विसर्ग संधी | Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi - The Study Katta

Educational and knowledge enhancing information, question papers, notes, online tests and worksheets are available on The Study Katta sites for students, teachers and parents as well as competitive exam aspirants.

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 17, 2023

विसर्ग संधी | Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi

Visarg Sandhi Marathi

विसर्ग संधी

Visarg Sandhi in Marathi

Marathi Visarg Sandhi

विसर्ग संधी |  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi

विसर्ग संधी |  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi )  :- 

            विसर्ग संधी ( Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi ) यावर स्पर्धा परीक्षेत अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. विशेषतः ५ वी व ८ वी स्कॉलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा, TET Exam, CTET Exam व इतरही अश्या अनेक परीक्षेमध्ये या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आपल्याला मराठी विसर्ग संधी (  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi ) माहित नसल्याने आपले हातातील गुण यामुळे आपल्या मिळत नाहीत म्हणून खासकरून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनसाठी विसर्ग संधी |  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi ) ही माहिती येथे देण्यात येत आहे.
            चला तर मग आपण बघूया विसर्ग संधी |  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi ).

        विसर्ग संधी ( Visarg Sandhi ) बघण्यागोदर आपल्याला संधी म्हणजे काय ते माहित असणे गरजेचे आहे. आपण बोलत असताना आपल्याला नवनवीन शब्दांची ओळख होत असते. बऱ्याच वेळी काही शब्द असतात जे दोन वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेले असतात परंतु आपण त्यांचा उच्चार एकत्र करत असतो.

उदाहरणार्थ :-
'गुरूपदेश' हा शब्द गुरू + उपदेश या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. तसेच

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन

            वरील प्रमाणे जे जोडशब्द तयार होतात त्यांनाच संधी असे म्हणतात.

संधी म्हणजे काय ?

➤ पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुस-या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळून त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' ( Sandhi ) असे म्हणतात.
उदाहरणार्थ :-

विग्रहवर्णसंधीसंधी
ज्ञान + ईश्वरअ + ई = एज्ञानेश्वर
अरूण + उदयअ + उ = ओअरूणोदय
राजा + औदार्यआ + औ = औराजौदार्य
यश: + धन-यशोधन
सम् + आचारम् + आसमाचार
सत् + जनत् + ज् = ज्सज्जन


        तसेच जेव्हा जोडशब्दांना आपण वेगळे करत असतो त्याला आपण त्या जोडशब्दाचा विग्रह म्हणजेच संधीचा विग्रह करणे असे म्हणतो.


संधीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

     स्वरसंधी [ Swar Sandhi ]

     व्यंजनसंधी [ Vyanjan Sandhi ]

     विसर्गसंधी [ Visarg Sandhi ]

            चला तर मग आता पाहूया 'विसर्ग संधी ' ( Visarg Sandhi ) म्हणजे काय ?


हे पण पहा :- आलंकारिक शब्द

विसर्ग संधी म्हणजे काय ?

 जेव्हा दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असून दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा त्या संधीला ‘विसर्ग संधी’ Visarg Sandhi ) असे म्हणतात.

[ विसर्ग संधी = विसर्ग + स्वर / व्यंजन ]

विसर्ग संधीचे नियम

नियम १] विसर्गाच्या मागे ‘अ’ व पुढे मृदू वर्ण असल्यास विसर्गाचा ‘उ’ होतो व तो मागील ‘अ’ मध्ये मिसळून त्याचा ‘ओ’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
यश: + धनयशोधन
मन: + रथमनोरथ
तप: + वनतपोवन
तेज: + निधीतेजोनिधी
मन: + राज्यमनोराज्य
अध: + मुखअधोमुख
अध: + वदनअधोवदन
यश: + गिरीयाशोगिरी



नियम २] विसर्गाच्या मागे ‘अ’ किंवा ‘आ’ सोडून कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा ‘र्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + अंतरनिरंतर
नि: + विकारनिर्विकार
नि: + लोभनिर्लोभ
दु: + जनदुर्जन
दु: + आत्मादुरात्मा
दु: + वासनदुर्वासन
धनु: + विद्याधनुर्विद्या
आशी: + वचनआशीर्वचन



नियम ३] पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘स्’ येऊन दुसऱ्या शब्दाच्या सुरवातीला कोणतेही व्यंजन आल्यास ‘स्’ चा विसर्ग होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
तेजस् + कणतेज:कण
मनस् + पटलमन:पटल

नियम ४] विसर्गाच्या मागे ‘अ’ किंवा ‘आ’ सोडून कोणताही स्वर असून पुढे ‘र्’ आल्यास विसर्गाचा ‘र्’ होऊन त्याचा लोप होतो व मागचा ऱ्हस्व स्वर दीर्घ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + रसनीरस
नि: + रवनीरव


नियम ५] पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ येऊन दुसऱ्या शब्दाच्या सुरवातीला कठोर व्यंजन आल्यास ‘र्’ चा विसर्ग होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
अंतर + करणअंत:करण
चतुर + शृंगीचतु:शृंगी

नियम ६] पहिल्या शब्दाच्या शेवटी ‘र्’ व त्याच्या मागे ‘अ’ असून दुसऱ्या शब्दाच्या सुरवातीला मृदू व्यंजन आल्यास तो ‘र्’ तसाच राहून संधी होते.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
पुनर् + जन्मपुर्नजन्म
अंतर् + आत्माअंतरात्मा
नि: + लोभनिर्लोभ


अपवाद :-  अंतरस्थ = अंतर् + स्थ

नियम ७] विसर्गाच्या मागे ‘अ’ हा स्वर असून पुढे क्, ख्, प्, फ् यांपैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्ग कायम राहतो मात्र पुढे व्यंजना ऐवजी स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो.

उदाहरणार्थ :- 

विसर्गा पुढे व्यंजना आल्यास विसर्गाचा कायम राहतो.

विग्रहसंधी
प्रात: + कालप्रात:काल
अध: + पतनअध:पतन
रज: + कणरज:कण
अंत: + पटलअंत:पटल
तेज: + पुंजतेज:पुंज


विसर्गा पुढे स्वर आल्यास विसर्गाचा लोप होतो.

विग्रहसंधी
अत: + एवअतएव
इत: + उत्तरइतउत्तर


नियम ८] विसर्गाच्या मागे ‘इ’ किंवा ‘उ’ असून पुढे क्, ख्, प्, फ् यांपैकी एखादे व्यंजन आल्यास विसर्गाचा ‘ष’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + कारणनिष्कारण
बहि: + कारबहिष्कार
चतु: + कोषचतुष्कोप
दु: + काळदुष्काळ
नि: + कपटनिष्कपट
नि: + फळनिष्फळ
नि: + पापनिष्पाप
बहि: + कृतबहिष्कृत
दु: + परिणामदुष्परिणाम
नि: + कामनिष्काम



नियम ९] विसर्गाच्या पुढे ‘कृ’ या धातूचे कोणतेही रूप (कर/कार) असल्यास विसर्गाचा ‘स्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
पूर: + कारपुरस्कार
पुर: + कर्तापुरस्कर्ता
पुर: + कारपुरस्कार
भा: + करभास्कर
तिर: + कारतिरस्कार
नम: + कारनमस्कार


 नियम १०] विसर्गाच्या पुढे ‘च्’ किंवा ‘छ्’ आल्यास विसर्गाचा ‘श्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + चलनिश्चल
नि: + चयनिश्चय
दु: + चिन्हदुश्चिन्ह
मन: + चक्षुमनश्चक्षु


नियम ११] विसर्गाच्या पुढे ‘त्’ किंवा ‘थ्’ आल्यास विसर्गाचा ‘स्’ होतो.

उदाहरणार्थ :-

विग्रहसंधी
नि: + तेजनिस्तेज
मनः + तापमनस्ताप
अध: + तलअधस्तल

          तुम्हाला विसर्ग संधी |  Visarg Sandhi in Marathi | Visarg Sandhi Marathi | Marathi Visarg Sandhi ही माहिती आवडली असेल तर शेअर करा. 

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box

Post Bottom Ad