हा मराठी व्याकरणातील फार महत्वाचा घटक आहे. या घटकावर स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास एक तरी प्रश्न विचारलाच जातो. या मध्ये लिंग बदला, लिंग ओळखा, पुलिंगाचे स्त्रीलिंग ओळखा, स्त्रीलिंगाचे पुलिंग ओळखा किंवा नपुसक लिंग ओळखा अशा प्रकारचे प्रश्न नवोदय परीक्षा, ५ वी स्कॉलरशिप, ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, TET Exam, TIAT Exam, CTET Exam, MPSC, UPSC  व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे आपल्याला लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi in Gender ) माहिती असली पाहिजे. त्यामुळे आपल्याला या घटकातील गुण मिळतील. 
            आम्ही मराठी लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi  in Gender ) ही माहिती होतकरू व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करतो की तुम्हाला लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi Gender ) ही माहिती तुमच्या उपयोगी येईल.


लिंग म्हणजे काय?

          नामाला त्याच्या रुपावरून तो घटक पुरुष जातीचा आहे की स्त्री जातीचा आहे किंवा यादोन्हीही जातीत मोडत नाही हे आपल्याला ज्यावरून कळते त्याला त्या नामाचे लिंग ( Ling / Gender ) असे म्हणतात.
          लिंग हे नामाच्या रुपावरून ठरत असते.

हे पण पहा :- नाम

लिंगाचे प्रकार किती?

मराठी भाषेमध्ये नामाच्या लिंगाचे तीन प्रकार आहेत.

लिंगाचे प्रकार कोणते?

मराठीत नामाच्या लिंगाचे तीन प्रकार खलील प्रमाणे आहेत.

क्रलिंगाचे प्रकार
पुल्लिंग [ Puling ]
[ Masculine Gender in Marathi ]
स्त्रीलिंग [ Sriling ]
[ Feminine Gender in Marathi ]
नपुंसक लिंग [ Napunsak Ling ]
[ Neuter Gender in Marathi ]

१) पुल्लिंग म्हणजे काय?

          एखादे नाम जर पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देत असेल तर त्या नामाला पुल्लिंगी नाम ( Masculine Gender / Puling ) असे म्हणतात.
          पुल्लिंग नाम ओळखण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे ज्या नामाला 'तो' हा सर्वनाम वापरतात ते नाम पुल्लिंगी नाम असतो.
उदाहरणार्थ :-
  • तो पती
  • तो आरसा
  • तो मालक
  • तो हंस
  • तो जनक


२) स्त्रीलिंग म्हणजे काय?

          एखादे नाम जर स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देत असेल तर त्या नामाला स्त्रील्लिंगी नाम ( Feminine Gender / Sriling ) असे म्हणतात.
          स्त्रील्लिंग नाम ओळखण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे ज्या नामाला 'ती' हे सर्वनाम वापरतात ते नाम स्त्रील्लिंगी नाम असतो.
उदाहरणार्थ :-
  • ती भगिनी
  • ती मैना
  • ती कालवड
  • ती माळीण
  • ती फळी

हे पण पहा :- 
बहुव्रीहि समास

३) नपुंसक लिंग म्हणजे काय?

          एखादे नाम जर स्त्री किंवा पुरुष अशा दोन्ही जातीचा बोध होत नसेल तर त्या नामाला नपुंसक लिंग नाम ( Neuter Gender / Napunsak Ling ) असे म्हणतात.
          नपुंसक लिंग नाम ओळखण्यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे ज्या नामाला 'ते'' हे सर्वनाम वापरतात ते नाम नपुंसक लिंगी नाम असतो.
उदाहरणार्थ :-
  • ते खेड
  • ते बदक
  • ते शिंग
  • ते तरस
  • ते सोने

मराठी लिंगाचे नियम ( Marathi Gender Rules )

            मराठी लिंग ( Marathi Gender )  या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास आपल्या असे लक्षात येते की त्याचे काही सामान्य नियम पहावयास मिळतात ते पुढील प्रमाणे आहेत.

नियम १] प्राणिवाचक पुल्लिंगीनाम जर 'आ' करांत असेल तर त्याचे स्रीलिंगी रूप 'ई' करांत होतो.

पुलिंग = स्रीलिंगपुलिंग = स्रीलिंगपुलिंग = स्रीलिंग
राजा = राणीमुलगा = मुलगीघोडा = घोडी
कुत्रा = कुत्रीपोरगा = पोरगीचिमणा = चिमणी


नियम २] प्राणिवाचक पुल्लिंगीनाम जर 'आ' करांत असेल तर त्याचे नपुसक लिंगी रूप 'ए' करांत होते.

पुलिंग = न.लिंगपुलिंग = न.लिंगपुलिंग = न.लिंग
घोडा = घोडेमुलगा = मुलगेकुत्रा = कुत्रे
कोल्हा = कोल्हेपोरगा = पोरगीछकुला = छकुले


नियम ३] काही प्रसंगी प्राणिवाचक पुल्लिंगीनामाला 'ईण' प्रत्यय लावून स्रीलिंगी रूप बनते.

पुलिंग = स्त्रीलिंगपुलिंग = स्त्रीलिंग
कुंभार = कुंभारीणवाघ = वाघीण
कोळी = कोळीणपोपट = पोपटीण
सिंह = सिंहीणमालक = मालकीण
हत्ती = हत्तीणतेली = तेलीण
वाघ = वाघीणधोबी = धोबीण


नियम ४] काही प्रसंगी प्राणिवाचक पुल्लिंगीनाम जर 'अ' करांत असेल तर त्याचे स्रीलिंगी रूप 'ई' करांत होते.

पुलिंग = स्त्रीलिंगपुलिंग = स्त्रीलिंग
तरुण = तरुणीकासव = कासवी
कुमार = कुमारीदास = दासी
देव = देवीवानर = वानरी
बेडूक = बेडकीहंस = हंसी


नियम ५] काही पुल्लिंगी 'आ' करांत पदार्थवाचक नामांना 'ई'  प्रत्यय लावून स्रीलिंगी रूप बनते.

पुलिंग = स्त्रीलिंगपुलिंग = स्त्रीलिंग
विधाता = विधात्रीदांडा = दांडी
लोटा = लोटीगाडा = गाडी
फळा = फळीनळा = नळी
वाडा = वाडीखडा = खडी


नियम ६] काही नामांची स्रीलिंगी रूपे वेगळ्या पद्धतीने होतात.

पुलिंग = स्त्रीलिंगपुलिंग = स्त्रीलिंग
वाघ्या = मुरळीपुत्र = कन्या
बोका = भातीपोपट = मैना
उंट = सांडणीभाऊ = बहिण
बाप = आईमुलगा = सून


नियम ७] संस्कृतमधून आलेली नामे स्रीलिंगात रुपांतरीत करतांना 'ई' प्रत्यय लावावा लागतो.

पुलिंग = स्त्रीलिंगपुलिंग = स्त्रीलिंग
युवा = युवतीग्रंथकर्ता = ग्रंथकर्ती
विद्वान = विदुषीराजा = राज्ञी
श्रीमान = श्रीमतीभगवान = भगवती


नियम ८] काही नामे लिंग बदलताना बदलत नाहीत.

पुलिंगस्रीलिंगनपुंसकलिंग
मूलमूलमूल
पोरपोरपोर
बागबाग-
वेळवेळ-
हरीण-हरीण
नेत्र-नेत्र

हे पण पहा :- मराठी बोधकथा

नियम ९] सामासिक शब्दांचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरते.

सा.शब्दविग्रहलिंग
भाजीपालाभाजी + पालापाला = पुलिंग
भाऊबहिणभाऊ + बहीणबहीण = स्रीलिंग
मीठभाकरीमीठ + भाकरीभाकरी = स्रीलिंग
गायरानगाय + रानरान = न.लिंग
देवघरदेव + घरघर = न. लिंग


नियम १०] एकाच नावाला वेगवेळ्या नावानी संबोधल्यास नावावरून लिंग बदलू शकते.

पुलिंगस्रीलिंगनपुंसकलिंग
तो ग्रंथती पोथीते पुस्तक
तो वाडाती इमारतते घर
तो देहती कायाते शरीर

हे पण पहा :- मराठी साहित्य अकादमी पुरस्कार

नियम ११] काही प्राण्यांना नर असो किंवा मादी ते एकाच लिंगात येतात.

पुलिंगस्त्रीलिंग
मासामैना
गरुडजळू
पोपटघार
कावळाघूस
सुरवंट
टोळसुसर


          कोणतीही स्पर्धा परीक्षा असो त्यामध्ये दिलेल्या शब्दाचे लिंग बदला, लिंग ओळखा, पुलिंगाचे स्त्रीलिंग ओळखा, स्त्रीलिंगाचे पुलिंग ओळखा किंवा नपुसक लिंग ओळखा असे प्रश्न हमखास असतातच त्यामुळे खलील तक्त्यांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

हे पण पहा :- तत्सम शब्द

पुल्लिंग चे स्त्रील्लिंग

पुल्लिंगस्त्रीलिंग
तो = राजाती = राज्ञी / राणी
तो = फळाती = फळी
तो = दांडाती = दांडी
तो = आरसा 
ती = आरशी
तो = गाडाती = गाडी
तो = खड़ाती = खड़ी
तो = सुतार 
ती = सुतारीण
तो = पाटीलती = पाटलीण
तो = कुंभारती = कुंभारीण
तो = वाघती = वाघीण
तो = तेलीती = तेलीण
तो = माळीती = माळीण
तो = हंसती = हंसी
तो = बेडूक 
ती = बेडकी
तो = दासती = दासी
तो = गोपती = गोपी
तो = तरुणती = तरुणी
तो = वानरती = वानरी
तो = लोटाती = लोटी
तो = युवा 
ती = युवती
तो = श्रीमानती = श्रीमती
तो = विद्वानती = विदुषी
तो = पुरुषती = स्त्री
तो = नरती = नारी / मादी
तो = पतीती = पत्नी
तो = कवी 
ती = कवयित्री
तो = वाघ्याती = मुरळी
तो = पुत्रती = कन्या
तो = बैलती = गाय
तो = मुलगाती = सून / मुलगी
तो = बंधूती = भगिनी 

हे पण पहा :-सामासिक शब्द

पुल्लिंग चे स्त्रील्लिंग


पुलिंगस्त्रीलिंग
तो = भाऊ 
ती = बहीण
तो = गृहस्थती = गृहिणी
तो = विधुरती = विधवा
तो = जनकती = जननी
तो = मोरती = लांडोर
तो = नातूती = नात
तो = उंट 
ती = सांडणी
तो = पोपटती = मैना
तो = रेडाती = म्हैस
तो = खोंडती = कालवड
तो = साधूती = साध्वी
तो = मुलगाती = मुलगी
तो = पोरगाती = पोरगी
तो = कुत्राती = कुत्री
तो = पाटील 
ती = पाटलीण
तो = तेलीती = तेलीण
तो = सिंहती = सिंहीण
तो = फळाती = फळी
तो = भगवानती = भगवती
तो = पुतण्या 
ती = पुतणी
तो = लेखकती = लेखिका
तो = बालकती = बालिका
तो = राजपुत्रती = राजकन्या
तो = कोल्हाती = कोल्हीण
तो = व्याहीती = विहीण
तो = प्रिय 
ती = प्रिया
तो = कोकीळती = कोकिळा
तो = दाताती = दात्री
तो = दीरती = जाऊ
तो = पत्रकारती = पत्रकर्ती
तो = नर्तकती = नर्तिका
तो = मेहुणाती = मेहुणी
तो = शुकती = सारिका
तो = गायकती = गायिका 



पुल्लिंग चे स्त्रील्लिंग

पुलिंगस्त्रीलिंग
तो = सुतार 
ती = सुतारीण
तो = कुंभारती = कुंभारीण
तो = वाघती = वाघीण
तो = संतती = संतीन
तो = लोहारती = लोहारीण
तो = सिंहती = सिंहीण
तो = वकीलती = वकिलीण
तो = डॉक्टरती = डॉक्टरीण
तो = पोलीसती = पोलीसीण
तो = मास्तरती = मास्तरीण
तो = विळा 
ती = विळी
तो = गवळीती = गवळण
तो = महोदयती = महोदया
तो = पणजोबाती = पणजी
तो = नवराती = बायको
तो = वडीलती = आई
तो = आजोबाती = आजी
तो = नानाती = नाणी
तो = काकाती = काकी
तो = नालाती = नाली
तो = गोळाती = गोळी 

हे पण पहा :- विराम चिन्हे

नपुंसक लिंग शब्द

नपुंसक लिंगनपुंसक लिंगनपुंसक लिंग
ते = कोकरूते = गावते = बदक
ते = पाखरूते = दारते = मंदिर
ते = लेकरूते = घरते = कोल्हे
ते = कार्यालयते = पोरते = पोरगे
ते = घड्याळते = कुत्रेते = छकुले
ते = मूलते = घोडेते = पुस्तक
ते = ताटते = झाडते = मुलगे
ते = फूलते = दारते = कपाट 



            आम्ही तुम्हाला येथे लिंग म्हणजे काय ? , लिंगाचे उदाहरण, लिंगाचे प्रकार, लिंग बदला, लिंग ओळखा, पुलिंगाचे स्त्रीलिंग ओळखा, स्त्रीलिंगाचे पुलिंग ओळखा किंवा नपुसक लिंग ओळखा यासाठी ही माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाला आहे. तरी तुम्हाला मराठी लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi Gender | Gender in Marathi ) संबंधित प्रश्नांची उत्तरे यातून मिळाली असतील अशी आशा करतो. व तुम्हाला मराठी लिंग व त्याचे प्रकार ( Types of Gender in Marathi | Marathi Gender | Gender in Marathi ) ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad