संख्या प्रकार
Types of Number System
Sankhya Web | Sankhya Prakar
संख्या प्रकार | Types of number System | Sankhya prakar | Sankhya Web :-
जगात कोठेही वावरतांना आपल्याला संख्या ही एकमेव गोष्ट आहे जी सर्वीकडे सारखीच असते. संख्या ही गणिती वस्तू आहे जी गणना करण्यासाठी वापरली जाते. नैसर्गिक संख्यांचे मूळ उदाहरणे १, २, ३, ४, ५, .... आणि पुढे ही आहेत. संख्यांनी सांख्यिक भाष्या दर्शविली जाऊ शकते. साधारणतः वैयक्तिक संख्या चिन्हांद्वारे दर्शविल्या जाऊ शकतात, ज्याला अंक असे म्हणतात.
उदा :- "४" हा एक अंक आहे जो पाच क्रमांकाचे प्रतिनिधित्व करतो.
संख्या प्रकार | Types of number System | Sankhya prakar | Sankhya Web
क्र संख्यांचे प्रकार १ नैसर्गिक संख्या
Natural Numbers | Naisargik Sankhya २ पूर्ण संख्या
Whole Numbers | Purn Sankhya ३ पूर्णांक संख्या
Integers Numbers | Purnank Sankhya ४ सम संख्या
Even Numbers | Sam Sankhya ५ क्रमवार सम संख्या
Serial Even Numbers | Kramvar Sam Sankhya ६ विषम संख्या
Odd Numbers | Visham Sankhya ७ क्रमवार विषम संख्या
Serial Odd Numbers | Kramvar Visham Sankhya ८
मुळ संख्या
Prime Numbers | Mul Sankhya ९ संयुक्त संख्या
Composite Number | Sanyukt Sankhya १० जोड मुळ संख्या
Twin Prime Numbers | Jod Mul Sankhya ११ सहमुळ संख्या
Co-prime Numbers | Sahamul Sankhya १२ परिमेय संख्या
Rational Numbers | Parimey Sankhya १३ अपरिमेय संख्या
Infinite Numbers | Aparimey Sankhya १४ वास्तव संख्या
Real Numbers | Vastav Sankhya १५ विरुद्ध संख्या
Opposite Numbers | Virudh Sankhya १६ व्यस्त संख्या
Vyst Sankhya १७ त्रिकोणी संख्या
Triangular number | Trikoni Sankhya १८ चौरस संख्या
Square number | Chauras Sankhya
क्र | संख्यांचे प्रकार |
---|---|
१ | नैसर्गिक संख्या Natural Numbers | Naisargik Sankhya |
२ | पूर्ण संख्या Whole Numbers | Purn Sankhya |
३ | पूर्णांक संख्या Integers Numbers | Purnank Sankhya |
४ | सम संख्या Even Numbers | Sam Sankhya |
५ | क्रमवार सम संख्या Serial Even Numbers | Kramvar Sam Sankhya |
६ | विषम संख्या Odd Numbers | Visham Sankhya |
७ | क्रमवार विषम संख्या Serial Odd Numbers | Kramvar Visham Sankhya |
८ | मुळ संख्या Prime Numbers | Mul Sankhya |
९ | संयुक्त संख्या Composite Number | Sanyukt Sankhya |
१० | जोड मुळ संख्या Twin Prime Numbers | Jod Mul Sankhya |
११ | सहमुळ संख्या Co-prime Numbers | Sahamul Sankhya |
१२ | परिमेय संख्या Rational Numbers | Parimey Sankhya |
१३ | अपरिमेय संख्या Infinite Numbers | Aparimey Sankhya |
१४ | वास्तव संख्या Real Numbers | Vastav Sankhya |
१५ | विरुद्ध संख्या Opposite Numbers | Virudh Sankhya |
१६ | व्यस्त संख्या Vyst Sankhya |
१७ | त्रिकोणी संख्या Triangular number | Trikoni Sankhya |
१८ | चौरस संख्या Square number | Chauras Sankhya |
संख्याचे प्रकार | Types of number System | Sankhya prakar | Sankhya Web
१) नैसर्गिक संख्या ( Natural Numbers | Naisargik Sankhya ) :-
१, २, ३, ४, ५, ६, ७, ८ ....... या क्रमाने येणार्या आणि मोजण्यासाठी वापरल्या जाणार्या संख्याना नैसर्गिक संख्या ( Natural Numbers | Naisargik Sankhya ) म्हणतात. यालाच मोजसंख्या ( Counting Numbers ) व क्रमवार संख्या ( Serial Number ) असेही म्हणतात. यामध्ये ० ही संख्या येत नाही म्हणून ० ही नैसर्गिक संख्या नाही.
उदा :- १, २, ३, ४, ५, ६, ७, ८ इत्यादी
२) पूर्ण संख्या (Whole Numbers | Purn Sankhya) :-
नैसर्गिक संख्या ( Natural Numbers ) मध्ये जेव्हा शून्य समाविष्ट होतो तेव्हा त्यांना पूर्ण संख्या (Whole Numbers | Purn Sankhya) म्हणतात. पूर्ण संख्यांनमध्ये अपूर्णांक, दशांश किंवा ऋण संख्यांचा समावेश होत नाही.
उदा :- ०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८ इत्यादी
३) पूर्णांक संख्या ( Integers Numbers | Purnank Sankhya) :-
पूर्ण संख्यांनमध्ये (Whole Numbers) जेव्हा ऋण संख्यांचा पण समावेश होत तेव्हा त्यांना पूर्णांक संख्या ( Integers Numbers | Purnank Sankhya ) असे म्हणतात.
उदा :- -६, -५, -४, -३, -२, -१, ०, १, २, ३, ४, ५, ६ इत्यादी
४) सम संख्या (Even Numbers | Sam Sankhya) :-
ज्या संख्याला २ ने भागले असता बाकी शुन्य राहतात म्हणजेच पुर्ण भाग जातो आणि एकक स्थानी ०,२,४,६,८ हे अंक असतात त्यांना सम संख्या (Even Numbers | Sam Sankhya) म्हणतात. शून्य ( ० ) ही सुद्धा सम संख्या आहे.
उदा :- ३४, ५६२, ६६८६,
५) क्रमवार सम संख्या ( Serial Even Numbers | Kramvar Sam Sankhya) :-
क्रमाने येणार्या सम संख्याना क्रमवार सम संख्या ( Serial Even Numbers | Kramvar Sam Sankhya ) म्हणतात. क्रमवार सम संख्येमध्ये नेहमी 2 चा फरक असतो.
उदा :- २,४,६,८,१०,१२,१४,१६......... इत्यादी.
६) विषम संख्या ( Odd Numbers | Visham Sankhya ) :-
ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जात नाही व भागले असता बाकी १ उरते अशा संख्येच्या एककस्थानी १,३,५,७,९ हे अंक असतात. त्यांना विषम संख्या (Odd Numbers | Visham Sankhya ) म्हणतात.
उदा :- २५, ६५३, ७५६९
७) क्रमवार विषम संख्या ( Serial Odd Numbers | Kramvar Visham Sankhya ) :-
क्रमाने येणार्या विषम संख्याना क्रमवार विषम संख्या ( Serial Odd Numbers | Kramvar Visham Sankhya ) म्हणतात. क्रमवार विषम संख्येमध्ये नेहमी 2 चा फरक असतो.
उदा :- १,३,५,७,९,११,१३,१५........ इत्यादी
सम व विषम संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम :-
The basic rules of even and odd numbers :-
१) सम संख्या + सम संख्या = सम संख्या
उदा :- २ + ४ = ६
२) सम संख्या + विषम संख्या = विषम संख्या
उदा :- २ + ३ = ५
३) विषम संख्या – विषम संख्या = सम संख्या
उदा :- ३ - ५ = २
४) सम संख्या x सम संख्या = सम संख्या
उदा :- २ × ४ = ८
५) विषम संख्या x विषम संख्या = विषम संख्या
उदा :- ३ × ३ = ९
६) सम संख्या – सम संख्या = सम संख्या
उदा :- ४ - २ = २
७) सम संख्या – विषम संख्या = विषम संख्या
उदा :- २ - १ = १
८) विषम संख्या + विषम संख्या = सम संख्या
उदा :- ३ + ५ = ८
९) सम संख्या x विषम संख्या = सम संख्या
उदा :- २ × ३ = ६
८) मुळ संख्या (Prime Numbers | Mul Sankhya) :-
ज्या संख्येला १ आणि तीच संख्या याशिवाय अन्य कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्या संख्येला मुळ संख्या ( Prime Numbers | Mul Sankhya ) म्हणतात.
उदा :- ३ या संख्येला ३ आणि १ नीच भाग जातो दुसर्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणुन ३ ही मुळ संख्या ( Prime Numbers | Mul Sankhya ) झाली.
१ ते १०० पर्यंत एकुण २५ मुळ संख्या आहे.
संख्या मुळ संख्या संख्या मुळ संख्या ०१ ते १० २, ३, ५, ७
५१ ते ६० ५३, ५९ ११ ते २० ११, १३, १७, १९ ६१ ते ७० ६१, ६७ २१ ते ३० २३, २९ ७१ ते ८० ७१, ७३, ७९ ३१ ते ४० ३१, ३७ ८१ ते ९० ८३, ८९ ४१ ते ५० ४१, ४३, ४७ ९१ ते १०० ९७
संख्या | मुळ संख्या | संख्या | मुळ संख्या |
---|---|---|---|
०१ ते १० | २, ३, ५, ७ | ५१ ते ६० | ५३, ५९ |
११ ते २० | ११, १३, १७, १९ | ६१ ते ७० | ६१, ६७ |
२१ ते ३० | २३, २९ | ७१ ते ८० | ७१, ७३, ७९ |
३१ ते ४० | ३१, ३७ | ८१ ते ९० | ८३, ८९ |
४१ ते ५० | ४१, ४३, ४७ | ९१ ते १०० | ९७ |
फक्त २ ही समसंख्या मूळसंख्या आहे. बाकी सर्व मूळसंख्या ह्या विषम संख्या आहेत.
९) संयुक्त संख्या ( Composite Number | Sanyukt Sankhya ) :-
ज्या संख्येला १ आणि तिच संख्या याशिवाय दुसर्याही संख्येनी भाग जातो त्याला संयुक्त संख्या ( Composite Number | Sanyukt Sankhya ) म्हणतात. मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या ( Composite Number | Sanyukt Sankhya ) म्हणतात.
उदा :- १२ या संख्येला १, २, ३, ४, ६, १२ इत्यादि संख्येनी भाग जातो म्हणुन ही संयुक्त संख्या ( Composite Number | Sanyukt Sankhya ) आहे.
१ ही मुळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही.
१०) जोड मुळ संख्या ( Twin Prime Numbers | Jod Mul Sankhya ):-
ज्या दोन मुळ संख्यामध्ये २ चा फरक असतो आणि त्या जोडुन आलेल्या असतात. त्याला जोड मुळ संख्या ( Twin Prime Numbers | Jod Mul Sankhya ) म्हणतात.
१ ते १०० पर्यंत ८ जोड मुळ संख्यांच्या जोड्या आहेत123.
क्र जोडमुळ संख्या क्र जोडमुळ संख्या ०१ ३ व ५ ०५ २९ व ३१ ०२ ५ व ७ ०६ ४१ व ४३ ०३ ११ व १३ ०७ ५९ व ६१ ०४ १७ व १९ ०८ ७१ व ७३
क्र | जोडमुळ संख्या | क्र | जोडमुळ संख्या |
---|---|---|---|
०१ | ३ व ५ | ०५ | २९ व ३१ |
०२ | ५ व ७ | ०६ | ४१ व ४३ |
०३ | ११ व १३ | ०७ | ५९ व ६१ |
०४ | १७ व १९ | ०८ | ७१ व ७३ |
११) सहमुळ संख्या (Co-prime Numbers | Sahamul Sankhya) : -
ज्या दोन संख्या मध्ये १ खेरीज कोणताही सामाईक अवयव नसतो. त्याना सहमुळ संख्या (Co-prime Numbers | Sahamul Sankhya) म्हणतात. यालाच परस्पर मुळ संख्याही म्हणतात.
उदा :- 12 व 35 ,
12 चे अवयव = १, २, ३, ४, ६, १२
35 चे अवयव = १, ५, ७, ३५
यामध्ये सामाईक म्हणजेच सारखा अवयव १ आहे. म्हणुन ह्या सहमुळ संख्या (Co-prime Numbers | Sahamul Sankhya) आहेत
१२) परिमेय संख्या (Rational Numbers | Parimey Sankhya) :-
शून्य छेद सोडून कोणत्याही संख्या अंश किंवा छेद या स्वरूपात लिहिल्या असता त्या संख्येला परिमेय संख्या (Rational Numbers | Parimey Sankhya) म्हणतात.
१ ८ ३ ९
उदा :- , , , इत्यादी
२ ६ ४ ३
१३) अपरिमेय संख्या ( Infinite Numbers | Aparimey Sankhya) : –
कोणत्याही संख्या अंश किंवा छेद या स्वरूपात लिहिल्या असता जर त्या संख्येचा छेद शून्य असल्यास त्या संख्येला अपरिमेय संख्या ( Infinite Numbers | Aparimey Sankhya) म्हणतात.
ज्या संख्येचे अंश किंवा छेद यांचे दशांश अपूर्णांकातील रूपांतर अनंत स्वरूपाचे असते अश्या संख्याना अपरिमेय संख्या ( Infinite Numbers | Aparimey Sankhya) म्हणतात.
उदा :- √(३ ) , √(२ ) इत्यादी या संख्याचे आवर्ती दशांशातही रुपांतर होत नाही.
१४) वास्तव संख्या (Real Numbers | Vastav Sankhya ) :-
सर्व प्रकारच्या परिमेय व अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या (Real Numbers | Vastav Sankhya ) होतात.
१ ८
उदा :- , , √(३ ) , √(२ ) इत्यादी
२ ६
१५) विरुद्ध संख्या (Opposite Numbers | Virudh Sankhya ) :-
ज्या दोन संख्यांची बेरीज ० येते त्या संख्याना परस्परांच्या विरुद्ध संख्या (Opposite Numbers | Virudh Sankhya ) असे म्हणतात.
उदा :- - ८ + ८ = ०,
१६) व्यस्त संख्या ( Vyst Sankhya ):-
ज्या दोन संख्यांचा गुणाकार १ असतो अशा संख्याना परस्परांच्या व्यस्त संख्या ( Vyst Sankhya ) असे म्हणतात.
९ ३
उदा :- , इत्यादी
३ ९
१७) त्रिकोणी संख्या (Triangular number | Trikoni Sankhya) :-
दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या (Triangular number | Trikoni Sankhya) असे म्हणतात.
उदा :- १, ३, ६, १०, १५, २१, २८, ३६ इत्यादी
१८) चौरस संख्या ( Square number | Chauras Sankhya ) :-
कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येस चौरस संख्या ( Square number | Chauras Sankhya ) असे म्हणतात.
उदा :- १, ४, ९, १६, २५, ३६, ४९, ६४, ८१, १०० इत्यादी.
तुम्हाला संख्याचे प्रकार | Types of number System | Sankhya Web ही माहिती नक्कीच आवडली असेल तर मग आपल्या प्रियजनाना शेअर करा.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box